शहरं
Join us  
Trending Stories
1
'आमच्यासाठी शेतकरी महत्वाचे; कितीही दबाव टाका, आम्ही...', ट्रम्प टॅरिफवर PM मोदींचे मोठे विधान
2
Rain Update : बाप्पाच्या स्वागतासाठी पावसाच्या 'पायघड्या'; पुढचे चार दिवस 'झोडपणार', कोणत्या भागांना इशारा?
3
जगातील सगळ्यात महागडी ७ शहरे! 'या' ठिकाणी राहायचा विचार करत असाल तर आताच जाणून घ्या...
4
नागपुरातील रस्त्यांवर कुत्र्यांना खाऊ घालाल तर खबरदार! कारवाईसाठी रहा तयार
5
‘रोजगार महाकुंभ’चे आयोजन; ५०,००० हून अधिक तरुणांना नोकऱ्या देणार योगी सरकार!
6
विमान हवेतच गायब झालं! २२ दिवसापूर्वी तस्मानियाहून उड्डाण केलं होतं; नेमकं काय घडलं?
7
Beed: लक्ष्मण हाके यांच्या गाडीवर गेवराईत हल्ला; आमदार पंडित यांचे कार्यकर्ते आक्रमक
8
क्षुल्लक कारणावरून वाद झाला, बॉयफ्रेंडने गर्लफ्रेंडच्या तोंडात बॉम्ब टाकला अन्...; घटना ऐकून होईल अंगाचा थरकाप!
9
Atharva Sudame : 'अक्कल शिकवतोय, तुझा धंदा मर्यादित ठेव'; अथर्व सुदामेला ब्राह्मण महासंघानेही सुनावले
10
एकाच घरात का केलं दोन्ही मुलींचं लग्न? निक्की भाटीच्या वडिलांनी सांगितलं कारण! म्हणाले...
11
"राज ठाकरे साहेब, आपण..."; हकालपट्टीनंतर वैभव खेडेकरांनी सोडलं मौन, राणेंच्या भेटीबद्दल काय सांगितलं?
12
पंतप्रधान मोदींची डिग्री सार्वजनिक होणार नाही, दिल्ली उच्च न्यायालयाकडून CIC चा आदेश रद्द
13
"गौतम एका ठिकाणी बसून ओरडत होता"; सिंहगड किल्ल्यावरून बेपत्ता झालेल्या तरुणाला पोलिसांनी कसं शोधलं?
14
"कुटुंबाला सांगू नका, लोकांकडून पैसे घेऊन अंत्यसंस्कार करा"; मनातील वेदना कागदावर लिहून तरुणाने संपवलं आयुष्य
15
Video: कार चालकाने अचानक दरवाजा उघडला; क्रिकेटर थेट धडकला, जागीच मृत्यू
16
याला म्हणतात परतावा...! 11403% ने वाढला हा स्टॉक, आता कंपनीला DRDO कडून मिळाली ₹3.36 कोटींची ऑर्डर, शेअरची किंमत 200 हून कमी!
17
मोबाइल हॅक झाला आहे का? हे संकेत ओळखा आणि लगेच पावलं उचला
18
अथर्व सुदामेवर टीकेचा भडीमार, असिम सरोदे मैदानात; म्हणाले, "राज ठाकरेंनी तुझं कौतुक केलंय, तू..."
19
"पप्पांनीच मम्मीला काठीने मारलं, पंख्याला लटकवलं..."; ३ वर्षांच्या लेकीने केली हत्येची पोलखोल
20
भारताने दाखवले मोठे मन; पाकिस्तानला पुराबाबत केले सतर्क, ऑपरेशन सिंदूर नंतर पहिल्यांदाच चर्चा

पुरुषांच्या जगात वेदना असतात?

By admin | Updated: September 3, 2015 21:45 IST

कॉलेजातला कुठलाही प्रोजेक्ट म्हटलं की सगळ्यात सोपा मार्ग म्हणजे एक काहीतरी थीम घ्यायची, शक्यतो सिनिअरनं केलेली थीम फिरवता येईल असं पाहायचं

-  स्नेहा मोरे

प्रोजेक्ट म्हटला की,

कर डाऊनलोड
नी चिपकव काहीतरी!
किंवा करा कॉपी/पेस्ट.
मुंबईतल्या ङोव्हिअर्स कॉलेजमधल्या
मुली मात्र एका प्रोजेक्टसाठी
थेट अशा एका जगात पोहचल्या
जिथं सहजी कुणी बोलत नाही.
पुरुषांच्या जगात
वेदना असतात?
 
तेच शोधणारा एक वेगळा ‘जेंडर’ प्रोजेक्ट
 
कॉलेजातला कुठलाही प्रोजेक्ट म्हटलं की सगळ्यात सोपा मार्ग म्हणजे एक काहीतरी थीम घ्यायची, शक्यतो सिनिअरनं केलेली थीम फिरवता येईल असं पाहायचं किंवा मग सरळ गुगलला शरण जात जे दिसेल ते डाऊनलोड करायचं, चिपकवायचं, झाला प्रोजेक्ट!
काही बेसिक विचार करणं, त्यात काम करणं, प्रत्यक्ष फिल्डचा अनुभव घेणं, त्यासाठी स्वत: काही विचार करणं असं काही घडताना सहसा दिसत नाही!
पण या सा:या टिपिकल वाटेला फाटा देत मुंबईतल्या ङोविअर्स कॉलेजच्या मुलींनी एक भलताच इंटरेस्टिंग प्रोजेक्ट केला.
एक साधं निमित्त झालं. या मुलींना ‘जेंडर’ या विषयावर प्रोजेक्ट करायचा होता.
मग प्राध्यापकांसह सगळे चर्चेला बसले. आणि जेंडर म्हटल्यावर सगळी महिलाविषयक चर्चा, त्यासंदर्भातले पश्न, त्यातल्या अपेक्षा आणि मीडियातून मिळणारी माहिती अशाच दिशेनं गोष्टी फिरू लागल्या.
पण त्यातूनच प्रश्न समोर आला की, जेंडर म्हणजे फक्त महिला का?
पुरुष का नाहीत त्यात?
त्यांचे काही प्रश्न असतील, ते नक्की काय?
पुरुषांच्या संदर्भात आजही समाजात कुठल्या जुनाट परंपरा शिल्लक आहेत, कुठले गैरसमज बाकी आहेत, नवे काही प्रश्न कालानुरूप निर्माण होत आहेत का?
या सा:या प्रश्नांतून मग याच विषयावर प्रोजेक्ट करायचं ठरलं.
यासंदर्भात प्रोजेक्ट करणा:या मुलींचे गाइड असलेले इतिहास व मानव हक्क विभागाचे प्राध्यापक अवकाश जाधव सांगतात, गेली कित्येक र्वष ‘मॅन शुल्ड नॉट क्राय’ हेच बाळकडू प्रत्येक घरात मुलांना दिलं जातं. मग तरुण मुलं कुणासमोर रडत नाहीत, बोलत नाहीत. रडणं हे त्यांना कमीपणाचं वाटतं. त्यांच्या वाटेला येणारे प्रश्नही कुणाला कळत नाहीत. पुरुषांच्या विशेषत: तरुणांच्या जगात काय चाललंय हे समजून घ्यायचा आणि वास्तव उलगडायचा प्रयत्न या सव्रेक्षणातून करायचं असं आम्ही चर्चेतून ठरवलं. मात्र हा विषय नवीन असल्यानं या सव्रेक्षणासाठी विद्यार्थिनींनी वेगवेगळ्या पैलूंनी अभ्यासात्मक निरीक्षण सुरू केलं. माहिती जमवली, रेफरन्स काढले. प्रश्न तयार केले. आणि मग प्रत्यक्ष फिल्डवर जाऊन थेट पुरुषांकडून उत्तरं जमवायला सुरुवात केली. मुंबईतील डॉक्टर, इंजिनिअर्स, व्यावसायिक,  शिक्षक, सुरक्षारक्षक, पोलीस अधिकारी यांच्यासह तब्बल दोन हजार सर्वसामान्य महिला आणि पुरुषांशी संवाद साधून हे सव्रेक्षण करण्यात आलं. 977 महिला आणि 1023 पुरुषांशी यानिमित्तानं प्रत्यक्ष या मुली बोलल्या.
प्रश्नावलीपलीकडे या विषयासंदर्भातली कोंडी नेमकी काय आहे हे त्यांनी समजून घेतलं.
त्यात अनेक तरुणांनी सांगितलं की, महिला आम्हाला त्रस देतात. बाई असल्याचा धाक दाखवून ब्लॅकमेल करतात. घरात छळ होतो, दमदाटी होते.
हे सारं ऐकणं, समजून घेणं, जेंडर या प्रश्नाचा दुस:या बाजूनं विचार करणं हे सारं या मुलींसाठीही नवीनच होतं.
या सव्रेक्षणात सहभागी झालेली श्रुती नायर सांगते, ‘‘विविध स्तरातील व्यक्तींशी बोलताना चांगले-वाईट अनुभव आले. काही पुरुष बोलायचेच नाहीत. असा काही विषय म्हटल्यावर तर अजिबात बोलत नाहीत. त्यांना बोलतं करणं, त्यातून वेगळ्याच बाजूनं काही गोष्टी ऐकून घेणं हे आमच्यासाठी नवीन होतं.’’
आपल्याला त्रस होत असेल तर बायका घडाघडा बोलतात, पण पुरुष बोलत नाहीत, अजिबात काही न सांगता गप्प बसतात हा अनुभव या मुलींसाठीही नवाच होता. 
याच सव्रेक्षणात सहभागी झालेली शिवानी पाटकर म्हणते, ‘‘महिलांवर होणा:या अन्यायासोबतच पुरुषांच्या प्रश्नांकडे समाजयंत्रणांचे लक्ष वेधण्यासाठी प्रयत्न झाले पाहिजे असं आता वाटतंय. आमच्या निरीक्षण आणि अभ्यासातून धक्कादायक वास्तव समोर आले आहे हे खरंच; पण पुस्तकी ज्ञानाच्या पलीकडे जाऊन शिक्षणाच्या वाटा हुडकण्याचा आणि समाजातून थेट वास्तव अनुभवण्याचा हा एक उपक्रम आम्हाला खूप काही शिकवून गेला!’’
आपण जरा दृष्टिकोन बदलला की जगातले वेगळेच प्रश्न समोर येतात, हा अनुभव या मुलींसाठीही खूप वेगळा ठरला!
प्रोजेक्ट म्हणजे नुस्तं कॉपी/पेस्ट आणि डाऊनलोड नव्हे, हे सांगण्यापलीकडचं जग दाखवणारा एक भन्नाट अनुभव!
 
 
 
 दीड महिना मुलींनी हे सव्रेक्षण केलं. विषयातून थेट समाजाला भिडण्याचं कौशल्य पडताळून पाहण्याची संधी तर त्यांना मिळालीच; पण एक मोठं कामही त्यांनी केलं. आता या अभ्यासाचे निष्कर्ष ‘वास्तव’ या समाजसेवी संस्थेच्या मदतीनं समाजासमोर ठेवणार आहोत. तसंच हा अहवाल विश्वविद्यालय अनुदान आयोगाकडे (यूजीसी) पाठविण्याची प्रक्रियाही सुरू झाली आहे.
 
- प्रा. अवकाश जाधव
सेंट ङोविअर्स महाविद्यालय, मुंबई
 
सव्रेक्षणात सहभागी विद्यार्थिनी- किरण जाधव, अरुनिमा तिकू, मिलोनी राठोड, शिवानी पाटकर, श्रुती नायर, शिविरा मुखर्जी, डेनी रोड्रीग्स, अथीना काडरेज, श्रुती वाल्देरो, किरण डिसोझा आणि रेचल परेरा.
 
  स्त्रिया कायद्याच्या संरक्षणाचा गैरफायदा घेतात?
- 66.35 टक्के - होय
- 33.65 टक्के - नाही
 
पुरुषांवर अत्याचार होतात का?
- 69.2 टक्के - होय
- 30.08 टक्के - नाही
 
पुरुष विकास कक्षाची गरज आहे का?
- 72.95 टक्के - होय
- 27.05 टक्के - नाही
 
बाईने हात उचलला तर तुम्ही उचलणार का?
- 37.35 टक्के - होय
- 62.62 टक्के - नाही
 
- पुरुषांवर होणा-या शारीरिक आणि मानसिक अत्याचारात वाढ होतेय, असे 73 टक्के महिला व पुरुषांनी म्हटले आहे.