शहरं
Join us  
Trending Stories
1
“आमचा युद्धसराव झालेला आहे, महापालिका निवडणुकांसाठी तयार”; संजय राऊतांचा निर्धार
2
महापालिका, स्थानिक स्वराज्य संस्थेच्या निवडणुका महायुती एकत्र लढणार का? CM फडणवीस म्हणाले...
3
'ही' आहेत पाकिस्तानातील श्रीमंत शहरं? मुंबई-दिल्लीशी तुलना करायची झाली तर...
4
“आता राज्य सरकारने स्थानिक स्वराज्य संस्थेच्या निवडणुका घेण्यास चालढकल करू नये”: जयंत पाटील
5
कानड्यांनो, बापाला सॉरी म्हणायला लावता राव?; अवधूतने सोनू निगमची बाजू घेत लिहिली कविता
6
भारत-पाकिस्तानमध्ये झालेली युद्धं किती दिवस चालली? एवढ्या दिवसांत उडाला होता पाकड्यांचा फज्जा
7
जादू की झप्पी! रुग्णांना बरं करणारी 'हग थेरपी' आहे तरी काय?, फायदे ऐकून तुम्हीही माराल मिठी
8
माझाही पक्ष आहे, भाजपाने विचारलेही नाही, राहुल गांधींनी सन्मानाची वागणूक दिली: महादेव जानकर
9
Amazon Prime सबस्क्रिप्शनसाठी पैसे खर्च करू नका; Jio, Airtel आणि Vi च्या रिचार्जवर मोफत मिळतंय
10
Nashik: जाधव बंधू हत्येनंतर ठाण्यात आला अन् ओळख लपवून राहू लागला, अखेर पोलिसांना सापडलाच
11
आता बिगुल वाजणार! "४ आठवड्यांच्या आत..."; स्थानिक स्वराज्य संस्थांच्या निवडणुकीबद्दल SC चा महत्त्वाचा निकाल
12
मॉकड्रिलमुळे ताज्या झाल्या भारत-पाकिस्तान युद्धाच्या आठवणी; १९६५ आणि १९७१च्या युद्धावेळी काय घडलेलं?
13
सूत जुळलं! ३ मुलांची आई असलेली हॉटेलची मालकीण १९ वर्षीय मजुराच्या पडली प्रेमात अन्...
14
"पहलगाम हल्ल्याच्या तीन दिवस आधी पंतप्रधान मोदींना पाठवला होता गुप्तचर अहवाल"; मल्लिकार्जुन खरगेंचा मोठा दावा
15
Cashless Treatment Scheme: अपघातातील जखमींवर होणार कॅशलेस उपचार, नवी योजना लागू; केंद्राने काढली अधिसूचना
16
बाजार पुन्हा घसरला! बँक ऑफ बडोदाला मोठा धक्का; 'या' सेक्टरमधील शेअर्सही विखुरले
17
भारत-पाक तणावाच्या पार्श्वभूमीवर दिल्लीत LRAD यंत्रणा सज्ज, हल्ल्याची तात्काळ मिळणार सूचना
18
उशीर झाल्याने परीक्षा हुकली, नैराश्यातून विद्यार्थ्याचा आत्महत्येचा प्रयत्न, पोलिसांनी वाचवले प्राण
19
'राम तेरी गंगा मैली'मधील मंदाकिनीच्या भूमिकेसाठी 'रामायण'मधील सीतेनं दिलेलं ऑडिशन, पण...
20
"पाय खूप सुजतात, नीट जेवणही नशिबात नसतं"; केदारनाथच्या पिठ्ठूची डोळे पाणावणारी गोष्ट

त्यानं कमी पैशात घरबसल्या पिकवले मशरुम आणि...

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: November 28, 2019 12:22 IST

वेगन खाण्याचा ट्रेण्ड आहे, त्यात मशरूमची चलती म्हणून मग मी ठरवलं घरातच मशरूमची लागवड केली

ठळक मुद्देमागणी कशाला आहे याचा विचार करून मी हे नवीन पीक घेत त्यावर प्रयोग करत आहे.

- आदित्य नांदूरकर

लहानपणापासून क्रिकेटचा खूप नाद. आज पदवी झाली, पण तो नाद ‘जैसे थे’. अभ्यासक्रम पूर्ण करून सहा-सात महिन्यांचा काळ उलटला असेल. अकोल्याला शिकत असताना एका मित्राने ‘मशरूम’ नावाचं एक बी माझ्या डोक्यात पेरलं होतं. तसं मशरूमबद्दल कुतूहल आधीपासूनच होतं. भंडार्‍याला असताना मी पहिल्यांदाच ‘मशरूम’ चाखलं होतं.हळूहळू मग त्याबद्दल माहिती काढायला सुरुवात केली. उत्साह पण वाढतच होता. एकदिवस आयसीएआरची साइट हाती लागली. पाहून तसा धक्काच बसला होता. मशरूमच्या पृथ्वीवर 12 ते 15 हजार जाती आहेत. त्यापकी 8 ते 9 हजार खाण्यायोग्य आहेत. म्हणजे काम थोडं मोठं होतं. एकतर अ‍ॅग्रिकल्चर डिग्री त्यात आरएडब्ल्यूसीला पॅथॉलॉजी विषय.मग आता काही सुरू करावं म्हटलं तर भांडवल आलंच. ठरवलं होतं घरी पैसे मागायचे नाही. सोबतच मला माझा प्रोजेक्ट कमीत कमी खर्चात जास्त उपयुक्त करायचा होता. जेणेकरून सर्वसामान्य शेतकर्‍यांना कमी खर्चात अपारंपरिक पीक उपलब्ध होईल.टेरेसवर फिरत असताना मला भंगार दिसलं, माझ्या घरी खूप भंगार होतं. माझ्या रूममध्ये होतं. होस्टेलवर असताना घरच्यांनी माझ्या रूमचं स्टोअर रूम कधी केलं कळलंच नाही. मी विनाकामाचा पूर्ण भंगार विकला व सहज 2000-3000 रु. मिळवले. थोडे कमीच होते, पण काम चालवायला पुरेसे होते.मग सुरुवात केली ऑस्टर मशरूमपासून. लागवडीस लागणारा कुटार मला वडिलांच्या मित्राच्या शेतातून सहज उपलब्ध झाला. आता चिंता होती शेडची. मशरूमची लागवड एका बंद तापमान नियंत्रित खोलीत स्वच्छ व काळजीपूर्वक वातावरणात पार पाडावी लागते. मग माझी रूम आठवली जिथे भंगार होता. ती मोकळीच झाली होती तिथे वातावरण तयार करून मी लागवडीस सुरुवात केली.लागणारं साहित्य जसे दोरी, प्रोपेलिन बॅग, स्प्रेअर इ. घेऊन आलो. आता वेळ होती स्पॉन (मशरूमचं बियाणं) ते कृषी विज्ञान केंद्र अमरावती येथून सहज उपलब्ध झालं.सुरुवातीला कुटार उकलून स्टरलाईज (निजर्तुक) केलं. पाणी काढून थंड झाल्यावर पॉलिप्रोपेलिन बॅगमध्ये दोन इंचाचा बेड आणि बॅगच्या गोलाकार कोपर्‍याला थोडं स्पॉन अशा चार लेअर बनवून बॅगचं तोंड बंद करून साधारणतर्‍ बॅगला 8-10 छिद्र करून त्या नियंत्रित तापमानात ठेवल्या, अशा पाच किलो स्पॉनपासून मी 50 बॅग्स तयार केल्या होत्या.साधारणतर्‍ एका 18-25 इंच बॅगला 80-100 गॅ. स्पॉन व 2 किलो निजर्तुक सबस्ट्रो हवा. मशरूमच्या एका लागवडीतून शेतकर्‍यांना तीन वेळा उत्पन्न घेता येतं. दोन-तीन दिवसातच वाढ दिसत होती आणि 15-20 दिवसातच त्याचं जाळं पूर्ण बॅगभर पसरवलं होतं. बॅग पूर्ण पांढरी झाली. बॅग ब्लेडच्या साहाय्याने काळजीपूर्वक थोडी झाडून रोज दिवसातून दोन-तीन वेळा फाडून पाण्याचा स्प्रे दिला. 24 व्या दिवशी पिनहेड निघायला सुरुवात झाली आणि 28 व्या दिवशी माझं उत्पादन माझ्या हातात होतं.  मग हार्वेस्टिंग, प्रोसेसिंग, पॅकेजिंग घरीच केली व थेट मार्केट गाठलं. सोशल मीडियावर मार्केटिंग सुरूच होतं. सोबतच काकांचं पण मार्गदर्शन होतं. काका अमरावतीलाच व्यावसायिक आहेत. लोकांचा प्रतिसाद मिळत होता, सोबतच पैसेही. मात्र काम अजून पूर्ण झालेलं नव्हतं, मी एकापाठोपाठ तीन जातींची लागवड केली.1) रं1‘ं1्र 823ी1 (तपकिरी रंग)2)स्र्रल्ल‘ 823ी1 (गुलाबी रंग)3) ा’1्रंि 823ी12 (पांढराशुभ्र रंग)आणि हळूहळू माझ्या घरच्या खाली ब्लॉकमध्ये पण लागवडीला सुरुवात झाली.नेटवर माहिती काढताना एका व्यापार्‍याचा नंबर मिळाला. तीन दिवस त्यांच्यासोबत राहून जितकं शिकता आलं शिकलो. त्यांनी पण मला निर्‍स्वार्थ मदत केली. धनविजय  नाव त्याचं.2019 च्या जानेवारीला ज्ॉकपॉट हाती आला. धनंजयला माझा कामाची कल्पना होतीच, त्याच्या कृपेने मला एका प्रदर्शनात स्टॉल उपलब्ध झाला. चांगले लोक येणार होते. माझ्या प्रॉडक्टची पॅकेजिंग पण तितकी आकर्षक नव्हती, पण, ग्राहकांच्या प्रश्नांचे व्यवस्थित आणि सकारात्मक उत्तरे देऊन मी तिथनं बरंच भांडवल गोळा केलं होतं. सध्या वेगन फूडचा ट्रेंड आला आहे आणि मशरूम हे एक परफेक्ट वेगन फूड आहे आणि समोर हा ट्रेंड वाढणारच आहे याची कल्पना मशरूमचा चढता आलेख बघून येईलच. तो तुम्हाला आयसीएआरच्या साइटवर मिळेलच. वडिलांच्या शिकवणीच्या पेटार्‍यात एक शिकवण अशी पण होती की निसर्गातून तू जे काही घेशील त्याच्या मोबदल्यात त्याला काही देण्याचा प्रयत्न कर.मग मी मशरूमच्या अफ्टर हाव्रेस्टेड निकामी झालेला बेडपासून खत बनवल व ते झाडांना दिलं आणि घरच्या त्या झाडांना आनंदाने डोलताना पाहून खरंच निसर्गाला काही दिल्यासारखं वाटलं. समोर खत वापरून मी बॉटल गार्डनिंग पण करणार आहे म्हणजेच प्लॅस्टिकच रूपांतर एका सुंदर ऑक्सिजन देणार्‍या झाडात होईल आणि माझी निकामी बॅगची चिंतापण मिटेल.या प्रवासात सुरुवातीपासूनच शुभम आणि कुणाल माझ्यासोबत होते. शुभम आता केव्हीके अमरावती येथे शेतकर्‍यांच्या सेवेत असतो व कुणालचं ऑटो स्पेअरपार्टच शॉप आहे. तो जॉबपण करतो.पण मशरूमच का?ओलं मशरूम साधारणतर्‍ 250 ते 400 रु. किलोने रिटेल मार्केटला असतात तसेच वाळवलेले मशरूम 500 ते 2000 रुपयांच्या घरात खेळतात ते मशरूमच्या ग्रेडिंग आणि क्वॉलिटीवर अवलंबून असतं. याची चव, गुणधर्म तसेच लागवडीस घेणार्‍या काळजीमुळे हे इतके महाग असतात.मागणी कशाला आहे याचा विचार करून मी हे नवीन पीक घेत त्यावर प्रयोग करत आहे.