शहरं
Join us  
Trending Stories
1
भाजपाच्या मित्रपक्षांमध्ये वाद, NDA सरकारमध्ये वाढली डोकेदुखी; बंद दाराआड बैठक घेणार
2
हे जग सोडून गेलेल्या बहिणीच्या हाताने रक्षाबंधन! वलसाडच्या भावासाठी 'ती' जिवंत हात घेऊन आली...
3
'या' देशातील लोक आता आपला पत्ताच बदलणार; संपूर्ण देश ऑस्ट्रेलियामध्ये सामील होणार! कारण काय?
4
ICICI Bank Minimum Balance: आता ₹१०००० नाही, बचत खात्यात ₹५०००० चा मिनिमम बॅलन्स ठेवावा लागणार, 'या' दिवसापासून नियम लागू होणार
5
हृदयद्रावक! रक्षाबंधनासाठी येणाऱ्या भावासोबत आक्रित घडलं, वाट पाहत होत्या बहिणी पण...
6
लफडं! पतीचे हात तोडले अन् १० वर्ष लहान भाच्यासोबत पळाली मामी; नात्याला काळीमा फासणारी कहाणी
7
पाकिस्तानात मोठ्या राजकीय घडामोडी...! संसदेच्या विरोधी पक्षनेत्याला पदावरून काढले, पीटीआयचे अनेक नेते अडचणीत
8
स्थानिक संस्थांच्या निवडणुकीत अद्याप आघाडी नाही; मविआबाबत संजय राऊतांचं मोठं विधान, 'मनसे' युतीचे संकेत
9
अमूल, पार्ले-जी, गोदरेज... अमेरिकेच्या टॅक्सपासून वाचण्यासाठी भारतीय कंपन्यांचा 'जुगाड', उचलू शकतात 'हे' पाऊल
10
"तिला कितीदा समजावले, तरीही दुसऱ्या मुलांशी बोलत राहिली"; संतापलेल्या प्रियकराने असा काढला राग अन्...
11
बलात्काराची खोटी तक्रार; माजी महिला बँक कर्मचाऱ्याला अटक
12
...तर अमेरिकेत १९२९ सारखी महामंदी येईल; डोनाल्ड ट्रम्प यांनी अमेरिकेलाच दिली धमकी
13
Bank of Baroda मध्ये जमा करा ₹२,००,००० आणि मिळवा ₹३०,२२८ रुपयांचं फिक्स व्याज, पाहा स्कीमच्या डिटेल्स
14
रक्षाबंधनाच्या दिवशी दोन जवान धारातीर्थी पडले; कुलगाममध्ये एक दहशतवादी ठार, मोठी चकमक सुरु
15
रशिया-युक्रेन युद्धालाही मिळणार पूर्णविराम? 'या' दिवशी डोनाल्ड ट्रम्प घेणार पुतिन यांची भेट
16
तरुण असो वा वृद्ध.., पोस्टाच्या या जबरदस्त स्कीमनं घरबसल्या करू शकता कमाई; 'या' ट्रिकनं दरवर्षी मिळतील ₹१,११,०००
17
मृत अर्थव्यवस्था? मग हा वाढीचा ७% वेग कोणाचा हो राष्ट्राध्यक्ष ट्रम्प? अरविंद पनगढियांचा पलटवार
18
राहुल गांधी, आव्हान स्वीकारा! ...जेणेकरून ‘दूध का दूध, और पानी का पानी’ होईल.
19
उत्तरकाशीतून ६५० लोकांना बाहेर काढण्यात यश; ३०० लोक अजूनही अडकल्याची भीती, धरालीमध्ये बचावकार्य सुरू
20
Raksha Bandhan Shubh Muhurt: राखी बांधण्यासाठी साडेसात तासांचा शुभ मुहूर्त; सुरु झाला, कधी संपणार... अख्खा दिवस नाहीय...

भेटा 19 वर्षाच्या आशियातल्या पहिल्या आर्यन गर्लला! नाशिकची रविजा सिंगल सांगतेय, आर्यन गर्ल होण्याचा प्रवास.

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: December 13, 2018 10:41 IST

रविजा सिंगल. नाशिकचे पोलीस आयुक्त रवींद्र सिंगल यांची कन्या. फक्त 19व्या वर्षी तिनं आयर्न मॅन ही स्पर्धा नुकतीच यशस्वी पूर्ण केली. ही स्पर्धा पूर्ण करणारी ती भारतातीलच नव्हे तर आशिया खंडातली सगळ्यात तरुण खेळाडू ठरली आहे. तो विक्रम आपल्या नावावर कोरणार्‍या रविजाचा हा खास लेख. तिच्याच शब्दांत यंगेस्ट आयर्न गर्ल होण्याचा प्रवास

ठळक मुद्देआयर्न मॅनचं आव्हान स्वीकारलं तेव्हा

रविजा सिंगल

मी नॅशनल स्विमर होतेच. तसं ट्रेन केलं होतं स्वतर्‍ला. भरपूर एफर्ट्स करत होते. पण मनासारखे रिझल्ट मिळत नव्हते. मला वाटतं होतं की, पुढं काही घडत नाहीये. सॅच्युरेशन आलं आहे. त्याचवेळी मनानं उचल खाल्ली होती की, काहीतरी वेगळं करावं. असं काहीतरी करावं जे आपल्याला चॅलेजिंग वाटेल. तसं काय करायचं याचा विचार करत असताना ट्रायथलॉनचा पर्याय समोर आला. पण मला तरी ते अशक्यच वाटत होतं. मी नियमित पोहण्याचा सराव करत असले तरी मी सायकलिंग आणि रनिंग असं क्रीडा प्रकार म्हणून कधीही केलं नव्हतं. माझे जीम ट्रेनर मुस्तफा टोपीवाला सर म्हणत होते की, हे कर, जमेल तुला. त्याचवेळी आम्हाला कळलं होतं की, मी आयर्न मॅन स्पर्धेत भाग घेऊन ती यशस्वी पूर्ण केली तर मी आशियातली सगळ्या ‘यंगेस्ट’, सगळ्यात तरुण फिनिशर असेल. आजवर माझ्या वयाच्या कुणीच मुलीनं हे केलेलं नाही. म्हणजे आता माझ्यासमोर आव्हान दुहेरी झालं होतं. मग ठरवलं, आता तर करूच या!अर्थात ठरवणं आणि करणं यात फरक असतोच. हे ट्रायथलॉन प्रकरण सोपं नसतंच. मात्र माझ्या घरातच माझ्यासमोर ती स्पर्धा पूर्ण करण्याचं आदर्श उदाहरण होतं. माझ्या वडिलांनी ती स्पर्धा पूर्ण केली होती. त्यांचा सराव मला प्रेरणा देत होताच. आजूबाजूचं वातावरणही पोषक होतं. मात्र हे ट्रेनिंगच पूर्ण वेगळं होतं. जरी आपण हे चॅलेंज घ्यायचं असं मी ठरवलेलं असलं तरीही ते एका रात्रीत घडलं नाही. ते घडत गेलं. इन द फ्लो, इट स्टार्टेट हॅपनिंग! कुठलाही खेळ आपण खेळू लागतो, तेव्हा सुरुवातीला त्यात वेदनाच असतात. शरीर अ‍ॅडजस्ट होत नाही तोर्पयत वेदना होतात. तेव्हाही झाल्याच. काय करावं, कसं करावं कळत नव्हतं. कधी कधी वाटायचं ‘मै क्यूं करू?’ 19 वर्षाचे आहोत आपण फक्त, कशाला करायचं हे? माझ्या वयाचे बाकीचे मुलंमुली तर नाही करत, मग मीच कशाला करू, सोडून दिलं तर?पण सोडण्याचा तर प्रश्नच नव्हता. कारण हे आव्हान मीच माझ्यासाठी निवडलं होतं. कुठलाच खेळाडू असा खेळ सोडून माघार घेत नसतो. पण तरी काही क्षण एकटेपणाचे यायचे. भयंकर मानसिक थकवा आल्यासारखं व्हायचं. पण त्यावेळी सोबत प्रोत्साहन देणारी माणसं होती. माझे मित्रमैत्रिणी होते, ते म्हणत, ‘रविजा, इट्स ओके, यू आर ऑन सच अ गुड लेव्हल !’ हे असं इतरांनी सांगणं की, रविजा होईल, जमेल तुला, जमतंय! हेसुद्धा फार महत्त्वाचं होतं.माझ्या वडिलांनी आयर्नमॅन स्पर्धा फ्रान्समध्ये जिंकली. ऑगस्टमधली ही गोष्ट. तेव्हा मीही त्या स्पर्धेत भाग घेतला होता. पण केवळ 5 मिनिटांसाठी माझं जेतेपद हुकलं. आपण ते पूर्ण करू शकलो नाही हे मनाला खटकत होतं. एवढे प्रय} पाण्यात गेले हे काही मन मानायला तयार नव्हतं. मी परत आले आणि स्वतर्‍शीच ठरवलं की, रविजा, गिव्ह इट अ वन मोअर चान्स. मी स्वतर्‍लाच एक हलकं ‘पुश’ केलं. त्यादिवशी चान्स गेला आपला; पण आपण फिजिकली वेल ट्रेण्ड आहोत. मग ठरवलं, पुन्हा भाग घ्यायचा.ट्रेनिंग जोरात सुरू झालं. आधी आव्हान दुहेरी होतं, आता तर प्रेशरही दुहेरी झालं. एकदा नाही झालं, यावेळी तरी पूर्णच व्हायला हवं हे मनात होतं. माझ्या पपांनी केलंय, म्हणजे ते करता येऊ शकतं हेही मनात होतं. पण ते सारं बाजूला ठेवून मी फक्त माझ्या गेमवर फोकस करत राहिले.स्वतर्‍शी बोलत होते. डिसकनेक्ट करून टाकलं स्वतर्‍ला सगळ्यापासून. फक्त स्वतर्‍वर लक्ष केंद्रित करत होते. स्पर्धेच्या आधी तर माझा फोनही मी देऊन टाकला होता. मला कुणाशीच बोलायचं नव्हतं, मला एकच माहिती होतं, मला हातात तिरंगा घेऊन ती फिनिश लाइन वेळेत क्रॉस करायची आहे. आणि मी करेनच!

अर्थात ऑस्ट्रेलियातली ही स्पर्धा सोपी नव्हती. पाणी खारं होतं. ते पोहताना तोंडात गेलं की ढवळायचं. सायकलिंग करायचं तर वारा उलटय़ा दिशेनं वाहत होता; पण तरी माझी मेण्टल स्ट्रेंथ उत्तम होती, मी ठरवलं होतं, यावेळी करायचंच.आणि मी केलंही !त्याक्षणी मी जे रडलेय. ते आनंदाचे, पूर्ण समाधानाचे अश्रू मी आयुष्यात पहिल्यांदा अनुभवले. दिवसाला पाच दिवस पहाटे 3 वाजता उठून पळायला जात होते, ट्रेनिंग करत होते. बारा-बारा तास ट्रेनिंग करत होते. ते सारे शारीरिक, मानसिक श्रम आता निवले होते. आणि त्याहून महत्त्वाचं म्हणजे माझ्या पप्पांची शाबासकी. त्यांनी स्वतर्‍ ती स्पर्धा पूर्ण केली आहे, त्यामुळे माझा आनंद ते जाणून होते. ते जेव्हा म्हणाले, ‘बेटा अच्छा किया !’ तो क्षण अत्युच्च आनंदाचा होता. माझ्या घरच्यांना, माझ्या आईबाबांना माझा अभिमान वाटला ते फार मोलाचं आहे..जिंकणं म्हणजे काय हे अनुभवून आता पुढचा प्रवास सुरू झाला आहे.