शहरं
Join us  
Trending Stories
1
अजितदादांनी खरपूस समाचार घेतला; निलेश लंकेंनी वेगळाच आरोप करत वादाची दिशा बदलली!
2
Amit Shah : "मोदी देशाचं नेतृत्व करत राहतील यात कन्फ्यूजन नाही"; अमित शाह यांचा केजरीवालांवर पलटवार
3
मुंबई इंडियन्स-कोलकाता नाईट रायडर्स सामना रद्द होण्याची शक्यता! महत्त्वाचे अपडेट्स 
4
इशान, श्रेयस यांना BCCI करारातून कोणी वगळले? वाचा जय शाह यांनी कोणाकडे बोट दाखवले
5
‘खरोखरच काही झालं होतं की नाही देवास ठाऊक’, रेवंत रेड्डी यांनी एअर स्ट्राईकवर उपस्थित केलं प्रश्नचिन्ह   
6
करीना कपूर अडकली कायद्याच्या कचाट्यात, प्रेग्नंसीसंदर्भातील पुस्तकावर 'बायबल'चा उल्लेख
7
धोनीला नक्की काय झालं? सामना संपल्यानंतर पुरस्कार स्वीकारण्यासाठी न आल्याने रंगली चर्चा
8
Arvind Kejriwal : "मी 140 कोटी लोकांकडे भीक मागायला आलोय, माझा देश वाचवा"; अरविंद केजरीवाल कडाडले
9
लोकसभेच्या निकालानंतर संजय राऊत, उद्धव ठाकरे यांना अज्ञातवासात जावं लागेल, चंद्रशेखर बावनकुळेंचा टोला
10
२७ वर्षांनंतर सिनेइंडस्ट्रीला रामराम करून अध्यात्माकडे वळली अभिनेत्री, बनली साध्वी
11
"सत्तेचा गैरवापर करणे ही पंतप्रधान मोदींची खासियत"; शरद पवार यांचा शिरूरमधून हल्लाबोल
12
एक-एक गोष्टी बदलत आहेत, हे मंदिर मी उभं केलंय...; Rohit Sharma चा व्हिडीओ KKRकडून डिलीट
13
औरंगाबादमध्ये मतविभाजनाने फिरवला होता निकाल; यावेळचं 'गणित' वेगळं, कोण बाजी मारणार? 
14
'भाजप पुन्हा जिंकला तर उद्धव ठाकरे तुरुंगात जातील'; केजरीवालांचा गंभीर आरोप
15
Patel Engineering Ltd: वर्षभरात पैसे दुप्पट, ३ वर्षांपासून शेअर देतोय जबरदस्त रिटर्न; एक्सपर्ट बुलिश, म्हणाले...
16
EPFO: तुमचा मोबाइल नंबर बदलला असेल तर घरबसल्या कसा कराल अपडेट? पाहा प्रोसेस
17
'आता KKRला सोडून जाऊ नको' म्हणत चाहत्याला फुटलं रडू, प्रेम पाहून गौतम गंभीरही झाला नि:शब्द (video)
18
भारीच! 18 तास काम केल्यावर 1000 रुपये मिळायचे; आता फुलांच्या शेतीतून झाला करोडपती
19
Fact Check : "मी तुम्हाला बेरोजगार करेन..."; योगी आदित्यनाथ यांच्या Video मागचं जाणून घ्या, 'सत्य'

Don't think always I love you- बी किडुडेचं गाणं तुम्ही ऐकलंय का?

By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: September 19, 2019 7:15 AM

तारबची राणी म्हणून ती जगभर गाजली. तिच्या संगीतानं तरुण मुला-मुलींना दीवानं केलं; पण तेवढंच न राहता तिथं प्रत्यक्ष कृतीतून बंधनं झुगारली आणि आपल्या संगीतालाही नवी ओळख मिळवून दिली.

ठळक मुद्देतारबचं ग्लॅमर जगभरात रुजवून त्या गेल्या. हे वलय अजूनही आफ्रिका खंडात आहे.     

- शिल्पा दातार-जोशी

एकदा माझ्या व्हॉट्सअ‍ॅपवर एक व्हिडीओ आला. एक आफ्रिकन वंशाची गडद रंगाची वृद्ध स्री वाद्यवृंदात आली. ठेक्यात गाऊ लागली. भाषा अगम्य होती. त्यामुळे बोल अजिबात कळले नाहीत. भजनकरी मंडळी भजन करता करता समोरच्या श्रोत्यांना कितपत समजलंय याचा अंदाज घेत असतात, मधूनच मिश्कील हसत असतात, तसाच भाव त्या स्रीच्या सुरकुतलेल्या चेहर्‍यावर होता; पण समोरचा आबालवृद्धांचा प्रेक्षकवर्ग अक्षरशर्‍ त्या गाण्यावर ताल धरू लागला. नाचू लागला. त्या स्रीनं रंगीबेरंगी गाउन आणि डोक्यावर वेगळ्याच पद्धतीनं एक कापड बांधलं होतं. गळ्यात नेकलेसही होता. तिचं वय, आवाज आणि आत्मविश्वास पाहून वाटलं, कोण असेल ही? नक्की काय म्हणत असेल? तिच्या तोंडचे शब्द ऐकून हसूही आलं; पण नंतर ही नक्की कोण, हा शोध घ्यायचा असं ठरवलं. तो घेता घेता पूर्व आफ्रिका आणि त्यामधलं सामाजिक-आर्थिक-धार्मिक-सांगीतिक दालनच खुलं झालं. महिलांचं शोषण, त्यांच्यावरील बंधनं, संगीतातली चाल या बाबींमध्ये आपला देश व टांझानिया, झांजीबारमध्ये कुठंतरी साधम्र्य जाणवलं. हे जिच्यामुळं झालं ती स्री म्हणजे बी किडुडे. विषय गंभीर, सामाजिक असला तरी तरु णाईला चटकन समजणार्‍या, त्यांना ठेका धरायला लावणार्‍या संगीत-नृत्यातून तो सांगितल्यामुळे बी किडुडे महत्त्वाची ठरते.  I am laughing, but not happyMy heart is brokenYou don't care for meDon't think always I love youएकेकाळच्या पूर्व आफ्रिकेतल्या स्वाहिली किंवा अरबी स्रीची कहाणी आपल्या कणखर आवाजातून, पारंपरिक गाण्यातून दाखवणारी फातुमा बिंटी बराका म्हणजेच बी किडुडे. या तारब गायिकेनं तब्बल 50 र्वष आफ्रिका, युरोप, अरब देशांमध्ये अधिराज्य गाजवलं. भारताप्रमाणेच महिलांनी सार्वजनिक ठिकाणी गाणं बजावणं हे पाप मानलं जायचं; पण सिटी बिंटी साद या बंडखोर स्रीनंतर फातुमा बिंटी बराका यांनी पूर्व आफ्रिकेत सार्वजनिक ठिकाणी ड्रमच्या साहाय्याने पारंपरिक गाणी म्हणायला सुरु वात केली. बंडखोरीचं दुसरं नाव फातुमा किंवा लिजेंड ऑफ इस्ट आफ्रिका असं बी किडुडे यांना म्हटलं जात असे. फातुमा बिंटी बराका यांचा जन्म आफ्रिका खंडातील पूर्वेकडील झांजीबार येथे म्फांगीमारिंगो या छोटय़ा गावात साधारण 1910 साली झाला. त्यांची नेमकी जन्मतारीख कोणालाही माहीत नाही. एका मुलाखतीत त्यांनी सांगितलं होतं की पूर्व आफ्रिकेत ज्यावेळी रु पया हे भारतीय चलन वापरलं जात होतं त्यावेळी त्यांचा जन्म झाला. पूर्व आफ्रिकेत पहिल्या महायुद्धाच्या काळात रु पया हे चलन वापरलं जायचं. त्यावरून फातुमा यांच्या जन्मसालाचा अंदाज बांधला गेला. फातुमा यांच्या जन्माच्या वेळेस झांजीबार गुलाम, हस्तिदंत व मसाल्यांसाठी प्रसिद्ध होता. त्यांचे वडील नारळ विक्रेते होते. लहान असताना फातुमाचा आवाज खूप गोड होता. वयाच्या 10व्या वर्षीच म्हणजे 1920 साली प्रसिद्ध कलाकारांच्या संचामध्ये तिनं स्थानिक पातळीवर गाणं म्हणायला सुरुवात केली. वयाच्या अवघ्या तेराव्या वर्षी तिचं जबरदस्तीनं लग्न झालं. त्यानंतर ती झांजीबारहून टांझानियाला स्थायिक झाली. त्यानंतर पूर्व आफ्रिकेतील किनार्‍यावरील छोटय़ा शहरांमध्ये तसंच पश्चिम किनार्‍यावरील लेक व्हिक्टोरियामध्ये तिनं प्रवास केला. दुसर्‍या अपयशी लग्नानंतर 1930 सालाच्या दरम्यान अनवाणी पायाने तिनं बराचसा भाग पालथा घातला. सन 1940 मध्ये ती झांजीबारला परत आली. तिथं एक छोटीशी मातीची झोपडी घेऊन ती त्यात राहू लागली. ड्रम वाजवणं, तारब शैलीतील गाणी म्हणणं हा फातुमाच्या जीवनातला प्राण होता. म्हणूनच फातुमांना क्वीन ऑफ तारब व उन्यांगो म्युझिक म्हणून ओळखलं जातं. तारब हा अरब शैलीतील संगीताचा एक प्रकार आहे. फातुमांच्या गाण्यांवर सिटी बिंटी साद यांचा प्रभाव होता. पूर्व आफ्रिकेतील स्वाहिली, अरबी स्रियांची घुसमट त्यांच्या गाण्यांतून प्रतीत व्हायची. त्यांच्या गाण्यांत आफ्रिकन पुरु षांची लैंगिक वर्तणूक व स्रियांचं शोषण यावरचं विडंबन असायचं. दोन घटस्फोट झाल्यानंतर महिलांनी चालवलेल्या तारब सोशल क्लबमध्ये त्या जाऊ लागल्या. पूर्व आफ्रिकेतील उन्यांगो चळवळीचा एक भाग बनल्या. स्वाहिली मुलींना जुनाट परंपरांमधून बाहेर काढणे, मासिक पाळीबद्दल माहिती देणे, शोषणाबद्दल सजग करणे, लैंगिक अत्याचारांना विरोध करायला शिकवणे या गोष्टी त्या पारंपरिक गाण्यांतून ड्रमच्या रिदमच्या साहाय्याने सांगत. बी किडुडे म्हणजेच फातुमा आणि त्यांच्या मैत्रिणी लग्नसमारंभाच्या वेळी स्वाहिली महिलांसमोर तारब म्हणजेच ड्रम समारंभ सादर करीत, हा समारंभ त्यांना क्वचितच लग्नकार्याच्या वेळी सादर करता येत असे. अशावेळी शेकडो महिलांसमोर ड्रम व नृत्याच्या साहाय्यानं त्या चिथावणीखोर गाणी म्हणत. स्वाहिली स्रियांना आत्मसन्मान देण्यासाठी प्रवृत्त करत. महिलांचं शोषण करणार्‍या आपल्या अरब नातेवाइकांविषयी त्या विषण्णतेनं बोलत. बी किडुडे यांनी कितीतरी मुलींना मदत केली होती. खोल भावनिक आवाज, गाण्यांतील शब्द व ड्रमचा ताल यांच्या मिलाफानं बाजूचं वातावरण भारून जात असे. त्यांनी कितीतरी तारब ग्रुपमधून सादरीकरण केलं. स्वतर्‍च्या रचनांची गाणी असलेली सुसज्ज लायब्ररी होती. आफ्रिकन संस्कृतीतील निखळ आफ्रिकन संगीतरचनाकारांमध्ये बी किडुडे यांचा समावेश होतो. काही समीक्षकांनी बी किडुडे यांना द मिथ म्हणून संबोधलं आहे. आपल्या कृतीतून बंधनं झुगारून देणारी ही पहिली झांजीबारी स्री म्हणता येईल.कला व क्र ीडा क्षेत्रातील दिग्गजांना दिला जाणारा मानाचा ‘वल्र्ड म्युझिक एक्स्पो वुमेक्स अवॉर्ड’ बी किडुडे यांना  मिळाला. त्याचवर्षी त्यांच्यावर अँडी जोन्स दिग्दर्शित ‘अ‍ॅज ओल्ड अ‍ॅज माय टंग - द मिथ अ‍ॅण्ड लाइफ ऑफ बी किडुडे’ हा माहितीपटही काढण्यात आला. त्यांची कीर्ती इतकी पसरली की झांजीबारी पर्यटनासाठीही त्यांच्या नावाचा वापर होऊ लागला. इतकं की एका तारांकित हॉटेलमधील उपाहारगृहाचं नाव बी किडुडे असं देण्यात आलं. फातुमा म्हणजेच बी किडुडे दीर्घ आयुष्य जगल्या.  तारबचं ग्लॅमर जगभरात रुजवून त्या गेल्या. हे वलय अजूनही आफ्रिका खंडात आहे.     

( शिल्पा मुक्त पत्रकार आहे.)