शहरं
Join us  
Trending Stories
1
भारताच्या कारवाईमुळे बांगलादेश खवळला, भारतीयांसाठी व्हिसा सर्व्हिस केली बंद 
2
‘बांगलादेशी आहेस का?’, केरळमध्ये परप्रांतीय तरुणाला बेदम मारहाण, रुग्णालयात मृत्यू 
3
वैभव सूर्यवंशी आणि आयुष म्हात्रेनं जशास तसे उत्तर दिलं; पण सरफराज अहमदला ते नाही दिसलं! म्हणे...
4
रशियाला युद्धादरम्यान मोठा धक्का ! सैन्याचे लेफ्टनंट जनरल सर्वारोव्हचा कार स्फोटात मृत्यू
5
सौदी अरेबियातील वाळवंटात पसरली बर्फाची चादर, अनेक वर्षांनंतर दिसलं असं चित्र, आपली पृथ्वी देतेय असे संकेत
6
बाथरूममध्ये तरुणाने प्रस्थापित केले संबंध, अतिरक्तस्त्रावाने गर्लफ्रेंडचा मृत्यू, वडिलांचे गंभीर आरोप
7
युजवेंद्र चहलने विकत घेतली आलिशान BMW Z4 कार; भारतात त्याची किंमत ऐकून धक्काच बसेल!
8
नवीन वर्षाच्या सुरूवातीला कमी हाेणार थंडीचा जोर; हवामान तज्ज्ञांनी व्यक्त केला अंदाज
9
Vijay Hazare Trophy स्पर्धेत दिसणार रोहित-विराटचा जलवा! ही जोडी कधी अन् कोणत्या मैदानात खेळणार सामना?
10
बांगलादेशातील हिंदू तरुणाच्या हत्येप्रकरणी मोठा खुलासा; ईशनिंदेचा आरोप खोटा, 'हे' होते कारण
11
महाराष्ट्रापाठोपाठ गोव्यातील निवडणुकीतही भाजपाची मुसंडी, काँग्रेसची पीछेहाट, आपचा धुव्वा
12
AI शक्तिशाली सहाय्यक, मात्र मानवी मेंदूला पर्याय नाही; सर्व तज्ज्ञांचे एकमताने शिक्कामोर्तब
13
भारतीय ऑलराउंडरची क्रिकेटच्या सर्व प्रकारातून निवृत्ती! IPL लिलावात CSK नं लावली होती विक्रमी बोली
14
"पालिका निवडणुकांमध्येही देवेंद्र फडणवीसच ‘धुरंधर’; उद्धव ठाकरे 'रेहमान डकैत"; भाजपाची टीका
15
IPL 2026: Axar Patel ला धक्का! कर्णधारपदावरून हटवलं, आता 'हा' Delhi Capitals चा 'कॅप्टन'
16
Video: उकळत्या तेलात हात घालून काढते गरमागरम पकोडे... 'समोसा गर्ल' ची रंगलीये तुफान चर्चा
17
झाडू मारण्यासाठी सॉफ्टवेअर इंजिनिअरने सोडली हाय-फाय नोकरी; आता महिन्याला १.१ लाख पगार
18
हाण की बडीव! रुग्णालयात डॉक्टर-रुग्ण भिडले, एकमेकांच्या जीवावर उठले; लाथाबुक्क्यांनी मारहाण
19
VIDEO: तुर्की संसदेत जोरदार राडा ! आधी खासदारांमध्ये बाचाबाची अन् लाथाबुक्क्यांनी हाणामारी
20
नगरपरिषद निवडणुकीतील यश भाजपाचंच की 'इनकमिंग'चं?; सुप्रिया सुळेंनी मांडला 'हिशेब'
Daily Top 2Weekly Top 5

मेंढपाळाची पीएसआय लेक! भेटा, कोल्हापूरच्या आरती पिंगळेला!

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: March 14, 2019 07:20 IST

वडील मेंढपाळ. भटकंतीतले कष्ट पाहतच ती मोठी झाली आणि तिनं ठरवलं आपण मोठी अधिकारी व्हायचं.

ठळक मुद्देएकटी आरतीच पीएसआय झाली असं नाही तर तिनं आपल्या अवतीभोवतीही शिक्षणाची आणि प्रगतीची स्वप्न पेरलेली दिसतात.

नसिम सनदी

‘घरातली वडीलधारी माणसं मेंढय़ा घेऊन रानोमाळ उन्हातान्हात भटकायचे. त्यांच्यासोबतच मेंढय़ांबरोबर चार-चार महिने घरापासून लांब कुठंतरी पाऊस न पडणार्‍या रानावनात मेंढय़ा चारायला जायचं. ऊन म्हणायचं नाही की रात्र, थंडी-वार्‍याची पर्वा नाही. मेंढय़ांच्या सोबतीनंच महिनोमहिने राहायचं. हेच मेंढपाळाचं आयुष्य  असतं. तेच जगत मी लहानची मोठी झाले. मनात तेव्हाच कुठंतरी होतं की, आपण शिकायचं. मोठी अधिकारी बनायचं. घरच्यांना परिस्थितीच्या चक्रातून बाहेर काढायचं. ती जिद्द मनात होती, तिनंच अधिकारी हो म्हणत मला शिकायला लावलं. घरच्यांनीही मुलगी म्हणून कधी अडवणूक केली नाही. जे करायचं म्हटलं ते कर म्हणाले. त्यातून शिकत गेले, घडत गेले. आता एक टप्पा झाला, अजूनही खूप पल्ला गाठायचा आहे..’आरती सांगत असते. तिच्या नजरेतला आत्मविश्वास आणि शेजारी बसलेल्या तिच्या माणसांच्या नजरेतला अभिमान आपल्याला खूप काही सांगत असतो. तो म्हणत असतो, जिद्दीनं पुढं व्हा, ठरवलं की शोधता येतेच आपली वाट.

त्या जिद्दीचंच एक रूप म्हणजे आरती सुरेश पिंगळे. पीएसआय परीक्षेत ती भटक्या विमुक्त प्रवर्गातून राज्यात दुसरी आली. कोल्हापुरातील कसबा बावडा येथे धनगर गल्लीत राहणारी ही आरती. ती राज्यात गुणवत्ता यादीत आली म्हटल्यावर भल्या सकाळीच तिचं घर गाठलं तर तिचं कौतुक करणार्‍यांची प्रचंड गर्दी. तिच्या जवळच बसलेली आजी. नातीचं यश पाहून भारावून गेलेली. आई, वडील, चुलते, चुलती, बहीण, भावंडं सारीच येणार्‍या-जाणार्‍यांच्या सराबराईत दंग. त्यातून जरा बाजूला करत आरतीला बोलतं केलं.

आरती सांगते, आमचा पारंपरिक व्यवसाय मेंढपाळाचा. मला तीन चुलते. माझे वडील मेंढपाळ म्हणून काम करायचे. आता मात्र सर्व जबाबदारी भाऊ रमेश याच्या खांद्यावर देऊन ते एमआयडीसीत वॉचमन म्हणून काम करतात. आणखी एक चुलते मुख्याध्यापक, तर दुसरे पोलीस आहेत. एकत्र कुटुंब आहे. घरात आम्ही 17 जण राहातो. आजीची एकूण 7 नातवंडं.  यापैकी मी सर्वात मोठी. सर्वात जास्त शिकलेली आणि नोकरी करणारीदेखील मी पहिलीच मुलगी. ’

ती सांगत असताना तिच्या नजरेत तिचा भूतकाळ दिसतो. भटकंती करून उदरनिर्वाह करणारं हे कुटुंब. आपण जे कष्ट उपसले ते आपल्या पुढच्या पिढीला सोसावे लागू नये म्हणून घरच्यांनी तिला शिकवलं.  आरतीच्या घरातही आता थोडी समृद्धी नांदत आहे, यावर विचारले तर ती सर्व श्रेय चुलते रमेश पिंगळे यांना देते. रमेश शाळेत हुशार असतानाही सातवीतच शाळा सोडली आणि मेंढरं हातात घेतली, ती आजर्पयत सुरूच आहेत. या मेंढराच्या जिवावर त्यांनी सर्वाना शिक्षण दिलं. शिक्षणातूनच समृद्धी आली. आज आरतीच्या पावलावर पाऊल ठेवून घरातील मुलं स्पर्धा परीक्षांचा नेटानं अभ्यास करू लागली आहेत. वेगवेगळ्या अभ्यासक्रमांना प्रवेश घेत आहेत. एक दिवस अधिकार्‍यांचं घर म्हणून नावारूपास आणण्याचे या भावंडांचं स्वप्न आहे.

आरती गेल्या चार वर्षापासून जिल्हा परिषदेत महिला व बाल कल्याण विभागात संरक्षण अधिकारी म्हणून काम करत होती. पण मोठी अधिकारी व्हायचं स्वप्न असल्याने तिनं नोकरी करत करतच अभ्यास सुरू केला. नुसतीच घोकंमपट्टी करण्यापेक्षा नेमक्या अभ्यासावर भर दिला. अशा प्रकारची परीक्षा पास झालेल्यांना भेटून त्यांचे अनुभव समजावून घेतले. या सर्वाचा परिणाम होऊन तिला पहिल्याच प्रयत्नांत यश मिळालं. एवढय़ावरच न थांबता ‘क्लास वन अधिकारी’ होण्याचं तिचं स्वप्न आहे. 

तिचे आईवडीलही सांगतात, ‘आमची काही आडकाठी असणार नाही, तिला जे करायचं ते तिनं करावं! आज या पोरीमुळेच आम्हाला कौतुकाचे दिवस पाहायला मिळत आहेत.’ 

एकटी आरतीच पीएसआय झाली असं नाही तर तिनं आपल्या अवतीभोवतीही शिक्षणाची आणि प्रगतीची स्वप्न पेरलेली दिसतात.