शहरं
Join us  
Trending Stories
1
Video: जे लोकसभेला कमावले, ते विधानसभेला का गमावलं?; उद्धव ठाकरेंनी चूक कबूल केली, म्हणाले...
2
“ठाकरे स्वार्थी नाही, प्रामाणिक-निर्भीड; ठाकरे ब्रँड पुसू इच्छिणारे पुसले गेले”: उद्धव ठाकरे
3
म्युच्युअल फंड KYC आता तुमच्या जवळच्या पोस्ट ऑफिस कार्यालयातून करता येणार, कर्मचारी करणार तुमची मदत
4
Video: मुंबई गुजरातचाच भाग होता, मराठी लोक केवळ ३२ टक्केच; भाजपा खासदार निशिकांत दुबे पुन्हा बरळले
5
'मला वाटतं ५ विमानं पाडण्यात आली...', भारत-पाकिस्तान तणावावर डोनाल्ड ट्रम्प यांचा नवा दावा
6
सलमानच्या Ex गर्लफ्रेंडच्या घरी चोरी, संगीता बिजलानीच्या फार्महाऊसवर चोरांकडून तोडफोड
7
China Rare Earth Quotas: चीननं शांततेत केलं हे काम, भारताचं टेन्शन वाढणार; कसे धोक्यात येतील हे व्यवसाय?
8
...तिथे 'मी'पणा आला म्हणून पराभव झाला; उद्धव ठाकरेंच्या मुलाखतीवर भाजपाचा खोचक टोला
9
जीवघेणा कॅन्सर कायमचा संपणार! शास्त्रज्ञांनी क्रांतीकारी mRNA लस केली विकसित
10
'समुद्रात बुडवून बुडवून मारू', राज ठाकरेंच्या टीकेला, खासदार दुबेंनी दिले प्रत्युत्तर; पुन्हा हिंदी भाषेवर म्हणाले,...
11
"मराठी माणूस हिंदी सिनेमात हिरो होऊच शकत नाही, कारण...", अशोक सराफ स्पष्टच बोलले
12
सावध ! विंचू पिंडीवर बसलाय ! पडळकर हा विषय अत्यंत गंभीर अन् आव्हाडांची गँग...
13
आजचे राशीभविष्य, १९ जुलै २०२५: यश प्राप्तीसाठी कठोर परिश्रम करावे लागतील
14
गौरी योगात कामिका एकादशी: ८ राशींवर धनलक्ष्मी कृपा, पदोन्नती-पगारवाढ; सुबत्ता-कल्याण काळ!
15
मुख्यमंत्री संतापले : लाेक म्हणतात आमदार माजले, आपण लाथाबुक्क्यांतून संदेश देणार आहोत का?
16
मराठा आरक्षण : अंतिम सुनावणीस सुरुवात, अंतरिम स्थगिती देण्याची याचिकाकर्त्यांची मागणी
17
आयपीएस सुपेकरांवर कारवाई का नाही? वैशाली हगवणे आत्महत्या, पोलिसांवर कडक ताशेरे
18
कर्जमाफीचे आश्वासन पूर्ण करूच, शेतकऱ्यांसाठी कधी हात आखडता घेतला नाही : मुख्यमंत्री
19
मी तसे बोलायला नको होते; सभागृहात आणि बाहेर केलेल्या विधानांवरून आमदारांचा माफीनामा
20
दुबे यांनी मुंबईत येऊन दाखवावे, समुद्रात बुडवून बुडवून मारू; राज ठाकरेंचे भाजप खासदाराला प्रत्यूत्तर 

नाचणार्‍या कार्यकर्त्यांना जेवण

By admin | Updated: August 29, 2014 09:46 IST

गणेशोत्सवात मिरवणुकीवर होणार्‍या वारेमाप खर्चाला फाटा देत दत्तनगरमधील अन्नदाता बाप्पा मंडळाने २१ वर्षांपासून एक वेगळीच परंपरा अत्यंत जबाबदारीनं सांभाळली आहे. विसर्जनाच्या मिरवणुकीत बेभान होऊन नाचणार्‍या कार्यकर्त्यांना चांगलंचुंगलं खाऊ घालत त्यांची तब्येत सांभाळण्याचं काम हे मंडळ करतंय.

अन्नदाता बाप्पा मंडळ, सोलापूर
 
खास उपक्रम :
गणेशोत्सवात मिरवणुकीवर होणार्‍या वारेमाप खर्चाला फाटा देत दत्तनगरमधील अन्नदाता बाप्पा मंडळाने २१ वर्षांपासून एक वेगळीच परंपरा अत्यंत जबाबदारीनं सांभाळली आहे. विसर्जनाच्या मिरवणुकीत बेभान होऊन नाचणार्‍या कार्यकर्त्यांना चांगलंचुंगलं खाऊ घालत त्यांची तब्येत सांभाळण्याचं काम हे मंडळ करतंय.
१९९२ साली या मंडळाची स्थापना झाली. त्याचवर्षी या मंडळाच्या कार्यकर्त्यांच्या लक्षात आलं की, मिरवणुकीच्या दिवशी धावपळ करणार्‍या कार्यकर्त्यांना, लेझीम-झांज खेळणार्‍यांचे खायचे फार हाल होतात. धड प्यायला पाणी मिळत नाही. एखाद्या टपरीवर, उघड्यावर तळलेले भजीवडे खात, चहा पीत चालावे लागते. त्यानंतर अनेक कार्यकर्त्यांना पोटदुखी होते, पचन बिघडतं. दुसर्‍या दिवशी डॉक्टरांकडे त्यांची गर्दी वाढते. दहा दिवस धावपळ करणार्‍या कार्यकर्त्यांना गणपती गेला की असा त्रास सहन करावा लागतो. हे सारं पाहून या मंडळाच्या कार्यकर्त्यांनी ठरवलं की, आपणच अन्नदान करायचं. मिरवणुकीतल्या कार्यकर्त्यांना खाऊपिऊ घालायचं. सुरुवातीची दोन वर्षे त्यांना फार यश लाभलं नाही. पण त्यानंतर मात्र दरवर्षी ते रात्री ८ वाजल्यापासून ते पहाटे २ वाजेपर्यंत लोकांना आनंदानं खाऊपिऊ घालतात.
या उपक्रमाला बळ मिळावं म्हणून त्यांनी केवळ वर्गणीवर भर न देता छोटे-मोठे उद्योजक, व्यापारी आणि अगदी सामान्यातल्या सामान्य माणसालाही धान्य वर्गणी म्हणून देण्याचं साकडं घातलं. कुणी किलोभर धान्य दिलं तरी ते घेतात. एरव्ही वर्गणीसाठी स्पर्धा करुन सगळा खर्च डॉल्बीवर करणार्‍या मंडळांच्या गर्दीत हे लोकांना जेऊ घालणारं मंडळ वेगळं दिसतं. दरवर्षी पाच हजार लोक या मंडळातर्फे चालवल्या जाणार्‍या उपक्रमात जेवतात. ऐनवेळेस धान्य किंवा पैसे कमी पडले तर मंडळाचे ४0-५0 सभासद स्वत: पैसे जमवून उपक्रम सुरूच ठेवतात. मंडळाचे खजिनदार प्रकाश गाजूल सांगतात,  स्वच्छ-शुद्ध पिण्याचं पाणी कार्यकर्त्यांंना मिळणं हे आमचं महत्त्वाचं उद्दिष्ट. तब्येत सांभाळणं हे ध्येय समोर ठेवून आम्ही करतोय.  
- काशीनाथ वाघमारे