शहरं
Join us  
Trending Stories
1
मग काय वाळू खाणार? आरक्षण दिले नाही तर मुंबईचा भाजीपाला, दूध बंद करू; जरांगेंचा इशारा
2
Video: अंजली कृष्णा यांच्यानंतर कारवाईला गेलेल्या महसूल अधिकाऱ्याला गावकऱ्यांकडून मारहाण
3
सावधान...! लाखात पगार असूनही ५ वर्षांपासून चुकीच्या पद्धतीने रेशन घेताय? जाणून घ्या, किती दंड भरावा लागेल?
4
Tiktok पुन्हा सुरू होणार? केंद्रीय आयटी मंत्री अश्विनी वैष्णव यांनी स्पष्ट केली सरकारची भूमिका
5
उपराष्ट्रपतीपदाच्या निवडणुकीपूर्वीच दोन पक्षांची मोठी घोषणा; मतदानापासून दूर राहणार...! पण का...?
6
AIIMS मध्ये पहिल्यांदाच झाले गर्भदान; संशोधन आणि वैद्यकीय शिक्षणाला मिळणार नवी दिशा
7
'सत्ते पे सत्ता' अन् शुबमन गिलच्या 'बेबी' या टोपण नावामागची खास गोष्ट
8
नवा आजार चिमुकल्यांना घालतोय विळखा; Hand Foot Mouth Disease म्हणजे काय?
9
आश्चर्यच...! एका झटक्यात तब्बल ₹ 20.8 लाखांनी स्वस्त झाली 'ही' लक्झरीअस SUV, यापूर्वी असं कधीच घडलं नाही!
10
रोहित पवारांनी आरोप सिद्ध करावा, नाही तर राजकीय संन्यास घ्यावा ; महसूल मंत्री चंद्रशेखर बावनकुळे यांचा पलटवार
11
उपराष्ट्रपती निवडणुकीत विरोधकांचा विजय कठीण; पण कुणाचा खेळ बिघडवणार 'क्रॉस व्होटिंग'?
12
मॉकड्रिल्स, तंत्रज्ञान असूनही कारखान्यांत स्फोट का? 'पेसो'सारख्या यंत्रणांना कार्यप्रणालीत बदल करण्याची गरज?
13
टाटा-महिंद्रासह आटो सेक्टरमध्ये मोठी वाढ! पण, आयटीतील 'या' कंपन्यांनी केली निराशा, कोण किती घसरलं?
14
पाकिस्तानच्या पावलावर पाऊल ठेवतोय बांगलादेश; IMFकडे पसरले हात, मागितले 'इतके' पैसे
15
भारत-पाक नव्हे तर श्रीलंकेच्या नावे आहे Asia Cup स्पर्धेतील हा खास रेकॉर्ड
16
रांगेत भाविकांचा छळ अन् चंद्रग्रहणात विसर्जन, लालबागचा राजा मंडळाविरोधात आता थेट CM फडणवीसांकडे तक्रार!
17
पंजाबमधील पूरपरिस्थिती पाहून सलमान खान झाला भावुक, दिला मदतीचा हात
18
एका झटक्यात स्वस्त झाली सर्वात पॉप्युलर फॅमिली कार; GST कपातीनंतर Maruti Ertiga कितीला मिळणार?
19
GST कपातीनंतर Maruti Dzire किती रुपयांना मिळणार? जाणून घ्या नवीन किंमत...
20
"IPL सोडायला लावलं, डिप्रेशनमध्ये होतो, ढसाढसा रडलो.."; ख्रिस गेल प्रितीच्या संघावर बरसला

मस्तानीची नऊवारी, काशीबाईची नथ

By admin | Updated: April 28, 2016 13:52 IST

बिग स्क्रिनवर एखादी स्टाइल झकास वाटली, मनाला भिडली की ती फॅशन म्हणून उचलली जातेच. तेच सध्या मस्तानी नऊवारीचं झालंय!

- सायली कडू

‘रेडिमेड वेअर’च्या कॅटेगरीत आॅनलाइन कुणी नऊवारी घेईल असं वाटलं होतं का?पण सध्या शिवलेल्या नऊवाऱ्या,फ्युजन नथ आणिबाजीराव स्टाइल धोतीहा नवा स्टायलिश मामला आहे.बिग स्क्रिनवर एखादी स्टाइल झकास वाटली, मनाला भिडली की ती फॅशन म्हणून उचलली जातेच. तेच सध्या मस्तानी नऊवारीचं झालंय!म्हणजे काय तर बाजीराव मस्तानी सिनेमातल्या नऊवाऱ्या कशा ‘आॅथेण्टिक नऊवाऱ्या’ नाहीच पेशवे काळात अशा नऊवाऱ्या नेसत नसत, अशी किती टीका झाली. पण ते ऐतिहासिक संदर्भ, ते वाद हे सारं एका बाजूला आणि सध्या लगीनसराईत ज्याची चलती आहे तो विषय दुसऱ्या बाजूला असा हा मनोरंजक मामला आहे.आणि त्याचंच नाव, मस्तानी नऊवारी!लग्नात नवरीबाईनं विधींसाठी नऊवारीच नेसायचा ट्रेण्ड तसा काही नवीन नाही. गेली काही वर्षे शिवूनबिऊन नऊवारी घेत मुली लग्नाची म्हणून खास नऊवारी साडी घेतात.पण आता त्या नवऱ्या मुलीच्या मैत्रिणी, तिच्या बहिणी, वहिन्या सगळ्यांनाच नऊवारी नेसण्याची हौस!पूर्ण साजशृंगार करून एकदम ट्रॅडिशन दिसण्याचा उत्साह तर महादांडगा.त्यात यंदाच्या लग्नसराईत एक नवीन ट्रेण्ड आलाय, बाजीराव मस्तानी स्टाइल नऊवारीचा आणि काशीबाईनं घातलेल्या दुहेरी नथीचाही!काहींचा फ्युजन उत्साह तर इतका दांडगा असतो की, अनारकली, पंजाबी ड्रेसवरही ‘नथ’ घालून लग्नात मिरवून घेणाऱ्या हौशी यंदा बऱ्याच आहेत.‘बाजीराव मस्तानी’ चित्रपटातील दीपिका पदुकोन आणि प्रियंका चोप्रा या दोघींनी घातलेली पिंगावाली नऊवारी तरुणींना भुरळ घालत आहे. संपूर्ण साडीवर सोनेरी रंगाचे बुट्टे, बारीक जरीकाठ आणि डिझाइनर ब्लाऊज असा हा लूक. सध्या अनेकींना ‘हॉट’ वाटतो आहे.ज्यांना शक्य आहे त्या या मस्तानी नऊवाऱ्या शिवून घेताहेत. ज्यांना शक्य नाही त्या भाड्यानं घेताहेत.एवढंच कशाला आता तर आॅनलाइनही हव्या त्या डिझाइनची, हव्या त्या रंगाची मस्तानी नऊवारी मिळतेय!आणि त्यासाठी आॅनलाइन आॅर्डर नोंदवल्या जात आहेत.शिवलेली नऊवारी हे प्रकरण म्हटलं की जुन्याजाणत्या बायका नाकं मुरडतात. पण, एवढी मोठी साडी चापूनचुपून व्यवस्थित नेसायची तर कसब लागतंच. गेल्या काही वर्षांपासून नऊवारी साडी मापाने शिवून घेण्याची पद्धत सुरू झाली, त्यामुळे नऊवारी साडी नेसूनही अगदी मोकळेपणाने वावरता यायला लागलं.आपल्या आवडीची, मापाची साडी मनाप्रमाणं शिवून घेता येते म्हणून तर ‘स्टिच्ड नऊवारी’ हा ‘रेडिमेड वेअर’मधला एक मोठा ट्रेण्ड तयार होतो आहे.नऊवारीची भुरळ नव्या काळातही कायम आहे ती अशी!- सायली कडूफ्युजन नथनऊवारी साडी असेल तर नथ हवीच. पूर्वीपासूनच्या पारंपरिक डिझाइन्स रूढ आहेत. यात मराठा पद्धतीची नथ थोडी मोठी असते, तर ब्राह्मणी पद्धतीची नथ नाजूक असते. याशिवाय नक्षीदार, विणकाम केल्यासारखी सरजाची नथही बघायला मिळते. मॅचिंग खडा, मोती किंवा सोन्या-चांदीत केलेली नाजूक आकाराची ‘मोरणी’देखील मुली घालतात.पण सध्या हौशीनं घालण्याची एक गोष्ट आहे ती काशीबाईची (सिनेमावाली) नथ. दुहेरी मोत्यांची. अनारकली, पंजाबी ड्रेस, स्कर्ट, घागरा अशा विविध मॉडर्न कपड्यांवरही आता ही काशीबाईची नथ शोभून दिसतेय.फंक्शन है ना, तो नथ तो बनती है, असा हा फॅशनेबल फ्युजन मामला!धोतीट्रॅडिशनल नऊवारी मॉडर्न रूप घेऊन जर येत असेल तर मग बाजीराव स्टाइल धोतीनं तरी का मागे राहावं?सध्या फंक्शनल मौसमात, लग्नकार्यालयात मराठी स्टाइल धोती (इतके दिवस काठेवाडी, राजस्थानी धोती जास्त लोकप्रिय होती) तरुण मुलांना जास्त आवडते आहे. रणवीरनं बाजीराव होऊन परिधान केलेली ही धोती स्टाइल. सध्या ही धोती तरुण मुलांना स्टायलिश वाटते!अंबाड्य़ातली फुलंनऊवारी साडीवर खोपा अथवा अंबाडा घातला जातो. त्यांना सजवण्यासाठी फुलं शोभून दिसतात. सोन्याची, मोत्याची कुंदनमध्ये, चांदीत अशी सुंदर फुलं मिळतात. मोत्याची कुडी कानातल्यांचे अनेक प्रकार असले तरी नऊवारी साडीवर कुड्या़, झुमके असे पारंपरिक प्रकार आजही वापरले जातात. कानातल्या बुगडीचीही फॅशन सध्या आहे. यातही पूर्ण सोन्याची वा मोत्याची असे प्रकार वापरले जातात. कान टोचून घ्यायचा नसेल तर आता ‘प्रेस’ची म्हणजे दाबून कानपाळीवर बसविण्याची बुगडीदेखील मिळते.छल्ला-मेखला पुन्हा इनछल्ला आणि मेखलाची फॅशनही हल्ली मुली पुन्हा करू लागल्या आहेत. कोल्हापुरी साज, तन्मणी, चपलाहार हे तर आहेच पण वज्रटिक आणि चिंचपेटीला सध्या मागणी आहे. वाकीसध्या नागबंध, वाकी यांची परत एकदा फॅशन आली आहे. नाजूक दंडावर या वाक्या अनेक लग्नात दिसतात.