शहरं
Join us  
Trending Stories
1
"आज रात्री एका संस्कृतीचा अंत होईल..."; डोनाल्ड ट्रम्प यांची इराणला सर्वात मोठी धमकी
2
धडधड वाढली! इराणने 'या' शहरातील सर्व रेल्वे सेवा केल्या रद्द; इस्रायल-अमेरिकेचे हल्ले, तीन उड्डाण पूल उद्ध्वस्त
3
अवघ्या जगाला इंधनाची कमतरता, पण चीनला नाही जाणवली? २० वर्षांपूर्वीच केली होती तयारी
4
Viral Video: नदीच्या काठावर नवऱ्यासोबत मद्यपान, लोकांनी हटकताच म्हणाली,"आमच्यामुळेच तुमची घरं चालतात!"
5
NCL: एनसीएलमध्ये नोकरीची संधी, ५७७ जागांसाठी जाहिरात प्रसिद्ध; ९ एप्रिलपासून नोंदणी सुरू
6
८वा वेतन आयोग: १३ एप्रिल रोजी महत्वाची बैठक; वेतनवाढीचा अंतिम निर्णय होणार?
7
"दैवीशक्ती असल्याचं भासवत लैंगिक शोषण, ३० पीडिता समोर आल्या..."; खरात प्रकरणात मोठे खुलासे
8
इराण 'हॉर्मुझ' करारासाठी तयार; अमेरिकेला पाठवला शांतता प्रस्ताव, पण केली मोठी मागणी....
9
"पार्थ पवारांचं विधान काँग्रेसला फारच झोंबलं", अमोल मिटकरींनी १६ आमदारांची पार्टी म्हणत डिवचले
10
इस्रायलचा इराणवर मोठा हवाई हल्ला! १८ जणांचा मृत्यू, 24 गंभीर; दिग्गज लष्करी अधिकारी ठार? तेहरानसह शस्त्रास्त्र डेपो उद्ध्वस्त
11
IPL 2026 : अर्जुन तेंडुलकरचा यॉर्कर शो! पंतसमोर अचूक गोलंदाजी; LSG नं दिली पदार्पणाची हिंट (VIDEO)
12
Latest Marathi News LIVE Updates: 'इराणसाठी आजची रात्र अखेरची', अमेरिकेचे अध्यक्ष डोनाल्ड ट्रम्प यांच्या पोस्टने जग हादरले
13
बंगाल निवडणुकीसाठी कडेकोट सुरक्षा; २.४ लाख जवानांसह २० हजार महिला कमांडो तैनात
14
David Warner: क्रीडाविश्वाला हादरून टाकणारी बातमी! स्टार क्रिकेटपटू डेव्हिड वॉर्नरला अटक; नेमकं प्रकरण काय?
15
GEN Z मध्ये वाढतोय हेअर कलर ट्रेंड; ब्ल्यू-रेड-गोल्डन केसांच्या रंगावरुन ओळखा त्यांचं व्यक्तिमत्व
16
युद्ध चिघळलं! डेडलाइन संपण्याआधीच अमेरिकेचा खार्ग बेटावर मोठा हल्ला; इराणचा आर्थिक कणा मोडणार?
17
Manipur rocket attack: गोळ्यांचा आवाज आणि हिंसक जमाव;  मणिपूरमधील हिंसाचाराचे व्हिडीओ आले समोर
18
Mira-Bhayander Flyover: मीरा भाईंदरमधला व्हायरल झालेला 'तो' अजब पूल असा का बनला? खुद्द CM फडणवीसांनी केला खुलासा
19
भूमिपूजन झालं, पण 'पॉड टॅक्सी' नेमकी असणार तरी कशी? फायदा काय? इत्थंभूत माहिती समजून घ्या २ मिनिटांत!
20
"मीरा भाईंदरला ३० टक्के जागा मेहतांच्या मालकीची, १० टक्के..."; मेट्रो उद्घाटनात रंगला संवाद
Daily Top 2Weekly Top 5

लग्नं रखडली!

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: July 19, 2017 17:18 IST

शेतीला पाणी नाही,उत्पादनाला भाव नाही,शेतमालाला बाजारपेठ नाही..आता तरशेती करणाऱ्या तरुणाच्यावयाची तिशी उलटली तरीलग्नाला मुलगी मिळत नाही.

- हिनाकौसर खान-पिंजार शेतीला पाणी नाही,उत्पादनाला भाव नाही,शेतमालाला बाजारपेठ नाही..आता तरशेती करणाऱ्या तरुणाच्यावयाची तिशी उलटली तरीलग्नाला मुलगी मिळत नाही.‘मागच्या सात वर्षांपासून मोठा मुलगा शेती करतोय. घरची स्थिती बरी आहे. लहान मुलगा इंजिनिअर झालाय. थोरल्यासाठी तीन वर्षांपासून मुलगी शोधतोय पण शेती करतो म्हटल्यावर स्थळं येणंच बंद झालीत. लहान मुलाला मात्र नोकरी लागल्याबरोबर स्थळ चालून आलं. आता थोरल्याच्या लग्नाची फार काळजी लागलीय. शेतकऱ्यांच्या मुलीसुद्धा नको म्हणत्यात.’- एक वैतागलेले बाबा सांगत होते.**‘आजतोवर शेतकऱ्यांच्या शेतमालाला चांगला हमीभाव नव्हता. आता शेतकऱ्यांच्या शेतीच करणाऱ्या पोरांनाही बायको मिळण्यात अडचणी येऊ लागल्या आहेत. मुलाची नोकरी साधी असल तरी चालल पण शेतकरी नको. अगदी दहा एकर जागा, मुलगा एकुलता एक असेल तरीही मुली आणि त्यांचे आईबाप ‘शेतकरी मुलगा’ म्हटलं की पुढं काही बोलतच नाहीत. आमचा पुतण्या गेली पाच वर्षं झाली मुलगी शोधतोय. आता तर तो लग्नाचं नाव काढलं तरी वैतागतो. - एक काका उदास होत सांगत होते.**‘आज खेड्यात जमीन असण्यापेक्षा तालुक्याला १० बाय १० चं दुकान असलं तरी लवकर लग्न होतं पोरांचं. मी पण शेतकरीच. मात्र पोरीला कधी काही कमी पडू दिलं नाही. लाडात वाढली ती. मग तिचं लग्न लावून देताना हयगय कशी करणार? मुलाचं गाव जर दुष्काळी पट्ट्यात असेल, घरी गायगुरं असतील आणि पाणी भरायला हंडे घेऊन लांब कोसावर जावं लागत असेल तर पोरीला कसं द्यायचं त्या गावी?’- पोरीचा शेतकरी बापही आपली सल सांगतो. **ही सारी माणसं काय सांगताहेत? ते सांगताहेत शेतीचा प्रश्न आता जगण्यात कसे वेगवेगळे पेच निर्माण करतोय. त्यातलाच एक म्हणजे शेतकरी नवरा नको म्हणण्याची मुलींची मानसिकता. खेड्यातल्या मुलींनाही शहरी, नोकरीवालाच मुलगा हवा अशी चर्चा आपण नेहमीच ऐकतो. शेतीच करतो मुलगा असं सांगितलं तर सर्वार्थानं अनुरूप मुलाशीही लग्न करायला मुली तयार होत नाहीत. शिकलेल्या मुली तर लग्न करून खेड्यापाड्यात यायलाच तयार नाहीत असं चित्र आहे. त्यावरून मुलींवर टीका, शिक्षणाचे परिणाम असे शेरेही सर्रास मारले जातात. मात्र फक्त याच कारणांमुळे शेती करणाऱ्या मुलांची लग्नं होत नाहीत, की त्यांची लग्नं न जुळण्याची अन्यही काही कारणं आहेत?आणि शोधलंच तर याशिवाय अन्य कारणं, शेती करणाऱ्या उपवर मुलांचे प्रश्न नेमके काय दिसतात?आणि ती कारणं सांगतात की, शेतकरी मुलाला तो शेतीच करतो म्हणून नकार मिळण्यापेक्षा शेतीतली असुरक्षितता, शेतीत न मिळणारी उत्पन्नाची हमी यामुळेही उपवर शेतकरी मुलांना लग्नासाठी मुली मिळत नाहीत. कारण शेतीतली असुरक्षितता लग्न करताना मुलींना घाबरवून सोडते. या साऱ्या कारणांची पुष्टी केली आहे ती अलीकडेच ४५ गावांत करण्यात आलेल्या एका अभ्यासातून!