शहरं
Join us  
Trending Stories
1
'त्यांच्या मेंदूची चीप चोरीला गेलीये, म्हणून ते...'; CM देवेंद्र फडणवीस राहुल गांधींच्या ECI वरील आरोपांवर भडकले
2
या पाच कारणांमुळे डोनाल्ड ट्रम्प भडकलेत; म्हणून भारतावर कर लावलेत
3
Asia Cup 2025 Hockey : पाकिस्तानची माघार; भारतात येऊन खेळण्यास दिला नकार, आता...
4
महाराष्ट्र विधानसभा निवडणुकीत मोठा घोटाळा, राहुल गांधी यांनी सादर केले पुरावे, मतदार यादीतील घोळ केला उघड   
5
"राहुल गांधी यांचा हा करंटेपणा, त्यांना..."; उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदे का संतापले?
6
मंदिरात आला, पिंडीवर जल अर्पण केले, हात जोडले आणि तिथली भांडी चोरली, सीसीटीव्हीमध्ये रेकॉर्ड झाली चोरी
7
नागरिकांचं आरोग्य महत्त्वाचं, आदेशाचा अवमान करू नका; मुंबई उच्च न्यायालयाने पिळले कान
8
प्रेमाच्या नादात नातंच विसरले! २ मुलांच्या आईने भाच्याशी केलं लग्न, नवऱ्याला पाठवले फोटो
9
Aisa Cup 2025: सूर्यकुमार यादव संघात नसेल तर कर्णधार कोण? 'या' ३ खेळाडूंमध्ये चुरशीची स्पर्धा
10
कुबेरेश्वर धाममध्ये आणखी ३ भाविकांचा मृत्यू; आतापर्यंत ७ जणांनी गमावला जीव, कारण काय..?
11
रशियाचे राष्ट्राध्यक्ष भारतात येणार, ट्रम्प यांच्या 'दबावतंत्रा'वर मोदी-पुतीन तोडगा काढणार!
12
Viral Video: रीलसाठी कायपण! थेट धावत्या रेल्वेसमोर...; तरुणाच्या व्हिडीओचा शेवट भयंकर
13
शेअर असावा तर असा! लिस्टिंगच्या दुसऱ्या दिवशीही गुंतणुकदार मालामाल, लागलं २०% चं अपर सर्किट
14
करून दाखवलं! प्रेग्नेन्सीमध्ये प्रिलिम्सची तयारी; डिलिव्हरीच्या १७ दिवसांनी UPSC मेन्स, झाली IAS
15
चेहरा एकच, मतदान ४ ठिकाणी! २ कर्नाटकात, १ मुंबईत आणि १ उत्तर प्रदेशात; कोण आहे हा युवक?
16
केलेल्या आरोपांबाबत २४ तासांत स्वाक्षरीसह शपथपत्र द्या, अन्यथा..., निवडणूक आयोगाचे राहुल गांधींना आदेश
17
“देशाच्या राजकारणात १५ दिवसांत मोठे बदल दिसतील”; प्रकाश आंबेडकरांचा दावा, विरोधकांवर टीका
18
धक्कादायक! कुत्र्यांनी एका बकरीला मारले, बदला म्हणून त्या माणसाने २५ कुत्र्यांना गोळ्याच घातल्या
19
भयंकर! बारमध्ये घुसून तरुणावर चाकूने सपासप वार, ३ वर्षांपूर्वी झालेल्या भांडणाचा काढला राग
20
"ही अमानवी प्रथा बंद करा..."; सरन्यायाधीश संतापले; सुप्रीम कोर्टाचे महाराष्ट्र सरकारला निर्देश

हवा तसा स्मार्टफोन स्वत:च बनवा!

By admin | Updated: June 4, 2015 14:16 IST

स्मार्टफोन विकत कशाला घ्यायचा? घरच्या घरी स्वत:च बनवता आला तर? आपल्याला हवे ते पार्ट्स विकत आणायचे, जोडायचे आणि आपल्यासाठी खास फोन तय्यार! असं होऊ शकतं? लवकरच असे मॉडय़ूलर फोन आपण स्वत: बनवू शकू!

जगभरात किती स्मार्टफोन्स आहेत माहितीये?
अंदाज?
आयडीसी या संस्थेच्या अहवालानुसार 2014 या एका वर्षात जगभरात विकल्या गेलेल्या स्मार्टफोन्सची संख्या होती तब्बल 1अब्ज 16 कोटी! म्हणजे फक्त 2014 मध्ये भारताच्या लोकसंख्यएवढे जवळपास स्मार्टफोन्स विकले गेले! गेल्या पाच-दहा वर्षात या स्मार्टफोन्सनी सगळं जग अक्षरश: पादाक्रांत केलं आहे.
बरं वैविध्यही किती असावं! सॅमसंग या एकटय़ा कंपनीची 56 वेगवेगळी मॉडेल्स गेल्या वर्षी बाजारात उपलब्ध होती.
इतकं काय वेगळेपण असू शकतं, या स्मार्टफोन्समध्ये?
वेगवेगळ्या ग्राहकांच्या खिशाला परवडतील, असे स्मार्टफोन्स बाजारात आणणं हा एक हेतू स्मार्टफोन्स बनवणा:या कंपन्यांचा असतोच. त्याशिवाय नवीन फिचर्स आणि प्रयोगही चालूच असतात.
येत्या काही वर्षात तर स्मार्टफोन्स आणखी स्मार्ट होतील आणि आपला आजचा जो काही स्मार्टफोनचा अनुभव आहे तोदेखील बदलून जाईल. जास्त युनिक, जास्त पर्सनल आणि जास्त सोपा अशा नव्या अनुभवावर येऊ घातलेलं तंत्रज्ञान, आपलं जग आणखी बदलून टाकील, अशी अशा आहे.
 
1) वायरलेस चार्जर्स
मागच्या एका लेखात स्मार्टफोनच्या बॅटरी लाइफबद्दल काही टिप्स मी सांगितल्या होत्या. त्यातला एक महत्त्वाचा मुद्दा आहे तो चार्जिगचा. चार्जर सॉकेटमध्ये खोचा, चार्जिगची छोटी पिन फोनच्या चार्जिग पोर्टमध्ये टाका. त्यात पुन्हा उलट-सुलटचा गोंधळ. वायरलेस चार्जरने या  सगळ्या गोष्टी बाद करून टाकल्या. फक्त वायरलेस चार्जर ऑन करा आणि तुमचा फोन त्यावर ठेवा. वायरलेस चार्जिगसाठी इंडक्शन कुकरमध्ये वापरले जाणारे इंडक्शन करंटचं तंत्रज्ञान वापरलं जातं. वायर लेस चार्जिगसाठी वापरलं गेलेलं इंडक्शन चार्जिग पूर्णपणो निर्धोक असतं.
फक्त वायरलेस चार्जिगचा एक तोटा म्हणजे साध्या चार्जिग पेक्षा ब:यापैकी हळूहळू होतं.
 
2) टर्बो चार्जिंग
चार्जिंगसाठीच तयार झालेलं दुसरं तंत्रज्ञान म्हणजे क्विक चार्जिग किंवा टर्बो चार्जिग. क्वालकॉम या कंपनीनं विकसित केलेलं हे तंत्रज्ञान मोटारोला कंपनीनं नेक्शस 6 फोनद्वारे बाजारात आणलं.  साध्या चार्जिगपेक्षा या फोनद्वारे 75 टक्के कमी वेळात फोन चार्ज होतो. 8 तासांचे चार्जिग 15 मिनिटांत!  यात चार्ज नसलेल्या बॅटरीत जास्त क्षमतेचे विद्युतपल्स सोडले जातात. त्यामुळे बॅटरी लवकर चार्ज होते. यात एक खोच म्हणजे बॅटरी चार्ज जेव्हा अगदीच कमी असते तेव्हा टबरे चार्जिंग जास्त परिणामकारक असते. बॅटरी जसजशी चार्ज होते, तसतसे बॅटरीला धोका न होण्यासाठी टबरे चार्जर वरच्यावर कमी-कमी क्षमतेचे पल्स सोडतो. त्यामुळे फोनची बॅटरी जर 80 टक्के चार्ज असेल तर तुम्हाला टबरे चार्जरमुळे फारसा फरक जाणवणार नाही.
 
3)  डिस्प्लेची नेत्रदीपक दुनिया
एका बाजूला स्मार्टफोनच्या स्क्रि न्सचा आकार वाढत वाढत साडेपाच इंचांच्यावर गेलाय. दुस:या बाजूला स्मार्टफोनच्या स्क्रि नचे रिझोल्युशन वाढतच आहे. HD, Full HD ने डोळे दीपत असतानाच ऊच्या चौपट रिझोल्युशन असलेले क्ऊ डिस्प्ले मिरवणारे स्मार्टफोन बाजारात आले आहेत. त्याही पुढे जाऊन, HD  म्हणजेच qHD डिस्प्ले असलेले फोन्सदेखील काही काळातच बाजारपेठेत उतरायच्या मार्गावर आहेत.
 
याशिवाय डिस्प्लेमधील आणखी एक उल्लेखनीय बदल म्हणजे वक्राकार डिस्प्ले आणि फ्लेक्सिबल डिस्प्ले. qHDमुळे वक्राकार डिस्प्ले आता बाजारात चांगलाच स्थिरावलाय. हेच तंत्रज्ञान qHDयाफोन्सद्बारे स्मार्टफोनच्या विश्वातही आले आहे.
 
4) मॉडय़ुलर फोन्स
माङया फोनचा डिस्प्ले किती असावा, हे ठरवायचा अधिकार स्मार्टफोन कंपनीला का असावा? नाहीतरी स्मार्टफोन कंपन्या स्वत:च एका कंपनीचा प्रोसेसर, दुस:या कंपनीने बनवलेला डिस्प्ले, दुस:या एका कंपनीचे कॅमेरा तंत्रज्ञान आणि तिस:याच एखाद्या कंपनीची ऑपरेटिंग सिस्टिम वापरतातच की?
मग, असे स्पेअरपार्ट वापरून माझा फोन मलाच तयार करता आला तर? म्हणजे मला स्क्रिनसाइझ 5 इंच हवीय, बॅटरी 3200 mah हवीय आणि  प्रोसेसर स्नॅपड्रॅगनच हवाय. आणि हो, मला त्यात थम्ब प्रिण्ट ऑनलॉकरही हवाय!
मॉडय़ुलर फोन्समागचे लॉजिक हे असे आहे. लेगोच्या खेळाप्रमाणो कम्पॅटिबल असणारे पार्ट विकत घ्यायचे आणि अगदी आपल्याला हवा तसा फोन घडवायचा, अशी ही कल्पना आहे. याबाबतीत पुढाकार घेतला आहे तो  गूगलने. गूगलच्या ‘प्रोजेक्टआरा’या प्रकल्पांतर्गत अशा मॉडय़ुलर फोनचे तंत्रज्ञान गूगलने विकसित केले आहे. यावर्षाच्या अखेर्पयत काही मॉडय़ुलर फोन्स बाजारपेठेत येतील.
‘प्रोजेक्टआरा’मधील फोन म्हणजे ‘एंडो’नावाचा एक बेसिकपार्ट आहे. जीवशास्त्रतल्या Endoskeleton प्रमाणो ‘प्रोजेक्टआरा’मधील ‘एंडो’ला बाकीचे पार्ट जोडता येतात. हे पार्ट म्हणजे विशिष्ट कार्य करणारे ‘मोडय़ुल्स. म्हणजे कॅमेरा हवाय का? मग अॅपस्टोअरमध्ये जसे अॅप्स असतात त्याप्रमाणो उपलब्ध असणा:या कॅमेरा मोडय़ुल्समधून हवे ते मोडय़ुल निवडा आणि एंडोला जोडा. याप्रमाणोच NFC, WiFi वगैरे वगैरे मोडय़ुल्स एंडोला जोडता येतात. आहे की नाही भारी!
 
आपल्याला हवा तसा फोन तयार करण्याबरोबरच याचा आणखी एक मोठा फायदा आहे.
तुमच्या फोनची फुटलेली स्क्रि न बदलायची तर कितीचा खड्डा असतो? 
त्यापेक्षा नवा फोन घ्यावा असं वाटलं नाही तरच नवल! 
मॉडय़ुलर फोनमध्ये मात्र स्क्रि न फुटली. नवे मॉडय़ुल घ्या आणि  स्वत:च बसवा. कॅमेरा अपग्रेड करायचाय फक्त तेवढेच मॉडय़ुल बदला. म्हणजे  काय तर आताचा स्मार्टफोन जो दीड-दोन वर्षे जातो त्याची लाइफ चांगली 5-6 वर्षे होईल. आणि तीसुद्धा एकच फोन वापरायचा कंटाळवाणा प्रकार होऊ न देता! 
आहे की नाही गंमत?
 
- गणोश कुलकर्णी