शहरं
Join us  
Trending Stories
1
मोठी बातमी! रायगडच्या समुद्रात मासेमारी बोट बुडाली, बचाव कार्य सुरू; व्हिडीओ व्हायरल
2
जीएसटी कपातीनंतरही कारवर जादा कर लागू शकतो...; सीएने केले विश्लेषण...
3
रशियाची सर्वात शक्तिशाली युद्धनौका S-400 बटालियनसह समुद्रात दाखल, पुतिन काय करतायत..?
4
BEST Election Results 2025: उद्धवसेना-मनसे युतीचा २१-० ने पराभव; राज ठाकरेंची पहिली प्रतिक्रिया आली
5
दोन वर्षाच्या मुलीसह अख्ख कुटुंब मृतावस्थेत आढळल्याने खळबळ; ५ जणांसोबत नेमकं काय घडलं? 
6
अभिनेत्रीला अश्लील मेसेज करणारा तो युवा नेता कोण? समोर आली धक्कादायक माहिती, राष्ट्रीय पक्षाशी संबंध 
7
4 वर्षांत तीन वेळा प्रेग्नंट, तुरुंगवासाची शिक्षा टाळण्यासाठी महिलेने भलताच मार्ग अवलंबला...! जाणून घ्या संपूर्ण प्रकरण
8
Mumbai Crime: 'तुझ्या अंगात भूत आहे', पुजेला बोलावलं आणि ३२ वर्षीय महिलेवर मांत्रिकाने केला बलात्कार
9
श्रावण अमावस्येला पिठोरी अमावस्या का म्हणतात? त्याच दिवशी असतो पोळा आणि मातृदिन
10
राज ठाकरे शिवतीर्थावर परतताच CM देवेंद्र फडणवीसांनी केला उद्धव ठाकरेंना फोन; नेमके कारण काय?
11
रामललांच्या भक्तांना दिवाळीपूर्वीच मिळणार खास गिफ्ट! राम मंदिर ट्रस्ट देणार विशेष भेट, जाणून घ्या सविस्तर
12
ऑनलाइन गेमिंग विधेयकावरुन अनुपम मित्तल यांची सरकारवर टीका; म्हणाले 'या निर्णयामुळे थेट...'
13
UPI वापरणाऱ्यांसाठी मोठी बातमी! १ ऑक्टोबरपासून 'हे' महत्त्वाचे फीचर कायमस्वरूपी बंद होणार
14
श्रावण शनि अमावास्या: शनिदोष, प्रतिकूल प्रभाव कसा ओळखावा? ‘हे’ ५ उपाय तारतील, कृपा होईल!
15
हा पी अर्जुन तेंडुलकर कोण? तुफानी खेळीत १२ चेंडूत ३ चौकार, ३ षटकार ठोकले; मुंबई इंडियन्सच्या नजरेत भरला?...
16
रोज इथे माणसं आदळत आहेत, झोपड्या वाढताहेत, 'अर्बन नक्षल'पेक्षा...; राज ठाकरेंचं 'मिशन मुंबई'
17
विद्यार्थ्याच्या हत्येवरून अहमदाबाद तापले, रस्त्यावर उतरले हजारो लोक, पोलीस आणि NSUI मध्ये वादावादी
18
युद्ध थांबण्याचे नाव नाही! रशियाचा युक्रेनवर आतापर्यंतचा सर्वात मोठा हल्ला; एकाच वेळी डागली ४० क्षेपणास्त्र
19
छत गळतेय, उंदीर फिरतात आणि वीज नसते; इमरान खान यांच्या पत्नी बुशरा बीबींची तुरुंगात दयनीय अवस्था
20
Viral Video: लोणावळ्यात मद्यधुंद महिलांमध्ये फ्री-स्टाईलमध्ये हाणामारी; पोलीस आल्यानंतरही थांबल्या नाहीत!

मेक इट लाइट

By admin | Updated: June 26, 2014 19:01 IST

कॉलेजात जाताना करायच्या फॅशनेबल खरेदीचा एकच मंत्र.

कॉलेज सुरू होणार म्हटलं की, हल्ली अनेकांच्या डोक्यात एकच पहिंला शब्द येतो, ‘शॉपिंग’.
बर्‍याच मुलामुलींना वाटतं, की आपला सध्याचा लूक जाम म्हणजे जामच बोअर आहे. तो तातडीनं बदलून टाकायला हवा. म्हणून मग ते मित्रमैत्रिणींना सोबत घेतात किंवा एखाद्या सिनिअरचा सल्ला घेतात आणि दे दणादण कपडे-बॅगा घेत सुटतात.
पण असं केल्यानं खरंच त्यांचा लूक बदलतो का? ते ट्रेण्डी दिसायला लागतात का? अनेकांना तर कॉलेजात गेल्यावर कळतं की जे आपण ट्रेण्डी म्हणून घेतलं, ते ट्रेण्डी-फॅशनेबल नाहीच. मुख्य म्हणजे आपल्याला ते कम्फर्टेबल वाटत नाही, धड कॅरी करता येत नाही आणि आपल्या चेहर्‍यावरच्या लूकशी ते कपडे मॅचही होत नाहीत.
अशावेळी निव्वळ फ्रस्ट्रेशन येण्यापलीकडे आपण दुसरं काहीही करू शकत नाही. पैसे तर पाण्यात गेलेले असतातच; पण कॉलेजात इम्प्रेशन जमवण्यासाठी म्हणून जो आटापिटा केलेला असतो तोही वाया जातो.
असं होऊ नये म्हणून यंदा कॉलेजात पाऊल ठेवण्याआधी आपण कपडे घेण्याचे काही बेसिक रुल्सच शिकून घेऊ.
सो, जस्ट मेक इट सिम्पल, अँण्ड मोअर फॅशनेबल.?
कसं तेच तर सांगतेय.!
पण ते नवीन काय हे समजून घेण्याआधी काही चुकीच्या समजुती आपल्या डोक्यातून काढून टाका.
 
ट्रॅडिशनल आणि ट्रेण्डीच!
 
१) अनेक मुलींना कॉलेजात गेल्यावर असं वाटायला लागतं की, हा आपला सलवार कुर्ता एकदम बोअर आहे. आपण एकदम ‘बहनजी’च दिसतो. वेगळं काहीतरी घालायला पाहिजे. ते ‘वेगळं’ काहीतरीच्या नादात त्या भरमसाट कपडे घेतात. ते कपडे कॅरी करता येतील की नाही याचा विचारही करत नाहीत. आणि कॉलेजात गेल्यावर, आपल्याला नाही शोभत म्हणत किंवा घरच्यांचा धाक म्हणून ते कपडे घातले जात नाहीत.
त्यामुळे हे लक्षात ठेवलेलं बरं की, सलवार-कमीज, चुडीदार-कुर्ताच जर आपण घालणार असू तर तो ट्रेण्डी नाही, आपण फॅशनेबल दिसणारच नाही हे डोक्यातून काढून. त्या सलवार-कुर्त्यालाच जास्त स्मार्ट बनवता येऊ शकतं. ते कसं हे नंतर सांगते.
२) कॉलेजात काहीही घातलं तरी चालतं. असं अनेक मुलांना आणि मुलींनाही वाटतं, की कॉलेज आहे, आपण काय वाट्टेल ते घालून जाऊ शकतो. तसं करतातही अनेक जण. पण आपला लूक, पर्सनॅलिटी, आपल्या कपड्यांतून निर्माण होणारी आपली प्रतिमा या सार्‍याचा विचार करायची सवय स्वत:ला लावायची असेल तर कॉलेजातही डिसेंट कपडे घालायला हवेत. फॅशनेबल घाला, पण ते ओंगळवाणे, विचित्र दिसता कामा नयेत.
- हे एवढं जरी लक्षात ठेवलं तरी यंदा कॉलेजात जाताना काय घालायचं या प्रश्नातली निम्मी काळजी संपते. आणि मग आता विचार करू की, नेमकं घालायचं काय? कसं? आणि सध्या एकदम ‘इन’ काय आहे.
अर्थात नुस्ती फॅशन कसली आहे याचा विचार करून कपडे घालू नयेत, फॅशन्सचेही काही नियम आहेत ते लक्षात घेतले तर फॅशन नावाची गोष्ट आपण कायमसाठी शिकू शकतो.
तेच शिकण्याचा या लेखात एक खास प्रयत्न.
- प्राची खाडे
स्टायलिस्ट आणि पर्सनल शॉपर
 
फॅब्रिक, प्रिण्टस आणि रंग - फॅशनचे सिंपल रुल्स
 
१) हा एक बेसिक नियम कायम लक्षात ठेवा. 
प्रत्येक ऋतूचा आपले म्हणून काही रंग असतात. तेच रंग निसर्गात अवतीभोवती सर्वत्र दिसतात. म्हणजे पावसाळ्यात आकाश भरून आलेलं असतं, सगळीकडे मळभ असतं. कोंदट हवा असते. ब्राऊन, हिरवा, राखाडी, निळा हेच रंग सर्वत्र दिसतात.
त्यामुळे पावसाळ्यात या रंगाचे कपडे घालायचे नाहीत. ते रंग टाळायचे. दुसरे ब्राईट कलर्स शक्यतो वापरायचे. एकतर पावसाळ्यात उदास वातावरणात त्यामुळे आपला मूड बदलतो, फ्रेशही वाटते. डोळ्यांनाही ते रंग चांगले वाटतात.
म्हणूनच पिवळा, तांबडा, निळा, गुलाबी, केशरी हे रंग वापरावेत.
नियम तोच, हे सगळे रंग उन्हाळ्यात भडक वाटतील त्यामुळे उन्हाळ्यात हे रंग टाळायचे.
जो ऋतू त्या रंगाचे कपडे वापरायचे नाहीत, हा साधा नियम अजिबात विसरायचा नाही.
२) जे रंगाचं तेच प्रिण्ट्सचं. पावसाळ्यात ऊन अनेकदा पडत नाही, त्यामुळे जे रंग, ज्या प्रिण्ट्स ऊर्जादायी वाटतील, ब्राईट वाटतील त्याच वापरायच्या. म्हणूनच पावसाळ्यात कपडे घेताना ब्राईट प्रिण्ट्स, जॉमेट्रिक, फ्लोरल या प्रिण्ट्सचे कपडे शक्यतो घ्यावेत. फ्लोरल प्रिण्ट्समध्ये आता अनेक प्रकार उपलब्ध आहेत, त्यामुळे जो आपल्याला आवडेल तो निवडावा.
३) अनेक लोकं फॅब्रिकचा काही विचारच करत नाहीत. मला कॉटन आवडतं म्हणून मी कॉटनच घालणार असा त्यांच आग्रह असतो. पण नियम लक्षात ठेवला तर पावसाळ्यात असे सुती, लवकर न वाळणारे, जाडसर कपडे वापरू नये. त्यापेक्षा लाईट फॅब्रिक वापरलं तर ते वाळतंही लवकर आणि त्यात वेगवेगळे ब्राईट रंग आणि प्रिण्ट्सही जास्त मिळू शकतात. त्यामुळे पावसाळ्यात कपडे घेताना कॉटनचा मुळीच विचार करायचा नाही. त्याऐवजी सिंथेटिक, जॉर्जेट, शिफॉन, लायक्रा हे लायटर फॅब्रिक वापरणं केव्हाही उत्तमच.
 
कॉलेजात जायचं म्हणून, काय-काय घ्याल?
 
कपडे?
कॉलेज आणि पावसाळा एकदमच सुरू होतो. चिकचिक, भिजणं, धावपळ सगळं एकाच वेळी सुरू होतं. त्यामुळेच जर तुम्ही कम्फर्टेबल असाल, तर खास पावसाळी रंगाढंगाचे कपडेच वापरा. 
म्हणजेच ‘कट्स’चा विचार करा. कपड्यांची खरेदी करताना या कट्सचा विचार फार महत्त्वाचा असतो. यंदा कपडे घेताना कुठले कट्स ‘इन’ आहेत हे लक्षात ठेवा.
१) शॉर्ट्स, बर्मुडा, केप्रीज
पावसाळ्यात मुलींसाठी आणि मुलांसाठीही या सर्व प्रकारचे कपडे कॉमन आहेत. फक्त मुलींसाठी किंवा मुलांसाठी असा भेद करण्याचं काहीच कारण नाही. ज्यांना आवडतात, त्यांनी पावसाळ्यात हे कपडे नक्की घालावेत.
२) नी लेन्थ ड्रेसेस
मुलींसाठीचे नी लेन्थ ड्रेसेस सध्या सगळ्यात जास्त पॉप्युलर आहेत. ते दिसतातही चांगले. ज्यांना कॅरी करता येतात त्यांनी वापरायला काहीच हरकत नाही.
३) लॉँग स्कर्ट्स
ज्या स्कर्ट वापरतात त्यांच्यासाठी लॉँग स्कर्टस् हा उत्तम आणि सध्याचा सगळ्यात फॅशनेबल पर्याय आहे. स्कर्ट आणि ट्रेण्डी टॉप हा सगळ्यात हिट फॉर्म्युला.
४) हेरम पॅण्ट्स
सैलसर हेरम पॅण्ट्स हा सगळ्यात सुटसुटीत पर्याय. होजिअरी कापडापासून वेगवेगळ्या फॅब्रिकमध्ये या पॅण्ट्स उपलब्ध आहेत. घोट्याजवळ इलास्टिक असलेल्या या पॅण्ट्स दिसतातही खासच.
५) थ्री-फोर्थस्
उत्तम दर्जाच्या थ्री-फोर्थस् मुलं वापरू शकतात. 
फक्त त्या दिसायला डिसेंट आणि स्मार्ट हव्यात.
६) कन्व्हर्टेबल कार्गो
मुलांसाठी सध्या हा एक एकदम बेस्ट पर्याय उपलब्ध आहेत. या कार्गोला कन्र्व्हट करून थ्री फोर्थ किंवा बर्मुडा म्हणूनही वापरणं शक्य आहे. त्या दिसतातही एकदम मस्त.
पर्स कुठली?
१) त्यातही नियम एकच, वॉटरप्रूफ, ब्राईट कलरची मोठी बॅग घ्या. पर्समध्येही जॉमेट्रिक प्रिण्ट्स, फ्लोरल प्रिण्ट्स उठून दिसतील.
२) हाच नियम सॅक, बॅग पॅक, टीनी 
पर्सेसलाही लागू होतो.
बूट-चप्पल?
१) काळ्या-तांबड्या रबरी चपला हा पावसाळ्यातला ऑप्शन आता मागे पडलाय.
२) पावसाळी  चपलांमध्येही अनेक ब्राईट कलर्स, सुंदर प्रिण्ट्स आता मिळताहेत. त्या वापरा.
३) ज्यांना फॉर्मल शूज वापरणं आवश्यकच आहे, त्यांच्यासाठीही फॉर्मल शेपमध्ये रेनी-रेक्झिनचे शूज आता मिळतात. ते वापरायला हरकत नाही.
छत्री?
काळ्या छत्र्या आता फारशा कुणी वापरत नाहीच. पण छत्री निवडतानाही फुलाफुलांच्या प्रिण्ट्ची ब्राईट कलरचीच छत्री शक्यतो घ्या.
 
हे नक्की करा.
१) पावसाळ्यात मुलींनी शक्यतो एखादा ब्राईट कलरचा स्टोल आपल्या बॅगेत कायम ठेवावा. भिजलो तर तो अंगावर घ्यायला उपयोगी पडतो. शिवाय घट्ट टॉप, कव्हरअप करणंही इझी जातं. स्टोल मात्र डार्क कलरचा प्रिण्टेडच हवा.
२) पावसाळ्यात हेवी एम्ब्रॉयडरीचे, टिकल्या-मण्यांचे कपडे वापरणं टाळा. पावसात भिजले तर ते कपडे जड होतात, लवकर वाळतही नाहीत. एम्ब्रॉयडरी टोचते.
३) पंजाबी ड्रेस, सलवार-कुर्ता वापरणार्‍या मुलींनी प्लेन कपडे घालू नयेत. अनेकदा प्लेन सिंथेटिक कपडे भिजले की ट्रान्सपरण्ट होतात. ते वाईट दिसतं. त्यामुळे प्लेन कुर्ता जरी असला तरी प्रिण्टेड सलवार, त्यावर काण्ट्रॉस्ट , ब्राईट कलरचा 
दुपट्ट घ्या. काहीही झालं तरी ट्रान्सपरण्ट असे कपडे वापरू नका.