शहरं
Join us  
Trending Stories
1
एकल पदाच्या पदोन्नती, भरतीमध्ये आरक्षण नाहीच! आजवरचे सगळे आदेश रद्द करून काढला नवा शासन निर्णय
2
LPG Price Today: आज एलपीजी सिलिंडरच्या किमतीबाबत काय आहेत अपटेड? पटापट चेक करा
3
आजचे राशीभविष्य, ०७ एप्रिल २०२६: गूढ रहस्यमय विद्येचे आकर्षण राहील; प्रकृती उत्तम राहील
4
Air India च्या सीईओंचा राजीनामा, अनेक आव्हानांचा सामना करतेय कंपनी; पाहा डिटेल्स
5
इराणला अमेरिकेचा अखेरचा अल्टिमेटम; "रात्री ८ पर्यंत निर्णय घ्या, अन्यथा थेट पाषाण युगात पाठवू"
6
राज्यातील खासदार, आमदारांविरोधात हत्या, बलात्काराचे खटले; आकडेवारीत मुंबई प्रथम
7
भोंदू अशोक खरातवर EDकडून गुन्हा दाखल; आर्थिक गैरव्यवहारप्रकरणी लवकरच होणार छापेमारी
8
समान नागरी संहिता, वन नेशन-वन इलेक्शन हे भाजपचे अजेंडे अद्याप अपूर्ण: पंतप्रधान मोदी
9
राष्ट्र समृद्ध आणि सुरक्षित असेल तरच वैयक्तिक समृद्धी शक्य- सरसंघचालक मोहन भागवत
10
धोक्याची घंटा! एआय डेटा सेंटर्समुळे वाढतोय पृथ्वीचा पारा; कोट्यवधींवर ओढावणार संकट
11
अनिल अंबानी समूहाच्या कर्ज प्रकरणात ७३ हजार कोटी रुपयांचा महाघोटाळा; CBIचा दावा
12
दिल्ली विधानसभेत थरार! कडक सुरक्षा व्यवस्थेला आव्हान देत बॅरिकेड तोडून SUV आत
13
आसाममध्ये हिमंता बिस्वा सरमा सत्ता टिकवणार की, गौरव गोगोई समीकरणे बदलणार?
14
इराणमधील अनेक शहरांवर बॉम्ब हल्ले; शैक्षणिक संस्थाही लक्ष्य, २५ हून अधिक नागरिक ठार
15
आयपीओंचा महापूर, ३८ ‘ड्राफ्ट पेपर’ दाखल! १२४ कंपन्या मुहूर्ताच्या प्रतीक्षेत, गुंतवणूकदारांची चांदी
16
तामिळनाडूमध्ये ७५ टक्के मंत्रिमंडळ भ्रष्टाचाराच्या खाईत अडकलेले : देवेंद्र फडणवीस
17
सोने दीड लाखावर, तरी खरेदी जोरात; आयात तुफान वाढली, भारताला स्वित्झर्लंडच्या सोन्याचा मोह
18
इराणला एका रात्रीत नष्ट करू शकतो आणि ती रात्र मंगळवारची रात्रही असू शकते; ट्रम्प यांच्या विधानाने जगात खळबळ
19
IPL 2026 : PBSK विरुद्धही अजिंक्य रहाणे चुकला! पण पावसाच्या बॅटिंगमुळे वाचला! KKR नं मॅच न जिंकता उघडले खाते
20
"धड भाषणही देता न येणाऱ्या, कुटुंबीयांच्या पुण्याईवर खासदार झालेल्या मुलाने...", काँग्रेसने पार्थ पवारांना सुनावले
Daily Top 2Weekly Top 5

तुमच्या डोक्यात भन्नाट अँपच्या आयडिया आहेत का? मग घ्या चॅलेंज

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: July 16, 2020 16:56 IST

इनोव्हेट इंडिया

ठळक मुद्देhttps://innovate.mygov.in/  ही वेबसाइट पाहा. तिथं नावनोंदणी करता येईल.

 प्रसाद  ताम्हनकर 

पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी डिजिटल इंडिया अंतर्गत ‘आत्मनिर्भर इंडिया इनोव्हेशन’ नावाचं एक नवीन आव्हान इच्छुक भारतीयांसाठी आणलं आहे.त्यासाठी अर्ज करण्याची अंतिम तारीख 18 जुलै. एनआयटीआय आयोगाने इलेक्ट्रॉनिक्स आणि माहिती तंत्रज्ञान मंत्रलय आणि अटल इनोव्हेशन मिशनच्या भागीदारीअंतर्गत हा उपक्रम सुरूकेला आहे. ‘मेक इन इंडिया’ या योजनेला पुन्हा गती देण्याचा प्रयत्न याद्वारे करण्यात येत आहे.  आत्मनिर्भर भारत इनोव्हेशन चॅलेंजमध्ये मोबाइल गेम्स, सोशल मीडिया आणि फोटो-व्हिडिओ एडिटिंग अॅप्स तयार करावे लागतील. स्पर्धेच्या आव्हानांतर्गत विजेत्याला जास्तीत जास्त 20 लाख रु पयांचे बक्षीस मिळू शकते. या अॅपला ‘मेक इन इंडिया फॉर इंडिया अॅण्ड द वर्ल्ड’ हा मंत्र देण्यात आला आहे. मेक इन इंडिया अॅप्स बनवण्यासाठी लोकांना प्रेरणा देण्याचं उद्दिष्ट आहे. सध्या भारत आणि चीन या दोन्ही देशांमध्ये सुरू असलेल्या तणावाकडे बघता, हे चॅलेंज म्हणजे या क्षेत्रंमध्ये कार्यरत असलेल्या भारतीयांसाठी एक अनोखी संधी आहे.  या स्पर्धेत ज्या ज्या क्षेत्रंचा समावेश आहे, जसे की- विविध खेळ आणि मनोरंजक, फोटो-व्हिडिओ एडिटिंग, सोशल मीडिया अॅप्स या सगळ्यांवरती सध्या चीनचं वर्चस्व आहे. या वर्चस्वाला मोडीत काढत, देशवासीयांना चीनच्या तोडीस तोड अस्सल भारतीय अॅप्स उपलब्ध होण्याची संधी या स्पर्धेद्वारे उपलब्ध होणार आहे. सध्या अनेक भारतीय कामाच्या निमित्ताने इच्छा नसतानादेखील काही मोजक्या चिनी अॅप्सवर अवलंबून आहेत, त्यांना भारतीय अॅप्स उपलब्ध झाल्यास, ते आनंदाने या नव्या देशी पर्यायांचा स्वीकार करतील, आणि मुख्य म्हणजे भारतीय अॅप्स वापरात आल्यास यूझर्सच्या वैयक्तिक माहितीची चोरी होणं अथवा ती देशाबाहेर जाणं यालादेखील आळा बसणार आहे. म्हणून देशाला डिजिटल आणि स्वावलंबी करण्यासाठी पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी एक पाऊल पुढे टाकत  आत्मनिर्भर भारत इनोव्हेशन चॅलेंज सुरू केलं आहे. स्वत: पंतप्रधान मोदी यांनी ट्विट करत या आव्हानाची माहिती सार्वजनिक केली आहे. हे आव्हान फोटो एडिटिंग ते गेमिंग अॅप्सर्पयतच्या आव्हानांसह अनेक भिन्न श्रेणींमध्ये विभागले गेले आहे. पंतप्रधान नरेंद्र मोदी ट्विटमध्ये म्हणतात, जर तुमच्याकडे अशी उत्पादनं असतील किंवा तुमच्याकडे असं उत्पादन तयार करण्याची अनोखी दृष्टी व कौशल्य आहे असं वाटत असेल तर हे आव्हान तुमच्यासाठी आहे.’तुम्हालाही आत्मनिर्भर भारत इनोव्हेशन चॅलेंजमध्ये सहभागी व्हायचं असेल, तर त्यासाठी https://innovate.mygov.in/  ही वेबसाइट पाहा. तिथं नावनोंदणी करता येईल.अर्ज करण्याची शेवटची तारीख 18 जुलै 2020 आहे.बघा, घेता का चॅलेंज, बनवता का भन्नाट अॅप?

 

ऑनलाइन  शॉपिंग करताय; पण साइट कुठली आहे?

सध्याच्या कोरोनासंकटात ऑनलाइन शॉपिंगमध्ये वाढ झाली आहे, तरी फसवणूक करणा:या शॉपिंग वेबसाइट कशा ओळखाव्यात?अविश्वसनीय अशा ऑफर देणा:या साइट्स सहसा टाळा. म्हणजे काय तर पाच हजार रु पयांत अॅपल फोन मिळवा, 9क्क् रुपयांत सॅमसंगचे स्मार्ट वॉच मिळवा, अशा ऑफर देणा:या वेबसाइट शक्यतो फसवणुकीसाठी उघडलेल्या असतात. या वेबसाइटची नावंदेखील विचित्र असतात. या साइटच्या नावावरती क्लिक केल्यानंतर त्या तुम्हाला भलत्याच नावाच्या वेबसाइटवरती पोहोचवतात. अशा फसव्या वेबसाइट्सवरती शक्यतो लॉग-इन किंवा रजिस्ट्रेशनची गरजच पडत नाही, त्या थेट तुम्हाला वस्तूच्या खरेदीचा पर्याय उपलब्ध करून देतात. वेबसाइटमध्ये थेट खरेदीचाच पर्याय उपलब्ध असल्याने, शॉपिंग कार्ट इत्यादी पर्यायांचा वापर करताच येत नाही. अशा वेबसाइट्सवरती दिलेल्या ऑफर्स  कायमच काही तासात संपणा:या असतात. दहा हजार रु पयांची अमकी तमकी इलेक्ट्रॉनिक वस्तू खरेदी करा, फक्त 4,999 रुपयांत, शेवटची तीस मिनिटं शिल्लक अशा जाहिराती दिसतात.त्या मोहात शक्यतो पडू नका. साइट माहितीतली, लॉग इन, पेमेंट सुरक्षित असेल आणि पूर्वानुभव बरा असेल तरच शक्यतो ऑनलाइन खरेदीचा पर्याय निवडलेला बरा.

( प्रसाद विज्ञान/तंत्रज्ञानविषयक पत्रकार आहे.)