शहरं
Join us  
Trending Stories
1
Video: काळजाचा ठोका चुकला! अंबरनाथ स्थानकात लोकल येत होती अन् अंध व्यक्ती थेट ट्रॅकवर कोसळला
2
निगेटिव्ह रिपोर्टिंग केल्याच्या रागातून डॉक्टरांचे बनवले अश्लील व्हिडिओ? कराडात 'एआय' चा घातक वापर
3
अखिलेश यादवांच्या आले मनी...! एक जिल्हा सोडला अन् युपीतील इतर जिल्ह्यांच्या कार्यकारिणी केल्या बरखास्त
4
ट्रम्पनी संधी साधली, अमेरिका आणि चीनमध्ये खतरनाक डील झाली; ट्रम्पच्या घोषणेने अनेकांची झोप उडाली
5
हे तेच मजेशीर केदार यादव...! लालूंचा वाढदिवस होडीवर साजरा करायला गेले आणि चिखलात पडले...
6
महापालिका निवडणूकीच्या पाश्वभूमीवर ओमी कलानींचा पुन्हा शिंदेगटाकडे दोस्तीचा हात?
7
महाराष्ट्रातही सोनम-राजा प्रकरण! २३ मे रोजीच झालेले लग्न, वटपौर्णिमेलाच कुऱ्हाडीने पतीला संपविले
8
Sonam Raghuvanshi : सोनम रघुवंशी प्रेग्नंट? लग्नाला महिना झाला! मेघालय पोलिसांकडे वैद्यकीय अहवाल आला
9
पहाटे ५.३० ला हॉटेलवरून निघाले, २.३० वाजता राजाचा मृतदेह दरीत फेकला; 'असा' होता ९ तासांचा घटनाक्रम
10
छत्तीसगडमधील सुकमा येथे दोन नक्षलवादी ठार; एकावर ५ लाखांचे बक्षीस होते
11
"एक दो तीन"... कॅच घेताना मोर्कोची 'कसरत'! लॉर्ड्सवर विक्रम रचल्यावर असा फसला स्मिथ (VIDEO)
12
छत्रपती संभाजीनगरास वादळाचा तडाखा; सिद्धार्थ गार्डनमधील भिंत कोसळून दोन महिलांचा मृत्यू
13
छत्रपती संभाजीनगरच्या विद्यार्थिनीची नवी मुंबईत आत्महत्या, प्राचार्यावर गंभीर आरोप, गुन्हा दाखल
14
BSF जवानांना ड्युटीवर जाण्यासाठी खराब ट्रेन मिळाली होती; रेल्वेने ४ अधिकाऱ्यांवर कारवाई केली
15
२० वर्षीय पाकिस्तानी युवकाच्या 'प्लॅनिंग'नं अमेरिका हादरली; FBI नं अटक करताच मोठा खुलासा
16
राज-सोनम यांनी केला होता कोर्ट मॅरेजचा प्रयत्न? राजासोबत लग्नाची घाई का केली? गोविंदनं दिलं उत्तर
17
टीम इंडियातील 'प्रिन्स'चा रुबाब! शुबमन गिलच्या स्टायलिश फोटोशूटवर उमटली फिरकी घेणारी कमेंट
18
आता फक्त ठाकरे ब्रँडच चालणार! शिवसेना भवनाबाहेर पहिल्यांदाच काका-पुतणे एकाच बॅनरवर झळकले
19
हायवेवर डान्स करत होती पत्नी अन् पतीला करावं लागलं शूटिंग! व्हिडीओ पाहून लोक म्हणाले 'सुखाने जगायचं तर..'
20
Raja Raghuvanshi : सोनमच्या भावाने २ मिनिटांत सत्य बाहेर काढले; राजा रघुवंशी हत्या प्रकरणी गोविंदाचा मोठा खुलासा

माधुरी दीक्षितसारखं ‘फ्युजन’ आपल्याला जमेल का?

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: October 11, 2018 18:06 IST

जिन्सवर टॉप किंवा कुर्ता हे कॉम्बिनेशन बोअर झालं. हा घ्या नवीन ट्रेण्ड.

ठळक मुद्देमाधुरीसारखं एकाच रंगाचे टॉप, पॅण्ट आणि श्रग किंवा  कॉन्ट्रास्ट कॉम्बिनेशन हेसुद्धा सुंदर दिसतं.

- श्रुती साठे 

एखादा वेस्टर्न किंवा इंडियन टॉप आणि जिन्स हे कॉम्बिनेशन तसं आता आपल्या सरावाचं झालंय. पण या त्याच त्या कॉम्बिनेशनचाही कंटाळा येतो. वेस्टर्न कपडे वापरणार्‍यांनाही सगळीकडे सरसकट क्र ॉप टॉप किंवा ब्रालेट कुठंही, कधीही वापरता येत नाही. कितीही म्हणलं तरी विचारच करावा लागतो असे कपडे वापरताना!  अशावेळी धावून येतं आपल्याकडे असलेलं आपलं फेव्हरीट एथनिक वेअर कलेक्शन! आपल्याकडे असलेले वेस्टर्न आणि एथनिक वेअर यांचा हुशारीने वापर करून त्यातून एक अनोखा फ्युजन ड्रेस तुम्ही नक्कीच ट्राय करू शकता. पारंपरिक आणि आधुनिकतेचा हा मिलाफ सहज जमू शकतो.तो जमवलाय खुद्द आपल्या आवडत्या एव्हरग्रीन माधुरी दीक्षितनं. ती अशा फ्युजन वेअरमध्ये अलीकडेच दिसली. ब्रालेट हा कॉलेजला जाणार्‍या मुलींचा फेवरिट टॉप प्रकार. डिझायनर अनुश्रीने या ब्रालेट स्टाइलला एथनिक प्रिण्ट आणि एम्ब्रॉयडरीची जोड दिली. यासोबत फुल लेन्थ प्रिण्टेड पलाझो पॅण्ट आणि प्लेन लांब श्रग वापरून तिने हा लूक पूर्ण केला. फिकट हिरव्या रंगाचं, प्लेन आणि प्रिण्टचं उत्तम बॅलन्स असलेला हा फ्युजन ड्रेस माधुरीवर उठून दिसला. आपणसुद्धा असं फ्युजन नक्की ट्राय करू शकतो. एखादा प्लेन आणि प्रिण्टेड क्र ॉप टॉप असेल तर तो डेनिमवर वापरायच्या ऐवजी एथनिक प्रिण्टेड पलाझोवर वापरून पाहा. यावर नेहमी स्टोल घेत असाल तर तसे न करता लांब श्रग वापरून पाहा. असे कॉम्बिनेशन करताना प्लेन आणि प्रिण्टेड कपडय़ांचा योग्य बॅलन्स सांभाळणं गरजेचं असतं. नुसतंच सगळं प्लेन नको किंवा प्रिण्टचा अतिरेकसुद्धा नको. माधुरीसारखं एकाच रंगाचे टॉप, पॅण्ट आणि श्रग किंवा  कॉन्ट्रास्ट कॉम्बिनेशन हेसुद्धा सुंदर दिसतं.