शहरं
Join us  
Trending Stories
1
CSK प्लेऑफ्सच्या शर्यतीतून आउट; IPL च्या इतिहासात धोनीच्या संघावर पहिल्यांदाच आली ही वेळ
2
पाकिस्तान हादरला !! बसले भूकंपाचे तीव्र धक्के; किती होती तीव्रता? काय आहे सध्याची परिस्थिती?
3
जातिनिहाय जनगणना निर्णयावरुन आता श्रेयवादाची लढाई; भाजपा नेत्यांचा राहुल गांधींवर पलटवार
4
चहलनं साधला मोठा डाव; IPL मधील दुसऱ्या हॅटट्रिकसह युवराज सिंगच्या विक्रमाशी बरोबरी
5
"आम्ही सुरुवात करणार नाही, पण...!"; पाकिस्तानची भारताला पोकळ धमकी
6
"2043 पर्यंत या देशांमध्ये असेल मुस्लिमांचं राज्य", बाबा वेंगा यांची भविष्यवाणी!
7
दिशा सालियन प्रकरण: सतीश सालियन यांच्या याचिकेवर भूमिका स्पष्ट करा; HCचे सरकारला निर्देश
8
'सरकारला 'टेकू' असला की मनमानी करता येत नाही'; जातनिहाय जनगणनेच्या मुद्द्यावरून खोचक टोला
9
संध्याकाळचे पेट्रोलिंग टाळले म्हणून पोलिस आयुक्तांनी ठाण्यात पोहोचून ठाणेदारांना फटकारले!
10
देशहितासाठी आ‌वश्यक ते सर्व केंद्राने करावे; जातनिहाय जनगणनेवर संघाची भूमिका
11
धक्कादायक! सांगलीतील आष्ट्यात विहिरीत पोहण्यासाठी गेलेल्या दोन जणांचा बुडून मृत्यू
12
भारत कधीही हल्ला करेल; पाकिस्तान घाबरला, PoK ला जाणारी सर्व देशांतर्गत उड्डाणे केली रद्द
13
"मोदी सरकारने घेतलेला निर्णय ऐतिहासिक...", जात जनगणनेवरून मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांचा काँग्रेसवर गंभीर आरोप 
14
यवतमाळ: १२ तासात दोन खून! दारूच्या वादात जावायाला संपवले; मालमत्तेच्या वादातून मोठ्या भावाची हत्या
15
गंगेप्रमाणेच राष्ट्रीय स्वयंसेवक संघालाही थांबविण्याचे कोणाकडे साहस नाही: भैय्याजी जोशी
16
जातिनिहाय जनगणनेचा निर्णय हा राहुल गांधींच्या संघर्ष व विचारांचा मोठा विजय: हर्षवर्धन सपकाळ
17
अमूल दूध २ रुपयांनी महागले, महागाईने बेजार झालेल्या सर्वसामन्यांना झटका!
18
कोकण मंडळाच्या योजनेअंतर्गत म्हाडा विकणार १३,३९५ घरे; तुम्ही ऑनलाईन अर्ज केला का?
19
जातीय जनगणनेसाठी सरकारला पूर्ण पाठिंबा, पण..., राहुल गांधींच्या केंद्राला 'या' 4 मागण्या
20
दाैंडच्या खून प्रकरणी १२ जणांना जन्मठेप! आरोपींमध्ये चार सख्खे भाऊ, तीन महिलांचा समावेश

प्रेमच संपवणारे हे कोणते व्हायरस?

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: February 7, 2019 18:00 IST

प्रेम आपल्या समाजात आजही गुन्हाच आहे. प्रेमाच्या नावावर गळे चिरले जातातच; मात्र त्यापलीकडे प्रेमाचे वैरी आपणच पोसतोय, त्यांचं काय?

ठळक मुद्देअ‍ॅन्टिव्हायरस सापडेल तेव्हा सापडेल; पण हे सारं काय आपण ओढावून घेतो आहोत, याचा विचार या आगामी प्रेम दिनानिमित्त करायला हवा. 1) बिझी, यू नो!

- अंकुश जोशी

व्हॅलेन्टाइन्स वीक सुरू झाला.बाजारपेठा सजतील, लालचुटुक फुगे, हॉटेल्स, माध्यमातल्या बातम्या हे सारं सुरू होईल.हे सारं आपल्या समाजात खरं आहे की नाही? तर आहे. प्यार किया तो डरना क्या म्हणणारं तारुण्य आहे की नाही, तर आहे.मात्र, प्यार के दुश्मन हजार हे आजही खरंच आहे. वाचतोच आपण बातम्या. प्रेमाची शिक्षा म्हणून भररस्त्यात आजही गळा कापला जातो. त्याच्या बातम्या वाचून, व्हायरल व्हिडीओ पाहून भीती वाटतेच. आजही खेडय़ापाडय़ातच कशाला, शहरातही जातीपाती, खानदान की इज्जत, घरच्यांना फसवलं, पैसाअडका, लोक काय म्हणतील, रंगरूप हे सारे प्रेमात आडवं येतं. ते सारं एका टप्प्यावर इतकं महत्त्वाचं ठरतं की त्यापायी एकमेकांचे जीव घ्यायला लोक कमी करत नाहीत. आणि आपल्यामुळे नको घरच्यांना त्रास म्हणून यश चोप्रा फिल्म स्टाइल मुलंमुली स्वतर्‍च ठरवतात की आपण आपल्या प्रेमाचा त्याग करू, विसरुन जाऊ सारं पण हा जीवघेणा जाच नको. किती मुलंमुली आजही आपलं प्रेम विसरुन, सारं संपवून घरचे म्हणतात तिथं लग्न करून मोकळे होतात. भयंकर असलं तरी हे आजच्या समाजाचं वास्तव आहेच. मात्र हे सारे शत्रू कमीच होते म्हणून आधुनिक काळात आणखी काही शत्रू आता प्रेमाच्या जिवावर उठलेत. आणि त्यापायी प्रेमातल्या रोमान्सलाच नाही तर प्रेमालाच चूड लागतोय हे लक्षातही येत नाही. अनेकांना कुठून प्रेमात पडलो असं वाटावं इतका जीव नको करणारी भांडणं सतत होतात. कारण प्रेमाला छळणारे आणि त्यासाठी टपून बसलेले काही शत्रू आपल्याच पिढीनं जन्माला घातले आहेत. त्यांची जाणीव होते तोवर ब्रेकअप होऊन गेलेला असतो. ते आहेत नव्या लव्ह स्टोरीतले व्हायरसच.अ‍ॅन्टिव्हायरस सापडेल तेव्हा सापडेल; पण हे सारं काय आपण ओढावून घेतो आहोत, याचा विचार या आगामी प्रेम दिनानिमित्त करायला हवा.

1) बिझी, यू नो!प्रेमात पडतात. पण रोज भेटायला अनेकांना वेळ नाही. फोनवर बोललं की भांडणंच होतं. कारण प्रश्नांची सरबत्ती. त्यातून गैरसमज, भांडणं. ते काही संपत नाही.

2) पझेसिव्हत्यानं/ तिनं कुणा मित्र-मैत्रिणींशी बोलूच नये. फक्त आपली मालकी याच भावनेतून नात्याला बांधून घालणारे काच बसतात. त्यातून पझेसिव्हनेस भयंकर त्रास देतो.

3) सोशल मीडियासोशल मीडिया खरंच शत्रू होतो प्रेमाचा. सतत एकमेकांच्या टाइमलाइन पाहणं, संशय घेणं, सगळं शेअर करणं, इतरांशी जास्त बोलणं, कुणाला लाइक केलं, कुणाला नाही यावरुन वाद. त्यानं सगळंच बिघडतं.

4) अति बोलणंखाणंपिणं, बोलणं, काम हे सारं एकमेकांना डिटेल सांगत राहाणं आणि समोरच्याकडून तशी अपेक्षा धरणं हे इतकं वाढलंय की हे सतत शेअर करणंच समस्या बनलं आहे.

5) स्पेसची मागणीपूर्वीसारखं टिपिकल गुलाबी प्रेम आता नसतेच, सतत स्पेसची मागणी. त्यातून कोण कुणाची स्पेस घालवतं, कोण नाही यावरून प्रेमाचा पार चुराडा होतो.