शहरं
Join us  
Trending Stories
1
उद्धव ठाकरेंना जोरदार धक्का! ज्याच्यासाठी लोकसभेला काँग्रेसला नडले, त्यानेच साथ सोडली; चंद्रहार पाटलांचा रामराम  
2
Maharashtra Politics : "भाजप आणि निवडणूक आयोगाची मॅच फिक्सिंग...", नाना पटोलेंचा देवेंद्र फडणवीसांवर पलटवार
3
पाकिस्तान पुन्हा उघडा पडला! सॅटेलाईट फोटो सोबत छेडछाड केली, खोटे दावे केले
4
बीएसएनएलने आणला ऑपरेशन सिंदूर प्लॅन! रिचार्जची काही रक्कम सैन्याला देणार; ग्राहकांनाही डिस्काऊंट मिळणार...
5
जळगाव: लग्नाच्या वाढदिवसासाठी माहेरावरून आली अन् घरात पाय ठेवताच दिसला पतीचा मृतदेह
6
चांदीचा भाव विक्रमी उच्चांकावर; आठवड्यात ८,४०० रुपयांची वाढ; ३ टक्के जीएसटीसह १,०९,२८३ रुपये
7
Bhushi Dam Incident: पोहण्याच्या मोहाने घेतला जीव, भुशी डॅममध्ये बुडून दोन तरुणांचा मृत्यू
8
इंजिनिअरिंगच्या 'त्या' विद्यार्थिनीचा खून प्रेम प्रकरणातून, पोस्टमार्टेम रिपोर्टमध्ये काय? मित्राविरुद्ध गुन्हा दाखल
9
सासू-सासरे अन् पतीसह तिनं मुलांनाही सोडलं नाही! कुटुंबाला 'स्लो पॉयझन' देणाऱ्या महिलेची 'अशी' झाली पोलखोल
10
पहलगाम हल्ला : मेजर विनय नरवाल यांच्या पत्नीचा अश्लील AI व्हिडीओ व्हायरल; पिता-पूत्र ताब्यात
11
अंडरवर्ल्डमधून मोठी बातमी! लॉरेन्स गँग फुटली; गोल्डी ब्रार, रोहित गोदारा लॉरेन्सपासून वेगळे झाले
12
मुंबई: मेट्रोमोनियल साईटवर भेट, लग्नाचं स्वप्न दाखवून बलात्कार, पैसेही उकळले; आरोपीला न्यायालयाने काय दिली शिक्षा?
13
"कोरोनापेक्षाही वाईट परिस्थिती येईल...", चीनबद्दल डोनाल्ड ट्रम्प यांना तज्ज्ञांचा मोठा इशारा
14
IND vs ENG : इंग्लंडमध्ये पोहचताच टीम इंडियाचा कसून सराव; २२ वर्षांनी हा चेहरा पुन्हा संघासोबत दिसला
15
Viral Video : चोरी करायला गेला अन् पाय घसरून पडला! चोराची फजिती सीसीटीव्हीत झाली कैद
16
बिहार निवडणुकीपूर्वीच एनडीएत बंडखोरी! चिराग पासवान यांची घोषणा, सर्व २४३ जागांवर लढणार...
17
हिंसाचार, बलात्कार, स्थलांतर...मणिपूर मुद्द्यावरुन प्रियंका गांधींचा मोदी सरकारवर निशाणा
18
मायकल जॅक्सनचं स्वागत करण्यासाठी सोनाली बेंद्रेने ठेवलेली 'ही' अट, म्हणाली- "राज ठाकरेंच्या पत्नीने मला..."
19
Photo : चिनाब रेल्वे पूल कमालच! पण भारतातल्या 'या' पूलांचीही जगभरात आहे चर्चा

love u दोस्त

By admin | Updated: February 12, 2015 16:58 IST

स्पेशल व्हॅलेण्टाईन्स ग्रीटिंग.आणि त्याचा मॅसेज एकच.वी नॉट ऑन्ली लव्ह यू.वी ट्रस्ट यू. जीत के आना.!! ऑल द बेस्ट!!

स्पेशल व्हॅलेण्टाईन्स ग्रीटिंग.आणि त्याचा मॅसेज एकच.वी नॉट ऑन्ली लव्ह यू.वी ट्रस्ट यू. जीत के आना.!! ऑल द बेस्ट!!
 
माही
डीअर धोनी,
कॅप्टनकूल वी लव्ह यू वार! काय तुझी स्टाईल, काय तुझा अॅटिटय़ूड! आणि परवा तर यार, जिंकलंस आम्हाला परत! पहिली बेटी झाली तुला, कॉँग्रॅट्स! पण तू बाणोदारपणो म्हणाला, ‘बाळ आणि बाळाची आई सुखरूप आहे, मी काही धावतपळत भारतात परत येणार नाही, मला माझं राष्ट्रीय कर्तव्य पूर्ण करायचं आहे, हा वर्ल्डकप महत्त्वाचा, बाकी सारं नंतर! यार, खल्लास झालो, फीदा झालो यार तुङयावर परत एकदा! तुला माहिती नसेल तो, पण आम्हाला आमचा तानाजी मालुसरेच तुङया रूपात दिसायला लागला, आधी लगीन कोंडाण्याचं म्हणणारा! 
एक सांगू, आम्हाला तोच, ङिाप:या धोनी परत हवाय, त्याच्यातली आग परत हवी आहे! तुझा तोच बिंधास अॅटिटय़ूड जर परत कामाला लागला ना, तर झक मारतो ऑसीवाला बाऊन्स तुङयासमोर! 
सो, एकबार हो जाए, वही पुरानी मॅजिक फीरसे? 
(आणि एक रिक्वेस्ट, त्या कोहलीच्या नंबर पोङिाशनशी खेळू नको यार, उसके बिना हम जीत नहीं सकते, तू तो जानता है.!)
 
त्या स्वपAापाठी निघालेल्या योद्धय़ांना,
हे एक खास लव्हलेटर.
उद्यापासून वर्ल्डकपला प्रारंभ, आणि परवाच 
पहिली मॅच पारंपरिक कट्टर प्रतिस्पर्धी पाकिस्तानशी.
गेले दोन महिने सतत मार खाल्ल्यानं 
भारतीय टीमचं ‘मोराल’ही जरा डाऊन आहे.
पण काल हरलं म्हणून कुणी आज आणि 
उद्या हरत नाही. कालचा दिवस संपला.
उद्या तुमचा आहे. आणि आम्ही तुमच्यासोबत आहोत.
तुम्ही आणि आम्ही, म्हणजे आपण जिंकणारच या विश्वासासह
भारतीय टीमसाठी हे एक 
 
रो
राऊडी रोहित
तसा दिसतबिसत नाही तू राऊडी! एकदम ममाज बॉयवाला टिपीकल डोंबिवली लूक आहेच तुझा अजूनही! डोंबिवलीहून मुंबईला जाणारा आणि तिथून थेट एवढी भरारी मारणारा पोरगा म्हणून आम्हा तमाम मराठी जिवांना तुझा सॉलिड अभिमान आहे!
आठवतंय ना तुला, तुङया कोचिंगची फी 5क्-5क् रुपये जमवून द्यायचे तुङो सहा काका! तुङया पॅशनला असा किती जणांचा हातभार लागलाय! आणि म्हणूनच अजूनही तू चिक्कार नम्र आहेस. अलीकडेच शाळेच्या एका कार्यक्रमात बाईंनी तुला स्टेजवर बोलावलं तर तू म्हणालास, ‘अजून मोठय़ा यशाची मी वाट पाहतोय. अजून मला बरंच काही करायचंय!’
आता ते बरंच काही करण्याची ही संधी आहे. तुझा फेवरिट सेहवाग, त्याची मॅच पहायला तू एकदा शाळा बुडवून गेला होतास. त्याचाच कित्ता चालव, सध्या तू एकमेव इनफॉर्म ओपनर आहेस संघात!
एकदम धडक्यात आणि कन्सिस्टण्टही!  तेव्हा सेहवागची शपथ आहे तुला, धो डाल!
 
धवन
 
दिलवाले धवन
तू खरंच यार दिलवाला आहेस! एकदम रांगडा गडी. प्रेम करावं तर तुङयासारखं! जी मुलगी आवडली, तिला तिच्या आधीच्या दोन मुलींसह स्वीकारण्याची ताकद किती प्रेमवीरांमधे असते? पण मिशीला पीळ मारून तू छातीठोकपणो तिच्याशी लगAच केलंस.
- तुङया ईश्कवाल्या लव्हला एक कडक सलाम!
तसा तू जाम रोमॅण्टिकच आहेस म्हणा. सुफी म्युङिाक तुला प्रचंड आवडतं ना? नुसरत अलींनी गायलेल्या रुहानी गझला तुला जीव की प्राण! सुफी गाणी, टॅटू आणि फिटनेस हे तुङो आणखी महत्त्वाचे पॅशन! धडकत्या दिलाची दास्ता जर कुणी लिहिलीच ना, तर तुङया रोमॅण्टिक रसरशीत जगण्याचा नंबर त्या यादीत खूप वरचा असेल! वी लव्ह यू फॉर युवर पॅशन, फॉर युवर स्माईल!
पण सध्या जो तो तुला जे सांगतोय ते जरा ऐकशील का?
तुझा ऑफ स्टम्प कुठेय हे जरा समजून घे रे बाबा, गडबड होतेय तिथेच सगळी!
बडे इनिंगवाला तू, ठोक ना चार-दोन बडय़ा इंनिंगा.
नायतर कशाला उठायचं इतक्या पहाटे पहाटे टीव्हीसमोर बसायला?
 
चिक्कू
प्यारे कोहली
काय यार तुझं नशिब, सॉलिड हेवा वाटतो आपल्याला तुझा!  काय तुङो लुक्स, काय तुझी नजर, काय ती अदा आणि काय तो अॅटिटय़ूड. (आणि कसली जबराट हॉट गर्लफ्रेण्ड!!) पोरीबाळींना तर एकदम मरजावा, मीटजावा होतं तुला पाहिल्यावर! त्याच कशाला, खुद्द रंगीला शेन वॉर्न तुला रॉकस्टार म्हणायचा. बाकीचे सारे टीममेट्स चिक्कू म्हणतात ना तुला? (अनुष्का काय म्हणते, बाय द वे?)
तर हमारे चमकिले चिक्कू.
तसा काही सध्या बरा नाहीये आपला फॉर्म! तू म्हणो, प्रेसमधे धोनीच्या पाठीमागे बोलला होतास की, धोनीचं अॅग्रेशन कमी होतंय! पण तुझं काय? आपलं अॅग्रेशन जोरात आणि फॉर्म ढपेश, असं होऊ नये नाही का? म्हणजे तसं तू करणार नाहीसच, तू लहानपणापासूनच पक्का जिद्दी आहेस म्हणो! ती जिद्द दिसते अजून तुङया नजरेत! मग उडव धुव्वा सगळ्यांचा, पार चिंधडय़ा कर ऑसी-किवीजच्या पीचवर बाकीच्यांच्या बॉलिंगच्या! बाकी रोमान्स काय, जन्मभर करायचाच आहे!!. काय? (आपला बॅटिंगचा फॉर्म गेला तर अनुष्काच्या सिनेमात फक्त आयटम नंबरच करावा लागेल, हे कळतंय ना तुला? तू उत्तम डान्सर आहेस म्हणो, पण आपला श्रीशांत झाला तर किती वाईट होईल, नाही का?)
 
जिंक्स
 
अलबेले अजिंक्य
तू मुंबई इंडियनकडून नवीन नवीन खेळायला लागलास ना, तेव्हा तुङया नावाचंच आपल्याला अप्रूप वाटायचं यार! अजिंक्य राहणो, इतकं मराठमोळं नाव! डोंबिवलीचा लाजराबुजरा, शांत, रिझव्र्ह मुलगा तू. खरं सांग, तुला तरी वाटलं होतं, ऑस्ट्रेलियात वर्ल्डकप जिंकण्याचं स्वपA आपल्या पुढय़ात कधी उभं असेल म्हणून? 
तुझा लाजरेपणा कमी व्हावा म्हणून तुङया बाबांनी तुला कराटे क्लासला घातलं होतं. आणि तू पठ्ठय़ा, ब्लॅकबेल्ट चॅम्पियन झालास की!  त्या कराटेतली शिस्त आणि समर्पण तुङया बॅटिंगमधेही दिसतंच!
तुझी बॅटिंग पाहताना अनेकदा अझहरुद्दीनच्या मनगटी फटक्यांची आठवण येते! कसला सुरेख वापर करतोस तूही मनगटाचा! मारझोड क्रिकेटमधे ही ‘ब्यूटी’ पाहणं म्हणजे वाळवंटात झुळझुळत्या पाण्याचा झराच पाहण्यासारखं रे!
सो, टिमवालोंके जिंक्स, आगे बढो. राखा आपला मराठी बाणा, आणि धुव्वाधार बॅटिंग करा! तसाही डरत तर तू कुणालाच नाही म्हणा.
 
सानू
रायट रैना
तू बॅटिंग करणार म्हणजे आमची अपेक्षाच रनांची रायट अर्थात दंगल होण्याची! 9क् चा स्ट्राईक रेट आहे तुझा वनडे मधे! आणि फिल्डिंग तर इतकी जबरदस्त. विश्वासच बसत नाही की, इतकी आणि अशी फिल्डिंग एखादा इंडियन प्लेअर करू शकतो? - पण तू करतोस! 
तुझी बॅटिंग जबरदस्त. खुद्द सचिननं तुझं कौतुक केलं होतं, तुङया शॉर्टबॉलवर गडगडण्याच्या घोळावर तर सचिननंच तुला गाईड केलं, आणि आता शॉर्टबॉल तू बिंधास खेळतोस, असं तूच तर सांगतोस! प्रेशरबिशर काय भानगड असते, हे तुला माहितीच नाही!
त्यामुळे इतर संघांना जे खेळाडू एकदम डेंजरस वाटतात त्यातलाच तू एक.
यार, जितना डेंजरस बन सकता है बन, सानू तो सिर्फ वर्ल्डकप मंगता है!
 
अॅश
अशक्य अश्विन
द ग्रेट मुरलीधरनने म्हणो सध्याच्या  स्पीनर्सची एक यादी केली आहे, आणि त्यात  तुझा नंबर चक्क पहिल्या पाचात आहे!
हो सकता है यार, एक तर मुरली म्हणतोय तेव्हा खरंच असेल! दुसरं म्हणजे तू रजनीकांतचा फॅन. तो पण आर, तू पण आर, काहीच अशक्य नाही यार!
असं म्हणतात रजनीकांतच्या खालोखाल तुझी चेन्नईत क्रेझ आहे. पोरी तर पुरत्या पागल आहेत. त्यात आंद्रे आगासी तुझा फेवरिट. चेहरा शांत. बॉडीलॅँग्वेज एकदम शांत. पण खेळ असा की, अॅग्रेसिव्हनेसने गुढगे टेकावे.
त्यात तू कमालीचा हुशार, बुद्धीवादी. पुस्तकातला कीडा. अफाट वाचतोस, सतत वाचतोस! तर टीमके प्यारे अॅश, रजनीवाला जादू चला, आणि ऑस्ट्रेलियातला बाऊन्स आणि न्यूझीलंडचा स्विंग यांच्याशी कोपअप करत चालव तुझं स्पीन, सुर्ळकन!!
 
पटेल
पठ्ठे अक्षर पटेल
अमदावादच्या नाडियाद भागातल्या कुंभनाथ रोडवर एक संतराम हौसिंग सोसायटी आहे, त्या सोसायटीतलं तुझं घर, म्हणजे खरं सांगतो, मध्यमवर्गीय भारतीय तरुणांच्या महत्वाकांक्षेचं प्रतीकच म्हणायला हवं. इंजिनिअर झालेला तू मुलगा. एकदम शांत, आज्ञाधारक! चारचौघांसारखा शिकून करिअर करशील असं घरच्यांना वाटत असताना तुङया क्रिकेटनं अशी काही उचल खाल्ली की, आज तू इंडिया कॅप डोक्यावर घेऊन वर्ल्डकप खेळायला गेलास. सचिन आणि पॉण्टिंग तुङो फेवरिट, पण गाणी आवडतात तुला एकदम तडकते फडकते पंजाबी! यो यो हनीसिंगवाले! मुद्दा काय, नव्या-जुन्याचं मिक्श्चर चांगलंय तुङयात. आम्ही वाट पाहतोय तुङया करिष्म्याची असं समज.!
 
रायुडू
 
ऑसम अंबाती रायुडू.
काही लोकांचं नशिबच एकदम बुलेट ट्रेनवर बांधलेलं असतं, जसं तुझंय! धोनीच्या चेन्नई सुपरकिंग्जबरोबर खेळता खेळता तू धोनीचा फेवरिट झालास, आणि तिकडून मजलदरमजल करत थेट भारतीय संघातच आलास! तुझं एक वैशिटय़ आम्हाला जाम आवडतं- तुला कुठल्याही नंबरवर पाठवा, तू आपला गेम फिनिश करुनच येणार! तुङया बॅटिंगचा तडाखाच असा. त्यात तुझा बॉलिंगवरही हात उत्तम. जमल्यास विकेट किपिंगही येतंच तुला!
ढेपाळलीच मिडल ऑर्डर तरी तू निभावून नेशील सारं, याची आम्हाला खात्रीच आहे. बाकी, पूर्वी झाले तसे बिर्यानीवरुन वाद नको आता, एकबार जित जाओ, बिर्यानी काय धोनीला पुन्हा खिलवता येईल!
 
जड्डू
 
रॉकस्टार रविंद्र जडेजा
तुला टीमवाले जड्ड रॉकस्टार म्हणतात ना!
आपल्यालाही सॉलिड आवडतोस यार तू, तुङया हाती बॅट-बॉल कायपण द्या, यू वील रॉक.ऑलवेज! तू एकनंबरचा ऑलराऊंडर -फायटरच!  मैदानावरच नाही तर मैदानाबाहेरही तू अशी काही फाईट देतोस की सगळ गेमच बदलून जावा!
तुङो वडील सिक्युरिटी गार्ड होते आणि आई नर्स. आणि मुलाला या खेळाचं व्यसनच. त्यापलिकडे काही सुचूच नये! स्वत:च्या केवळ गुणवत्तेवर तू आज जिथे आहेस, तिथे पोहचला आहेस. आजही तिच गुणवत्ता  ही तुझी ताकद आहे. 7 नंबरवर येऊन कुठलाही गेम चेंज करण्याची, हरलेला सामना जिंकून देण्याची ताकद तुङयात आहे. मग काय, वापर ती ताकद. जिंकण्याला दुसरा काय पर्याय आहे?
 
भूवी
 
भन्नाट भुवनेश्वर
‘तेरा छोरा एकदिन म्हारी आंख फोडेगा, जब देखो क्रिकेट खेले है.’ अशी तक्रार करायचे ना तुङो आजोबा तुङया आईकडे! पण आईला मात्र वाटायचं आपला पोरगा म्हणजे मोहल्लयाचा तेंडुलकर. ती म्हणायची, बेटे खेल!
तसं खेळतच चेंडू तुङया हातात आला आणि आज भलेभले तुङया स्विंगला घाबरतात. तुङया फिटनेसचे काही प्रश्न आहेत म्हणा तसे, पण सगळं जग म्हणतंय की, ऑस्ट्रेलियातली पीचेस तुला मदत करतील आणि तुझी बॉलिंग तमाम बॅट्समनची दाणादाण उडवेल.! दादाजीकी आंख तो ना फोडी तूने, पर अब वो जिता हमे, तेरी बॉलिंगकी मटकी फोडके.क्या समङो?
 
शामी
शर्मिले शामी
सूना है तू बहौत शर्मिला है! शादी भी करी तो चुपकेचुपके.!
नवंकोरं लगA, प्यारव्यार, तसा तू पक्का छुपा रुस्तुम आहेस असं कळलंय आम्हाला!
आणि त्यात आता चर्चा की, वर्ल्डकपमधे धोनी तुङयाच हाती नवाकोरा चेंडू ठेवणार आहे! 
तसं असेल तर तो तुझा बहुमानच म्हणायला हवा. ऑस्ट्रेलियात नवा चेंडू हाताळायला मिळणं म्हणजे, कुणाही बॉलरला आपलं बेस्ट परफॉर्म करण्याची संधी. वी विश यू ऑल द लक! एन्जॉय!!
 
बिन्नी
 
ज्युनिअर बिन्नी
रॉजर बिन्नींचा मुलगा तू.
तुङया सिलेक्शनवरुन बरेच वाद झाले! कोण म्हणो तुङया वडिलांचे कॉण्टॅक्ट्स मोठे, तर कोण म्हणो, तू काय करणार तिकडे ऑस्ट्रेलियात?
पण असं म्हणतात की, आजच्या घडीला संघातला सगळ्यात बेस्ट ऑलराऊंण्डर ठरशील तू! धोनीला खात्री आहे की, कितीही खराब पत्ते येवोत, तू ऑलराऊंण्डर जोकर सारखा हमखास बाजी मारून नेशील.
डाव तर आता मांडलाच आहे. दिखाओ अपना कमाल!
 
मन्नी
माहीर मोहीत
कॉँग्रॅट्स यार! म्हणजे फिटनेसनं इंशात शर्माची विकेट पडली नसती, तर तुङया नशिबाचे सितारे चकाकले नसते! पण शेवटी नशिब! आता संधी तुङया दारात चालून आली आहे, सो, ऑल द बेस्ट!
तुङया जिद्दीचं खरं तर कौतूक करायला पाहिजे यार, दिल्लीपासून फक्त 37 किलोमिटरवरचं तुझं गाव, बालागढ. पण तरीही सर्वसामान्य तरुणाला जितकी दिल्ली दूर असते तितकीच तुलाही होती! ना गावात क्रिकेट प्रशिक्षणाच्या सोयी होत्या, ना क्रिकेटिअर होतो असं म्हटलं तर कुणी विश्वास ठेवणारं! ज्या काळात मुंबई-बंगळूर-चेन्नईतल्या हजारो मुलांचं क्रिकेट ड्रीम मरु लागतं, त्या काळात म्हणजे वयाच्या चौदाव्या वर्षी तू क्रिकेट सिरीयस्ली शिकायला सुरूवात केली. फॉर्मल ट्रेनिंग सुरू झालं आणि आज वयाच्या 26व्या वर्षी तू थेट वर्ल्डकप खेळतोहेस! धमक असावी तर अशी!! हे तर काहीच नाही, वर्षभर तू पाठीच्या दुखण्यानं अक्षरश:: बेडरिडन होता, त्या आजारातून उठून तू जी फाईट दिलीस, ती तर जगावेगळीच!काय बिशात आहे यार, तूला कुणी कमी लेखण्याची!!
 
यादव
दालघीवाले यादव
आपल्या नागपूरचा गडी तू! कमाल आहेस कमाल! एकदम तगडी फिजिक. दूध-दाल-घी हे तुङो मित्र. वर्कआऊट करकरुन कमावलेलं शरीर. पोलीस नाहीतर आर्मीवाली नोकरी हवी म्हणता म्हणता आज तू क्रिकेट वर्ल्डकप खेळायला गेला आहेस. विदर्भाची शान, महाराष्ट्राची शान वाढव.आणि बॉलिंग तर तगडी करच, पण तुझी उचलून चेंडू मारायची तुफानी ताकदही दिसूच दे या वर्ल्डकपमधे.ऑल द बेस्ट!
 
‘तुम जान हमारी हो, तुम प्यार से प्यारे हो.’
असं म्हणत सारा देश ज्यांच्यावर जीव ओवाळून टाकतो.
ते खूश झाले तर खूश होतो, ते जिंकले तर स्वत:च जिंकल्यासारखे नाचतो,
ते हरले, तर आपण हरलोय असं वाटून गुडघ्यात मान खुपसून बसतो.
दिल-जान-शान-आन और बान.
असं वाटणा:या ‘त्यांना’
व्हॅलेण्टाईन्स डे ला विश नाही करायचं तर कुणाला?
आणि तेही, जेव्हा ते जगण्यामरण्याची, हारण्याजिंकण्याची,
हसण्यारडण्याची सगळ्यात मोठी जंग, 
सगळ्यात मोठी लढाई
लढायला निघाले आहेत तेव्हा.
ती लढाई फक्त त्यांची नाही,
तर आपली आहे.
आपण आणि ते वेगळे कुठेय?
ते 15 फक्त चेहरे आहेत 
सव्वाशे कोटींच्या एका स्वपAाचे.
आणि ते स्वपAच म्हणतंय,
वी वोण्ट गिव्ह इट बॅक!
काहीही झालं तरी, आम्ही एकदा जिंकलेला वर्ल्डकप परत करणार नाही,
आम्ही तो राखू. पुन्हा जिंकू.