शहरं
Join us  
Trending Stories
1
'आता चर्चा नाही, पाकिस्तानशी अखेरची लढाई...', पहलगाम हल्ल्यावरुन फारुख अब्दुल्ला संतापले
2
सीमेवरील तणावादरम्यान भारताचं मोठं पाऊल, राफेल-एम विमानांसाठी फ्रान्ससोबत करार, अशी आहेत वैशिष्ट्ये
3
ही खिंड आहे पाकिस्तानचं ‘चिकन नेक’, PoKमधील या एंट्री पॉईंटवर भारताने कब्जा केल्यास होईल जबर कोंडी, कारवायांना लागेल लगाम
4
मोठा खुलासा! पहलगाममध्ये हल्ल्यावेळी लष्कराचा मोठा अधिकारी तिथेच होता; गेटकडे धावणाऱ्या लोकांना रोखले...
5
दिल्ली बिहारपासून लांब आहे का? सर्वपक्षीय बैठकीला उपस्थित न राहिल्याने खरगेंचा PM मोदींवर निशाणा
6
पहलगाम हल्ल्याबाबत काँग्रेस नेत्यांच्या विधानांवर राहुल गांधी नाराज; मल्लिकार्जुन खरगे समज देणार
7
जसं त्याला कळलं, आम्ही हिंदू आहोत, त्याने...; लेफ्टिनंटच्या पत्नीचा पहिल्यांदाच खुलासा
8
मुकेश अंबानी यांच्या एका शेअरने मार्केट फिरवलं; बाजाराची जोरदार उसळी; कुठे सर्वाधिक वाढ?
9
पर्यटकांच्या सुरक्षेसाठी 'महाराष्ट्र पर्यटन सुरक्षा दल' स्थापना; राज्य सरकारचा निर्णय
10
Bank of Baroda मध्ये जमा करा १,००,००० रुपये आणि मिळेल ₹१६,१२२ चा फिक्स्ड रिटर्न, पाहा डिटेल्स
11
५०० रुपयांपेक्षा कमी वार्षिक प्रीमियमवर २ लाख रुपयांचा विमा मिळवा, कोण घेऊ शकतो लाभ?
12
दहशतवादी हल्ला करताना धर्म विचारतात का? वडेट्टीवारांचे विधान; CM फडणवीस म्हणाले, "इथे बसून…"
13
यशस्वी जैस्वालकडे सर्वांचं लक्ष, गुजरातविरुद्ध मोलाचा पल्ला गाठणार
14
'धनंजय मुंडे यांनी मंत्रिपदाचा राजीनामा दिला, मग...', अंजली दमानियांचे सरकारला दोन सवाल
15
मुंबई- लखनौ सामन्यानंतर जसप्रीत बुमराहच्या पत्नीला राग अनावर, नेमके काय घडलं?
16
LIC च्या 'या' पॉलिसीत एकदाच गुंतवणूक करा अन् दरमहा २० हजार पेन्शन मिळवा; किती गुंतवणूक करावी लागेल?
17
"काँग्रेस नेते दहशतवाद्यांना 'निर्दोष' ठरवण्याचा प्रयत्न करताहेत का?", बावनकुळे वडेट्टीवारांवर कडाडले
18
चीनला का पडतेय भारतीय कंपन्यांची गरज? 'या' कामासाठी मागताहेत मदत
19
तुम्ही होम लोन घेतलेलं असेल, तर पर्सनल लोन मिळू शकते का? जाणून घ्या
20
एकही युद्ध जिंकले नाही; मग पाकिस्तानी अधिकारी छातीवर पदके लावून का फिरतात? जाणून घ्या...

झगामगा मला बघा.

By admin | Updated: October 16, 2014 19:17 IST

तुम्ही फेसबुकवर आहात? हा काय प्रश्न झाला, असतोच हल्ली प्रत्येकजण फेसबुकवर !करतोच टाइमपास, चालतेच भंकस !

तुम्ही फेसबुकवर आहात?हा काय प्रश्न झाला, असतोच हल्ली प्रत्येकजण फेसबुकवर !करतोच टाइमपास, चालतेच भंकस !पण आपल्या लक्षातही येत नाही की, फेसबुकवर आपण जे जे लिहितो, पोस्ट करतो, शेअर करतो, त्या सार्‍यातून लोक आपली ‘परीक्षा’च करत असतात. आणि आपण जे अगाध ज्ञान उधळतो, जो काय उद्धटपणा किंवा बालीशपणा करतो त्यातून आपल्याकडे पाहण्याची ‘नजर’ही बदलू शकते. तुमच्या एखाद्या पोस्टचा किंवा कमेण्टचा भलताच अर्थ काढत लोकं तुमच्याविषयी बरीवाईट मतं बनवत असतात. मुख्य म्हणजे आभासी जगात हे सारं चालत असलं तरी मतं जी बनतात ती प्रत्यक्ष जगातही कायमच राहतात.अनेक तरुण मुलं फेसबुक वापरताना काही चुका हमखास करतात किंवा आपल्या नकळत त्या होतात.त्या चुका कोणत्या?सेण्ड टू ऑलकाहीजण दे दणादण मेसेज टाइप करतात, फॉरवर्ड करतात, आपले फोटो घेतात त्याखाली काहीतरी लिहितात आणि सेण्ड टू ऑल म्हणत सगळ्यांना पाठवून देतात. फेसबुक हे पर्सनल कनेक्टचं माध्यम तुम्ही असे गठ्ठे मेसेजेस पाठवणं चूक तर आहेच, पण ते इतरांसाठी इन्सलटिंगही. हळूहळू तुमचे कामाचे मेसेजही लोक गांभीर्यानं घेत नाहीत.मला पहा, फुलं वाहासेल्फ ऑबसेशन म्हणतात याला. सतत ‘मी-मी’. मी अमुक खाल्लं, तमुक खाल्लं, अमुक सिनेमा पाहिला, तो बकवास आहे, मला तमुकच रंग आवडतो, ढमुकच मी केलं. मी श्‍वास घेतला आणि सोडला एवढंच लिहायचं काही लोकं बाकी ठेवतात. फक्तस्वत:विषयी बोलतात. स्वत:चेच अनुभव सांगतात. स्वत:ची अखंड जाहिरात करत राहतात. दुसर्‍यांच्या पोस्टवर जाऊनसुद्धा कमेण्टमध्ये मी-मी करत राहतात. हे असं सतत मला पहा, फुलं वाहा.असं पाहून लोकं कंटाळतात. ‘मी-मी’ करणार्‍यांची आत्मप्रौढी इतरांना इरीटेट करते. हळूहळू लोक त्यांना टाळतात तरी किंवा मग अशी माणसं फक्त इतरांच्या गॉसिपचा आणि मनोरंजनाचा विषय ठरतात. विशेषत: जे तरुण प्रोफेशनल नेटवर्किंगसाठी फेसबुक वापरतात निदान त्यांनी तरी हे असं ‘आत्मगान’ टाळायलाच हवं.विरोधातली कॉमेण्ट, मार डीलीटतुम्ही काहीही लिहा, कितीही गंभीर असू द्या विषय काहीजण असे असतात जे तुमच्या पोस्टवर भंकसच करतात. तुम्हाला टपली मारतात, विरोधाला विरोध करतात, काहीतरी पांचट कमेण्ट करतात. मुद्दाम तुम्हाला त्रास देतात. तुमची ही पोस्ट कशी तद्दन चुकीची आहे, तुमचा विचारच कसा मूर्खपणाचा आहे असं सांगणारेही काहीजण असतात. काही मित्र तर विषय सोडून भलतंच काहीतरी बोलतात. आणि कधीकधी खरंच तुमच्या पोस्टवर कुणीतरी गांभीर्यानं टीका करत तुमचा मुद्दाच खोडून काढतं.अशावेळी काय करता तुम्ही? तावातावानं वाद घालता, शिवीगाळ करता, चिडून काहीबाही लिहिता, जातीय टीकाटिप्पणी करता, व्यंगावरून शिव्या घालता, समोरच्याची लायकी काढत अकारण हुज्जत घालत बसता? हे सगळं इतर लोकं वाचतात तेव्हा त्यांचं काय मत होतं तुमच्याविषयी याचा काही विचार केलाय? अशा वादग्रस्त पोस्ट तुम्ही कशा डील करता, काय सभ्यतेनं वाद मिटवता, चूक मान्य करता, माघार घेता किंवा अत्यंत डिप्लोमॅटिक पद्धतीनं गोष्टी हाताळता हे सारं म्हणजे तुमचे उत्तम प्रोफेशनल असण्याचे गुण. ते तुम्हाला जमलं तर तुम्हाला माणसं हाताळलं जमलं असं समजा.किती बकबक कराल?काहीजण सतत काही ना काही पोस्ट करतच असतात. इतकं की कधीही फेसबुकवर जा, तेच दिसतात. ते आवरा. कण्ट्रोल करा तुमचं दिसणं आणि व्यक्त होणं. तरच तिथंही तुमच्या शब्दाला काहीतरी मान राहील. नाहीतर काय लोक म्हणतात, आहेच सुरू बकबक.वॉच युवर क्लॉकसगळ्यात महत्त्वाचं, आपण किती थोर, आपल्याला काय काय येतं, आपण कसे हॅपनिंग आहोत हे सांगणं ठीक आहे, पण त्यासाठी आपण खरंच हॅपनिंग असायला हवं. रात्रंदिवस फेसबुकवर राहून तुम्ही ते कसं जमवणार? त्यापेक्षा आपलं काम पूर्ण फोकस्ड करा, दिवसाकाठी फार तर अर्धातास टाइमपास आणि नेटवíकंग करण्यापुरतं या कट्टय़ावर या.सोशल नेटवर्किंगउत्तम ‘ब्रेक’साठी कसं वापराल?अनेक मुलं तासन्तास फेसबुक,व्हॉट्सअँपवर पडीक असतात. पण त्याचा आपल्या व्यावसायिक गरजेसाठी आणि उत्तम ‘ब्रेक’साठी उपयोग करून घेता येऊ शकतो हेच अनेकांना कळत नाही.त्यासाठीच या काही टीप्स.१) लिंकएडीनफेसबुकपेक्षा जरा किचकट हे प्रकरण. मात्र जास्त कामाचं. लिंकएडीनवर जाऊन तुमचं प्रोफाईल बनवा. पूर्णत: व्यावसायिक. त्यात तुमचे स्किल्स ठळकपणे मांडा. तुमच्या क्षेत्रातल्या लोकांशी संपर्क करा. गांभीर्यानं नेटवर्किंग केलं तर तुमच्या ओळखी वाढून तुम्हाला काही संधी मिळू शकतात. २) फेसबुकटाइमपास करणं असा विचार न करता, तिथं आपलं चांगलं काम, आवड, आपले स्किल्स याविषयी पोस्ट करा. तुमच्या क्षेत्रात नवनव्या ओळखी करून घ्या. गळेपडूपणा न करता, आणि कुणाला त्रास न देता, आपलं संपर्क वतरुळ वापरा. लोचटपणा करण्याचा धोका टाळा.३) व्हॉट्स अँपतुम्ही आणि तुमचा बॉस, अन्य सिनियर कलीग, दुसर्‍या कंपनीतले सहकारी असे सारे तुमच्या ग्रुपमध्ये असतील. तर जरा जपून तोंड उघडा. गॉसिप करू नका. आणि कुणावरही टिप्पणी करताना आपली र्मयादा ओलांडू नका. अतिवेळ त्या ग्रुपवर अँक्टिव्ह राहू नका, नाहीतर तुम्ही फॉरवर्डवाले रिकामटेकडे असा समज होऊ शकतो.