शहरं
Join us  
Trending Stories
1
पुराचा इशारा देत भारताची माणुसकी; मात्र, पाकिस्तानने काढली नवी कुरापत
2
एमएसपीची गॅरंटी द्या, शेतकरी नेते डल्लेवाल यांची मागणी; दिल्लीत महापंचायत, शेतकरी पुन्हा रस्त्यावर
3
२९ हजार किमीचे रस्ते खराब, तरीही द्यावा लागतोय टोल, ५ वर्षांत राष्ट्रीय महामार्गांवर ८० हजार जणांचा मृत्यू
4
वैकुंठाला जाण्याचा हट्ट; इरकर कुटुंबीय नजरकैदेत
5
शुभांशूने सांगितला यशाचा अस्सल मार्ग, म्हणाले, २०४० पर्यंत तुम्हीही जाऊ शकता चंद्रावर
6
जगातील सर्वांत जुनी गणेश प्रतिमा मुंबईत !पद्मश्री डॉ. प्रकाश कोठारी यांना सापडला अमूल्य ठेवा
7
बेरोजगार पतीला सतत टोमणे मारणे पत्नीला पडले महागात; कोर्ट म्हणाले ही मानसिक क्रूरता
8
'आमच्यासाठी शेतकरी महत्वाचे; कितीही दबाव टाका, आम्ही...', ट्रम्प टॅरिफवर PM मोदींचे मोठे विधान
9
‘सोना जल्दी निकालो, वरना मार दूंगा’ साधू बनून लुटले
10
Mig 21 : ६० वर्षांत पाकिस्तानला अनेकदा दिली मात; निरोप घेण्यापूर्वी लढाऊ विमान 'मिग-२१'ने केले शेवटचे उड्डाण!
11
Rain Update : बाप्पाच्या स्वागतासाठी पावसाच्या 'पायघड्या'; पुढचे चार दिवस 'झोडपणार', कोणत्या भागांना इशारा?
12
जगातील सगळ्यात महागडी ७ शहरे! 'या' ठिकाणी राहायचा विचार करत असाल तर आताच जाणून घ्या...
13
नागपुरातील रस्त्यांवर कुत्र्यांना खाऊ घालाल तर खबरदार! कारवाईसाठी रहा तयार
14
पंतप्रधान मोदींची डिग्री सार्वजनिक होणार नाही, दिल्ली उच्च न्यायालयाकडून CIC चा आदेश रद्द
15
‘रोजगार महाकुंभ’चे आयोजन; ५०,००० हून अधिक तरुणांना नोकऱ्या देणार योगी सरकार!
16
विमान हवेतच गायब झालं! २२ दिवसापूर्वी तस्मानियाहून उड्डाण केलं होतं; नेमकं काय घडलं?
17
Beed: लक्ष्मण हाके यांच्या गाडीवर गेवराईत हल्ला; आमदार पंडित यांचे कार्यकर्ते आक्रमक
18
क्षुल्लक कारणावरून वाद झाला, बॉयफ्रेंडने गर्लफ्रेंडच्या तोंडात बॉम्ब टाकला अन्...; घटना ऐकून होईल अंगाचा थरकाप!
19
Atharva Sudame : 'अक्कल शिकवतोय, तुझा धंदा मर्यादित ठेव'; अथर्व सुदामेला ब्राह्मण महासंघानेही सुनावले
20
एकाच घरात का केलं दोन्ही मुलींचं लग्न? निक्की भाटीच्या वडिलांनी सांगितलं कारण! म्हणाले...

तुम्ही उमेदवार पाहून तुमचं मत देणार की पक्षाला मत देणार?

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: April 11, 2019 16:52 IST

प्रथम मतदान करणारे मतदार अखेरच्या क्षणार्पयत कुंपणावर असतात, या पारंपरिक समजाला तडा र्‍ मत कुणाला द्यायचं ते अद्याप ठरलेलं नाही असे तरुण मतदार सरासरी 15 टक्क्यांच्या आत. मुलींचं ‘कन्फ्यूजन’ मुलांपेक्षा थोडं अधिक!

ठळक मुद्दे ‘तिचं’ आणि ‘त्याचं’ पहिलं मत ‘लायक’ उमेदवारालाच; पक्षाला नाही!!

-ऑक्सिजन  टीम 

‘बाप दाखव नाहीतर श्राद्ध घाल’.नुसत्या ‘चमत्कारा’ला भुलून आम्ही तुम्हाला ‘नमस्कार’ घालणार नाही हे तरुणांनी प्रत्येक क्षेत्रात आजवर दाखवून दिलं आहे. त्याचंच प्रत्यंतर आता राजकारणातही दिसतं आहे. यंदाच्या निवडणुकीत तरुण मतदारांचा टक्का आजवरच्या सर्वच निवडणुकांमध्ये सर्वाधिक आहे. अशावेळी सर्वाचाच या तरुण मतदारांवर डोळा असणंही साहजिकच, पण त्या सर्वाना हे तरुण मतदार बजावताहेत, आधी आपली लायकी सिद्ध करा आणि त्यानंतरच आमच्याकडे मत मागायला या. तुमच्यासाठी पक्ष महत्त्वाचा असेल; पण आमच्यासाठी तुमची पत, लायकीच तुमचं प्रगतिपुस्तक आहे. या प्रगतिपुस्तकातला तुमचा इतिहास आणि वर्तमान जर काही वेगळंच सांगत असेल, तर तुमची काही खैर नाही. नुसत्या नावाला, परंपरेला आणि पक्षाला आम्ही भुलणार नाही, तर तुम्हाला तुमचं कर्तृत्व आधी सिद्ध करावं लागेल. राजकीय पक्षांनाही एक प्रकारे हा इशाराच आहे. तुम्ही जर चांगले उमेदवार दिले नाहीत, तर या देशावर राज्य करण्याचा तुम्हाला कोणताही अधिकार नाही असं हे पहिल्यांदाच मत देणारे नवमतदार ठणकावून सांगताहेत.‘लायक’ उमेदवारच आम्हाला कोणी दिसत नाही असंही अनेकांचं मत आहे. मतच देणार नाही किंवा ‘नोटा’चं बटन दाबू असं मात्र त्यांचं ठरलेलं नाही.मात्र उमेदवार ‘लायक’ नाहीत असं म्हणणारे अनेकजण आहेत. तरुणांची ही भाषा जर पक्ष आणि उमेदवारांना नीटपणे कळली तर ठीक, नाहीतर अवघड आहे.

एकूण प्रतिसाद काय सांगतो?

* उमेदवार कोण आहे, ते महत्त्वाचं! - 64.69 %* पक्षाला मत देणार - 19.57 %* कोणाला देणार, ते अजून ठरवलेलं नाही - 13.59 %एकूण सहभागींपैकी 2.15 %  तरुण-तरुणींनी या प्रश्नाचं उत्तर दिलेलं नाही.--------------------------------------------------------

मुली म्हणतात * उमेदवार कोण आहे, ते महत्त्वाचं! - 64.41 %* पक्षाला मत देणार -  17.56 %* कोणाला देणार, ते अजून ठरवलेलं नाही. - 16.12 % निवडणूक तोंडावर आली, तरी कुणाला मत देणार याचा निर्णय न झालेल्या तरुण मतदारांमध्ये मुलींची संख्या मुलांपेक्षा जास्त आहे.  -----------------------------------------------मुलगे म्हणतात * उमेदवार कोण आहे, ते महत्त्वाचं!- 64.97 % * पक्षाला मत देणार - 21.59 % * कोणाला देणार, ते अजून ठरवलेलं नाही - 11.3 % राजकीय पक्षांना ‘कमिटेड’ असण्याची वृत्ती तरुण मुलांमध्ये मुलींपेक्षा अधिक दिसते.कोणाला मत द्यायचं याबाबतचं कन्फ्यूजनही मुलांमध्ये कमी आहे.

***

2009 : ओन्ली फॉर अ‍ॅडल्ट्स - दहा वर्षात नेमकं काय बदललं?

  ‘पक्षा’चं महत्त्व आणखी घटलं!

* घराणेशाही काही फक्त राजकीय पक्षांचीच नाही तर मतदारांचीही होतीच, अमुक एका जातीची, धर्माची मतं तमुकच पक्षाला असा हिशेब 2009 सालीच तरुण मतदारांनी नाकारला होता. राजकीय पक्षांचीच नाही तर घरातलीही पारंपरिक मतदानाची घराणेशाही मोडणार असल्याचं सांगितलं होतं. म्हणून तर तेव्हा 77 टक्के तरुण सांगत होते की, मत उमेदवार पाहूनच देणार. पक्ष, पक्षाप्रति निष्ठा नंतर, उमेदवार कसा तेच मत देताना महत्त्वाचं.* पण मग दहा वर्षात असं काय बदललं की, आज फक्त 60 टक्केच तरुण मतदार उमेदवार महत्त्वाचा म्हणतात आणि 20 टक्केंना पक्ष महत्त्वाचा वाटतो आणि 20 टक्केंचं अजून काहीच ठरलेलं नाही. हे कुंपणावरचे मतदार नक्की काय विचार करत असतील?