शहरं
Join us  
Trending Stories
1
मोठी बातमी! इराण युद्धामुळे भारतीय अर्थव्यवस्थेसमोर निर्माण झाली ५ मोठी संकटे; आरबीआय गव्हर्नर संजय मल्होत्रांचा महागाईचा इशारा
2
इराणच्या 'पीस प्लॅन'मध्ये मोठा घोळ! फारसी आणि इंग्रजी मसुद्यात आढळला फरक; युरेनियमच्या अटीवरून संभ्रम वाढला
3
इराणमधील युद्धविरामावर भारताची पहिली प्रतिक्रिया आली समोर, निर्णयाचं स्वागत करत व्यक्त केली अशी अपेक्षा 
4
'चमका हिंदुस्तान हमारा!'; अणुऊर्जा क्षेत्रात भारताचा 'करिश्मा'! रशियानंतर भारत दुसरा देश ठरला! ४०० वर्षांपर्यंत टेन्शन संपणार!
5
सस्पेन्स कायम! भारतीयांनो, इराण तात्काळ सोडा; युद्धविरामानंतर काही तासांत भारताने जारी केली सूचना
6
अमेरिका-इराणमध्ये युद्धविरामाची घोषणा; जगभरातील देशांनी काय म्हटले? पाकिस्तानच्या भूमिकेची चर्चा
7
स्मरण दिन २०२६: ७ दिवस ३ उपाय, ‘ही’ सेवा सुरक्षा कवच ठरेल; स्वामी कृपेचा अद्भूत अनुभव येईल!
8
आयसीएल फिनकॉर्पचा नवीन एनसीडी इश्यू १० एप्रिल रोजी खुला होणार; १२.२५% पर्यंत परताव्याचा दावा
9
पाकिस्तानच्या मध्यस्थीचे 'डर्टी सीक्रेट'! १००० खोल्यांचा सौदा केला, आसिम मुनीर यांनी ट्रम्प यांना दिली ८,३०० कोटींची ऑफर
10
Ashok Kharat : अशोक खरातला न्यायालयीन कोठडी; उद्या पुन्हा नव्या गुन्ह्यात कोर्टात सादर करण्याचे आदेश
11
School bus Accident: काळजाचा ठोका चुकवणारा अपघात; ३५ विद्यार्थ्यांसह शालेय बस खड्ड्यात उलटली!
12
७ मिनिटांच्या बैठकीत निवडणूक आयुक्त म्हणाले, Get Lost...; डेरेक ओ ब्रायन यांचा गंभीर आरोप
13
नवऱ्याचे ९ महिलांसोबत संबंध, १४ वर्षांचा संसार मोडला; प्रसिद्ध अभिनेत्रीचा खुलासा, एकटीने करतेय मुलाचा सांभाळ
14
आसाराम बापूच्या मुलाचा घटस्फोट, पत्नीला द्यावी लागणार कोट्यवधी रुपयांची पोटगी, कोर्टाचे आदेश
15
Video : बॉयफ्रेंडला चीटिंग करताना रंगेहाथ पकडलं; भररस्त्यात गर्लफ्रेंडने धू-धू धुतलं, पण नंतर जे झालं…
16
इस्रायल तयार नव्हता...! ट्रम्प यांनी इराणला लुळा-पांगळा करण्याचा प्लॅन सांगितला; नेतान्याहू झटकन तयार झाले...
17
थायलंडच्या महाराजांना भेटायला गेले भारतीय राजदूत; समोर अधिकारी गुडघ्यावर बसले, कारण काय?
18
"बाबा, मला पोलीस नाही व्हायचं!" वडिलांचं स्वप्न बाजूला सारलं; आता स्विंगच्या जोरावर गाजवतोय आयपीएल
19
युद्धविराम १४ दिवसांचाच...! नंतर पुन्हा युद्ध सुरु होणार? ट्रम्प यांचा इशारा आणि नेतन्याहूंच्या अटी 
20
“PM मोदींचे अपयश, ट्रम्प यांनी इराण शस्त्रसंधीचे श्रेय चीन-पाकला दिले”; संजय राऊतांची टीका
Daily Top 2Weekly Top 5

तुमच्या राजकीय नेतृत्वाकडून तुमची सगळ्यात ‘पहिली’ अपेक्षा (प्रायॉरिटी) कोणती?

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: April 11, 2019 17:05 IST

मुला-मुलींचं पक्कं एकमत - 60 % हून अधिकांसाठी महत्त्वाचं शिक्षण आणि रोजगार! नागरी सुविधांबाबतही दक्ष!

ठळक मुद्देउत्तम शिक्षण हवं आणि हाताला काम.

-ऑक्सिजन  टीम 

सोशल मीडियातून ‘लॉग आउट’ व्हा, तुम्हाला खरा भारत भेटेल असं हल्ली जाणकार सांगतात ते खरंच आहे. समाज माध्यमात केवढा तो जातींचा विखार, धर्मद्वेषाचं जहर, त्यावरचे वितंडवाद.‘लोकमत ऑक्सिजन’ने प्रत्यक्ष तरुण मुलामुलींची गाठ घेतली तेव्हा मात्र भेटलं सुज्ञ तारुण्य. ज्यांना भवतालाचं भान आहे, आणि खोटय़ा चर्चाचे फुगे आपल्या कामाचे नाहीत याची जाणही आहे. म्हणून तर 60 टक्के तरुण-तरुणी म्हणतात की, बाकी जाऊ द्या आमचं नेतृत्व करू म्हणणारे आमच्या शिक्षणाचं आणि रोजगाराचं काय करणार ते सांगा !कालबाह्य शिक्षण, हाताला नसलेलं स्किल, लांबवर न दिसणार्‍या नोकर्‍या आणि उत्तम आयुष्य जगण्याची नाकारली जाणारी संधी हे सारं तरुण मुलामुलींना जास्त त्रासदायक वाटतं. म्हणून तर ते म्हणतात की धार्मिक-जातीय रक्षण आणि अस्मिता यांचं काय करायचं ते नंतर पाहू, आधी आम्हाला शिक्षण आणि रोजगार द्या.त्या खालोखाल आहेत, नागरी सुविधांच्या कळीचा प्रश्न. रोजच्या जगण्यातल्या अडचणी सोडवण्याच्या अपेक्षा. त्यातही तरुणांपेक्षा तरुणींना हा प्रश्न जास्त महत्त्वाचा वाटतं. साधी एसटीची सोय नाही म्हणून शिक्षण सुटतं, स्वच्छतागृह नाहीत म्हणून आरोग्यावर परिणाम होतो इथपासून मुलींचे प्रश्न सुरू होतात आणि रोज डोक्यावरून पाण्याचे हंडे वाहताना शिक्षण आणि उत्तम संधी नाकारल्या जातात. हे सारे कष्ट कमी व्हावेत म्हणून मुली सांगतात की, नागरी सुविधांचा विकास करा, ती आमची टॉप प्रायॉरिटी आहे. ‘टॉप प्रायॉरिटी’ हा तरुण मुलांच्या आयुष्यात फार महत्त्वाचा शब्द असतो. जी प्रायॉरिटी नाही, त्याला त्यांच्या लेखी इम्पॉर्टन्सही नसतो.आणि म्हणूनच जातधर्माचा खल सोशल मीडियात करणार्‍यांपेक्षाही हे जमिनीवर जगणारं तारुण्य वास्तवाच्या अधिक जवळ असतं.त्या वास्तवाची एक झलक म्हणजे ही आकडेवारी !

***

एकूण प्रतिसाद काय सांगतो?

* नागरी सुविधांचा विकास - 26.32 %* शिक्षण आणि रोजगार - 61.67 %* धार्मिक-जातीय स्वाभिमानाचे रक्षण - 6.94 %* यापैकी नाही : 2.06 %एकूण सहभागींपैकी 3}  तरुण-तरुणींनी या प्रश्नाचं उत्तर दिलेलं नाही.--------------------------------------------------------

मुली म्हणतात * नागरी सुविधांचा विकास - 27.61%* शिक्षण आणि रोजगार - 61.74 %* धार्मिक-जातीय स्वाभिमानाचे रक्षण - 6.87 %* यापैकी नाही - 2.09 % शिक्षण आणि रोजगार हीच ‘प्रायॉरिटी’ असण्यावर मुला-मुलींचं ठामठोक एकमत आहे.मुलींना नागरी सुविधांची कळकळ मुलांपेक्षा किंचित अधिक दिसते आणि ते स्वाभाविकही आहे.  -----------------------------------------------मुलगे म्हणतात * नागरी सुविधांचा विकास - 24.95 %* शिक्षण आणि रोजगार - 61.61 %* धार्मिक-जातीय स्वाभिमानाचं रक्षण - 7 %* यापैकी नाही - 2.01 %यापैकी नाही असा पर्याय निवडणार्‍या काही मुला-मुलींनी आपल्या राजकीय नेतृत्वाकडून असलेल्या अपेक्षांची लांबलचक यादीच प्रश्नावलीसोबत पाठवलेली दिसते. त्यात सतत पक्ष न बदलण्यापासून ते भ्रष्टाचारापासून दूर राहण्यार्पयत अनेक गोष्टींना ‘प्राथमिकता’ दिलेली आहे. आणि अपेक्षांचं ते काहीच करत नाही असा टीकेचा कठोर सूरही लावला आहे. 

*** 

2009 - ओन्ली फॉर अ‍ॅडल्ट्स -  दहा वर्षात नेमकं काय बदललं?

प्रश्न जैसे-थेच ! - बदल शून्य!

* स्वातंत्र्य मिळून 70 वर्षे झाली, तरी तीच चर्चा सुरू आहे. 2009 साली 15व्या लोकसभेच्या निवडणुकीच्या वेळीही बिजली सडक पानी याच मुद्दय़ांची चर्चा निवडणुकीत होती. आणि तेव्हा सव्र्हेत सहभागी झालेल्या तरुण मुलांनाही  शिक्षण आणि रोजगार या दोनच गोष्टी महत्त्वाच्या वाटत होत्या. * 45 टक्के तरुण तेव्हा सांगत होते की, बाकी सगळं सोडा आमच्या शिक्षणाचं आणि हाताला काम देण्याचं काय कराल ते सांगा. * आज 17व्या लोकसभेची निवडणूक आणि आजही 60 टक्के तरुण तेच म्हणत आहेत. हाताला काम आणि स्किल देणारं शिक्षण, या अपेक्षा 10 वर्षानंतरही त्याच असतील तर हे चित्र काय सांगतं?