शहरं
Join us  
Trending Stories
1
'मी ते केले तर चीन उद्ध्वस्त होईल'; ड्रॅगनची भारताशी जवळीक वाढल्याने डोनाल्ड ट्रम्प यांची धमकी
2
पुराचा इशारा देत भारताची माणुसकी; मात्र, पाकिस्तानने काढली नवी कुरापत
3
२ दिवसांत निर्णय घ्या, अन्यथा मुंबईत धडकू, मनोज जरांगे यांचा इशारा; आरक्षण घेतल्याशिवाय आता माघार नाही, काठी उगारली तर सरकारच उलथवून टाकणार
4
आजचे राशीभविष्य, २६ ऑगस्ट २०२५: वाद-विवादापासून दूर राहा, गोड बोलून कामे पूर्ण कराल
5
‘सरकारने मागणीला गांभीर्याने घ्यावे, घराघरांतून मराठा समाज मुंबईला येणार’, मनोज जरांगे यांचा इशारा
6
'रिझर्व्हेशन'ची स्पेलिंगही न येणारे मुंबईला निघाल्यास ओबीसी रस्त्यावर उतरतील: लक्ष्मण हाकेंचा इशारा
7
२६ लाख लाडक्या बहिणींचे मानधन रोखले, छाननीचे काम सुरू, २.२९ कोटी बहिणींचे मानधन मात्र सुरूच
8
एमएसपीची गॅरंटी द्या, शेतकरी नेते डल्लेवाल यांची मागणी; दिल्लीत महापंचायत, शेतकरी पुन्हा रस्त्यावर
9
२९ हजार किमीचे रस्ते खराब, तरीही द्यावा लागतोय टोल, ५ वर्षांत राष्ट्रीय महामार्गांवर ८० हजार जणांचा मृत्यू
10
वैकुंठाला जाण्याचा हट्ट; इरकर कुटुंबीय नजरकैदेत
11
शुभांशूने सांगितला यशाचा अस्सल मार्ग, म्हणाले, २०४० पर्यंत तुम्हीही जाऊ शकता चंद्रावर
12
जगातील सर्वांत जुनी गणेश प्रतिमा मुंबईत !पद्मश्री डॉ. प्रकाश कोठारी यांना सापडला अमूल्य ठेवा
13
बेरोजगार पतीला सतत टोमणे मारणे पत्नीला पडले महागात; कोर्ट म्हणाले ही मानसिक क्रूरता
14
'आमच्यासाठी शेतकरी महत्वाचे; कितीही दबाव टाका, आम्ही...', ट्रम्प टॅरिफवर PM मोदींचे मोठे विधान
15
‘सोना जल्दी निकालो, वरना मार दूंगा’ साधू बनून लुटले
16
Mig 21 : ६० वर्षांत पाकिस्तानला अनेकदा दिली मात; निरोप घेण्यापूर्वी लढाऊ विमान 'मिग-२१'ने केले शेवटचे उड्डाण!
17
Rain Update : बाप्पाच्या स्वागतासाठी पावसाच्या 'पायघड्या'; पुढचे चार दिवस 'झोडपणार', कोणत्या भागांना इशारा?
18
जगातील सगळ्यात महागडी ७ शहरे! 'या' ठिकाणी राहायचा विचार करत असाल तर आताच जाणून घ्या...
19
नागपुरातील रस्त्यांवर कुत्र्यांना खाऊ घालाल तर खबरदार! कारवाईसाठी रहा तयार
20
पंतप्रधान मोदींची डिग्री सार्वजनिक होणार नाही, दिल्ली उच्च न्यायालयाकडून CIC चा आदेश रद्द

आजच्या राजकीय व्यवस्थेवर तुमचा विश्वास आहे का?

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: April 11, 2019 16:34 IST

निम्म्या मुलांचा विश्वास आहे र्‍ उरलेल्यातल्या निम्म्यांना ही व्यवस्थाच फिजूल वाटते . बाकीचे म्हणतात, नक्की कसं सांगणार? मुलांपेक्षा मुलींचा भरवसा कणभरच अधिक!

ठळक मुद्देविश्वास ठेवावासा वाटतो, पण शंकांची खुसपटं त्रास देतात; त्याचं काय?

-ऑक्सिजन  टीम 

‘ग्लास अर्धा भरलेला आहे की अर्धा रिकामा?’ असं विचारणारे मेसेज तरुण मुलांच्या व्हॉट्सअ‍ॅपवर रोज फिरतात आणि त्यांना आशावादी राहाण्याचा आग्रह धरतात. मात्र त्याच तारुण्याला आपल्या देशातल्या राजकीय व्यवस्थेकडे पाहून आशादायी वाटतं का? त्यावर विश्वास ठेवावासा वाटतो का? - हे शोधायला गेलं तर काय दिसतं?उत्तर येतं. फिप्टी फिप्टी!पन्नास टक्के तरुण मुलांना आणि मुलींना वाटतं की, अजूनही राजकीय व्यवस्थेवर भरवसा ठेवता येऊ शकतो. आपलं मत या व्यवस्थेला कामाला लावू शकतं, प्रसंगी वठणीवर आणू शकतं. मात्र उरलेल्यांचं काय?त्यांचा विश्वासच उरलेला नाही का या व्यवस्थेवर? मन उडालं आहे का त्यांचं व्यवस्थेवरून? कशामुळे त्यांना हा इतका अविश्वास वाटत असेल?- या प्रश्नांची उत्तरं आकडेवारीच्या पलीकडे जात जेव्हा प्रत्यक्ष मुलांशी बोलून शोधायचा प्रयत्न केला तेव्हा ही मुलं सांगतात, काळ बदलला म्हणता मात्र आमचे आईवडील जे प्रश्न घेऊन मतदानाच्या रांगेत उभे राहात तेच प्रश्न घेऊन आम्ही आता मतदानाला जाणार, याला काय अर्थ आहे? पण शिक्षण-रोजगार-वीज-शेतमालाला भाव-रस्ते हे आमचे प्रश्न समाजाला आणि राजकीय व्यवस्थेला ‘आउटडेटेड’ वाटतात. आणि जर व्यवस्था प्रश्न सोडवतच नसेल तर त्या व्यवस्थेवर भरवसा ठेवून पाहावा की ठेवूच नये हेच कळत नाही!तरुणांपेक्षा तरुणींचा मात्र राजकीय व्यवस्थेवर थोडा कमी विश्वास आहे.सत्तेत कुणीही असो, सत्ता आणि राजकीय व्यवस्था पुरुषीच चेहर्‍यामोहर्‍याच्या असतात आणि त्यावर फार विश्वास ठेवण्यात अर्थ नाही.. असं तरुणींना वाटत असेल का?-कदाचित!निदान आकडेवारी तरी तेच सांगतेय.उघड आहे.भरोसे की डोर यहॉँ भी बडी नाजूक है..

****

 

एकूण प्रतिसाद काय सांगतो?

* अर्थात, विश्वास आहे - 49.76 %* अजिबात विश्वास नाही - 24.02 }* नक्की सांगता येत नाही -23.87}एकूण सहभागींपैकी 2.35%  तरुण-तरुणींनी या प्रश्नाचं उत्तर दिलेलं नाही.------------------------------------मुली म्हणतात -* अर्थात, विश्वास आहे - 50 %* अजिबात विश्वास नाही -21.75 %* नक्की सांगता येत नाही - 27.58 %निम्म्या मुलींनी ठामठोकपणे राजकीय व्यवस्थेवर विश्वास व्यक्त केलेला आहे.काही मुलींनी मात्र या प्रश्नाचं उत्तरच दिलेलं नाही.या प्रश्नाचा विचार कसा करावा, हेच कळत नाही; असे काही मुलींनी स्वच्छच मान्य केलं  आहे. -----------------------------------------------मुलगे म्हणतात ...* अर्थात, विश्वास आहे - 49.52 %* अजिबात विश्वास नाही -  26.30 %* नक्की सांगता येत नाही - 20.15 %राजकीय व्यवस्थेवर अविश्वासाचं प्रमाण मुलींपेक्षा मुलांमध्ये काहीसं जास्त दिसतं.यात विचार काय करायचा, असं थेट विचारून काही मुलांनी आपला ठाम नकार दर्शवला आहे.

 

2009 : ओन्ली फॉर अ‍ॅडल्ट्स दहा वर्षात नेमकं काय बदललं?

व्यवस्थेवरचा ‘विश्वास’ वाढला!

* खरं तर आपल्या राजकीय व्यवस्थेची पत वाढली आहे असंच म्हणावं लागेल, कारण 2009 मध्ये ‘ऑक्सिजन’ने केलेल्या सव्र्हेत हाच प्रश्न विचारला होता, तेव्हा फक्त 25 टक्के तरुण-तरुणी म्हणत होते की, आमचा राजकीय व्यवस्थेवर विश्वास आहे. उरलेल्या  63 टक्क्यांचं स्पष्ट मत होतं की आमचा या व्यवस्थेवरच विश्वास नाही. उरलेल्यांना हेच माहिती नव्हतं की आपला विश्वास आहे की नाही?* विशेष म्हणजे तेव्हा राज्यभरातलं बहुतांश तारुण्य राजकीय व्यवस्थेवर विश्वास नाही म्हणत असताना मराठवाडय़ात मात्र चित्र उलटंच होतं. तिथं 63 टक्के तरुण राजकीय व्यवस्थेवर विश्वास आहे, असं सांगत होते.