शहरं
Join us  
Trending Stories
1
Maharashtra Local Body Election Results 2025 Live: सर्वाधिक नगराध्यक्ष भाजपाचे, काँग्रेसलाही किंचित दिलासा! नगरपरिषद निकालांमध्ये कोण 'हिट', कोण 'फ्लॉप'?
2
नगर परिषदा, पंचायत निवडणुकीत भाजपाला भरघोस यश; प्रदेशाध्यक्ष रविंद्र चव्हाण म्हणाले...
3
'घरी बसणाऱ्यांना मतदारांनी नाकारले' ; नगरपरिषद निवडणुकांवर एकनाथ शिंदेंची पहिली प्रतिक्रिया
4
वर्षाखेरीस IPO बाजारात 'धुमधडाका'! या आठवड्यात ११ नवीन कंपन्यांचे आगमन; गुंतवणुकीची मोठी संधी
5
चांदेकरवाडीत पाणंद रस्त्यावर लिंबू आणि बाहुली, अंधश्रद्धेचा प्रकार, ग्रामस्थांत भीतीची सावली
6
दोन पराभवांनंतर अखेर संजयकाका पाटलांनी मैदान मारले, आर. आर. आबांचा रोहित पाटील पराभूत
7
Siddhi Vastre: अवघ्या २२ वर्षांची तरुणी भाजपवर पडली भारी; मोहोळमध्ये इतिहास घडवणारी सिद्धी वस्त्रे आहे तरी कोण?
8
"दरवाजे उघडून बाहेरच्यांना प्रवेश दिल्याचा हा परिणाम"; चंद्रपूरातील पराभवानंतर मुनगंटीवारांचा घरचा आहेर
9
Maharashtra Local Body Election Results 2025 : अख्खं मंत्रिमंडळ ईश्वरपुरात, तरीही जयंत पाटलांनी महायुतीला दिला धक्का; सांगली जिल्ह्यातील नगराध्यक्षांची यादी एका क्लिकवर
10
विमा घेताय? केवळ जाहिरातींवर जाऊ नका; 'या' ४ तांत्रिक गोष्टी तपासा, अन्यथा क्लेमवेळी होईल पश्चात्ताप!
11
उद्धवसेना-मनसे युतीची बोलणी संपली, संजय राऊतांनी दिली महत्त्वाची माहिती; "अजूनही ७२ तास..."
12
"म्हणून पुन्हा एकदा सांगतो, शून्य अधिक शून्य...", निकाल लागताच भाजपचा उद्धव ठाकरेंवर पहिला प्रहार
13
Shrivardhan Nagar Parishad Election Result 2025: रायगडमध्ये मोठा ट्विस्ट! श्रीवर्धनमधील ठाकरे गटाचा विजयी नगराध्यक्ष शिंदेसेनेत प्रवेश करणार?
14
Maharashtra Nagaradhyaksha Winners List: महाराष्ट्रातील नगरपरिषद, नगरपंचायतींमध्ये कोण झालं नगराध्यक्ष? वाचा, पक्षनिहाय यादी
15
Muktainagar Nagar Panchayat Election Result 2025: “रक्षा खडसे भाजपात एकाकी पडल्या”; मुक्ताईनगरातील शिंदेसेनेच्या विजयानंतर एकनाथ खडसेंचा दावा
16
"पैसे भरा, मृतदेह न्या", पोटच्या पोरासाठी बापाने मागितली भीक; घर गहाण ठेवलं, कर्ज काढलं, पण...
17
धारुरमध्ये हे काय घडलं? भाजपचे सर्व उमेदवार आपटले...! पंकजा मुंडे यांना मोठा धक्का, म्हणाल्या...
18
रेल्वे प्रवासासाठी आता मोजावे लागणार जादा पैसे! जास्त सामान नेण्यावरही अतिरिक्त शुल्क लागू होणार
19
Sangamner Nagar Parishad Election Result 2025: संगमनेरमध्ये पुन्हा 'तांबे-थोरात' पॅटर्न; डॉ. मैथिली तांबे महाराष्ट्रात सर्वाधिक मताधिक्याने विजयी
20
Khed Nagar Parishad Election Result 2025: “कोकणातील विजय हा मुंबई मनपा विजयाची नांदी”; एकनाथ शिंदे यांच्या शिलेदाराचे मोठे भाकित
Daily Top 2Weekly Top 5

हाईत कोन ही पोरं?

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: October 20, 2018 14:39 IST

सोलापूर-बार्शीकडल्या तरुण पोरांनी यूटय़ूबवर नुस्ता धुरळा उडवलाय. डोनाल्ड ट्रम्पला तात्या बनवून गायछाप मळायला लावलीय त्येंनी. ह्यो ट्रम्पतात्या फेटाबिटा घालून गप्पा हाणतूय कशावरबी. त्येंच्या निक्की जिगरनं आपल्या टोप्या उडवाव्यात म्हणून पुन्यामुंबैकडल्या शिनेमावाल्यांची रांग लागलीय.. सातारकडच्या पोरांनी तर गावाकडच्या वेबशिरीजमध्नं पार काळजालाच हात घातलाय, वर ही पोरं पैसंबी कमवाय लागल्यात ह्या पोरांच्यात ओबामाभाऊ खास्बागेत मिस्सळ खायाला जात्यात आणि मिशेलवैनीबी रस्सा वाडा म्हन्त्यात! नुस्ता नादखुळा!

ठळक मुद्दे‘लोकमत दीपोत्सव 2018’ या लवकरच प्रसिद्ध होणार्‍या दिवाळी अंकात या पोरांची चक्कीत जाळ काढणारी डीटेल ष्टोरी वाचाय लागत्येय भावांनो!

- श्रीनिवास नागे

मोबाईल वाजला. दोस्ताचा कॉल. ‘भावा, यू टय़ूबवरच्या ‘एन्टरटेनमेन्ट’च्या दुनियेत गावाकडच्या पोरांनी धुमाकूळ घातलाय. पार धुरळा उडीवलाय त्येंनी..!’ यू टय़ूब बघत हुतोच. व्हाटसअ‍ॅप न् फेसबुकावरबी हसून-हसून मुरकुंडय़ा वळीवनारे, काळजाला हात घालनारे व्हीडीओ व्हायरल झाल्याले. ते बनवणार्‍या पोरांबद्दलच दोस्त त्वांड भरून कवतुक करत हुता.‘लेका, चार-चार लाख सबस्क्रायबर हाईत त्येंचं. धा-पंधरा लाखावर व्हीव्हज. पुन्या-मुंबयचे पिरवाले प्रमोशनसाठी त्येंच्या पायर्‍या झिजवत्यात..’ दोस्तानं  किडा सोडला मेंदवात. तिथं झापकन् लाईट लागली! चक्कीत जाळ! ह्याच पोरांना गाठायचं ठरवलं. लोकमत ‘दीपोत्सव’साठी त्यांची ‘स्टोरी ’ करायची ठरली.कोण हाईत ही पोरं?डिजिटल क्रांती झाली न् पार वाडय़ावस्त्यांवर मोबाईल, स्मार्ट फोन, टय़ाब, ल्यापट्वाप दिसाय लागलं. स्वस्तातल्या नेटप्याकनं तर आख्खं जग मुठीत आलं. गावाकडची पोरं गावात र्‍हाऊन आता गावाकडच्या भाषेत गावाकडच्याच गोष्टी मांडत्यात. नव्या ‘टेक्निक’नं त्ये जगभर न्हेत्यात न् मग जगभरातून त्येंच्यावर ‘लाईक’, ‘कमेन्ट’चा धुवांधार पाऊस पडतूय, ही खरी अपरूबाई!हे असलं भारी काम करणार्‍या पोरांना गाठायचं म्हणून त्या सोलापूरकडच्या बार्शीच्या तरण्याबांड पोरांना पह्यलांदा गाठलं.  ही पोरं आता पुन्यात राहत्यात. त्येंनी ‘खास रे’ नावाचं यू टय़ूब च्यानेल काढलंय. थेट अमेरिकेच्या अध्यक्षाला म्हंजे डोनाल्ड ट्रम्पला गावाकडचा ‘ट्रम्प तात्या’ केलाय ह्येंनी. ह्यो तात्या गाय छाप मळनारा न् सोलापुरी मर्‍हाटीत बोलनारा! त्येच्या ‘वरीजनल’ व्हीडीओवर डबिंग करन्याची नादखुळी आयडीया या पोरांच्या डोस्क्यातून आली.पुन्यातल्या वडगाव बुद्रुकच्या सिंहगड कॉलेजवळच्या पत्र्याच्या ‘रिल्याक्स’ हाटेलात सगळी भेटली. चौघं बार्शीचे, तर तिघं पुन्यातले. बाकीचे डबिंग करनारे तिकडं बार्शीत. ह्येंची नावं पह्यलांदाच कळली. आतापतूर नुस्ती व्हीडीओत दिसत हुती. समदी वीस-बावीशीतली पोरं!‘बार्शी के शोले’ हा पिर या पोरांनी काढला आणि तो  सुपरहिट झाला म्हणून ह्या गँगच्या डोस्क्यात या भलत्याच चॅनलची आयडिया सव्वा-दीड वर्षाआधी आली. तवा स्मार्ट फोनवर स्वस्तातल्या नेटप्याकमुळं यू टय़ूबची चलती सुरू झालती. डोनाल्ड ट्रम्पबी फार्मात हुता. ह्या पोरांनी ट्रम्पचं व्हीडीओ मिळवलं न् केलं सुरू डबिंग. इषय  काय? तर कायबी!गावाकडच्या दुष्काळापास्नं सरपंचाच्या इलेक्शनपतूर! करिअर गायडन्सपास्नं आयपीएलच्या किरकेट म्याचपतूर!हा ट्रम्प ‘तात्या’ कशावबी बोलाय लागला.. गावाकडं कट्टय़ावर, पानटपरीवर, बांधावर बसलेल्यांपास्न एमआयडीशीतल्या कारखान्यांत जानार्‍या, बसस्टापवर थांबलेल्या, कालेजातल्या गाडय़ांवर बसून टपोरीगिरी करनार्‍या, लेक्चर बंक करून भाईर टाईमपास करनार्‍यांकडं तोवर मोबाईल आलेला. ते तात्याला भेटायला लागले. पुन्या-मुंबयत नोकरी-धंद्यासाठी गेलेलेबी ह्येच्यात मागं न्हवते. त्येंच्याबी मोबाईलवर ‘तात्या’ व्हायरल झाला.  यू टय़ूबवरबी ‘लोकं’ बघाय लागली.दणक्यात पाप्युलर झाला ‘तात्या’. मग एकामागोमाग एक व्हीडीओ टाकलं ह्या पोरांनी. मागनं पेरडी-बिरडीचं टोप्या उडवनारं व्हीडीओ तयार केलं. यापायी खर्च किती झाला? झिरो पैशे! शुटिंग, एडिटिंग, अपलोडिंग समदं मोबाईल न् ल्यापट्वापवर. नंतर दुसर्‍याचा क्यामेरा घिवून नवं ढंगदार, रंगतदार व्हीडीओबी केलं.  लेखन-दिग्दर्शन-संकलन न् अ‍ॅक्टिंग-बिक्टिंग सबकुछ ह्येंचंच. मग जाहिराती सुरू झाल्या. आता मराठी-हिंदी पिक्चरवाले ह्येंच्याकडं पिरच्या प्रमोशनसाठी येऊ लागले. चांगला पैकाबी मिळाय लागला. आता ह्येंचा स्टुडिओ हुबा र्‍हातोय. पंचवीस लोकांची टिम तयार हुतीय.. - ही समदी मुशाफिरी पोरं सांगत हुती. ****सातार्‍यातल्या पाटण तालुक्यातलं तारळे गाव. तिथली पोरं भी अशीच भेटली.त्यांची कहाणी तर जाम भन्नाट. ह्या पोरांनी यू टय़ूबवर वेबशिरीज काढलिया. ती लै फेमस. तिचं नाव ‘गावाकडच्या गोष्टी’.सातार्‍यापास्नं पस्तीस-चाळीस किलोमीटरवरचा ह्यो भाग. डोंगराळ न् हिरवाकंच. तिथंच गाठलं ह्या पोरांना. न्हवं, ‘कोरी पाटी’ प्रॉडक्शनवाल्यांना. तिथं नुस्तं ‘कोरी पाटी’ म्हनायचा अवकाश लगेच लोकच बोलाया लागतात. संत्या-सुरखी-बापू म्हन की भावा असं आपसूक येतं, गावकर्‍यांच्या तोंडातनं. गावातल्या बाजारपेठंत रस्त्यालाच ह्या पोरांनी ‘हापिस’ घेतलंय. तिथं समदी जमल्याली. विशी-तिशीतली पोरंपोरी. दोघंच पस्तीशीतले. भाईर त्येंच्या गाडय़ा.ही पोरं रस्त्यात भेटली तर  वाटनारबी न्हाई की, ती या भागात ‘स्टार’ हायती म्हनून. पोरं हरहुन्नरी. यू ट्यूबवरच्या त्येंच्या वेबशिरीजनं लोकांच्या काळजाला हात घातलाय. आता त्यांच्या ‘गावाकडच्या गोष्टी’चे सव्वाचार लाख सबस्क्रायबर्स हाईत!  यू टय़ूबवर ट्रेंडिंगला मर्‍हाटीत नंबर वनवर असल्याली वेबशिरीज. पुन्या-मुंबयतल्या सेलिब्रिटींच्या यू टय़ूब च्यानेलना बद्दय़ा मार दिलाय ह्येंनी! एकेका एपिसोडला आठ-धा लाख व्हीव्हज. आतापतूर तीस-पस्तीस एपिसोड झाल्यालं. नुस्त्या यू टय़ूबकडनं महिन्याला तीन-चार एपिसोडचा लाखभराचा गल्ला मिळतूय. बाकीच्या कार्पोरेट न् लोकल जाहिरातीचा पैका येगळाच!- दर आठवडय़ाला एका गोष्टीवर एक एपिसोड करत्यात. त्यो बारा ते सतरा-आठरा मिनिटाचा. गोष्टी तर गावाकडच्या साध्या पन वास्तवातल्या. खर्‍र्याखुर्‍र्या. गावातली भोळीभाबडी न् डांबरट मानसं, कालेज शिकाय जाणारी तरणी पिढी, प्रेमप्रकरणं, गावगाडय़ातला बळीराजा, शहराची वढीनं हुनारी गावकर्‍यांची वढातान, टेक्नॉलॉजीच्या मागं लागून पळनं, गावातलं राजकारण, शाळा, देवळं-जत्रा ह्ये समदं आपसूक येतं ह्या गोष्टींत.त्यातल्या संत्या-सुरखी न् अव्या-माधुरी ह्या जोडय़ा फेमस झाल्यात. बापू तर इरसाल नमुना. सातार्‍याकडं ‘संत्या-सुरखी फॅन्स क्लब’ निघाल्यात, मोटारसायकलींच्या मागं ‘संत्या-सुरखी प्रेमी’, ‘बापू, बसायचं का?’ असलं कायबाय लिहिल्यालं दिसाय लागलंय. पिरसाठी मागणी न् इव्हेंटची आवतानंबी याय लागल्यात.त्येंच्याबरूबर गप्पा मारताना ध्येनात येतं, की ‘गावाकडच्या पोरांनी, गावात जावून, गावातल्या लोकांना घिवून काढल्याली गावगाडय़ावरची शिरीयल’ ह्योच ह्येंचा ‘यूएसपी’! रोजच्या जगन्यातल्या गमतीजमती, कलागती, भानगडी, धडपडी ह्येच्यात दिसत्यात. भाषाबी गावाकडचीच. पन त्यांनी मर्‍हाटी मानसाला खूळ लावलंय.. ह्येंची स्टोरी ऐकता-ऐकता चाट पडलो! गप्पा संपतासंपता ‘च्या-बिस्किटं’ आली. तर समदी आलकटपालकट घालून खाली बसली, कप घिवून. मधी बिस्किटाचं ताट.. ****या पोरांना भेटलं अन् लक्षात आलं की, या दोनीबी स्टोर्‍यांतली पोरं गावापतूर आल्यालं तंत्रज्ञान आधी शिकली. शिकून शहाणी झाली. ‘एन्टरटेनमेन्ट’च्या दुनियेत आली. त्येच्यावर हुकुमत मिळवन्याची रेटारेटी एकीकडं सुरू असताना दुसरीकडं त्यातनं नवं कायतरी करायसाठी धडपडू लागली.  त्यातला खरखरीतपना, अस्सलपना लोकांना आपला वाटाय लागला. एव्हढं दिस ह्ये दिसलंच न्हवतं लोकांना. ह्या पोरांना डोक्याव घेनार्‍यात गावाकडचीच लोकं जास्त हुती. त्येंच्याबी हातात नवं तंत्रज्ञान आल्यालं. त्येच्यामुळं सोप्पच झालं समदं. पोरांनी तयार केलेल्या नव्यानव्या गोष्टींवर उडय़ा पडाय लागल्या. ही कमाल पोरांच्या डोस्क्यातनं आल्याला आयडीयेची जशी हुती, तशी अस्सल देशी बेन्याचीबी हुती! मग त्यातनंच आपसूक पैकाबी मिळाय लागला. फेमस व्हायचं न् पैकं कमवायचं, दोन्हीबी साधलंय पोरांनी. वा रं पठ्ठय़ांनू!त्या पठ्ठयांना भेटा, लोकमत दीपोत्सव 2018 मध्ये.कधी?दिवाळीचा पहिला दिवा दारात उजळण्यापूर्वी.म्हणजे लवकरच!

*** 

लोकमतदीपोत्सव 2018अंक नव्हे, उत्सव!!

* पाने अंदाजे 256  * मूल्य 200 रुपये  * प्रसिद्धी दिवाळीच्या आधी * ऑनलाइन नोंदणी/खरेदी : deepotsav.lokmat.com* फोन बुकिंग -  एसएमएस / व्हॉट्सअ‍ॅप-8425814112* अधिक माहिती -  स्थानिक लोकमत कार्यालय, लोकमत वृत्तपत्र विक्रेते* इ-मेल : deepotsav.lokmat.com 

टॅग्स :Lokmat Deepotsav 2018लोकमत दीपोत्सव 2018