शहरं
Join us  
Trending Stories
1
पाकिस्तानच्या मध्यस्थीचे 'डर्टी सीक्रेट'! १००० खोल्यांचा सौदा केला, आसिम मुनीर यांनी ट्रम्प यांना दिली ८,३०० कोटींची ऑफर
2
Ashok Kharat : अशोक खरातला न्यायालयीन कोठडी; उद्या पुन्हा नव्या गुन्ह्यात कोर्टात सादर करण्याचे आदेश
3
युद्धविराम १४ दिवसांचाच...! नंतर पुन्हा युद्ध सुरु होणार? ट्रम्प यांचा इशारा आणि नेतन्याहूंच्या अटी 
4
“PM मोदींचे अपयश, ट्रम्प यांनी इराण शस्त्रसंधीचे श्रेय चीन-पाकला दिले”; संजय राऊतांची टीका
5
RBI नं रद्द केला महाराष्ट्रातील 'या' बँकेचा परवाना; ग्राहकांच्या पैशांचं काय होणार? 
6
US Israel Iran War: युद्ध थांबलं? ट्रम्प यांची मोठी घोषणा, पण मोज्तबा खामेनेईंच्या एका वाक्याने पुन्हा खळबळ! म्हणाले..
7
इराणमधील संघर्ष थांबला, आता या दोन देशात तणाव वाढला, किम जोंगच्या सैन्याने डागली बॅलेस्टिक मिसाईल 
8
"होर्मुझच्या समुद्रधुनीत अमेरिका...!"; युद्धविरामानंतर ट्रम्प यांचा इराणला नवा संदेश; तेहरानमध्ये पुन्हा उभ्या राहणार इमारती?
9
युद्ध संपले, आता मदतीचा हात! २४ तासांत ट्रम्प यांचा 'यू-टर्न'; इराणच्या पुनर्निर्माणासाठी अमेरिका करणार सहकार्य
10
Vastu Tips: मनी प्लांट लावूनही पैसा टिकत नाहीये? मग 'या' ५ चुका तुम्ही करत नाही ना? तपासून घ्या!
11
नेपाळमध्ये भारतीय वाहनांसाठी नवा नियम, सीमेवरून वाहतुकीला निर्बंध; स्थानिकांमध्ये संताप
12
ST Fare Hike: उन्हाळी सुट्टीत ST प्रवाशांच्या खिशाला चटका; १०% भाडेवाढ; प्रवास १५ एप्रिलपासून महागणार
13
नाशिकचा 'भोंदू' अशोक खरात कोठडीत ढसाढसा रडला; पोलिसांना शाप देणारा बाबा आता नरमला!
14
विकृतीचा कळस! महिलांची अंतर्वस्त्रे चोरून कॅमेऱ्यासमोरच करायचा अश्लील कृत्य; रहिवाशांनी सीसीटीव्ही पाहिला अन्...
15
IPL 2026: मुंबईविरुद्धच्या सामन्यात जयस्वालची 'स्पेशल' सेंच्युरी; याआधी असं फक्त तिघांनाच जमलंय!
16
लवकरच येणार स्वस्त मोबाईल प्लॅन! केवळ कॉल आणि एसएमएस करणाऱ्यांना मिळणार गिफ्ट; कंपन्या दिलासा देणार?
17
समरजित घाटगे यांची भाजपात घरवापसी, शरद पवार गटाला धक्का, कागलमधील समीकरणं बदलणार
18
तुमच्या नगरसेवकांना नियम शिकवा; अधिकारी, विरोधकांनी गणेश नाईकांना घेरले, नेमके काय घडले?
19
शहबाज शरीफ यांना डच्चू! ट्रम्प यांनी या दोन जणांना केले कॉल? वाचा युद्धविरामापूर्वीच्या फोन कॉलची संपूर्ण 'इनसाईड स्टोरी'
20
"जी व्यक्ती मालिकेतच नव्हती...", 'लक्ष्य'मधून बाहेर काढण्याच्या दिगंबर नाईकांच्या आरोपांवर आदेश बांदेकरांचं उत्तर
Daily Top 2Weekly Top 5

दक्षिणी मराठीत ‘ऑक्सिजन’ला आलेलं हे एक पत्र.

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: July 5, 2018 16:40 IST

दक्षिणी मराठी नेमकी कशी असते, कशी बोलतात हे सांगणारं हे दक्षिणी मराठीतच लिहिलेलं एका दोस्ताचं पत्र.

ठळक मुद्दे‘ऑक्सिजन’ पुरवणीत (दिनांक 28 जून 2018 रोजी) तंजावूर येथील मराठी माणसं, तंजावूरची दक्षिणी मराठी आणि त्यासाठी सुरू असलेले तरुण मुलांचे प्रय} याची माहिती देणारा लेख प्रसिद्ध करण्यात आला होता.

आनंदराव वसिष्टा, बंगळुरू

नमस्कार,आजचं लोकमत पत्रांत तुमचे लेख वाचून संतोष झालं मला. वाचाला बेष होतं. हळूहळू दक्षिणी मराठी विषयीन, म्हणजे तंजावूर मराठी विषयीन महाराष्ट्राचं लोकांस कळून याच पाव्हून आनंद होतं. महाराष्ट्राच लोके अम्हाला विसरले तरीन, अम्ही अमचं मराठी विसरलों नाही. अपभ्रंश झालाहे तरीन सोडलों नाही.तुम्ही सांगिटलं सार्ख फेसबुक अणी यू टय़ूब हे दोन माध्यम वाटे अम्ही अमचं भाषा दत्तन (जत्तन) ठिवाला अणी पुनरुद्धार कराला प्रय} करत आहों. यशवंत पिंगळे यांच यू टय़ूब प्रकल्प अता-अता आरंभ झालं अणी भरून लोकांकडून अभिनंदन पणीन आलाहे. मुख्यविणी फेसबुक मध्ये अम्चं दोन तीन वेगळं वेगळं प्रकल्प आहे.तुम्हाला अण्खी एक विषय सांगतों अता. दक्षिणी मराठीच पहिल-पहिलच प्रकल्प मी 2009 एप्रिल महिनेंत आरंभ करलों. हे विना, मझं अण्खीन दोन ब्ळोग आहे. www.vishnughar.blogspot.com दक्षिणी मराठीच पहिलं-पहिलचं शब्दकोश तुम्हाला ह्यांत वाचाला मिळेल. हे ब्ळोगाच मुख्यत्व काय म्हणजे, दक्षिण देशाला आलं नंतर अमचं अत्तचं सामाजिक आचार-विचार ह्या विषयीन एक झळक तुम्हाला मिळेल.   आण्खीन एक सांगाच आहे. हे पत्र दक्षिणी मराठींत लिव्हाला एक कारण आहे. अमचं भाषा अणी महाराष्ट्राच मराठी हे दोनां मध्ये काय व्यत्यास आहे, हे दाखिवाला एक लहान उदाहरण तुमचं कडे असूनदे, एवढेच मझं उद्देश. वाचून तुम्हाला आश्चर्य वाटलं म्हणूनहीं मला कळेलं !नमस्कार.