शहरं
Join us  
Trending Stories
1
जातनिहाय जनगणनेचे स्वागत, पण कधी पूर्ण करणार ते सांगा; राहुल गांधी यांनी केंद्र सरकारच्या निर्णयाला दिला पाठिंबा
2
दहशतवाद्याने विचारले, आप काश्मिरी हो क्या? जालन्यातील युवकाचा दावा : रेखाचित्र पाहताच ‘एनआयए’ला ई-मेल
3
मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस आता वर्षा बंगल्यामध्ये; अक्षय्य तृतीयेचा मुहूर्त साधून केली विधीवत पूजा
4
ग्रामीण भागात रोजगार वाढले; तरुणांपुढे आव्हाने, तरुणांपुढे गुणवत्तापूर्ण उपजीविकेशी संबंधित आव्हाने कायम
5
एफआयआर नोंदविण्यास नकार हे दुर्दैव; अक्षय शिंदे एन्काऊंटरप्रकरणात क्राइम ब्रँचच्या ‘एसआयटी’वर उच्च न्यायालयाची नाराजी
6
एमएमआरटीएकडून बेस्ट भाडेवाढ मंजूर; अधिकृत घोषणेची प्रतीक्षा
7
रेल्वेच्या बैठकीला पाच खासदारांची दांडी; प्रवाशांना चांगल्या सुविधा पुरविण्याचे आश्वासन
8
पुढील जनगणनेची तारीख लवकरच जाहीर; काेराेनामुळे झाला नव्हता निर्णय
9
भारतासोबतच्या टॅरिफ वाटाघाटी प्रगतिपथावर; अमेरिकी राष्ट्राध्यक्ष डोनाल्ड ट्रम्प यांचे प्रतिपादन
10
CSK प्लेऑफ्सच्या शर्यतीतून आउट; IPL च्या इतिहासात धोनीच्या संघावर पहिल्यांदाच आली ही वेळ
11
पाकिस्तान हादरला !! बसले भूकंपाचे तीव्र धक्के; किती होती तीव्रता? काय आहे सध्याची परिस्थिती?
12
जातिनिहाय जनगणना निर्णयावरुन आता श्रेयवादाची लढाई; भाजपा नेत्यांचा राहुल गांधींवर पलटवार
13
चहलनं साधला मोठा डाव; IPL मधील दुसऱ्या हॅटट्रिकसह युवराज सिंगच्या विक्रमाशी बरोबरी
14
"आम्ही सुरुवात करणार नाही, पण...!"; पाकिस्तानची भारताला पोकळ धमकी
15
"2043 पर्यंत या देशांमध्ये असेल मुस्लिमांचं राज्य", बाबा वेंगा यांची भविष्यवाणी!
16
दिशा सालियन प्रकरण: सतीश सालियन यांच्या याचिकेवर भूमिका स्पष्ट करा; HCचे सरकारला निर्देश
17
'सरकारला 'टेकू' असला की मनमानी करता येत नाही'; जातनिहाय जनगणनेच्या मुद्द्यावरून खोचक टोला
18
संध्याकाळचे पेट्रोलिंग टाळले म्हणून पोलिस आयुक्तांनी ठाण्यात पोहोचून ठाणेदारांना फटकारले!
19
देशहितासाठी आ‌वश्यक ते सर्व केंद्राने करावे; जातनिहाय जनगणनेवर संघाची भूमिका
20
धक्कादायक! सांगलीतील आष्ट्यात विहिरीत पोहण्यासाठी गेलेल्या दोन जणांचा बुडून मृत्यू

एक खत तबियतसे लिखो तो यारों

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: August 5, 2017 15:24 IST

रोजच तर भेटतो आपला मित्र रोज तर तासभर होतं मैत्रिणीशी बोलणं. तिला कशाला करायचा एसएमएस? कशाला लिहायचं पत्र? कशाला पाठवायचा एखादा ईमेल? लिहायचं काय त्यात?

ठळक मुद्दे ‘अनकही और अनसुनी’ असा एक सुंदर शब्द आहे. पण मैत्रीतही अनेक गोष्टी ‘अनकही’च राहतात. एक बोलत नाही म्हणून दुसरा ऐकत नाही. त्याला त्या कळतच नाहीत. मग गैरसमज.

-ऑक्सिजन टीम

 

फ्रेण्डशिप डजण्ट हॅपन विथ स्पेशल पीपल, पीपल बिकम स्पेशल आफ्टर बिकमिंग फ्रेण्डस्! - मॉरल?

यू वेअर बॉर्न ऑर्डिनरी, आय मेड यू स्पेशल!

- असा एसएमएस भल्या सकाळी खणखणत येतो. आपण साखरझोपेत. मोबाईल कुठं पडलाय म्हणून वैतागत अवतीभोवती शोधतो. सापडतो एकदाचा

डाव्या-उजव्या हाताला. कसेबसे डोळे चोळत मोबाईलमध्ये नाक खुपसावं तर हा असा एसएमएस. संताप होतो. कशाला सकाळी सकाळी हे असले फॉरवर्ड पीजेछाप मेसेजेस पाठवतात? पण त्या संतापालाही तसा काही अर्थ नाही. कारण या मेसेजमधली गंमत पाठवणार्‍यालाही आवडते आणि वाचणार्‍यालाही. मग पुन्हा फॉरवर्डची साखळी सुरू होते. व्हॉट्सअ‍ॅप शायरीच्या या काळात मैत्रीवर ‘सेंटी’ मेसेजेस खरडणारे काही कमी नाहीत. त्या शायरीतल्या शब्दांना मीटरची तांत्रिक भानगड काही कळत नाही. ती असते हेदेखील अनेकांना माहिती नसतं. मराठी- हिंदी-उर्दू भाषांवर अन्याय होतो ही शायरी करता करता. पण त्याची कोण फिकीर करतंय? हे नव्या युगाचे नवे गुलजार कोण याचा कोणालाही पत्ता नसतो. पण तरी मेसेजेस तयार होत राहतात.

जीएम/जीएन (गुड मॉर्निग आणि गुड नाईट) मेसेसेजच्या नावाखाली असे भावुक संदेश दणादण खपवले जातात की वाचणार्‍याला वाटावे, क्या बात है, खास माझ्यासाठी असं कुणी मनापासून लिहू शकतो!’ - तसं नसतं हे खरं! पण नसलं म्हणून काय झालं? मित्रानं मित्राला पाठवलेला संदेश तर खराच असतो. त्यातल्या भावना तर सच्च्या असतात. आणि अवचित येणारा तो मेसेज चुकून कधी आपल्या डोळ्यात पाणी तरळवून जातो. ती डोळ्यात लकाकणारी चमक सच्चीच असते!

तुम्ही विचाराल, मैत्रीत असं परस्परांना काही सांगण्याची गरज असते का? मेसेज फॉरवर्ड करकरून का कधी मैत्री होते? फुलते? - भावना व्यक्त करणे म्हणजे नात्यात काही तरी घोळच असला पाहिजे असं आपण का मानतो? आपल्या जवळच्या माणसांविषयी जे वाटतं, ते सांगितलंच कधी मोजक्या शब्दातून, कृतीतून किंवा स्पर्शातून तर लगेच नातं उथळ होतं असं मानायचं कारण काय?

‘अनकही और अनसुनी’ असा एक सुंदर शब्द आहे. पण मैत्रीतही अनेक गोष्टी ‘अनकही’च राहतात. एक बोलत नाही म्हणून दुसरा ऐकत नाही. त्याला त्या कळतच नाहीत. मग गैरसमज. ‘तू मला कधी समजूनच घेत नाही. मला काय म्हणायचं होतं, तुला कधी कळलंच नाही!’ अशा शेरेबाजीतून तर वाद वाढतात. जे नातं निकोप होतं सशक्त व्हायला व्हावं ते अकारण मरगळायला लागतं. कारण, न बोलणं! न सांगणं! त्यातून अनकही कायमच अनसुनी होते आणि अनहोनीला जन्माला घालते. मनातली ही सारी अंतरं चार ओळींच्या मेसेजने साधणार असतील तर काय हा उल्लपणा असं संकुचित वृत्तीनं त्याकडे कशाला बघायचं? दिलखुलासपणे जगताना मनमोकळं बोलायलाही शिकलं तर मैत्रीची वीणा कायम झंकारेल! त्या सुरांतून आपल्या जगण्याला अर्थ येईल! वाईट याचंच की नाहीच करत आपण असं! आपल्याला वाटतं, रोजच तर भेटतो आपला मित्र. रोज तर तासभर होतं मैत्रिणीशी बोलणं. तिला कशाला करायचा एसएमएस? कशाला लिहायचं पत्र? कशाला पाठवायचा एखादा ईमेल? समजा, पाठवलाच मेल किंवा केलाच एसएमएस तर तो केवळ कामाचा नाहीतर फॉरवर्ड! पूर्वी लोक परस्परांना पत्र लिहायची, पत्रमैत्रीविषयी तर आपण बरंच काही ऐकलंय. आयुष्यात केवळ एकदाच भेटलेले यांच्यासारखी पत्रमैत्री आजच्या काळात होण्याची कल्पना तरी करवते आपल्याला? कारण कोणाशी काही तरी शांतपणे शेअर करावं, बोलावं, मनातलं सांगावं असं वाटण्याची प्रक्रिया आपल्याही नकळत थांबते. आपण बोलतो, पण त्यात शेअरिंग नाही अशी तक्रारही स्वतर्‍च करतो! आपले हात चुकून कधी नाही चालत की-बोर्डवर. नाहीच घेत आपण पेन हातात पत्र लिहायला. आपली सारी भिस्त या फॉरवर्ड्सवर. आपण अजून फॉरवर्ड्सला कंटाळलो नाही. त्यातला आशय किमान आपल्यार्पयत पोहोचतोय, हे काय कमी आहे?