शहरं
Join us  
Trending Stories
1
World Boxing Championship: भारताच्या लेकीचा 'गोल्डन पंच' ! जास्मिन लंबोरियाने बॉक्सिंग चॅम्पियनशिपमध्ये जिंकलं सुवर्ण
2
आजचे राशीभविष्य- १४ सप्टेंबर २०२५: आजचा दिवस फायद्याने भरलेला, पण हितशत्रूंपासून सावध राहा
3
"तुम्हाला काय वाटतं याला काही महत्त्व नसतं..."; IND vs PAK सामन्यावर सुनील गावसकरांचे मत
4
लंडनमध्ये १ लाखाहून अधिक स्थलांतर विरोधी आंदोलक रस्त्यावर उतरले, अनेक पोलिसांवर हल्ला
5
मतपेढीच्या राजकारणामुळे ईशान्य भारताचे मोठे नुकसान : पंतप्रधान मोदी
6
पोलिसांच्या ८ तासांच्या ड्युटीचे काय झाले? मनुष्यबळ वाढल्यास ८ तासांची ड्युटी शक्य
7
तुम्ही आता मागास झालात, आपआपसात विवाह ठरवूया; प्रा. लक्ष्मण हाके यांचा मनोज जरांगे यांना प्रस्ताव
8
अंगात 'सिंदूर' नव्हे तर खरी देशभक्ती भिनली पाहिजे; उद्धव ठाकरे यांची भाजपवर टीका
9
'एआय'मुळे खासगी आयुष्य धोक्यात! चेहऱ्यांचे बनावट फोटो, खोटे आवाज, सही याचा गैरवापर
10
आशिया चषकात दुबईच्या मैदानावर आज भारत-पाकिस्तान हायव्होल्टेज द्वंद्व
11
सर्व्हर डाऊनमुळे शेकडोंची 'स्टाफ सिलेक्शन' परीक्षा हुकली; केंद्रावर झाला गोंधळ : पोलिसांना केले पाचारण
12
तुम्हीही शौचालयात मोबाइल घेऊन जाता का?
13
एसईबीसी आरक्षणावर काय परिणाम होईल? मराठा आरक्षणावरील नव्या जीआरबाबत हायकोर्टाची राज्य सरकारला विचारणा
14
कोर्टाचे वारंवार निर्देश म्हणजे आमच्या अधिकारांवर गदा; निवडणूक आयोग म्हणाले, एसआयआर विशेषाधिकार
15
नवरात्रीत लवकर देवीदर्शन हवंय, दामदुप्पट मोजा; मंदिर प्रशासनाने केली शुल्कात वाढ
16
हिंसाचार सोडा, शांतीचा मार्ग स्वीकारा; मणिपूरला शांततेचे प्रतीक बनवू ; पंतप्रधान नरेंद्र मोदी यांचे आवाहन
17
अमेरिकेनं ओसामा संपवला, पण त्याच्या बायकांचं काय झालं? पाकिस्तानच्या माजी राष्ट्रपतीच्या सहकाऱ्यानं सागितलं
18
IND vs PAK: गंभीरनं टीम इंडियातील खेळाडूंना स्पष्ट सांगितलंय की...; सहाय्यक कोच नेमकं काय म्हणाले?
19
याला म्हणतात 'दृढनिश्चय'...! मणिपूरमध्ये पाऊस बनला अडथळा, मग पंतप्रधान मोदींनी 'हा' मार्ग अवलंबला! 
20
Asia Cup 2025 Points Table : भारत-पाक लढतीआधी लंकेची विजयी सलामी! तरीही अफगाणिस्तान ठरले भारी!

जरा मन आवरायला घेऊ

By admin | Updated: November 5, 2015 21:38 IST

बोलू मनापासून आपल्या जिवाभावाच्या माणसांशी. एफबी आणि व्हॉट्सअॅपवर उधानउसनवारीच्या स्मायली नकोत. खांद्यावर डोकं ठेवून प्रत्यक्ष बोलू काय ते सांगून मोकळे होऊ.

 

- चिन्मय लेले
बोलू मनापासून 
आपल्या जिवाभावाच्या माणसांशी.
एफबी आणि व्हॉट्सअॅपवर
उधानउसनवारीच्या स्मायली नकोत.
खांद्यावर डोकं ठेवून प्रत्यक्ष बोलू
काय ते सांगून मोकळे होऊ.
राग-संताप असेल तर तो सांगू.
प्रेम असेल तर तेही सांगू.
पण जरा बोलूच.
एकदा!
ॅकिती तो मनावर ताण?
किती तो वैताग?
खरं तर हाताशी आहे सारं?
शेअरिंग करणं तर फार सोपं!
वाटलं बोलून टाकावं?
सांगावं अगदी मनातलं, 
सलणारं, डाचणारं, रुतणारं नि काचणारं.
कुणालाही.
अगदी ओळखपाळख नसणा:यांनाही.
पण ते सांगून तरी कुठं मोकळं वाटतं?
बोलावंसं आताशा कुठं कुणी भेटतं?
का बरं असं मनातलं अंधारलं आकाश
आपल्यालाच छळतं.
काहूर करत राहतं?
***
तशी आहेतच की 
माणसं आपल्या अवतीभोवती.
किती ग्रुप्स नि किती फ्रेण्ड्स.
किती भावनांची आयती चिन्हं,
किती चेह:यांच्या वेगवेगळ्या भावना.
मग एवढं सारं असूनही
आपण व्यक्त कसे होत नाही.
मनावरचं ओझं उतरवून का ठेवत नाही?
आणि दुस:या कुणाच्या मनावरचा बोजा
आपल्यालाही चुकून कसा जाणवत नाही.
आपलंच आपल्यात असं काय आहे
जे मिट्टं अंधारात चाचपडत ठेवतंय.
छळतंय.
रडवतंय.
आतल्या आत.
***
या दिवाळीत सारं घर 
झाडूनपुसून लख्खं केलं.
माळे काढले.
नकोशा वस्तू काढून टाकल्या.
काहीत रुतल्या होत्या आठवणी.
त्या हातात धरून पाहिल्या.
पण नको आता ही अडगळ, 
काय उपयोग म्हणून सरळ
भंगारमधे दिल्या.
जुने कपडे,
मोडकी भांडी,
तुटक्या खुच्र्या,
विरले पडदे,
फाटके अभ्रे.
नकोत आता असं बजावलंत
ना स्वत:ला.
आणि ते बाहेर काढून 
जरा मोकळी केली जागा.
सांगितलं आणि
नवीन काही घेऊ तेव्हा घेऊ पण
आता जुन्याची अडगळ नको.
पसारा नको.
आणि हा हावरटपणाही नको.
नाही नाही ते जमवण्याचा.
त्यानंतर कसं सारं स्वच्छ,
मोकळं. आणि सुटं झालं.
***
हे असं सारं या दिवाळीत आपल्या
मनाचंही केलं तर?
मनातली अशी अडगळ.
कधीचे सायडिंगला पडलेले माळे.
त्या माळ्यावर टाकून दिलेल्या आठवणी,
त्यातले काच.
संताप.
चिडचिड.
आणि काही मनभर पसरलेला पसारा.
त्यावर बसलेली धूळ
अस्ताव्यस्त भावनांचे तुकडे
नकोशा आठवणी
द्वेष.
असूया.
जिव्हारी लागलेले अपमान.
बदल्याची भावना.
सुडाची आग.
हे सारं आपण काढून टाकू शकू
मनातून या दिवाळीला?
मोकळी करू जरा जागा
नव्या आनंदासाठी?
***
जुनाच पसारा तसाच ठेवला तर
नव्या गोष्टींना जागा कशी व्हायची?
नव्या माणसांना प्रवेश कसा मिळायचा?
आणि आपल्याला तरी हलकं,
फ्रेश, ताजतवानं कसं वाटायचं?
***
म्हणून वाटतंय  की,
या दिवाळीत एवढं करूच.
जरा मन आवरायला घेऊ.
अडगळ काढून टाकू.
रडून घेऊ वाटलं तर
म्हणजे त्या पाण्यात स्वच्छ होतील
काही आठवणी.
बोलू मनापासून 
आपल्या जिवाभावाच्या माणसांशी.
एफबी आणि व्हॉट्सअॅपवर
उधानउसनवारीच्या स्मायली नको.
प्रत्यक्ष बोलू,.
खांद्यावर डोकं ठेवून.
काय ते सांगून मोकळे होऊ.
राग-संताप असेल तर तो सांगू.
प्रेम असेल तर तेही सांगू.
पण जरा बोलूच.
***
कशाला उगीच जिवाला जाळायचं?
कशाला काजळी धरून द्यायची मनावर?
कशाला हवी उदास मेणचट वतरुळं?
आणि कशाला उगीच धरून बसायच्या
छोटछोटय़ा गोष्टी?
या दिवाळीत विचारू ना हे प्रश्न स्वत:ला?
आणि लख्खं उजळवून टाकू मन.
आपलंच. 
आपल्यासाठी!
आपणच!
***
जमेल का?
का नाही?
एक दिवा जर सारा अंधार उजळवतो
तर तसाच एक सुंदर प्रकाशाचा किरण
आपल्या मनाला का उजळवणार नाही?
 -उजळेलच की!
त्या ‘उजाल्याचीच’ खरी गरज आहे!!