शहरं
Join us  
Trending Stories
1
ऑपरेशन सिंदूर' दहशतवादाविरुद्धच्या लढाईत एक उदाहरण निर्माण करेल : राष्ट्रपती द्रौपदी मुर्मू
2
आम्ही रशियन तेल खरेदी करणे थांबवलेले नाही, जे फायदेशीर असेल ते आम्ही करू; भारतीय कंपन्यांनी स्पष्टच सांगितले
3
Kishtwar Cloud Burst Photos: मृत्यूचं तांडव... जीवलगांचा आक्रोश; जिवंत माणसं गाडली, 52 मृतदेह सापडले, 200 बेपत्ता
4
धनंजय मुंडेकडून १० हजार रुपये वसूल करण्याचे खंडपीठाचे आदेश; नेमके कारण काय?
5
हॉटेलच्या रुममध्ये सापडला महिला आणि पुरुषाचा मृतदेह; पोलिसांनी दरवाजा तोडला धक्काच बसला
6
जजच्या परीक्षेची तयारी करणारी युवती चालत्या ट्रेनमधून गायब; ७ दिवस सुगावा नाही, ५ थेअरी समोर आल्या
7
मैत्रिणीने पार्टीला बोलावलं आणि दारूमध्ये मिसळले ड्रग्ज; तरुणीवर सामूहिक बलात्कार करून बनवले व्हिडीओ
8
Aadhaar Card : खुशखबर! ई-आधार अ‍ॅपवरुन घरबसल्या काही मिनिटांत नाव, पत्ता, मोबाईल नंबर अपडेट करता येणार
9
वाहनधारकांना मोठा दिलासा! हाय सिक्युरिटी नंबर प्लेट लावण्यास 'या' तारखेपर्यंत मुदतवाढ
10
'ट्रम्प यांनी टॅरिफवर चर्चा करण्यासाठी बोलावले, पण नोबेलबद्दल बोलायला लागले'; नॉर्वेजियन वृत्तपत्राने डोनाल्ड ट्रम्प यांचा पर्दाफाश केला
11
'मी फक्त मटण हंडीचं आमंत्रण स्वीकारतो'; दहीहंडीच्या मुद्द्यावर राज ठाकरेंचं उत्तर, काय घडलं?
12
मोठी बातमी! सोमनाथ सूर्यवंशी मृत्यू प्रकरणात खंडपीठाचे एसआयटी स्थापन करण्याचे आदेश
13
ही घरे नाहीत तर पुढच्या पिढ्यांसाठी ‘सोन्यासारखी’ गुंतवणूक; CM देवेंद्र फडणवीसांचा BDD वासियांना सल्ला
14
"जबान संभालें, वरना...!"; पाकिस्तानच्या चिथावणीखोर वक्तव्यांवर भारताचं चोख प्रत्युत्तर
15
दिल्ली, बीजिंग आणि मॉस्कोच्या लागोपाठ बैठका; काय आहे पंतप्रधान मोदींची SCO रणनीती?
16
Vir Chakra: दहशतवाद्यांचे अड्डे उद्ध्वस्त करणाऱ्या फाइटर पायलट्सना 'वीर चक्र'! कोण आहेत ते नऊ जवान?
17
ढगफुटीनंतर किश्तवाडमध्ये मृत्यूचं तांडव, आतापर्यंत ३३ जणांचा मृत्यू, १२० हून अधिक जखमी, २०० जण बेपत्ता
18
आमदार पतीची हत्या, पुढे 3 वेळा जिंकली निवडणूक; आता सपाने केली हकालपट्टी, कोण आहे पूजा पाल?
19
India-Pakistan Tension : '...तर तुम्हाला सोसणार नाही', पाकिस्तानच्या धमकीला भारताने फटकारले
20
सावत्र आईबरोबर मुलगा करत होता अश्लील चाळे, नेमकं त्याच वेळी बापाने पाहिलं अन् मग...

मेंदूला काम द्या!

By admin | Updated: July 14, 2016 23:02 IST

सकाळी उठल्यापासून रात्नी झोपेर्पयत बहुतेक माणसं ही स्वत:साठीच जगत असतात. पण तरीही ते स्वत:साठी जगणं नसतंच.

- डॉ. श्रुती पानसे
 
( लेखिका मेंदू आणि शिक्षण या विषयातील संशोधिका आहेत)
 
 
अनेकांना एकतर खूप रिकामपण येतं,
काय करावं सुचत नाही,
सांगकाम्यासारखं इतर जे सांगतील
ते करत राहायचं,
आणि मग तक्रारी करायच्या की,
माङया मनासारखं काहीच घडत नाही.
असं का होतं?
 
 
कॉम्प्युटरचं नेमकं प्रोग्रॅमिंग करतात,
तसं आपण आपल्या मेंदूचंही करू शकतो,
आणि आपलं जगणंही बदलवू शकतो!
 
सकाळी उठल्यापासून रात्नी झोपेर्पयत बहुतेक माणसं ही स्वत:साठीच जगत असतात. 
पण तरीही ते स्वत:साठी जगणं नसतंच. 
स्वत:चं आरोग्य, स्वत:चा सन्मान, स्वत:साठी बौद्धिक खुराक, स्वत:साठी कलेचा आस्वाद अशा गोष्टींमुळे मनाला निश्चितपणो नवी उमेद मिळते. जगाकडे बघण्याचा दृष्टिकोन ताजा होतो. नवी, अधिक अवघड, अधिक आव्हानात्मक कामं करण्याकडे कल वाढतो. स्वत:वरचा विश्वास वाढीला लागतो. थोडक्यात, काय तर आपण ‘सुधारतो’!!
पण हे सारं आपण करतो का?
तर अनेकदा नाही.
आपलं जे काय वाईट होतं, बिनसतं त्यासाठी आपण इतरांनाच दोष देतो. इतरांनीच बदलायला पाहिजे, असं म्हणतो.
पण परिस्थिती दुस:यानं बदलून बदलत नाही, त्यासाठी आपण स्वत:ला बदललं पाहिजे!
स्वत:ला बदलायचं ते कसं?
त्यासाठी चार गोष्टींकडे लक्ष देण्याची गरज आहे. 
मी, माझं घर, माझं शिक्षण/नोकरी/ व्यवसाय आणि माझा परिसर या चार गोष्टीत आपणच बदल करू शकतो.
हा बदल हेच आपलं जीवन अधिक आनंदी करण्याचा एक मार्ग आहे.
 
 
मी
1) मी, नियमित व्यायाम करायला हवा. रोज वीस-पंचवीस मिनिटं चालणं, पळणं, योगासनं हे व्हायलाच हवं.
2) रोज रात्नी झोपताना स्वत:शी बोलायला हवं. आज विशेष काय चांगलं झालं, काय चुकलं, याचा हिशेब रोज ठेवायचा. त्याचवेळेस उद्या कोणत्या चुका टाळायला हव्यात. उद्याच्या दिवसातली महत्त्वाची कामं कोणत्या प्रकारे पार पाडायला हवीत, याचं व्हिज्युअलायङोशन रोजच्या रोज व्हायला हवं. सुरुवातीला स्वत:तला हा लहानसा बदल ‘मी’ मध्ये एक सकारात्मक ऊर्जा भरतो.
 
माझं घर
1)  कोणत्याही वाईट प्रसंगात आपल्या घरातली माणसं आपल्या बरोबर असतात. काही कारणाने रागावले तरी आपलं हित बघणं, हाच त्यांचा हेतू असतो, यावर मी विश्वास ठेवीन! 
2) घरातल्या माणसांशी आपला सुसंवाद साधता यायला हवा. जेव्हा जेव्हा त्यांच्या मनाविरु द्ध पावलं उचलावी लागतील तेव्हा तुमची बाजू पूर्णपणो समजावून सांगा.
त्यांना विश्वासात घ्यायचा पूर्ण घ्या.
3) घरातल्या आपल्या माणसांची साथ आपल्याला कायम लागते. त्यांच्यावर विश्वास ठेवा आणि त्यांनाही पडत्या काळात पूर्ण मदत करा.
 
माझं शिक्षण / नोकरी / व्यवसाय
1) माझं शिक्षण हे माझं तारुण्यातलं पहिलं कर्तव्य आहे. ते व्यवस्थित पूर्ण करणं हे माझं सगळ्यात महत्त्वाचं काम आहे.
2) नोकरी/व्यवसाय करतानाही  नवी कौशल्यं, नवं ज्ञान घेण्यासाठी कधीच पूर्णविराम नसतो. सतत शिकत राहिलं पाहिजे आणि जिद्दीनं चांगलं काम करत राहिलं पाहिजे. भरपूर मेहनत, प्रयोग आणि सकारात्मक दृष्टीनंच मी माङया कामाकडे, नोकरीकडे पाहायला हवं. 
 
माझा परिसर
आपल्या परिसराला उपयोगी पडेल असा एखादा संकल्प करता येईल का, याचा विचार करा. समजा कॉलेज चालू असेल तर कॉलेजमध्ये चांगले बदल व्हावेत म्हणून काही करता येईल का? किंवा ज्या ऑफिसमध्ये जाता तिथल्या कर्मचा:यांसाठी एखादा नवा बदल करता येईल का? किंवा आपल्या कॉलेजतर्फे किंवा कंपनीतर्फे समाजासाठी एखादा उपक्रम हातात घेता येईल का? घराच्या आसपासच्या परिसराचाही यात विचार करता येईल. 
अशी एखादी गोष्ट ज्यामुळे आपल्या परिसराला, तिथल्या लोकांना, निसर्ग- पर्यावरणाला उपयोग होईल. आपला संकल्प एकटय़ानेच पूर्ण करायला हवा असं नाही. त्यात आपलं घर, मित्नमैत्रिणींनाही घ्यावं.  एखादं काम एकत्न, सगळ्यांनी मिळून करण्यात एक वेगळीच मजा असते. त्यानिमित्तानं आपण एकमेकांना भेटत राहतो. संपर्कवाढतो. या सर्वातून दुस:या कोणाला तरी मदत होणार असते. तशी आपल्यालाही मदत होणार असते.
 
तुमचं लक्ष्य काय?
 मी, माझं घर, माझं शिक्षण/नोकरी/व्यवसाय, माझा परिसर या चारही गोष्टींमधलं तुम्ही जे काही ठरवाल, ते का करताय याबद्दल तुमच्या मनात स्पष्टता असणं मात्र खूप आवश्यक आहे. 
उदा. ‘रोज का चालायचं?’ हे तुम्हाला स्पष्ट हवं. ‘आपण प्रत्येक गोष्ट घरच्या माणसांना का सांगायची’ याचं कारण तुम्हाला माहीत हवं.
तुम्ही जो उपक्रम करायचं ठरवलं आहे, तो तुमच्या नजरेसमोर स्पष्ट असावा. त्याचा हेतू स्पष्ट असावा.
आपल्याला नेमकं माहिती हवं की आपण जे करतो आहोत ते नेमकं कशासाठी करतो आहोत?
तेच नवीन शिकण्याचंही. आपल्या हातून नवीन गोष्टी  घडताहेत ना, हे वरच्यावर तपासत रहायला हवं. स्वत:ला तपासत राहा. ठरवलेल्या एखाद्या गोष्टीत जरी यश मिळालं तरी ही गोष्ट कोणाला ना कोणाला तरी अवश्य सांगा. यामुळे आपल्याला उत्साह मिळतो.
आपल्या मेंदूला आपणच ‘प्रोग्राम’ द्यायला हवा. शाळेत शिक्षकांचं ऐकायचं, घरात पालकांचं ऐकायचं आणि नोकरीत बॉसचं ऐकायचं असं  आपण जे करतो यात इतर माणसं आपलं प्रोग्रामिंग करत असतात. 
पण या चार टप्प्यातून आपण आपलं प्रोग्रामिंग करू शकतो, हे लक्षात घेण्याची गरज आहे; नव्हे ते करावंच. आणि एकदा का प्रोग्रामिंग करायचं ठरवलं तर ते चांगल्या गोष्टींचंच करावं. वाईट गोष्टी बाजूला साराव्यात. हे तर नक्कीच !
हे केलं तर आपल्या जगण्याला एक दिशा, एक नेमका हेतू, लक्ष्य आपण देऊ शकतो. त्यामुळे रिकामपण येण्याचं आणि हताश वाटण्याचं कारणही उरणार नाही.