शहरं
Join us  
Trending Stories
1
पालघर: मासेमारी करताना चुकून पाकिस्तानी हद्दीत प्रवेश केलेले नामदेव मेहेर पाकच्या ताब्यात!
2
आजचे राशीभविष्य, ०८ नोव्हेंबर २०२५: काळजी मिटेल, आनंदाची बातमी मिळेल, धनलाभ शक्य
3
नवी मुंबईत मनसेने भरवले मतदार यादीतील बाेगस नावांचे प्रदर्शन; अमित ठाकरेंच्या हस्ते उद्घाटन
4
पार्थ पवारांच्या कंपनीचा आणखी एक गैरव्यवहार; आधी जमीन घाेटाळा, मग व्यवहार रद्द
5
माझे नाव दोन मतदार याद्यांत असणे ही निवडणूक आयोगाची चूक- आमदार अस्लम शेख
6
धनंजय मुंडेंनी दिली मारण्याची सुपारी; मनोज जरांगे यांचा गंभीर आरोप; पोलिसांकडे तक्रार
7
वर्ल्ड चॅम्पियन्सचा गौरव! स्मृती, जेमिमा, राधा यादव यांना प्रत्येकी सव्वादोन कोटींचे बक्षीस
8
जिल्हा परिषद निवडणुकांची दोन आठवड्यांत घोषणा; ३० दिवसांच्या कालावधीतच पार पाडणार निवडणुका
9
नरेंद्र माेदी माझे मित्र आहेत; पुढील वर्षी मी नक्की भारतात येईन: डोनाल्ड ट्रम्प
10
मनोज जरांगे यांच्या आरोपांची सीबीआय चौकशी व्हायलाच हवी; धनंजय मुंडेंचे आरोपांना प्रत्युत्तर
11
प्रभागरचना, आरक्षणावरील निकालांच्या अधीन असेल स्थानिक संस्था निवडणूक- उच्च न्यायालय
12
धक्कादायक! ऑनलाइन क्रीम खरेदी केली, महिलेच्या शरीरावर सापासारखे व्रण; १० वर्षांत १२ लाख रुपये खर्च
13
अधिकाऱ्यांना वाचवण्याच्या नादात दोघांचा मृत्यू; सॅण्डहर्स्ट रेल्वे अपघातामध्ये मुलीचा मृत्यू; आई जखमी
14
पार्थ पवार भूखंड प्रकरणाचा व्यवहार रद्द; अजित पवार म्हणाले, "मी मुख्यमंत्री फडणवीसांना कॉल केला आणि..."
15
देशातील सर्वात मोठ्या विमानतळावर विमानांच्या उड्डाणाला ब्रेक! ATC मध्ये झाला तांत्रिक बिघाड, १००० विमानांना फटका
16
60 टक्क्यांहून अधिक मतदान म्हणजे NDA ची सत्ता परतणार; बिहारबाबत अमित शाहांचा दावा
17
"त्या एक टक्केवाल्या पाटलाला पार्थ पवारने जमीन दिली असती का?"; अजित पवारांचा उल्लेख, दानवेंची मोठी मागणी
18
धोत्रे हत्या प्रकरण: अत्यंविधीला आला आणि पोलिसांनी पकडला, स्मशानभूमीत लावला होता सापळा
19
चार नाही, दहा लाख महिना पोटगी, मोहम्मद शमीच्या पत्नीच्या मागणीवर सर्वोच्च न्यायालयाने नोटीस बजावली
20
महाराष्ट्राचा अभिमान! स्मृती, जेमिमा अन् राधाचा मुख्यमंत्री-उपमुख्यमंत्र्यांच्या हस्ते कोट्यवधींच्या बक्षीसासह सन्मान

ऑफिसला लेट जाता, मग तुमची नोकरी जाणार!

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: October 11, 2018 17:47 IST

टेस्ला या जगप्रसिद्ध कंपनीचा सध्या सर्वेसवा असलेला रिचर्ड ब्रॅन्सन म्हणतो, जो उशिरा येतो, त्याला माझ्या कंपनीत नोकरी नाही!

ठळक मुद्दे10 दिवसांचं ‘टाइमली’ व्रत ही एक सवय सोडा, आयुष्य बदलून जाईल!

गेल्याच आठवडय़ातल्या या बातमीची जगभरातल्या कार्पोरेट विश्वात मोठी चर्चा झाली. टेस्ला या सध्याच्या सगळ्यात बडय़ा, हॉट, श्रीमंत कंपनीविषयी तर तुम्ही ऐकलंच असेल. तिचा संस्थापक अ‍ॅलन मस्क सध्या कंपनीपासून दुरावलाय, पण नवीन बॉस रिचर्ड ब्रॅन्सन मोठा कठीण माणूस आहे. त्यानं अलीकडेच एका मुलाखतीत सांगून टाकलं की, माझ्या कंपनीचं नवीन धोरण आहे जो कुणी उशिरा येईल, वेळ पाळणार नाही त्याला माझ्या कंपनीत जागा नाही. त्याला सरळ नारळ देण्यात येईल. सरळ फायर करण्यात येईल.रिचर्ड ब्रॅन्सन त्याच्या मुलाखतीत सांगतो, वेळ पाळणं हे किती सोपं काम आहे; पण लोक नेहमी उशीरा येतात. मी कुठं किती वाजता पोहोचायचं यावर माझा कण्ट्रोल असला पाहिजे, तेच जमत नसेल तर तुम्ही काय दुसरं काम करणार? मुळात जो माणूस पुंअल नाही, जो वेळ पाळू शकत नाही, तो त्याच्या कामाविषयी सिरिअस नाही आणि त्याला इतरांच्या वेळेचंही काही वाटत नाही, वेळेची किंमत नाही असं मला वाटतं. त्यामुळे अशा माणसाच्या कामावरच नाही तर एकूण कंपनीच्या कामावरच त्याचा मोठा परिणाम होतो, त्यापेक्षा त्या माणसाला कामावरून काढून टाकलेलं बरं.!’केवळ वेळ पाळत नाही म्हणून कामावरून काढून टाकलं, हे तसं पचायला कठीणच आहे. मात्र न्यू यॉर्क या भयंकर ट्राफिक असलेल्या शहरातही ब्रॅन्सन स्वतर्‍ कधी कुठेच उशिरा पोहोचत नाही, त्यामुळे नेहमीची कारणं त्याच्यापुढे चालत नाही. हे कमीच म्हणून त्यानं अलीकडे कंपनीची पॉलिसीच बदलून टाकली.काय बदललं?त्यानं ठरवलं की, आता कंपनी पॉलिसीप्रमाणं येण्याजाण्याच्या वेळेचं साप्ताहिक ऑडिट होईल. कोण कितीदा उशिरा आलं, कोण लवकर गेलं याचा हिशेब थेट यंत्रणाच ठेवेल. आणि एक मिनिट उशिरा येणं किंवा लवकर जाणं हे वारंवार घडलं तर थेट नोकरीवरून हकालपट्टी. एकच मिनिट उशीर झाला वगैरे बोलायला काही जागाच नाही. टेस्लानं अलीकडे काढलेल्या 40 टक्के मॅनेजरला पुंअल नाही असं रेकॉर्ड दाखवून काढल्याचंही नुकतंच प्रसिद्ध झालं आहे.तर नमनाला एवढा घडाभर तेल वाहिलं तर त्याचं मर्म एकच.वेळ पाळणं आपण शिकलं पाहिजे.आणि ते शिकलं नाही तर नवीन काळात आपल्याला नोकरी मिळणं तर सोडाच टिकणंही अवघड होईल!त्यामुळे या नवरात्रात निदान नऊ दिवस तरी आपण हे व्रत करून पाहू.दसरा होईर्पयत तरी रोज नियमित, ठरल्या वेळेत आपल्या कॉलेजला, ऑफिसला जाऊ!वेळ पाळू!वेळेच्या पुढे ना सही, टाइम के साथ तो चल ही सकते है.ते नाही जमलं, तर काळ आपल्यापुढे निघून गेलेला असेल!वेळ आहे, तोवर करून पाहू.!