दिवाळीत ‘ग्लो’ हवा म्हणून
पार्लर गाठायची गरजच काय?
आपलं किचन आहे ना,
तिकडे गेलं तर
फुकटात तजेला मिळू शकतो!
घरच्या घरी करण्याच्या नऊ गोष्टी,
ज्या दिवाळीची चमक चेह:यावर सहज आणतील!
- श्रवणी बॅनर्जी
दिवाळी आता उद्यापासूनच..
लक्ष्मीपूजन आणि पाडवा हे मुख्य दिवस मात्र अजून चार-पाच दिवस दूर आहेत..
खरं तर हा सणच चांगलंचुंगलं खाण्याचा. मस्त नटण्यामुरडण्याचा. शरीराचे लाड करत, जिभेचे चोचले पुरवण्याचा ! मस्त दणकून खायचं, अंगाला तेल लावून मस्त ताकद कमवण्यासाठी प्रय} करायचे आणि मित्रमैत्रिणी, नातेवाइकांना भेटत आनंद वाटून घ्यायचा.
त्यामुळे दिवाळीत चांगलं दिसणं, स्वत:कडे लक्ष देणं, तब्येतीची काळजी घेणं हे सारं अपेक्षित आहेच.
मात्र आरोग्य हा विषय बाजूला ठेवून नुस्तं दिसणंच आता सुरू झालं.
तेही पार्लरमध्ये जाऊन, आणि सगळ्यांचे चेहरे एकाच रंगात रंगवल्यासारखे रंगवून!
म्हणून तर दिवाळीच्या या सिझनसाठी खास ‘तयार’ होण्याचा ट्रेण्ड आता चांगलाच रुळलाय..
मोठमोठी पार्लर्स या काळात गर्दीनं खच्चून भरलेली असतात. ब्यूटी पॅकेजेस देतात.
आणि त्या गर्दीत ऐन सणावाराचे महत्त्वाचे दिवस ब:याच मुली (आणि आता तर मुलंही) पार्लरमध्ये घालवतात.
फेशियल आणि क्लिनअप याकाळात मुख्यत: केलं जातं.
मात्र काही हजार रुपये खर्च करून अपेक्षित ग्लो लगेच मिळतोच असं नाही.
आणि मुख्य म्हणजे इतकी गर्दी असते त्या पार्लरमध्ये की अनेकदा दणादण सारं उरकलं जातं.
मग ऐन सणावाराच्या दिवशीच पार्लर गाठण्यापेक्षा आपण घरच्या घरीच काही गोष्टी केल्या तर पार्लरसे बेहतर ग्लो मिळू शकतो.
्रआणि तोही स्वस्तात किंवा अलमोस्ट फुकट ! पुन्हा साइड इफेक्ट नाही आणि नुस्तं सौंदर्यवर्धन होण्यासोबत आरोग्यही जरा सुधारेल..
असं खरंच होऊ शकतं?
त्यासाठीच या काही घरगुती ब्यूटी टीप्स.
फक्त या नऊ गोष्टी करून पहा.
तुमचा चेहरा ग्लो तर करेल आणि वेळही वाचेल!
1) खरं तर अगदी सोपंय. सकाळी घरी जे ताजं दूध येतं, निरसं ते तसंच म्हणजे न तापवता चेह:याला लावायचं. कापसाचा बोळा घेऊन चेहरा आणि मानेला लावायचं.
ैआणि पंधरा-वीस मिण्टानी धुवून टाकायचं. झालं क्लिन्ङिांग. विकतचे क्लिन्झर न वापरताही चेहरा स्वच्छ होईल आणि सगळा स्कीन टोनही एकसारखा होईल. मुख्य म्हणजे हा उपक्रम रोज करायचा.
2) अंघोळ करताना मसूर डाळीचं पीठ ज्येष्ठमधाची पावडर घालून चेह:याला लावायचं. हे मिश्रण तुम्ही पॅक म्हणूनही वापरू शकता. त्यामुळेही चेहरा सतेज होईल.
3) तुमची त्वचा ऑईली असेल तर एक टमाटा घ्या. तो चेहरा आणि मानेला चोळा. त्यानंतर पंधरा-वीस मिण्टानी धुवून टाका.
4) त्वचा खूप कोरडी असेल तर एक चांगलं पिकलेलं केळ घ्या. ते चांगलं मॅश करा आणि त्यात मध कालवून ते मिश्रण चेह:याला लावा. पंधरा मिण्टांनी धुवून टाका.
5) जर एवढाही वेळ नसेल तर चेह:याला फक्त मध लावा. आणि ते सुकलं की धुवून टाका.
6) बटाटा मिक्सरमधून काढा आणि ती पेस्ट चेह:याला, मानेला लावा.
7) बदामाची पेस्ट करा आणि ती चेह:याला लावा. किंवा पपईचा गर आणि बदामाची पेस्ट यांचा पॅक चेह:याला लावा.
8) दिवाळीत अभ्यंगाचं महत्त्व खूप असतं. मस्त तेल लावून आंघोळी होतात. त्यामुळे या काळात रोज चांगला मसाज करून तेल लावा. व्यायाम करा. आणि मग मस्त गरम पाण्यानं आंघोळ. थकवा गायब आणि तजेला इन होणारच !
9) सगळ्यात महत्त्वाचं या काळात पाणी भरपूर प्या. एकतर थंडी सुरू होत असते आणि दुसरं म्हणजे तेलकट खाणं जास्त होतं. त्यामुळे भरपूर पाणी प्या.