वजनानं पीडलेल्या, स्ट्रेसने मरगळलेल्यातरुण जगण्यात एक नाचरी झुळूक..झुंबा!मात्र केवळ क्रेझपायी झुंबा करणाऱ्यांच्या वाट्यालात्याचा आनंद येईल का?साउथचा सुपरस्टार ‘चिरंजिवी’.वय वर्षे फक्त ६०, मात्र आजही जवां दिलों की धडकन!त्याच्या डान्सचे आणि फायटिंगशायटिंगचे तरुण चाहते पुरते दिवाने आहेत.पण अलीकडेच चिरंजिवीचा एक अपघात झाला नी खांद्याला दुखापत झाली..त्या दुखापतीतून सावरण्यासाठी त्यानं ‘झुंबा’ क्लास लावला आणि तो सावरलाही त्यातून चटकन!कुणी म्हणे, त्याला मुळातच उत्तम नाचता येतं, त्यानं झुंबा केलं तर त्यात काय विशेष?पण त्यात विशेष काय हे त्याच्या तरुण चाहत्यांना बरोबर माहिती होतं. साठाव्या वर्षी फिटनेसचं वेड आणि त्यासाठी झुंबा हे कॉम्बिनेशन अनेकांना डेडली वाटलं. आणि लगे हाथ तिकडच्या काही तरुण मुलामुलींनी झुंबा क्लास लावूनही टाकला अशी चर्चा सुरू झाली..हे झालं एक उदाहरण. पण सध्या जगभरात अनेक तरुणतरुणींच्या ‘टू डू लिस्ट’मध्ये प्रायॉरिटीनं करायच्या कामाच्या यादीत ‘झुंबा’ लिहिलेलं असतं! आकडेवारी सांगते की, जगभरात आठवड्याचा एक तास साधारण एक कोटी, पन्नास लाख तरुण मुलंमुली झुंबा करतात. आणि दर तासाला साधारण ६०० ते १००० कॅलरी जाळतात.एकाच वेळी रस्त्यावर झुंबा करण्याचं गिनीज रेकॉर्ड मागच्याच वर्षी फिलिपिन्सच्या तरुण मुलामुलींनी केलं. १२,९७५ तरुणतरुणींनी एकाच वेळी रस्त्यात झुंबा केला. मुद्दा काय, झुंबा हा सध्या तरुण जगण्याच्या क्रेझचा विषय बनतो आहे. म्हणून तर जागोजागी झुंबा-थॉन आयोजित होऊ लागले आहेत. आणि कार्पोरेटवाले आपल्या कर्मचाऱ्यांचा स्ट्रेस कमी व्हावा म्हणून त्यांच्यासाठी झुंबा क्लासेस आयोजित करत आहेत.आणि या नव्या जगाची परिभाषा सगळ्यांना सांगते आहे की, ‘कीप काल्म अॅण्ड झुंबा’!म्हणजेच शांत राहा, आनंदी राहा, झुंबा करा!साऊथ आफ्रिकेतून आलेलं हे नृत्य+ एरोबिक्सचं एक रूप जगभरात तरुणांना ओढ लावतंय!आणि हे सारं आपल्याकडेही अपवाद नाही! मोठ्या शहरातच कशाला, लहानग्या शहरातही झुंबा क्लासेस सुरू होत आहेत, आणि तिथं गर्दी वाढतेय!मात्र अर्धवट माहिती, उत्तम प्रशिक्षकाचा अभाव, निव्वळ क्रेझ, चलता है अॅप्रोच यामुळे झुंबाचे फायदे होण्यापेक्षा त्याचे तोटेच अनेकांच्या वाट्याला येत आहेत.म्हणून यंदा उन्हाळ्याच्या सुट्यांत तुम्ही झुंबा करणार असाल,तर हाताशी हवी अशी माहिती,वाचा, पान ४-५ वरझुंबा- आॅक्सिजन टीम
Keep Calm & Zumba
By admin | Updated: March 17, 2016 22:23 IST