शहरं
Join us  
Trending Stories
1
Video: मोठी बातमी! दिल्लीत लाल किल्ल्याजवळ भीषण स्फोट, 8 जणांचा मृत्यू, अनेक गंभीर जखमी
2
'त्या' जमीन गैरव्यवहार प्रकरणात पार्थ पवार, शीतल तेजवानींना पोलिसांकडून क्लीन चिट
3
भयानक कोसळणार ...! मी १९७१ पासून सोने खरेदी करतोय, पण...; रॉबर्ट कियोसाकी यांच्या दाव्याने खळबळ 
4
भारताच्या शेजारी देशांत भरतो 'नवरीचा बाजार', खरेदी करण्यासाठी चीनमधून येतात लोक! काय आहे प्रकार?
5
राष्ट्रवादीने हटवले तरी रुपाली ठोंबरे पाटील 'प्रवक्त्या'च; पोस्ट करत म्हणाल्या, 'अजित पवारांना भेटून...'
6
ताजमहालसमोर साखरपुडा...! दोनवेळा ऑस्ट्रेलियाला वर्ल्डकप जिंकविणारी भारताची सून होणार; कोण आहे ती...
7
अभिनेते धर्मेंद्र व्हेंटिलेटरवर? आयसीयूत सुरु आहेत उपचार; टीमने दिली हेल्थ अपडेट, म्हणाले...
8
"मी तुझ्या बापाला मारलं, मृतदेह सुटकेसमध्ये..."; बायकोने नवऱ्याला संपवलं, लेकीला केला फोन
9
Honeymoon Destinations : गुलाबी थंडीत रोमँटिक हनिमून प्लॅन करताय? भारतातील 'ही' ठिकाणं ठरतील बेस्ट!
10
"पंक्चर बनवणारे येऊन...!", बिहारमध्ये योगी आदित्यनाथांची तुफान बॅटिंग; विरोधकांवर थेट हल्लाबोल
11
"जबरदस्तीनं मिठीत घ्यायचा, शारीरिक जवळीक साधायचा, अन्..."; महिला क्रिकेटरच्या आरोपांनी खळबळ
12
धर्मेंद्र यांच्या तब्येतीबद्दल कळताच हेमा मालिनी रुग्णालयात पोहोचल्या, म्हणाल्या, "आम्ही सगळेच..."
13
मुंबईत काँग्रेस स्वबळावर लढणार तर उद्धव ठाकरेंसोबत युतीआधीच मनसेने 'इतक्या' जागांची केली तयारी
14
'या' मुस्लिम देशाची अमेरिकेशी वाढतेय जवळीक! ब्लॅकलिस्टमधून बाहेर पडताच, ८० वर्षांनी अमेरिकेत एन्ट्री
15
'मुख्यमंत्री माझी लाडकी बहीण' योजना बंद होणार? एकनाथ शिंदेंकडून मोठी घोषणा, e-KYC देखील...
16
धक्कादायक! बाथरूममध्ये आंघोळीसाठी गेली, पण तासभर बाहेरच नाही आली; दरवाजा तोडला तर...
17
ब्युटी आणि फॅशन क्षेत्रातील 'हा' शेअर्स ५२ आठवड्यांच्या उच्चांकाजवळ, वर्षात ५७% रिटर्न, अजूनही संधी?
18
२ डॉक्टर अन् मशिदीच्या इमामासह ७ जणांना अटक, 'व्हाइट कॉलर' दहशतवाद्यांचा पर्दाफाश, पोलिसांनी केले धक्कादायक खुलासे
19
कर्मानेच अडकले! करायला गेला एक अन्.. दहशतवादी अकील आणि मुजम्मिल यांचा 'असा' झाला पर्दाफाश!
20
Jalgaon Accident: कार दुभाजकावर धडकून पेटली, पत्नीचा होरपळून मृत्यू, पती गंभीर जखमी 

कौन बनेगा सिकंदर?

By admin | Updated: April 4, 2017 17:37 IST

आयपीएलच्या दहाव्या सत्राचा थरारा उद्या दि. पाच एप्रिलपासून सुरू होईल. या सत्राचं पहिलं युद्धच ‘फायनल’पासून सुरू होईल. आयपीएलमधील प्रत्येकच लढत ‘फायनल’सारखी

- मैदानाबाहेरच्या डझनभर दिग्गजांची जागा कोण घेणार?आयपीएलच्या दहाव्या सत्राचा थरारा उद्या दि. पाच एप्रिलपासून सुरू होईल. या सत्राचं पहिलं युद्धच ‘फायनल’पासून सुरू होईल. आयपीएलमधील प्रत्येकच लढत ‘फायनल’सारखी असते किंवा लढावी लागते, हे तर खरंच, पण गेल्या वर्षीच्या फायनलमध्ये जे दोन संघ आमनेसामने होते, त्याच दोन संघातील लढतींपासून आयपीएलच्या या हंगामाला सुरुवात होईल.हे दोन संघ आहेत गतवेळचा विजेता सनरायझर्स हैदराबाद आणि रॉयल चॅलेंजर्स बेगलुरु.पाच एप्रिलपासून सुरू होणारा हा रणसंग्राम थेट २१ मेपर्यंत चालेल. दीड महिन्यापेक्षाही अधिक काळ आणि तब्बल साठ अटीतटीच्या लढती या महासंग्रामात पाहायला मिळतील. यावेळच्या आयपीएलचा विजेता कोण असेल याबाबात सामने सुरू होण्याच्या आधीच सट्टेबाजीला सुरूवात झाली असली तरी यावेळच्या विजेत्याचा अंदाज करणं मात्र फारच कठीण आहे.याचं कारण म्हरजे सर्वच संघातील अतिरथी महारथी समजले जाणारे खेळाडू यावेळी आयपीएलमध्ये खेळताना दिसणार नाहीत. शक्यता अशी आहे की, यातील काही खेळाडू संपूर्ण आयपीएलमध्ये एकही सामना खेळू शकणार नाही, तर काही हेवीवेट खेळाडू किमान सुरुवातीच्या सामन्यांमध्ये तरी खेळू शकणार नाहीत. कारण अनेक आहेत, काही जण जखमी आहेत, तर काहींना आपल्या देशाकडून खेळण्याची सक्ती आहे.विराट कोहली, केएल राहूल, एबी डिव्हिलिअर्स, लसीथ मलिंगा, असेला गुणरत्ने, क्विंटन डीकॉक, जेपी ड्युमिनी, आर. अश्विन, मिशेल मार्श, मुरली विजय, उमेश यादव, रवींद्र जडेजा, मुस्तफिजूर रहमान.. अशी किती नावं घ्यायची?आॅस्ट्रेलियाविरुद्ध नुकत्याच झालेल्या कसोटी सामन्यांत विराट कोहली आणि आॅस्ट्रेलियन कर्णधार स्टीव स्मिथ यांच्यातलं मैदानावरचं आणि मैदानाबाहेरचं युद्ध चांगलंच गाजलं. हाच स्मिथ आता आयपीएलमध्ये पुण्याच्या संघाचं सारथ्य करतोय.आॅस्ट्रेलियाविरुद्धच्या मालिकेत विराट कोहलीला खांद्याच्या दुखापतीनं सतावलं आणि त्याला मालिकेतून बाहेर व्हावं लागलं. याच दुखापतीमुळे आता तो आयपीएलच्या सुरुवातीच्या काही सामन्यांनाही मुकणार आहे. त्याचवेळी त्याच्याच संघातलं दुसरं वादळ एबी डिव्हिलिअर्सही सुरुवातीचे काही सामने खेळू शकणार नाही अशी शक्यता आहे. उद्या सनरायझर्स हैदराबाद बरोबर तो मैदानात उतरू शकतो की नाही याकडे सगळ्यांचे डोळे लागले आहेत. उद्याच्या सामन्यात जर तो खेळू शकला, तर आरसीबीच्या डोक्यावरचं मोठं ओझं उतरले. कारण आरसीबीचा आणखी एक स्टार खेळाडू के. एल. राहूल तर खांद्याच्या दुखापतीमुळे संपूर्ण आयपीएलमधूनच बाहेर गेला आहे. त्यालाही आॅस्ट्रेलियाविरुद्धच्या कसोटी मालिकेत दुखापतीला सामोरे जावे लागले होते. आजही संभाव्य विजेत्यांमध्ये आरसीबीचा संघ हेवीवेट असला तरी तीन मोठे धक्के ते कसे पचवू शकतात याकडे सगळ्यांचं लक्ष आहे. जे खेळाडू सध्याच्या आयपीएलमधून बाहेर आहेत किंवा काही काळ त्यांना मैदानापासून दूर राहावं लागणार आहे, त्या साऱ्यांनीच मैदान गाजवलं आहे आणि एकहाती सामना फिरवण्याची ताकद त्यांच्यात आहे. अर्थात टीट्वेंटी सामन्यांत त्या दिवशी कोण चांगलं खेळतं त्यावरच सामन्याचा निकाल अवलंबून असतो. जो जिता वही सिकंदर! त्यामुळे या सामन्यांचा अंदाज कोणीही लावू शकत नाही. नाहीतर आयपीएलच्या पहिल्या सत्रात अजिंक्यपद मिळवणाऱ्या आणि सर्वात कमकुवत समजल्या जाणाऱ्या राजस्थान संघानं अजिंक्यपद मिळवलं नसतं.असे अनेक झटके यंदाही पचवावे लागणार आहेत आणि अनपेक्षित निकालानं आश्चर्यचकितही व्हावं लागणार आहे.जे खेळाडू आज मैदान गाजवताहेत त्यातील अनेक आयपीएलचेच फाइंड आहेत हेही खरं. त्यामुळे कोहलीपासून तर अश्विनपर्यंत अनेक खेळाडू आयपीएलच्या मैदानाबाहेर असले तरी त्यांची जागा दुसरे खेळाडू घेतील आणि क्रिकेटच्या क्षीतिजावर त्यांचा नव्यानं उदय होईल याचीही मोठी शक्यता आहेच. अनेक नवख्या खेळाडूंना घेऊन दिग्गजांना धक्का देण्याचं तंत्रही काही संघांनी आखलं आहे. या आयपीएलमध्ये चक्क अफगाणिस्तानच्या दोन खेळाडूंची वर्णी लागली आहे हेही आयपीएलच्या अनिश्चिततेचंच एक प्रतीक!या रणसंग्रामाला उद्यापासून सुरुवात तर होते आहे, बघू या कोण बाजी मारतं ते..

- प्रतिनिधी