शहरं
Join us  
Trending Stories
1
राज्यसभेत भाजपाचं 'शतक' पार! ३ वर्षांनी पुन्हा गाठली शंभरी; 'असा' रेकॉर्ड करणारा दुसरा पक्ष ठरला
2
अबब! मंदिराला मिळालेलं दान पाहून डोळे दीपतील; २८ कोटींची रोकड, सोने-चांदीचीही कमी नाही
3
मतांच्या चोरीबाबत भक्कम पुरावे, निवडणूक आयोगाला तोंड लपवायला जागा उरणार नाही: राहुल गांधी
4
Anil Ambani: अनिल अंबानींसमोरील समस्या वाढल्या, समन नंतर आता लुकआऊट सर्क्युलर जारी
5
भारतात पहिल्यांदा पार पडली 'लॅप्रोस्कोपिक' शस्त्रक्रिया; 'श्री' नावाच्या कासवाला मिळाली संजीवनी
6
LIC च्या 'या' स्कीममध्ये केवळ ४ वर्षांपर्यंत भरा प्रीमिअम; १ कोटींच्या सम अश्योर्डची गॅरेंटी, सोबत मिळतील अनेक बेनिफिट्स
7
पत्नीला संपवलं अन् हॉस्पिटलमध्ये जाऊन म्हणाला साप चावला; दिव्यांग मुलींनी केली पित्याची पोलखोल 
8
निर्जन रस्ता, अर्धवट जळालेला मृतदेह अन् रहस्यमय गुंता...; १३ वर्षीय मुलाच्या हत्येमागे ट्विस्ट काय?
9
शतांक विपरीत राजयोग: ९ राशींना वक्री शनिचे वरदान, सुबत्ता भरभराट; भरघोस लाभ, शुभ कल्याण होईल!
10
RSS प्रमुख मोहन भागवत यांना पकडा, माजी ATS अधिकाऱ्याचा हा दावा विशेष कोर्टाने फेटाळला
11
'या' सरकारी बँकेत जमा करा ₹१,००,००० आणि मिळवा ₹१४,८८८ चं फिक्स व्याज; पाहा स्कीमच्या डिटेल्स
12
"हा पुरस्कार मी...", राष्ट्रीय पुरस्कार मिळाल्यानंतर शाहरुख खानची पोस्ट, पण फ्रॅक्चर हात पाहून चाहते चिंतेत
13
जम्मू-काश्मीर: कुलगाममध्ये चकमक, सुरक्षा दलांनी एका दहशतवाद्याला केले ठार
14
भारत आता रशियाकडून तेल खरेदी करणार नाही? डोनाल्ड ट्रम्प यांच्या चेहऱ्यावर उमटले हास्य! म्हणाले...
15
बिहारमध्ये ६५ लाख मतदार वगळले; नोंदणी केलेल्या मतदारांची संख्या ७.२४ कोटींपर्यंत घटली
16
कोल्हापुरात हायकोर्टाचे १८ ऑगस्टपासून ‘सर्किट बेंच’; ४० वर्षांच्या प्रदीर्घ लढ्याला अखेर यश
17
मालेगाव स्फोटप्रकरणी सिमीच्या अँगलने तपास व्हायला हवा होता; विशेष न्यायालयाने केले स्पष्ट
18
‘एफ-३५’ फायटर खरेदी प्रस्ताव रोखला; भारताचे अमेरिकेला प्रत्युत्तर, लोकसभेत सरकारची माहिती
19
आठवडाभर लांबले; भारतावरील २५ टक्के टॅरिफची अंमलबजावणी ७ ऑगस्टपासून, पाकचा कर घटवला
20
आक्रमक खासदारांना रोखण्यासाठी थेट कमांडो; लोकशाही इतिहासातील हा एक काळा दिवस: काँग्रेस

पुण्यात शिकायला आलेल्या काश्मिरी तरुणांचं म्हणणं काय आहे? - एक संवाद!

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: February 28, 2019 07:45 IST

दहशतवादी हल्ल्यानंतर देशभरात शिकत असलेल्या काश्मिरी विद्यार्थ्यांना स्थानिकांच्या संतापाला सामोरं जावं लागलं. महाराष्ट्रातही अशा घटना घडल्या. पंतप्रधानांनी शेवटी ठणकावलं की, आपला लढा काश्मिरसाठी आहे, काश्मिरी माणसांच्या विरोधात नाही. !

ठळक मुद्देज्यांना शिक्षणाची संधी मिळाली ते हे तरुण कळकळीनं सांगतात, आम्हाला शिकू द्या.

- राहुल गायकवाड 

ते सगळे पुण्यात शिकायला आलेत.देशभरातून, जगभरातून मुलं पुण्यात शिकायला येतात, आयुष्य घडवायला येतात तसेच. त्यांचं राज्य एरव्हीही सतत बातम्यांत गाजतं; पण पुलवामा दहशतवादी हल्ल्यानंतर त्यांची काश्मिरी ही ओळख अनेक नजरांना जणू खुपायला लागल्यासारखंच वातावरण आहे.  पुण्यात सरहद संस्थेच्या माध्यमातून शिक्षणासाठी आलेल्या विद्याथ्र्र्याना भेटलं, गप्पा मारल्या तर ते आपलं मन मोकळं करतात. लांबून आलेले आपले हे बांधव-दोस्त शिकायला म्हणून एवढय़ा लांब आलेले, तर त्यांची घालमेल समजून घ्यायची म्हणून त्यांना भेटलं तर काय सांगतात ते.खरं तर आधीचा अनोळखी संकोच बाजूला ठेवून सार्‍या नजरा सांगतात की, दहशतवादी हल्ला झाला, त्याचं दुर्‍ख, ती भयंकर वेदना आमच्यातही आहे. मात्र त्याचवेळी त्या नजरांमध्ये काही प्रश्नही दिसतात, कारण गेल्या काही दिवसांत देशभरात काश्मिरी मुलांवरचे हल्ले वाढले आहेत.या तरु णांशी संवाद साधल्यावर कळतं की शिक्षणाप्रति त्यांची तळमळ किती मोठी आहे. काश्मीर खोर्‍यातून बाहेर पडून दूर शिकायला जाणं हेसुद्धा फार सुदैवी जिवांच्या वाटय़ाला येतं, बाकीचे तिकडेच राहून जातात. मात्र ज्यांना शिक्षणाची संधी मिळाली ते हे तरुण कळकळीनं सांगतात, आम्हाला शिकू द्या, बोला आमच्याशी, आमचं जगणं समजून घ्या. आणि हो, तो नजरेतला संशय तेवढा काढा!

**काश्मीरमध्ये झालेल्या हल्ल्यामुळे सर्व भारतीयांप्रमाणे आम्हीसुद्धा दुर्‍खी आहोत. भारतातील प्रत्येक व्यक्ती जितकी देशप्रेमी आहे तितकेच देशप्रेमी आम्हीसुद्धा आहोत. आपण सगळे एक आहोत आणि नेहमी एक असू. पण तिकडे हल्ला झाला म्हणून इकडे काश्मिरी तरुणांकडे पाहणार्‍या नजरांतला संशय आम्हाला फार छळतो. खरं तर आज काश्मीरमधील विद्याथ्र्याना उत्तम शिक्षण हवंय. शांतता हवी आहे. दहशत काय असते याचा अनुभव काश्मिरी मुलांनी अनेक वर्षे घेतलाय. त्याला कंटाळलेल्या काश्मिरी मुलामुलींनी उत्तम शिक्षणाची वाट धरली. आज अनेक तरु ण उच्चशिक्षित आहेत. कोणी सैन्यात भरती झालंय, आयएएस/आयपीएस करणारेही आता अनेकजण आहे, खासगी क्षेत्रात मोठय़ा पदांवरही आहेत. टेलिव्हिजनवर काश्मीरचं जसं चित्र दाखवलं जातं तितकी वाईट परिस्थिती काश्मीरमध्ये नाही. आज तरु णांना शिक्षण हवंय, नोकर्‍या हव्या आहेत. असं नाहीये की प्रत्येकालाच काश्मीरमधून बाहेर जाऊन शिकायचं आहे, प्रत्येकाला ती संधी मिळतेच असं नाही.आम्हाला बाहेर येऊन शिक्षण घेण्याची संधी मिळाली म्हणून आम्ही इकडे येऊन शिक्षण घेतोय. पण मग प्रत्येकवेळी आम्हालाच का देशभक्ती सिद्ध करायला लावता? जम्मू-काश्मीरच्या सैन्याच्या तुकडीत हजारो काश्मिरी तरु ण सैनिक आज आहेत. जे सीमेवर भारतासाठी लढताहेत. यापेक्षा अधिक देशभक्ती काय सिद्ध करायची?  - मुख्तार अहमद 

तरुण विद्यार्थी हेच देशाचं भवितव्य आहेत. तेच पुढे जाऊन खोर्‍यात सांगणार आहेत की बाकीचा भारत कसा आहे. त्यामुळे भारतातील विविध ठिकाणी शिक्षणासाठी आलेल्या विद्याथ्र्याना सतावणं योग्य नाही. - जावेद वाणी 

काश्मिरी तरु ण हा शिक्षणासाठी भारतातल्या विविध शहरांमध्ये जातो, तो पाकिस्तानमध्ये जात नाही. जायचा प्रश्नच नाही कारण आम्हीही भारतीयच आहोत आणि आम्हाला भारतात कोठेही शिक्षण घेण्याचा हक्क घटनेने दिला आहे. काश्मीरचे विद्यार्थी अत्यंत हुशार आहेत. परंतु त्यांना शिक्षणाच्या संधी मिळत नाहीत. काश्मीरमध्ये शाळा, महाविद्यालये फार कमी आहेत. त्यातही कमी जागा असल्याने अनेक काश्मिरी तरु ण शिक्षणापासून वंचित राहतात. त्यामुळे महाविद्यालयांची संख्या काश्मीरमध्ये वाढवणं आवश्यक आहे.खरं तर पुण्यात इतकी वर्षे शिक्षण घेताना आम्हाला कधीच वाईट अनुभव आला नाही. - जाहीद भट  रिकामं डोकं असेल तर त्यात काही वाईट लोक दगड भरतात. हेच तरु ण मग जवानांवर दगडफेक करतात. काश्मीरमध्ये सगळेच तरुण वाईट नाहीत. काही वाईट लोकांमुळे काश्मीर बदनाम होतंय. अगर मसला सुलझाना हैं तो एज्युकेशन और पॉलिटिकल डायलॉग बहुत जरु री है!  - आदील मलिक  

(राहुल लोकमतच्या पुणे आवृत्तीत वार्ताहर आहे.)