शहरं
Join us  
Trending Stories
1
“मोदी २०० देश फिरले, पण एकही पाठिशी नाही; शिष्टमंडळाच्या वऱ्हाडावर बहिष्कार टाकला पाहिजे”
2
संपूर्ण यादीच आली, सर्वपक्षीय शिष्टमंडळाचे सदस्य ठरले, प्रत्येक टीममध्ये किती अन् कोण नेते?
3
पोखरणच्या जमिनीवर 'असा' झाला स्फोट, अमेरिकाही हादरली; आजच्या दिवशी भारताची दखल जगानं घेतली
4
पाकची नवी चाल! भारताच्या ‘डिप्लोमॅटिक स्ट्राइक’ला ‘शांतीदूता’ने उत्तर; जगाला सांगणार काय?
5
गिलख्रिस्टच्या IPL संघात विराटला स्थान नाही, Mumbai Indiansचे ५ जण, कर्णधार कोण?
6
पाकिस्तानसोबतच्या तणावादरम्यान भारत आणि अफगाणिस्तानमधील व्यापार पुन्हा सुरू
7
आयडियाची कल्पना झाली फेल! बेपत्ता झालेला गुरुग्रामचा आयटी मॅनेजर पकडला गेला अन् समोर आलं खरं कारण
8
अटकेत पाकिस्तानी स्पाय? ज्योती मल्होत्राची कमाई किती? कोरोनात नोकरी गेली अन्... पाकिस्तानही फिरून आली...
9
Hyundai ने आखली मोठी योजना! भारतात लॉन्च करणार 20 पेट्रोल-डिझेल अन् 6 EV कार
10
तुम्हीही एकापेक्षा जास्त क्रेडिट कार्ड वापरता? मग फायद्यासोबत हे तोटे माहिती आहे का?
11
कोण आहे पाकिस्तानी अधिकारी, ज्याच्या जाळ्यात अडकली ज्योती?; भारताने देशाबाहेर काढले होते
12
"विराट कोहलीला क्रिकेटमधील योगदानासाठी 'भारतरत्न' द्या"; स्टार माजी क्रिकेटपटूने केली मागणी
13
हैदराबादमधील गुलजार हाऊसजवळ भीषण आग, १७ जणांचा होरपळून मृत्यू; अनेक जण गंभीर जखमी
14
Video: "असा धडा शिकवणार, की..."; सैन्यानं जारी केला 'ऑपरेशन सिंदूर'चा आणखी एक व्हिडिओ
15
केरळात मान्सून वाऱ्याच्या वेगाने दाखल होणारा, ढग भरभरून पाऊस देणार
16
करण जोहरच्या 'तख्त' सिनेमाचं पुढे काय झालं? पहिल्यांदाच प्रतिक्रिया देत म्हणाला, "तो सिनेमा..."
17
ज्योती मल्होत्रा पाकिस्तानी ISI अधिकाऱ्यासोबत बालीलाही गेलेली; वडील कारपेंटर, मुलीची लक्झरी लाईफ, नेमके करायची तरी काय...
18
टेरिफ वॉरची खुमखुमी अन् अमेरिकेचा तिळपापड! मूडीजने क्रेडिट रेटिंग घटविताच...
19
२५ लाख दे, नाहीतर मरून जा; पत्नीने दिली धमकी! शिक्षक पतीने उचलले दुर्दैवी पाऊल
20
सुसाइड नोटमध्ये मराठीत सही कशी?; डॉ. वळसंगकर आत्महत्या प्रकरणी वेगळाच संशय

#justicapormiguel - ब्राझीलमध्ये तरुण मुलं का ट्रेण्ड करत आहेत हा हॅशटॅग?

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: June 11, 2020 18:00 IST

कोरोनाबाधितांमध्ये ब्राझीलमध्ये आफ्रिकनवंशीय कृष्णवर्णीयांची संख्या अधिक आहे. धक्कादायक म्हणजे मृतांमध्ये तरु णांचा आकडा मोठा आहे. कोरोनामुळे जगात सर्वाधिक तरुण हे ब्राझीलमध्येच दगावलेत आणि आता वर्णद्वेषाने भडकाही उडाला आहे.

ठळक मुद्देकोरानामुळे जगात सर्वाधिक  तरु णांचा ब्राझीलमध्ये मृत्यू झाला आहे.

- कलीम अजीम 

अमेरिकेत वर्णद्वेषाचं भयंकर चित्र सा:या जगानं पाहिलं. तो भडका तिकडे उडालेला असताना ब्राझीलमध्ये वर्णद्वेशातूनच एका पाचवर्षीय बालकाचा मृत्यू झाला. त्यानंतर ब्राझीलमध्येही आंदोलन सुरूझालं आणि ‘ब्लॅक लाइव्हज मॅटर्स’ म्हणत वर्णद्वेषी विकृतीचा जोरदार निषेध करत अनेक जण रस्त्यावर उतरले. लॉकडाऊन तिथंही सुरूच आहे. मात्र शारीरिक दुरी राखण्याचे सारे  नियम तोडत हजारो तरुण/अन्यही रस्त्यावर उतरले.वर्णद्वेषातून होणारी होरपळ तिथंही अनेकांनी बोलून दाखवली. कोरोनामुळे होत असलेल्या सर्वाधिक मृत्यूच्या आकडेवारीत ब्राझील जगात अमेरिकेनंतर दुसरा देश आहे. या लॅटीन अमेरिकन देशात कोरोनामुळे आत्तार्पयत 6 लाख 92 हजार माणसं बाधित झाली असून, 36,499 लोकांचा मृत्यू झाला आहे. अर्थात ही आकडेवारी पुढेही वाढेल; पण जगाला कळणार नाही. कारण इथून पुढे मृत्यूचे आकडे सार्वजनिक न करण्याचा निर्णय ब्राझीलनं घेतला आहे.सरकारच्या हलगर्जीपणामुळे देशात कोरोनाबाधितांची संख्या वाढतेय, असा आरोप राष्ट्रपती जॉयर बोल्सोनारो यांच्यावर केला जात आहे. ते सोशल मीडियात ट्रोल होत आहेत. विरोधक व सामान्य लोकांचा रोष अजून ओढावून घ्यायला नको म्हणून आता सरकारने मृतांची माहिती अधिकृत सव्र्हरवरूनही काढून टाकली आहे.एकीकडे कोरोना, दुसरीकडे वर्णद्वेशावरून उडालेला भडका अशा स्थितीत अमेरिका आहे, तसाच ब्राझीलही.भडका नेमका कशानं उडाला?जर्मन मीडिया हाउस डॉयच्च वेलेने हे वृत्त दिलं. त्यानुसार 3 जूनला ही घटना घडली. पर्नाम्बुको राज्याच्या राजधानी रेसिफे शहरातील ही गोष्ट.मर्तिेस रेनाटा सौझा ही घरकामगार महिला. आपले पाच वर्षीय मूल मिगुएलला घेऊन ती सकाळीच कामावर गेली.  शाळा बंद असल्याने हल्ली तो आईसोबतच कामावर जायचा. मालिकिणीने रेनाटाला बाहेरून कुत्ना फिरवून आणण्यास सांगितलं. मुलाला मालकिणीच्या देखरेखीत ठेवून ती बाहेर पडली. कुत्ना फिरवून रेनाटा घराकडे परतली. इमारतीच्या आवारात आईला आपलं मूल रक्ताच्या थारोळ्यात मृतावस्थेत पडलेलं दिसलं. रेलिंगवरून पडून त्याचा मृत्यू झाला होता. सीसीटीव्ही फुटेजमध्ये मात्र भलतंच दिसलं. रेनाटा बाहेर पडताच मालकिणीनं तिच्या मुलाला बाहेर सव्र्हिस एलिवेटरजवळ आणून सोडलं. पाय:यांवरून तो वरच्या मजल्यावर गेला.तो मुलगा नवव्या मजल्यावरील लिफ्टमधून बाहेर पडला आणि खिडकीतून बाल्कनीच्या रेलिंगवर चढला. थोडय़ाच वेळातच त्याचा मृत्यू झाला. मीडिया रिपोर्ट सांगतात की, मालिकिणीने जाणून-बुजून नोकराच्या मुलाकडे दुर्लक्ष केलं. इतकंच नाही तर तिनं मुलाच्या हाताला धरून एलिवेटरवर सोडलं.मिगुएलने जीव गमावला. मर्तिेस रेनाटा सौझाचं हे एकुलतं एक मूल. ही बातमी वा:यासारखी पसरली. रेसिफे शहरात संतापाचे लोंढे रस्त्यावर उतरले. वर्णभेदाचा आरोप करत लोकांनी निदर्शनं सुरू केली. रंगभेदातून लहान मुलाची हत्या झाली, असा आरोप केला.हजारो तरुण रस्त्यावर आले. पोलिसांनी गोळीबार केलाच तर त्याचा प्रतिकार म्हणून रस्त्यावर झोपले. प्रत्येकांच्या हातात ब्लॅक लाइव्हज मॅटर्स या आशयाचे फलक होते. शारीरिक अंतराचा नियम पाळून आंदोलन सुरू झालं, त्यात काही श्वेतवर्णीयही सहभागी झाले. सोशल मीडियावरही गदारोळ झाला. #justicapormiguel  हा हॅशटॅग ट्रेण्ड होऊ लागला. रॅपर, लेखक जॉयस फर्नाडिस यांनी वर्णद्वेशी मानसिकतेवर टीका केली.  ते लिहितात, ‘या अशा मानसिकतेमुळे एक आयुष्य संपलं. माङया पूर्वजांना गुलाम बनवणा:या व वारशाने मिळालेल्या पैशाने सर्व काही विकत घेणा:या उच्चवर्गाची ही वृत्ती निंदनीय आहे.’कोरानाकाळात उपचारांत भेदभावाचा आरोपकृष्णवर्णीयांवर कोरोना आजारावर उपचार करताना भेदभाव केला जातोय, असा आरोप ब्राझीलमध्येही होतोय. वॉशिंग्टन पोस्टच्या मते, रिओ दि जानेरे शहरात कोविड 19 चा पहिला मृत्यू झालेला हा एक वृद्ध घरकामगार होता. त्याला मालकाकडून संसर्ग झाला होता. त्याचा मालक मार्चमध्ये इटलीहून परतला होता. मालकाची टेस्ट झाली; परंतु पॉङिाटिव्ह असल्याचं त्यानं घरकामगाराला सांगितलं नाही. 1 मार्चला रिओच्या एका हॉस्पिटलमध्ये त्या 63 वर्षीय मधुमेहपीडित नोकराचा मृत्यू झाला.मर्तिेस रेनाटा सौझा ज्या घरात काम करते त्याच्या मालकाला कोविडची लागण झालेली आहे. मालक सर्जिओ हॅकर हे रेसिफेजवळील नगराचे महापौर आहेत. एका सेल्फी व्हिडीओद्वारे त्यांनी आपल्याला संसर्ग झाल्याची माहिती दिली होती. मात्र त्यांनी आपल्याकडे काम करणा:या कर्मचा:यांना सुटी दिली नाही. अशा अनेक घटना. मीडिया रिपोर्ट सांगतात, की बाधितांमध्ये आफ्रिकनवंशीय कृष्णवर्णीयांची संख्या अधिक आहे.  धक्कादायक म्हणजे मृतांमध्ये तरु णांचा आकडा मोठा आहे. कोरानामुळे जगात सर्वाधिक  तरु णांचा ब्राझीलमध्ये मृत्यू झाला आहे.उपचाराविना मरणारे लोकं ब्राझीलमध्ये वाढली आहेत. परंतु सरकार मृतांची योग्य आकडेवारी जाहीर करत नसल्याचा आरोप विरोधक करत आहेत. आणि या सा:यात ब्राझील मात्र होरपळत आहे.

(कलीम मुक्त पत्रकार आहे.)