- ऑक्सिजन टीम
oxygen@lokmat.com
जगणं नावाची परीक्षा पास करत,
आनंदाची ‘मंङिाल’ गाठायची.
हे एरवी कुठली शाळा,
कोणते शिक्षक
शिकवतात आपल्याला.
पुस्तकी शिक्षणाची घोकंपट्टी व्यवहारी जगात जगायला
आवश्यक ‘पात्रता’ देते,
अवघड परीक्षा पार करत
यशाच्या शिखरावर
पोहचण्याची संधीही देते.
पण जगण्यातले आनंद कसे जिंकावे.
आपलं काम आपल्या मस्तीत करावं.
भरभरून जगावं,
सोडून द्यावं स्वत:ला
मोकळं वा:यावर.
आणि बरसावं मनसोक्त,
आभाळातून पडणा:या जलाधारांसारखं.
खडकाला भेदणारा
इवलासा अंकुर व्हावं,
हिरवागार कोंभ होत
नव्या नवलाईनं
उत्तुंग आकाशाकडे पहावं.
रोज उगवणा:या
नव्या सूर्यासारखं तळपत लख्खं
करावं आपल्या
अवतीभोवतीचं तरी जगणं.
रोज-रोज करावं हे सारं.
-पण हे असं करता येतं
हे कुठं कोण शिकवतं आपल्याला.
आपली सगळी धाव
बेंकबेच्या यशाच्या चौकटीत.
पण या चौकटीपलीकडेही असतातच काही निखळ-नितळ आनंद.
काही न अनुभवलेले भाव,
जगण्याचे काही
अत्यंत अपरिचित अवकाश.
ते मात्र आपल्याला भेटत नाहीत.
कारण ते भेटावेत, नव्हे दिसावेत यासाठी लागणारा गुरू
अनेकांना कधी लाभत नाही.
काही जण मात्र नशीबवान.
‘तिनो जहॉँ मिल जाने’वाला अनुभव देणारा त्यांना गुरु भेटतो.
विशेषत: कलेच्या क्षेत्रत
असे ज्येष्ठ श्रेष्ठ गुरु
आजही अनेकांना लाभतात.
अशाच काही गुरु-शिष्यांची
खास भेट या अंकात.
उद्याच्या गुरुपौर्णिमेनिमित्त.
आणि सदिच्छाही की,
आपल्या जगण्याला नवं ऊर्मी,
उमेद देणारा,
शहाणपणाची घुटी पाजणारा गुरू आपल्या सगळ्यांना लाभावा..
मिळावं एक बुंद तरी ग्यान.