शहरं
Join us  
Trending Stories
1
आरक्षण आता रेल्वेच्या डब्याप्रमाणे झालंय, सर्वोच्च न्यायालयातील न्यायमूर्तींनी केली परखड टिप्पणी, कारण काय?  
2
“आमचा युद्धसराव झालेला आहे, महापालिका निवडणुकांसाठी तयार”; संजय राऊतांचा निर्धार
3
पाकिस्तानने मर्यादा ओलांडल्या, आता अद्दल घडवावी लागेल..; काश्मीरमधून ओवेसींचा निशाणा
4
महापालिका, स्थानिक स्वराज्य संस्थेच्या निवडणुका महायुती एकत्र लढणार का? CM फडणवीस म्हणाले...
5
कोहलीच्या पोस्टरसमोर बकऱ्याचा बळी, आरसीबीच्या ३ चाहत्यांना अटक, कारण ऐकूण पोलीसही चक्रावले
6
चीनचा पाकिस्तानसोबत डबल गेम! UN परिषदेत भेटी-गाठींचा देखावा; पण बाजूने एक शब्दही नाही बोलला
7
'ही' आहेत पाकिस्तानातील श्रीमंत शहरं? मुंबई-दिल्लीशी तुलना करायची झाली तर...
8
भीषण अपघात! कार चालवताना रील पाहत होता ड्रायव्हर; नवरदेवाच्या भाचीचा मृत्यू, ५ गंभीर जखमी
9
पाकिस्तानातून भारतात आलेल्या २२ महिलांनी वाढवलं सरकारचं टेन्शन! जन्माला घातली ९५ मुलं अन्...
10
“आता राज्य सरकारने स्थानिक स्वराज्य संस्थेच्या निवडणुका घेण्यास चालढकल करू नये”: जयंत पाटील
11
कानड्यांनो, बापाला सॉरी म्हणायला लावता राव?; अवधूतने सोनू निगमची बाजू घेत लिहिली कविता
12
भारत-पाकिस्तानमध्ये झालेली युद्धं किती दिवस चालली? एवढ्या दिवसांत उडाला होता पाकिस्तानचा फज्जा
13
जादू की झप्पी! रुग्णांना बरं करणारी 'हग थेरपी' आहे तरी काय?, फायदे ऐकून तुम्हीही माराल मिठी
14
Amazon Prime सबस्क्रिप्शनसाठी पैसे खर्च करू नका; Jio, Airtel आणि Vi च्या रिचार्जवर मोफत मिळतंय
15
Nashik: जाधव बंधू हत्येनंतर ठाण्यात आला अन् ओळख लपवून राहू लागला, अखेर पोलिसांना सापडलाच
16
आता बिगुल वाजणार! "४ आठवड्यांच्या आत..."; स्थानिक स्वराज्य संस्थांच्या निवडणुकीबद्दल SC चा महत्त्वाचा निकाल
17
सूत जुळलं! ३ मुलांची आई असलेली हॉटेलची मालकीण १९ वर्षीय मजुराच्या पडली प्रेमात अन्...
18
"पहलगाम हल्ल्याच्या तीन दिवस आधी पंतप्रधान मोदींना पाठवला होता गुप्तचर अहवाल"; मल्लिकार्जुन खरगेंचा मोठा दावा
19
Cashless Treatment Scheme: अपघातातील जखमींवर होणार कॅशलेस उपचार, नवी योजना लागू; केंद्राने काढली अधिसूचना
20
बाजार पुन्हा घसरला! बँक ऑफ बडोदाला मोठा धक्का; 'या' सेक्टरमधील शेअर्सही विखुरले

जरतारीचा मोर खणांचा जोर

By admin | Updated: March 20, 2015 15:40 IST

मराठमोळ्या गोष्टी फॅशन म्हणून एकाएकी ‘हॉट’ ठरत आहेत. खणांच्या कुर्ती, पॅण्ट्स, स्कर्ट्स, चपला तर ट्रेण्डी ठरत आहेतच; पण डिझायनर म्हणून नऊवारीही तयार करून घेतली जात आहे. या नव्या ट्रेण्डची ही एक झलक..

लग्न ठरलं की ताक्षही एक भयंकर मोठी एन्झायटी येते, तिचं नाव शॉपिंग. वेड्यासारखं मुली शॉपिंग करत फिरतात. त्यातही कपड्यांच्या शॉपिंगसाठी तर जिवाचं रान करावं लागतं.
ठरतच नाही, घ्यायचं काय?
शरार की घागरा, वर्कवाली डिझायनर साडी की टिपिकल ट्रॅडिशन बनारसी शालू आणि पैठणी.
हे सगळं तर घेणार्‍या घेतातच; पण सध्या एक एकदम वेगळा ट्रेण्ड आहे. त्याला तसं नाव नाही पण तरुण मुलींच्याच भाषेत सांगायचं तर, ‘लग्नात मला एकदम ऑथेण्टिक मराठी लूक हवा आहे.’
यंदाच्या लग्नसराईत या ऑथेण्टिक मराठी लूकचेच बडे चर्चे आहेत. तेही मेट्रो शहरातल्या उच्च मध्यमवर्गीय-मध्यमवर्गीय घरातल्या स्वत: पाच आकडी पगार कमावत्या मुलींमधे!
एरव्ही या मुलींना पंजाबी ड्रेसेसही आऊटडेटेड वाटतील. फक्त जीन्स-शर्ट्स-ट्राऊझर्स आणि लॉँग स्कर्ट्सच कम्फर्टेबल वाटतीलही. पण आता लग्न ठरलंय आणि ते ट्रॅडिशनल पद्धतीनंच करायचंय म्हटल्यावर एकाएकी त्यांना वाटू लागतं की, आपला लूकपण परफेक्ट ट्रॅडिशनलच असला पाहिजे.
मग सुरू होते लग्नविधींना नऊवारी साडीच नेसायची या हट्टाची मोहीम. तसंही हल्ली अनेकजणी लग्नविधींना नऊवारी नेसतातच. बहुतेक दुकानं शिवलेली नऊवारी विकतात, मापाप्रमाणं नऊवारी रेडी टू वेअर साडी शिवून देतात.
पण तो ट्रेण्डही आता जुना झाला. अशी रेडी टू वेअर साडीपण नको वाटतेय अनेकींना!
मग त्या चक्क एखादी उत्तम डिझायनर गाठतात किंवा शेकडो दुकानं पालथी घालतात. स्वत:ला हवी तशी नऊवारी साडी मिळवण्यासाठी!
आणि म्हणूनच ज्यांच्याकडे उत्तम पैसे आहेत, ऐपत आहे अशा मुली चक्क नऊवारी साडी डिझाईन करून घेतात. डिझायनर साड्यांच्या जगात डिझायनर नऊवारी आपली जागा तयार करत आहेत.
पैठणीचा लूक, नाजूक वेलबुट्टी, मोर हे सारं तर हवं, पण रंग टिपिकल काठापदराच्या साड्यांचे नकोत असं म्हणत खास नऊवारी डिझाईन करून घेतली जाते.
मात्र हे काम जरा अतिखर्चिक आणि तसं वेळखाऊच. ज्यांना हे नको, त्या मग सरळ दुकानं गाठतात आणि आपल्याला हवी तशी नऊवारी सापडेपर्यंत शोधत राहतात दुकानातले ढीग!
नऊवारी नेसायची कशी, असा काही अवघड प्रश्नही आता उरलेला नाही. ब्यूटिपार्लरच असं शोधायचं जी उत्तम नऊवारीपण नेसवून देऊ शकेल!
म्हणून तर मग नऊवारी तिच्यावर ठसठशीत नथ. त्यातही चापाची नथ नकोच असते, म्हणून मग खास लग्नापूर्वी काही महिने नाक टोचलं जातं. लग्नात नाकात नथ घालता यावी म्हणून हा सारा खटाटोप. अर्थात हौशेला मोल नसतंच.
नुस्ती नथ कशाला, आजीच्या काळातले मोत्याचे दागिनेही पुन्हा एकदम फॅशनेबल वाटायला लागले आहेत.
चिंचपेटी, तनमणी, कुड्या, हातातले मोत्याचे गोठ, कंठा हे सारे पारंपरिक दागिने मग मस्त अंगावर मानानं मिरवले जात आहेत.
कारण हे सारे दागिने घातले नाहीत तर आपल्याला हवा तो ऑथेण्टिक लूक मिळणारच नाही याची खात्रीच असते.
इतकी तयारी करून आपलं लग्न एकदम ‘मराठमोळ्या लूक’मधे लागलं असं समाधान म्हणत फोटो काढले जातात. आणि मग तेच फोटो सोशल नेटवर्किंगवर शेअरही केले जातात. ‘सी द परफेक्ट ब्यूटिफूल मराठी ब्राईड’ अशी कॉम्प्लिमेण्ट स्वीकारतच!!
***
लग्नाच्या निमित्तानं हा ट्रेण्ड कपड्यांपासून केसांचा खोपा घालून मेकअप करण्यापर्यंत दिसत असला, तरी तो फक्त असा लग्नापुरताच र्मयादित नाही. अनेक पारंपरिक मराठी गोष्टी आता फॅशन म्हणून परत येत आहेत.
त्यात सगळ्यात आघाडीवर आहे ते खण म्हणजे खणाचे कापड.
खणाच्या कुर्तीज, बॅगा, पाऊच, क्लचेस, क्लिप्स, चपला, कार्डहोल्डर इतकंच काय की-चेनही खणाच्या कापडांच्या मिळतात.
विशेष म्हणजे, ऑफिसलाही सर्रास हल्ली मुली खणाच्या कुर्तीज वापरू लागल्या आहेत. फॉर्मल ड्रेसिंगमधेही ट्रॅडिशनल कलर्स दिसू लागलेत ही आनंदाची गोष्ट!
***
पैसा आहे, ऐपत आहे हे खरंच, पण त्याचबरोबर जुन्याला जुनाट न म्हणता त्याला नवीन लूक देत ते पुन्हा स्वीकारलं जाण्याची उत्तम मानसिकता म्हणजे ही मराठी फॅशन्सची नवी रंगत!
हा नवा ट्रेण्ड मराठमोळा लूक अधिक फॅशनेबल करेल अशी आशा ठेवायला जागा आहेच!
- सायली कडू