शहरं
Join us  
Trending Stories
1
शरद पवारांच्या बारामतीतील प्रचाराच्या सांगता सभेत अचानक अजितदादांची एंट्री; नेमकं काय घडलं?
2
भाजपा, महायुतीच्या उमेदवारांची उमेदवारी रद्द करा, कारण...; काँग्रेसची निवडणूक अधिकाऱ्यांकडे तक्रार
3
श्रीराम मंदिरात गेल्यामुळे पक्षातून तीव्र विरोध; काँग्रेस नेत्या राधिका खेरा यांचा राजीनामा...
4
देशपांडे लैय भारी! तुषारने पहिल्याच षटकात PBKS च्या स्टार फलंदाजांचे उडवले त्रिफळे, Video 
5
पक्षफुटीनंतर शरद पवारांचे 'ते' शब्द आठवून रोहित पवार गहिवरले; ढसाढसा रडताना पाहून सारेच स्तब्ध
6
“राज ठाकरे ज्यांच्या प्रचारासाठी जातात तो उमेदवार पडतोच”; ठाकरे गटाचा खोचक टोला
7
अगं बाई तुला आम्हीच निवडून आणत होतो; प्रचाराच्या शेवटच्या दिवशी अजितदादांचा सुप्रिया सुळेंवर निशाणा
8
MS Dhoni पहिल्याच चेंडूवर बोल्ड! पंजाब किंग्सच्या गोलंदाजांसमोर CSK ची शरणागती, डाव संपला
9
'सोढी' १० दिवसांपासून बेपत्ता, आदल्या दिवशी नेमकं काय घडलं होतं? वडिलांनी केला खुलासा
10
निवडणुकीच्या तोंडावर मुद्दाम बदनामीचा प्रयत्न, 'त्या' प्रकरणाशी माझा संबंध नाही- सुनिल तटकरे
11
MS Dhoni चा त्रिफळा उडवताच हर्षल पटेलनं केलं असं काही; निराश फॅन्सची जिंकली मनं
12
'...तर मी मोदींचा जाहीर प्रचार करेन'; उद्धव ठाकरेंचं भरसभेत आश्वासन
13
सई ताम्हणकर अन् जितेंद्र जोशी झळकणार एकाच हिंदी सिनेमात, फरहान अख्तरने केली घोषणा
14
जम्मू-काश्मीर: दहशतवादी हल्ल्यात एकुलता एक मुलगा शहीद; चिमुकला पोरका झाला
15
इंग्लंडच्या सर्वात वजनदार व्यक्तीचा मृत्यू, पुढच्या आठवड्यात होता वाढदिवस, वजन होते...
16
६ धावांत ३ बाद! CSK ने गमावल्या धडाधड विकेट्स, राहुल चहरने टिपले सलग बळी, Video 
17
'ही' आहेत जगातील सर्वात उष्ण ठिकाणं, तापमान वाचून बसेल धक्का!
18
‘भाजपाला विरोध करण्यासाठी दहशतवादी कसाबची बाजू घेता? थोडी तरी लाज बाळगा’, बावनकुळेंची वडेट्टीवारांवर टीका
19
CSK च्या प्ले ऑफच्या मार्गात अडथळे; २ मेन गोलंदाज मायदेशात परतले, दीपक चहरवरही प्रश्नचिन्ह
20
T20 वर्ल्ड कपमध्ये विराटला OUT करणं हेच ध्येय; पाकिस्तानी गोलंदाजानं बाळगलं 'स्वप्न'

Judgement & decision making - वेळेत आणि अचूक निर्णय घेण्याची कला शिकलात की नाही?

By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: January 16, 2020 7:20 AM

जजमेंट अ‍ॅण्ड डिसिजन मेकिंग म्हणजे निर्णयक्षमता. काही प्रश्न निर्णय न घेतल्यानेच सुटतात असं म्हणायचे दिवस गेले. धडाडीनं निर्णय घेणं, वेळेत घेणं आणि ते राबवणं हेच मोठं स्किल आहे.

ठळक मुद्देजॉब टिकवणं आणि त्याहूनही महत्त्वाचं म्हणजे यशस्वी करिअर करणं हे एक आव्हान असू शकतं. ते आव्हान स्वीकारायचं तर आपल्याकडे काही खास कौशल्यं हवीत? तेच  सांगणारा  ऑक्सिजनचा  विशेष  अंक 

अतुल कहाते,  डॉ. यश वेलणकर

परिस्थितीचं योग्य मूल्यांकन करू शकणार्‍या माणसांना कंपन्या पटापट वरच्या पदांवर पाठवतात. याचं कारण म्हणजे अमुक परिस्थितीमध्ये नेमकं काय करायचं याची जाण येणं तसं सोपं नसतं. दैनंदिन कामांमध्ये आपल्यासमोर अनेक अडचणी उभ्या ठाकतात. काहीजण या अडचणींचा डोंगर होईर्पयत नुसताच विचार करत बसतात किंवा काळजीमध्ये बुडून जातात. या उलट काही कृतिशील माणसं मात्न या अडचणींचा सामना निधडेपणानं करतात. त्यातून काय होऊ शकेल या विविध शक्यतांचा ते विचार करतात. शेवटी काही अंदाज मनाशी बांधून ते अडचण सोडवण्यासाठीची कृती करून टाकतात. सारासार विचार न करता काही लोक या मार्गानं जातात आणि त्यांना त्याचे परिणाम भोगावे लागतात; पण जे लोक सगळ्या शक्यता विचारात घेऊन पाऊल टाकतात त्यांना मात्न वेगानं बढती मिळत जाते.कुठल्या परिस्थितीमध्ये नेमकं काय करायचं हे कुठेही शिकवलं जात नाही. ते तसं शिकवणं शक्यही नाही. अनुभवातून माणूस ते काही प्रमाणात शिकत जातो. बरेचदा आपलं मन काय म्हणतं आहे आणि आत्तार्पयतचा इतिहास काय सांगतो, यानुसार निर्णय घ्यावे लागतात. हे काम अजिबातच सोपं नाही. त्यात प्रचंड आव्हानं आहेत. त्यात चुका होऊ शकतात. म्हणजेच तरीही निर्णय घेऊन ते अंमलात आणण्यासाठी संबंधित माणसाकडे धाडस असावं लागतं.खरं म्हणजे दैनंदिन आयुष्यातच आपण असंख्य बाबतींमध्ये बारीकसारीक निर्णय घेत असतो. आत्ता रस्ता ओलांडायचा का नाही, आज डबा न्यायचा का नाही, आज लवकर झोपायचं का नाही, अशा हजारो गोष्टी आपण सहजपणे करत असतो. हेच काम अधिकृतपणे आपल्यावर सोपवलं गेल्यावर मात्न आपण गांगरून जातो. अमुक ग्राहकाला फोन करायचा का नाही, हे उत्पादन बाजारात आणायचं का नाही, झालेली चूक वरिष्ठांना सांगायची का नाही, असे प्रश्न समोर उभे ठाकले की अनेक लोक पार कोलमडून पडतात. अशावेळी ‘कुठलाच निर्णय न घेणं हाच एक निर्णय असतो’ असं म्हणण्याचीही एक पद्धत असते. खरोखरच काही प्रसंगांमध्ये काहीच न करणं योग्य ठरूही शकतं; पण दरवेळी तसं करण्यातून मोठे धोकेही निर्माण होतात. सगळ्या गोष्टी नीटपणे टिपत राहणारा माणूस यातूनच हळूहळू ‘कॅल्क्युलेटेड रिस्क्स’ घ्यायला शिकायला लागतो. प्रत्येक माणसाची धोके पत्करण्याची क्षमताही भिन्न असू शकते. एखादा माणूस धडाडीनं मोठा निर्णय घेऊन मोकळा होत असल्याचं बघून दुसर्‍या एखाद्या माणसाला पार घाबरून जायला होतं. अशा सगळ्या छटा निर्णय प्रक्रि येमागे असल्या तरी प्रसंगानुरूप निर्णय घेणं आणि तो अंमलात आणणं हे अत्यंत महत्त्वाचं कौशल्य ठरणार, यात शंका नाही.

त्यासाठीची मानसिक कौशल्यं  कशी कमवायची?

1. आपण रोज अनेक निर्णय घेत असतोच. पण अनेकजण मोठे निर्णय घ्यायला घाबरतात. त्यापासून पळायचा प्रय} करतात, ते टाळतात, त्यानं तणाव वाढतो आणि परिस्थिती बदलत नाही.2. जितके पर्याय जास्त तितके निर्णय अधिक.3. निर्णय घेताना वर्तमान स्थिती जाणून भविष्याचा अंदाज बांधावा लागतो. निर्णय घ्यायचा म्हणजे अनेक पर्यायातील एक पर्याय निवडायचा. असं करताना आपण काहींना काही किमत मोजावी लागते. धोकाही पत्करावा लागतो.4. मात्र त्यामुळेच निर्णय घेताना कोणत्याही भावनिक कृती किंवा उतावीळपणा टाळला पाहिजे.5. निर्णयक्षमता वाढविण्यासाठी आपण रोज छोटेमोठे निर्णय घेण्याचा सराव करायला हवा. तज्ज्ञ व्यक्तीचा, मित्नमंडळीचा सल्ला घ्यायला हवा; पण हा माझा निर्णय आहे ही जबाबदारी स्वीकारायला हवी.6. जो निर्णय घेतला आहे त्याबद्दल दुसर्‍यांना दोष देत न राहता तो निर्णय बरोबर ठरवण्यासाठी मेहनत घ्यायला हवी. 

टॅग्स :Career Guidanceकरिअर मार्गदर्शन