पूर्वी शासनाच्या रोजगार व स्वयंरोजगार कार्यालयात बेरोजगारांच्या रांगा लागायच्या आता त्या लागत नाहीत !म्हणजे बेरोजगारी संपलेली नाही तर सारं कामंच ऑनलाइन झालंय !
‘कॉल’च्या प्रतीक्षेत असणारा बेरोजगार तरूण आता ‘एसएमएस’वर इंटरव्ह्यूला जाऊ लागलाय.
हे नवं तंत्र तुम्हाला जमलंय का ? एम्प्लॉयमेण्ट एक्सचेंजच्या बदलत्या
स्वरूपाचा एक ऑन द स्पॉट रिपोर्ट
--------------------------
दहावी-बारावीची परीक्षा झाली की पूर्वी जो तो एकमेकांना विचारायला लागायचा, कार्ड आहे का?
‘ते’ कार्ड म्हणजे अनेकांना आपल्या भविष्याच्या ताळ्याची हक्काची हुकमी किल्ली वाटत असे.
तेच ते एम्प्लॉयमेण्ट एक्सचेंजचं कार्ड. एम्पलॉयमेण्ट एक्सचेंजमधे नाव नोंदवलेलं नसेल तर सरकारी नोकरीचा कॉल मिळणं अवघड. कार्ड असलं आणि त्याची मुदत संपलेली असली तरी ऐनवेळेस अशी काही पंचाईत व्हायची की विचारता सोय नाही.
पूर्वी नोकरी शोधण्यासाठी मर्यादित साधनं होती. सरकारी नोकरीचं अप्रूपही जास्त होतं. मुळात खासगी नोक:या आजच्या इतक्या उपलब्धही नव्हता.
एकमेव हक्काचा आणि आशा देणारा मार्ग असे तो म्हणजे शासनाचा रोजगार व स्वंयरोजगार विभाग. अर्थात एम्प्लॉयमेण्ट एक्सचेंज. मात्र याठिकाणीदेखील सहजासहजी नोकरी मिळत नसे. मुळात ते नाव नोंदवणं हेच एक अत्यंत किचकट, रडकुंडीला आणणारं काम असे.
एकतर या कार्यालयात तरुणांची प्रचंड गर्दी व्हायची. फॉर्म घ्या. आवश्यक ती कागदपत्रं जोडा. मग आपला नंबर येईर्पयत वाट पहा. काही महत्त्वाचा कागद नसेल सोबत की त्यादिवशी काम व्हायचंच नाही.
मग पुन्हा हेलपाटेच मारावे लागत.
आणि एवढे कष्ट करुनही, कार्ड मिळवूनही मुलाखतीचा कॉल येईलच याची काहीही खात्री नसे. अनेकजण तर विसरूनही जात की, आपण असं काही नाव कधी नोंदवलं होतं. काहीजण मात्र मुलाखतीचा कॉल मिळावा म्हणून अनेक वर्ष, महिने या कार्यालयाच्या पाय:या ङिाजवत.
मुद्दा काय, आईबाबांच्या पिढीतल्या कुणालाही विचारा, एम्प्लॉयमेण्ट एक्सचेंज कार्ड काढण्याचा अनुभव. अनेक सुरस कथा ऐकायला मिळतील.
त्याकाळच्या तारुण्यानं अशा ‘न येणा:या’ मुलाखतीच्या कॉलपायी प्रचंड नैराश्य आणि मनस्ताप सहन केलाय.
एवढंच कशाला,
रोजगार व स्वयंरोजगार कार्यालयात नावनोंदणी, नूतनीकरण, शैक्षणिक पात्नतेतील वाढ, पत्ता बदल यासारख्या गोष्टींसाठीही रांगा लावाव्या लागत. ज्यांच्या शहरात हे कार्यालय होतं त्यांचं ठीक पण खेडय़ापाडय़ातल्या तरुणांना तर तालुकास्तरावरील फिरत्या पथकासमोर प्रत्यक्ष उपस्थित राहून नोंदणी करावी लागत असे; त्यात जो काय मनस्ताप व्हायचा त्याची कल्पनाही न केलेली बरी. नोकरी नको पण हे हेलपाटे आवरा असं म्हणायची वेळ यायची. हे सारं डोक्यात ठेवून आज जर तुम्ही एम्प्लॉयमेण्ट कार्यालयात जाल, तर तुम्हाला हे चित्रच दिसणार नाही. कुठल्या तरी भलत्याच काळातल्या चमत्कारिक गोष्टी लोकं सांगतात असं वाटू शकेल.
कारण आता एम्प्लॉयमेण्ट एक्सचेंजमध्ये ती आशाळभूत चेह:यांची गर्दीच दिसत नाही. त्या रांगा नाहीत की, ती वणवण नाही.
कशानं झाला हा बदल?
महाराष्ट्र शासनाने ऑक्टोबर 2क्क्क् मध्ये रोजगार व स्वंयरोजगाराचे नवीन धोरण जाहीर करून कार्यालयाच्या वेबसाइटवरच रजिस्ट्रेशन योजना सुरू केली. शहर, तालुका, गाव पातळीवरील बेरोजगारांना रोजगाराची संधी उपलब्ध व्हावी, रोजगार नोंदणीसाठी प्रत्यक्ष न जाताही नाव नोंदणी करता यावी हे त्यामागचे सूत्र. केंद्र सरकारकडून अशी देशव्यापीच सोय करण्यात आली. नोव नोंदणीसाठी इच्छूक तरुणांचा वेळ वाचावा, खर्चात बचत व्हावी आणि मुख्य म्हणजे ग्रामीण भागातील उमेदवारांना स्थानिक पातळीवर सेवा केंद्राद्वारे रोजगाराविषयी माहिती मिळावी असा या ऑनलाइन नोंदणीचा हेतू होता.
ऑनलाइन कामकाज सुरू झालं आणि पूर्वीची कोंदट, हताश वाटायला लावणारी परिस्थितीजन्य भावना बदलू लागली. एका क्लिकवर अनेकांना रोजगाराचा शोध घेणो शक्य होऊ लागले.
दरम्यानच्या काळात इंटरनेट गावोगावी पोहचू लागलं. ग्रामीण व शहरी भागात महा ई-सेवा केंद्र सुरू झाली. तिथून अनेकांना नोंदणी करता येऊ लागली. इंटरनेट कॅफेही सुरू झाले. आता तर ग्रामीण भागातही अनेकांच्या फोनवर नेटचे पॅक मारले जाऊ लागले. त्यामुळे ही ऑनलाइन नोंदणी घरबसल्या करणं शक्य होऊ लागलं. त्यासाठी रोजगार व स्वयंरोजगार कार्यालयात जाण्याची आवश्यकताच उरली नाही.
पण केलं स्वत:ला ऑनलाइन रजिस्टर, विसरून गेलो असं करुन चालत नाही. वर्षातून किमान एकदा तरी यूजर आयडी, पासवर्डद्वारे लॉगइन करणं बंधनकारक असतं. जसजशी शैक्षणिक पात्नता वाढेल, तसतसे बदलही तुम्ही ऑनलाइन जाऊन करू शकता. याशिवाय पत्ता, मोबाइल क्र मांक, ई-मेल असा संपर्कासंदर्भात काही बदल असेल तर आपला यूजर आयडी वापरून ते सहज करता येऊ शकतात.
शासनाच्या रोजगार व स्वयंरोजगार विभागातर्फे वर्षभरापूर्वी सुरू केलेल्या ई-सेवेमुळे बेरोजगारांना रोजगार शोधणं सोपं झालं आहे. या सेवेअंतर्गत आतार्पयत तब्बल 32 लाख 82 हजार 9क्6 बेरोजगार तरुणांनी ऑनलाइन नोंदणी केली असून, त्यातील दोन हजार 795 बेरोजगारांच्या हाताला रोजगारदेखील मिळाला आहे. विशेष म्हणजे शासनाच्या या वेबसाइटवर रोजगार उपलब्ध असलेल्या कंपन्यांची माहिती अपडेट केली जाते. कोणत्या कंपनीत कुठल्या पदांसाठी किती जागा भरावयाच्या आहेत, त्यासाठी उमेदवारांची पात्नता काय हवी हा सारा तपशील या साइटवर असतो. उमेदवार थेट कंपन्यांशी संपर्क साधून मुलाखतीची संधी मिळवू शकतात.
अर्थात अजून सा:यांनाच हे ऑनलाइन नावनोंदणी प्रकरण ङोपत नाही. इच्छुक जास्त आणि नोक:या कमी ही अवस्था तर अजूनही आहेच. अनेकजणांना तर अशी ऑनलाइन माहिती मिळते हेच माहिती नाही. आणि माहिती असलं तरी ही ऑनलाइन नोंदणी कशी करायची हेच कळत नाही.
आपल्याला संधी देणारं जग जर बदलत असेल, तर आपणही नवीन कौशल्य शिकून ‘अपडेट’ व्हायला हवं, तरच संधी मिळतील !
--------------
अशी करा नोंदणी
www.maharojgar.gov.in या संकेतस्थळावर जा. ‘जॉब सिकर’ या ऑप्शनवर क्लिक करा.
स्वत:ची संपूर्ण माहिती तिथे ऑनलाइन भरता येईल. ही माहिती भरल्यानंतर तत्काळ लॉगिंन आयडी व पासवर्ड तुम्हाला तुमच्या मोबाइलवर एसएमएसने मिळेल. मात्र साइटवर तुमचा मोबाइल नंबर तुम्हाला अपडेट करावा लागेल.
--------------
उद्योजकांनाही यूजर आयडी
केवळ बेरोजगारालाच यूजर आयडी व पासवर्ड दिला जात नसून नोंदणीकृत उद्योजकांनाही स्वतंत्र यूजर आयडी आणि पासवर्ड दिला जातो. कारण ऑनलाइन नोंदणी केलेल्या बेरोजगारांचा संपूर्ण डाटा उद्योजकांच्या अकाउंटवर ट्रान्सफर केला जातो. त्यानुसार कंपनीमध्ये भरतीप्रक्रिया राबवायची झाल्यास, उद्योजकांना बेरोजगारांचा सहज डाटा उपलब्ध होतो.
--------------
रोजगार मेळावे सुरूच
ऑनलाइन प्रक्रियेचा रोजगार मेळाव्यांवर काहीही परिणाम झालेला नसून रोजगार मेळाव्यांच्या माध्यमातूनदेखील बेरोजगारांना रोजगाराच्या संधी उपलब्ध होत आहेत. कंपनींमध्ये उपलब्ध असलेल्या जागांचा विचार करून हे मेळावे आयोजित केले जातात.
--------------
राज्यातील बेरोजगारांची संख्या
बेरोजगार - 32,82,906
पुरूष -24,97,934
महिला - 8,29,072
ग्रामीण - 20,65,598
शहरी - 12,47,036
--------------
56 हजार कंपन्या कनेक्ट
बेरोजगारांना रोजगार मिळावा याकरिता राज्यातील तब्बल 56 हजार कंपन्या शासनाच्या रोजगार व स्वयंरोजगार कार्यालयाला कनेक्ट आहेत. ऑनलाइन नोंदणी केलेल्या बेरोजगारांचा संपूर्ण डाटा या कंपन्यांना फॉरवर्ड केला जातो. कंपन्यांमध्ये भरतीप्रक्रिया राबवायची झाल्यास थेट बेरोजगार उमेदवारांना कंपन्यांमार्फत एसएमएस पाठविले जातात.
----------------
एकेकाळी मी प्रिंटिंग टेक्नॉलॉजीतल्या सगळ्या गोष्टी शिकून घेतल्या होत्या. तेव्हा ते तंत्रज्ञान नवं होतं. आता किती नव्या गोष्टी आल्या, तरुण दोस्त फेसबुक, ट्विटर, व्हॉट्स अॅप अत्यंत सफाईने आणि परिणामकारक रीतीने हाताळतात. मात्र त्यासाठी हातातली तंत्रज्ञानाची ताकद तेवढी जपून वापरा. या साधनांमुळे संधीची क्षितिजं विस्तारावीत. तुम्हाला यशाचे सोपान नक्की लाभतील..
-राजेंद्र दर्डा
www.facebook.com/social.teamaurangabad