शहरं
Join us  
Trending Stories
1
RSS सरसंघचालक मोहन भागवत यांची पंतप्रधान मोदींशी महत्त्वाची भेट; सुमारे दीड तास चर्चा - रिपोर्ट्स
2
IPL 2025 DC vs KKR : सुनील नरेन मॅजिक! ७ चेंडूत फिरवली मॅच; फाफची फिफ्टी ठरली व्यर्थ
3
धक्कादायक! वडिलांनी आठ वर्षांच्या मुलाचा गळा आवळून खून केला, मृतदेह पोत्यात भरला अन्...
4
काळजी करण्यासारखं काही नाही! खुद्द अजिंक्य रहाणेनं दिली आपल्या दुखापतीसंदर्भातील माहिती
5
VIDEO: रत्नागिरीजवळ रनपार खाडीत मासेमारी पाहण्यासाठी गेलेल्या १६ जणांना वाचविण्यात यश
6
भाजपाच्या अनेक नेत्यांचं आयएसआयशी संबंध, काँग्रेसचे ज्येष्ठ नेते रणदीप सुरजेवाला यांचा गंभीर आरोप   
7
गंभीर गुन्हा होण्यापूर्वीच पोलिसांनी डाव हाणून पाडला; परभणीत घरझडतीत घातक शस्त्र जप्त
8
IPL 2025 : 'चमत्कारी' चमीरा! 'सुपरमॅन' होऊन सीमारेषेवर टिपला IPL मधील एक सर्वोत्तम कॅच (VIDEO)
9
'ब्रेक फेल' झाल्याने पुण्याच्या चांदणी चौकात भीषण अपघात; PMPML बसने उडवली अनेक वाहने
10
लातूरच्या लेकींचा आंतरराष्ट्रीय क्रीडा स्पर्धेत बोलबाला! ज्योती पवारमुळे भारताला उपविजेतेपद
11
अक्षय्य तृतीयेच्या पूर्वसंध्येला नागपूर जिल्ह्यात दोन बालविवाह; काटोल, कन्हान हद्दीतील घटना
12
दक्षिण नागपूरात कमी दाबाने पाणीपुरवठा, हनुमाननगर झोनमध्ये शिवसेनेतर्फे पाण्यासाठी आंदोलन
13
ब्रेकरने खड्डे करत फाउंडेशन केले मजबूत! क्रीडा संकुलातील महिलांच्या ओपन जीमची नव्याने दुरुस्ती
14
आता पाकिस्तानची खैर नाही! पीएम मोदींचे सैन्याला फ्री हँड, उच्चस्तरीय बैठकीत ठरली रणनीती
15
पाकिस्तानात पाणी प्रश्नावरून जनता संतापली! लोक आक्रमक होत रस्त्यावर उतरले, वाहतूक अडवली...
16
जय हिंद म्हणत अतुल कुलकर्णीं यांनी लाल चौकातून देशवासीयांना दिला जबरदस्त संदेश, म्हणाले...  
17
श्री संत तुकाराम महाराजांच्या पालखीचे १८ जुनला प्रस्थान; ६ जुलैला पंढरपूरमध्ये होणार दाखल
18
अंत्यसंस्कार न करता मुलाने दोन वर्षे कपाटात लपवून ठेवला वडिलांचा मृतदेह, पोलिसांनी केली अटक, कारण वाचून येईल डोळ्यात पाणी
19
"नाशिकच्या हिंसक घटनेतील आरोपींना कठोर शिक्षा करा"; काँग्रेसची महायुती सरकारकडे मागणी
20
नवज्योत सिंग सिद्धू भाजपात सामील होणार? या पोस्टने वेधले लक्ष, उद्या करणार घोषणा

आयटी इंजिनिअर ते खेडय़ापाडय़ात डेटा ऍनालिस्ट , समाधान ते सापडलं त्याची गोष्ट.

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: July 9, 2020 17:24 IST

आयटी इंजिनिअर झालो. वीकेण्डर्पयत काम, मग सुटीच्या दिवशी ट्रेकबिक असं कार्पोरेट लाइफ सुरूहोतं. पण मी शोधत होतो कामाचा अर्थ..

ठळक मुद्देनिर्माणमध्ये सहभागी व्हायचं आहे?

- उमेश जाधव

देड जिल्ह्यातील हिमायतनगर तालुक्यात माझं गाव. 2014 साली आयटी इंजिनिअरिंग झाल्यानंतर मी एका सॉफ्टवेअर कंपनीत 18 महिने काम केलं. पहिल्या पगारासोबत आलेलं आर्थिक स्वातंत्र्य, पुण्यातलं - कार्पोरेटचं आरामदायक आयुष्य असं वर्षभर एकदम सुखात गेलं. नंतर नंतर ते करताना माङया कामाचा रिलेव्हन्स कळत नव्हता. एका मोठय़ा अमेरिकन कंपनीला विभागवार नफा-तोटा समजून घ्यायला मी दुपारी 2 ते रात्नी 12 र्पयत काम करायचो. वीकेण्डला नवीन नवीन ट्रेक्स. पण ते करूनही सोमवारी कामात उत्साह वाटायचा नाही. फक्त पैसे मिळताहेत म्हणून तेच करत राहावं हे पटलं नाही. एकदाच मिळालेलं आयुष्य मला हे असं घालवायचं नव्हतं. पोटाला भाकर, डोक्याला आव्हान आणि मनाला समाधान देणारं काय काम करायचं याचं उत्तर मी शोधत होतो. मग मला निर्माणविषयी समजलं. निर्माण प्रक्रियेत शेती, शिक्षण, रोजगार, आरोग्य या क्षेत्नातील अडचणी, सामाजिक प्रश्न यांची एकमेकांतली गुंतागुंत समजून घेता आली.माझं आयटीचं शिक्षण आणि थोडाफार अनुभव वापरून मी कुठल्या सामाजिक प्रश्नावर काम करू शकता? प्रश्न सोडवण्याच्या वेगवेगळ्या मार्गापैकी मी कुठला मार्ग निवडू? म्हणजे डोमेन आणि स्पेसिफिक रोलच्या शोधात होतो. एखाद्या प्रश्नाबद्दल अगदी खोलात जाऊन समजून घेतलं तर तो सोडवण्यात फार मदत होते. काम करताना डेटा आणि रिसर्च यांचा साधन म्हणून वापर केल्यास ते अधिक परिणामकारक होते हे पाहिलं होतं. तेव्हा सामाजिक प्रश्नांवर रिसर्च कसा करतात त्याची माहिती आणि कौशल्य शिकून घेतले. ग्रामीण भागात दर्जेदार संशोधन करण्याचा अनुभव असलेली सर्च ही संस्था एक नवीन रिसोर्स शोधत होती. निर्माणमुळे शोधग्रामची कार्य पद्धती आणि एकूणच वातावरण आवडलं होतंच. म्हणून सर्चसोबत काम करण्याचा निर्णय घेतला.गडचिरोली जिल्ह्यातील 15क् गावांमध्ये आरोग्य - व्यसनमुक्ती या विषयांवरती  विविध संशोधन प्रकल्पात डाटा सायकल मॅनेजमेण्टची कामं शिकायला मिळाली. रिसर्च मेथडॉलॉजी आणि स्टॅटिस्टिकची हे पुस्तकातून शिकण्यापेक्षा प्रत्यक्ष कामातून शिकताना मजा येते, ते अनुभवलं. कामासाठी सगळा गडचिरोली जिल्हा फिरलो, तिथलं जगणं, संस्कृती, तिथले स्थानिक प्रश्न प्रत्यक्षात पाहत होतो.प्रश्नांची गुंतागुंत समजत होती. हे करताना टीमवर्क शिकलो. चौथी पास आरोग्यदूत आणि एमडी डॉक्टर दोघांसोबत काम केलं. सर्चमध्ये 25 महिन्यात मी ग्रामीण भागात रिसर्च कसा करायचा हे तर शिकलोच; पण तो का करायचा अन् कामात तो कसा वापरायचा हे शिकलो. कुठल्याही सामाजिक प्रश्नावर काम करताना स्थानिकांची त्यातली गुंतवणूक आणि त्यांचं सबलीकरण असल्याशिवाय दुरगामी आणि शाश्वत परिणाम होत नाही हे शिकलो.पुढे घरच्या जबाबदा:यांसाठी मी जानेवारी 2019 मध्ये सर्च सोडलं. नांदेड जिल्ह्यातील हिमायतनगर तालुक्यात माङया गावात आठ महिने राहिलो. फक्त गावात राहून ग्रामीण मराठवाडय़ातील विविध प्रश्नांची गुंतागुंत पाहत होतो. गावागावात रिकामे पारावर बसून व्हॉट्सअॅप आणि टिकटॉक - टिकटॉक करणारे 15-20 पोरांचे टोळके दिसत होते. पंजा/बाण/घडय़ाळ/कमळाच्या राजकारणावर गप्पा करणारे एक-से-एक बहाद्दर भेटत होते. पण भवताली पाण्याचं दुर्भिक्ष. लोकांशी बोलताना एक गोष्ट जाणवली की, आपण भयानक अवस्थेत जगत आहोत, गंभीर प्रश्न आहेत हे त्यांना कळत होतं. त्याविषयी ते बोलतही; पण ते प्रश्न सोडविण्यासाठी आपण काही करू शकतो, ते कुठेच येत नव्हतं. एखाद्या गावाच्या/भागाच्या समस्या सोडविण्यात आणि विकासात तिथल्या लोकांचा सहभाग कसा वाढवता येईल? ग्रामपंचायतीच्या प्रत्येक निर्णयात लोकांचा मत असणारी खरी लोकशाही आणण्यात मी काय करू शकतो हे शोधायला सुरू केलं. 73 व्या घटना दुरु स्तीत मिळालेल्या ग्रामसभेच्या हक्कांबद्दल, त्रिस्तरीय पंचायतराज व्यवस्थेबद्दल वाचलं. तेव्हाच महाराष्ट्र शासनाच्या ग्रामविकास विभागातर्फे सुरू झालेल्या ग्रामीण सामाजिक परिवर्तन अभियानात असलेल्या एका संधीबद्दल कळालं. डाटा अॅनालिसिस स्किल्स आणि गडचिरोलीच्या अनुभवाच्या जोरावर माझी निवडही झाली, ऑगस्टमध्ये डाटा ड्रिव्हन गव्र्हन्मेण्ट कन्सलण्टण्ट म्हणून रु जू झालो.राज्यातील एक हजार गावांचा लोकसहभागातून आदर्श गाव म्हणून शाश्वत विकास करणं असं या कार्यक्र माचे ध्येय आहे. प्रत्येक ग्रामपंचायत दरवर्षी आपला विकास आराखडा बनविते. गावाचा विकास करायचा म्हणजे काय करायचं?  मिळणा:या निधीतून कुठली विकासकामं घ्यायची? शाळेचं छत दुरु स्त करायचं आधी की पांदण रस्ते/नाली बांधकाम आधी  ते  ग्रामसभेत चर्चा करून सर्वानुमते ठरवणं अपेक्षित असतं. सगळे आराखडे कागदावर बनतात. त्यातही फारच तोकडं आणि गरजेचंच नियोजन असतं. संपूर्ण गावाची नेमकी गरज घेऊन हा व्हिलेज डेव्हलपमेण्ट प्लॅन कॉम्प्रसिव्ह बनवता येईल आणि हा आराखडा डिजिटली बनवला तर त्यातील विकासकांची प्रगती ट्रॅक करण्यासाठी सोप्पं होईल, असा ठरवून आम्ही जीपीडीएस एमआयएस मॉनिटरिंग सिस्टिम बनवली.आज कार्यक्र माच्या एक हजार गावांमध्ये या एमआयएसवर विकासकामांचे नियोजन आणि मॉनिटरिंग होत आहे. कामांची प्रगती काय आणि कुठली कामे प्रलंबित आहेत ती यादी वेळोवेळी वरिष्ठ अधिका:यांना जाते. 

त्याने प्रलंबित असलेली कामे लवकर होतात. विकासकामांच्या नियोजनात ग्रामसभेचा सहभाग, विकासकामांच्या खर्चात पारदर्शकता आली हे मी पाहतोय. कामात मला ग्रामपंचायत ते मंत्नालयार्पयत असलेली सरकारी यंत्नणा पाहायला मिळाली. मोबाइलमुळे माहिती तंत्नज्ञान/इंटरनेट सगळीकडे पोहोचलंय; परंतु ग्रामविकासाच्या कामांत माहिती विश्लेषणाचा वापर अजून हवा तितका झालेला नाही. तो व्हायला हवा असं वाटतं.प्रत्येकजण समाजाला काहीतरी देऊ शकतो, फक्त त्याची गरज कुठेय आणि मी कसं करू ते समजून घेतलं पाहिजे. मी त्याच वाटेवरचा प्रवासी आहे.

 

निर्माणमध्ये सहभागी व्हायचं आहे?तरुणांना अर्थपूर्ण जगण्याचा शोध घ्यायला मदत करणा:या निर्माण या उपक्रमाच्या अकराव्या बॅचसाठीची निवड प्रक्रि या सुरू झाली आहे. त्यात सहभागी व्हायची इच्छा असेल तर http://nirman.mkcl.org  या संकेतस्थळावर उपलब्ध असलेला अर्ज भरता येईल.अधिक माहितीही याच संकेतस्थळावर मिळू शकेल.