शहरं
Join us  
Trending Stories
1
शेतकऱ्यांच्या कायमस्वरूपी कर्जमुक्तीसाठी उच्चाधिकार समितीची स्थापना; मुख्यमंत्री फडणवीस-बच्चू कडू यांच्या बैठकीत निर्णय
2
Phaltan Doctor Update: "हॉटेलमध्ये हातावर सुसाईड नोट दिसली नाही, पोस्टमार्टम रुममध्ये दिसली"; वकिलाने कोर्टासमोर मांडली शंका
3
IND vs AUS : ७ वेळच्या वर्ल्ड चॅम्पियनसमोर जेमी-हरमनप्रीतची हवा; दोघींनी मिळून सेट केला नवा विक्रम
4
बिहार निवडणुकीत काँग्रेस-राजदला किती जागा मिळणार?; PM नरेंद्र मोदींची 'भविष्यवाणी'
5
विदर्भाला बसला ‘माेंथा’ चक्रीवादळाचा फटका ! पुढचे तीन दिवस अवकाळीचे संकट ; नोव्हेंबरपर्यंत जोर राहणार कायम?
6
शिवरायांच्या गडकिल्ल्यांवर मोदींच्या नावाने उघडणार 'नमो पर्यटन केंद्र'; राज ठाकरेंचा तीव्र विरोध
7
खासगी क्षणात अडथळा ठरत होती प्रेयसीची चिमुकली! प्रियकरानं उचललं टोकाचं पाऊल? जाणून तुमचाही थरकाप उडेल! 
8
याला म्हणतात शेअरचा धमाका...! गुंतवणूकदारांना केलं मालामाल; १०००० चे फक्त १० महिन्यांत बनवले 5 लाख; अजूनही तेजी कायम
9
महाराष्ट्रातला मोर्चा दणदणीत झाला पाहिजे, राज ठाकरेंचं आवाहन; मतचोरीवरून मेळाव्यात केले सादरीकरण
10
सरन्यायाधीश गवई यांच्यानंतर पुढचे सरन्यायाधीश कोण असतील? सरकारने केली मोठी घोषणा
11
Bihar Election: नितीश कुमारी की, तेजस्वी यादव, बिहारमध्ये कोणाचे सरकार येणार? फलोदी सट्टा बाजाराचा कौल काय?
12
सुटकेचा थरार! ओलीस ठेवलेल्या मुलांना सोडवण्यासाठी पोलिसांचा गोळीबार; आरोपी रोहित आर्यचा मृत्यू
13
"माजी मंत्री दीपक केसरकर यांनी पवईतील किडनॅपरबाबत दिली अशी माहिती, म्हणाले, मी स्वत:…’’  
14
IND vs AUS : ऑस्ट्रेलिया ऑलआउट! पण फायनलसाठी टीम इंडियासमोर सेट केलं ३३९ धावांचं टार्गेट
15
Kawasaki: कावासाकी व्हर्सिस-एक्स ३०० भारतात लॉन्च; केटीएम, रॉयल एनफील्डच्या 'या' बाईकशी स्पर्धा!
16
मुंबईत अपहरणाचा थरार: पोलिसांची एकीकडे आरोपीशी चर्चा, दुसरीकडे बाथरूमच्या खिडकीतून एन्ट्री
17
UFO संशोधन की आणखी काही, अमेरिकेच्या हवाई दलाच्या तळावर तीन संशोधकांचा मृत्यू , कारण गूढच राहिले
18
मंदिरांच्या भिंतीवर आय लव्ह मोहम्मद लिहिणारे हिंदू तरुण, पोलिसांनी ठोकल्या बेड्या; नावे आली समोर
19
IPL 2026: रोहित शर्मा KKRच्या वाटेवर? Mumbai Indiansची खास पोस्ट चर्चेत, नेमकं काय घडतंय?
20
"...पेक्षाही अधिक धाडस त्या महिलेत होतं"; इंदिरा गांधींचा उल्लेख करत राहुल गांधींचा पंतप्रधान मोदींवर हल्लाबोल

इज इट ऑल अबाउट नंबर्स?

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: March 4, 2021 13:30 IST

सोशल मीड्यात इन्फ्ल्यूएन्सर म्हणून करिअर करायचं ठरवलं तर यश मिळवण्यासाठी नेमकं काय लागतं? व्हायरल करण्याचं गिमिक की मेहनतीचं सातत्य?

-मोरेश्वर येरम

सोशल मीडिया आता प्रत्येकाच्या जीवनाचा अविभाज्य घटक झाला आहे हे नाकारता येणार नाही. मागणी तसा पुरवठा या तत्त्वावर चालणाऱ्या सध्याच्या मार्केटिंग युगात युथफुल जनरेशनच्या सर्व मागण्या सोशल मीडियाकडून पूर्ण होतात. व्हर्च्युअल जगाचं व्यावसायिक स्वरूपंही आज प्रचंड वाढलं आहे. नंबर्स गेम, व्हायरल, फॉलोअर्स, ट्रोलर्स या सगळ्याबाबतीत अनेक प्रश्न तरुण यू-ट्यूबर्स, सोशल मीडिया इन्फ्लूएन्सर्सला पडतात. आपणही या जगात नाव कमवावं अशी आस असते. मात्र ते जग नेमकं कसं आहे, इथं फक्त आकड्यांचाच खेळ चालतो का याविषयावर सखोल चर्चा करण्यासाठी 'लोकमत नॉलेज फोरम’च्यावतीने एका खास वेबिनारचे आयोजन करण्यात आले होते. इज इट ऑल अबाउट नंबर्स? - असं या वेबिनारचं नाव होतं.

लोकमत समूहाचे सहव्यवस्थापकीय संचालक आणि संपादकीय संचालक ऋषी दर्डा यांनी रणवीर अलाहबादिया  (BeerBicepsGuy), मासूम मिनावाला (StyleFiesta), अभिराज आणि नियती (Abhi&Niyu, Following Love), निकुंज लोटिया (Be YouNick) आणि मालिनी अग्रवाल (MissMalini) या लोकप्रिय सोशल मीडिया इन्फ्लूएन्सर्सशी चर्चा केली.

तरुण मुलं ज्यांच्यावर, ज्यांच्या शब्दांवर-स्टाइल आणि प्रेझेटेंशनवर फिदा आहेत असे हे तरुण इन्फ्ल्यूएन्सर.

रुळलेल्या वाटेवरून प्रवास करण्यापेक्षा काहीतरी वेगळं करण्याची ओढ असणारे वेगळी वाट निवडून स्वत:ची वेगळी ओळख करणारे. 'सोशल मीडिया इन्फ्लूएन्सर' हे अलीकडच्या काळात तयार झालेलं नवं करिअर. सोशल सॅव्ही नेटकऱ्यांना तर या क्षेत्राबाबत अप्रूप आहे. 'लोकमत वेबिनार'च्या माध्यमातून सोशल मीडिया इन्फ्लूएन्सर्सशी संवादातही याच गोेष्टींवर मनमोकळी चर्चा झाली की सोशल मीडिया इन्फ्लूएन्सर म्हणून यशस्वी कसं होता येईल? कोणत्या गोष्टींवर भर द्यायला हवा? काय टाळायला हवं?

समाज माध्यमात ‘व्हायरल’ का होते, फॉलोअर्स आणि लाइक्स-व्ह्यूजचे आकडे महत्त्वाचे असतात की नसतात, त्यापलीकडे काय महत्त्वाचं ठरतं हे सारं उलगडून सांगितलं. गप्पांचा प्रारंभ झाला तोच मुळात कोरोनाकाळात या ‘इन्फ्लूअन्सर्स’नी कोणती एक गोष्ट ‘वेगळ्या पद्धतीने’ केली या प्रश्नानं . त्यावर सगळ्यांचं एकमत होतं की, जसं सारं जग ‘बॅक टू बेसिक्स’ या जगण्याच्या मूळ वृत्तीकडे वळलं तसंच समाज माध्यमांनाही वळायला लागलं. मात्र या महामारीच्या काळातही एक गोष्ट कायम राहिली ती म्हणजे तुम्ही कोणत्या प्रकारचा ‘कॉण्टेण्ट’ क्रिएट करता हेच जास्त महत्त्वाचं ठरलं.

या चिअरफूल चर्चेतून मग काही यशाचे, काही टाळण्याचे टप्पे आणि काही जरूर शिकावीत अशी सूत्रं समोर आली.

त्यातलीच ही काही निवडक सूत्रं.

१. सातत्य हाच यशाचा मार्ग

आपला व्हिडिओ किंवा स्टोरी प्रचंड व्हायरल झाली म्हणजे आपण यशस्वी झालो असं होत नाही. व्हायरल होणं म्हणजे यश नसतं. हे यश तात्पुरता आनंद देतं. एका व्हिडिओला मिळालेलं यश पुढच्या वेळेसह कायम राखणं हे खूप कठीण काम आहे. सातत्य ठेवणं आणि नेहमी काहीतरी नवं देण्याचा प्रयत्न करणं हाच सोशल मीडिया इन्फ्लूएन्सरच्या यशाचा मार्ग आहे, यावर या साऱ्याचं एकमत दिसलं. व्हिडिओ व्हायरल व्हायला हवा हे लक्ष्य ठेवून काम करण्यापेक्षा लोकांना माहीत नसलेली आणि तुम्हाला त्यात आवड असलेली माहिती जास्तीत जास्त देण्याचा प्रयत्न करायला हवा. तुम्ही लोकांना दर्जेदार माहिती देत असाल तर ते व्हायरल होतंच, असं 'स्टाइलफिएस्टा' मासूम मिनावाला सांगते.

सोशल मीडियावर सातत्य टिकवण्याचादेखील एक मार्ग आहे. पैसे कमावण्याच्या उद्देशानं जो या व्यासपीठावर येतो तो कधीच टीकत नाही. तुम्ही एखाद्या गोष्टीबाबत पॅशनेट असणं महत्त्वाचे असतं. तुम्ही पॅशनेट असाल तरच सातत्यानं तुमच्याकडून व्हिडिओ केले जातात आणि तुमच्या चॅनलची सातत्यपूर्ण कामगिरी सुरू राहते. यातूनच तुम्ही पुढे यशस्वी होता, असं मत 'बी यूनिक' निकुंज लोटिया उर्फ निक यानं व्यक्त केलं.

हे माध्यम मत असलेल्या प्रत्येकाला ‘आवाज’ देतं, तो आवाज आणि व्यक्त करण्याची पॅशन हीच ताकद बनत जाते.

 

२. ‘नंबर्स गेम' घातक

आकडे महत्त्वाचे असलेल्या या जगात नक्की व्हायरल काय होतं याचं काही सूत्र आहे का?

त्यावर संवादात सहभागी सगळ्यांचंच म्हणणं होतं की, व्हायरल काय होईल किंवा होतं याच्या मागे पळण्यापेक्षा आपल्याला काय करावंसं वाटतं ते केलं, तर इथलं यश टिकू शकतं. इथं प्रसिद्धी आधी मिळते आणि यश नंतर मिळतं. त्यामुळे व्हायरॅलिटी टिकवण्यापेक्षा सातत्य टिकवणं, आपला प्रभाव निर्माण करून तो कायम ठेवणं हे जास्त महत्त्वाचं ठरतं. ‘सातत्य’ आणि ‘नावीन्य’ हे इथल्या यशाचं गमक आहे. व्हिडिओ व्ह्यूज म्हणजेच नंबर्सच्या मागे लागलं की तुम्हाला सोशल मीडियावर माणसं दिसत नाहीत. फक्त नंबर्स दिसू लागतात. नंबर्सच्या मागे धावण्यापेक्षा ज्या लोकांना तुम्ही कमावलंय त्यांना जपणं गरजेचं आहे. यातून संवाद आणि विश्वासार्हता दोन्हीत वाढ होते. त्यामुळे नंबर्सपेक्षा प्रेक्षकांशी नाळ जोडून ठेवणं महत्त्वाचं वाटतं, असा मोलाचा सल्ला 'मिस मालिनी' म्हणजेच मालिनी अग्रवालनं दिला. तुमच्यातील टॅलेंटनुसारचं व्हिडिओ व्हायरल व्हायला हवेत. त्यामुळे काय होतं की तु्म्ही आता पुढच्यावेळी काय नवं देणार याची लोकांमध्ये उत्कंठा वाढते.

आणि तरच व्हायरॅलिटीच्या पुढे यशातलं सातत्य दिसतं.

३. नावीन्य आणि प्रयोगशीलता

सोशल मीडिया इन्फ्लूएन्सर हा एक इन्व्हेण्टरच असतो. तो डिजिटल माध्यमात काहीतरी नवं देत असतो. नवं जन्माला घालत असतो. यातून या माध्यमातील माहितीत भर पडत असते. सोशल मीडिया इन्फ्लूएन्सरनं प्रयोगशील राहायला हवं, असा सल्ला मासूम मिनावला हिनं दिला. यावेळी अभि-नियू करत असलेल्या कामाचं उदाहरण तिनं दिलं. अभिराज आणि नियती त्यांच्या व्हिडिओच्या माध्यमातून संवदेनशील विषयांवर माहितीपूर्ण व्हिडिओ बनवतात. डिजिटलच्या ज्ञानभांडारात अभि-नियू यांनी एक वेगळी कॅटेगरी निर्माण करण्याचं काम केलंय. हेच गणित प्रत्येकानं लक्षात घ्यायला हवं.

ताज्या विषयांवर माहितीपूर्ण व्हिडिओ तयार करणं आणि ते सहजपणे लोकांपर्यंत पोहोचतील अशापद्धतीनं एडिट करणं हे खूप कठीण काम आहे. व्हिडिओचं आउटपूट आपल्याला दिसतं. पण तो तयार होण्यामागे प्रयोगशीलता दडलेली असते जी सहसा लोकांपर्यंत पोहोचत नाही, असा अनुभव रणवीरनं सर्वांसोबत शेअर केला.

 

४. ट्रोलर्सचं काय करायचं?

एखाद्या बहरलेल्या शेतावर टोळधाड पडल्यानं होत्याचं नव्हतं होतं. तसंच सोशल मीडियातील ट्रोलर्सचा जत्था तुमच्या व्हिडिओवर पाणी फेरण्याचं काम करत असतो. त्यामुळे ट्रोलर्सशी नेमकं कसं डील करावं याबाबतही सर्वांनी आपापले अनुभव शेअर केले.

ट्रोलर्स हे वास्तवापासून पळ काढणारे लोक असतात, असं रणवीर सांगतो. व्हिडिओ क्रिएटर म्हणून आपण अत्यंत प्रामाणिकपणे प्रयत्न करत असतो. पण एखाद्या ट्रोलमुळं व्हिडिओसाठी मेहनत घेणाऱ्यांच्या मानसिकतेवर परिणाम होत असतो. पण लोक ट्रोल करतायत ते तुम्ही केलेल्या कामावर कमेंट करतायत तुमच्यावर नव्हे. त्यामुळे एक व्यक्ती म्हणून आपलं एक वेगळं आयुष्य आहे आणि सोशल मीडियात आपण जे करतोय, आपण जो काही ब्रॅण्ड आहोत तो आपल्या कामाचा भाग आहे. या दोन गोष्टी वेगळ्या ठेवल्या की ट्रोलर्सचा विषय सहजपणे सोडवता येतो, असं मासूम म्हणाली.

एखाद्या ट्रोलरच्या कमेंटमध्ये आपण गुंतून जात असू तर आपलं कुठंतरी चुकतंय हे लक्षात घ्यायला हवं. जेव्हा आपण एखाद्या ट्रोलरला उत्तर देतो. तेव्हा आपण आपल्या व्हिडिओवर कौतुकाच्या कमेंट्स केलेल्यांचा अपमान करत असतो. त्यामुळे ट्रोलर्सला अजिबात महत्त्व देऊ नये, असं मत निक आणि अभि-नियू यांनी मांडलं.

'सोशल मीडिया इन्फ्लूएन्सर्स'सोबतचा हा 'लोकमत वेबिनार' इथं पाहता येईल.

https://youtu.be/WDVUOZiuR_8

 

moreshwar.yeram@lokmat.com