शहरं
Join us  
Trending Stories
1
"...मग बाकीच्या मराठ्यांचं काय? त्यांचा विचार कोण करणार?", विनोद पाटलांनी दाखवले आकडे
2
धक्कादायक! न्यायाधीशांनाच दिली जीवे मारण्याची धमकी, म्हणाला, जिवंत राहायचे असेल तर ५०० कोटी घेऊन जंगलात या
3
Video: अवैध कामावर कारवाई करणाऱ्या महिला पोलीस अधिकाऱ्यालाच उपमुख्यमंत्री अजित पवारांनी खडसावलं
4
२० हजार किमी रेंज, संपूर्ण जग टप्प्यात, पृथ्वीबाहेरही हल्ला करण्यास सक्षम, चीननं बनवलं घातक हत्यार
5
Amit Mishra Retirement : लेट निवृत्तीसह IPL हॅटट्रिक किंगनं क्रिकेटच्या देवालाही टाकलं मागे
6
“महाराष्ट्र विकासाच्या महामार्गावर, देशाच्या अर्थव्यवस्थेत मोठे योगदान”: DCM एकनाथ शिंदे
7
जगभ्रमंतीवर निघालेल्या योगेश आळेकरी यांची दुचाकी चोरीला, UK मधील नॉटिंगहॅम शहरातील घटना
8
"राजवटींचा काळ संपला; तुम्ही भारत, चीनसोबत असं बोलू शकत नाही"; पुतीन यांनी ट्रम्प यांना सुनावलं
9
"...यापुढे दक्षिण मुंबईत आंदोलनावर निर्बंध आणावेत"; शिंदेसेनेच्या खासदाराचं CM देवेंद्र फडणवीसांना पत्र
10
VIDEO: पुतिन यांच्या भेटीनंतर किम जोंगच्या कर्मचाऱ्यांनी सर्व DNA पुरावे अन् बोटांचे ठसे पुसून टाकले
11
मृत्यू पंचकात खग्रास चंद्रग्रहण २०२५: सूतक काल कधी? काय करावे अन् काय करू नये; पाहा, नियम
12
Shikhar Dhawan Summoned By ED : शिखर धवन ईडीच्या रडारवर; Betting App प्रकरणात होणार कसून चौकशी
13
'बेकायदेशीरपणे झाडे तोडल्यामुळे आपत्ती आली', पूर आणि भूस्खलनावर सर्वोच्च न्यायालयाची कडक टिप्पणी
14
४२ दिवसांत तब्बल १२ वेळा मुलीला चावला साप; पण नेमकं कारण तरी काय? डॉक्टर म्हणाले...
15
Palmistry: नशिबात राजयोग आहे की नाही, हे तळहाताच्या 'या' चिन्हावरुन ओळखू शकता!
16
मृत्यू पंचक २०२५: अनंत चतुर्दशी, चंद्रग्रहणात अशुभाची छाया; चुकूनही ‘ही’ कामे करू नका!
17
राहुल गांधी यांच्या हायड्रोजन बॉम्बमध्ये नेमकं आहे काय? तो फुटणार कुठे, समोर येतेय अशी माहिती  
18
GST Rate Change: Activa, स्प्लेंडर, पल्सर.., GST बदलल्यानं कोणती बाईक-स्कुटी होणार स्वस्त, कोणती महागणार? जाणून घ्या
19
रात्रभर अभ्यास केला, सकाळी मृतावस्थेत आढळला; IIT च्या विद्यार्थ्याचा परिक्षेच्या आदल्या दिवशी मृत्यू
20
GST Rate Cut: कार आणि बाईक झाल्या स्वस्त; पण Anand Mahindra यांनी केली आणखी एक मागणी...

इंटिलिजण्ट हरकामे

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: June 7, 2018 03:00 IST

अलेक्झा, माझ्या केवायसीचं काम करून टाक आणि माझं आधार कार्ड सगळ्या अकाउण्टला जोडून टाक.. असं म्हणायचा अवकाश की झालं काम!

- डॉ. भूषण केळकर

एक कर्मचारी आॅफिसमध्ये आला. ‘फेशियल रेकग्निशन’ प्रणालीनं त्याची आयडेंटिटी तपासली गेल्यावर दार आपोआप उघडून तो त्याच्या जागेवर जाईपर्यंत त्याच्या आवडीची कॉफी तयार व्हायला लागली, त्याची त्या दिवसाची कामांची यादी त्याच्या फोन स्क्रीनवर आली आणि त्यानं व्हाइस कमांड्स द्यायला सुरुवात केली...हॉलिवूडचा सिनेमा नाहीए मित्रांनो, हैदराबादमधील एका आयटी आॅफिसमधली रोज घडणारी ही गोष्ट आहे. म्हणून म्हणतोय आयओटी अर्थात इंटरनेट आॅफ थिंग्ज आपल्या दारात आलंय!परवारच नासकॉमनी जाहीर केलंय की, भारतात आयओटी खूप वाढणार आहे. रविशंकर प्रसाद आपले इलेक्ट्रॉनिक व आयटी खात्याचे केंद्रीय मंत्री यांनी २०१७ मध्ये जाहीर केलंय की, भारतात अजून ४ वर्षांत २०० कोटी आयओटी डिव्हाइसेस असतील. या आयओटीबद्दल थोडंसं आपण मागील २-३ लेखात बघितलं, आता थोडी अधिक माहिती घेऊया..पूर्वी संगणक, प्रिंटर्स हे नेटवर्कने जोडले जायचे. आता संगणकाचं काम हे मोबाइल फोन करू लागलेत, एवढंच काय तर कमी अधिक प्रमाणात आता सर्वच उपकरणं घड्याळ, मशीन्स, टीव्ही, अगदी ओव्हन, मिक्सर, कॅमेराही या गोष्टी पण करू लागल्या आहेत. म्हणून हे इंटरनेट आॅख थिंग्ज.तांत्रिकदृष्ट्या अनेक प्रकारचे मापक/माहिती गोळा करणारे मापक (सेन्सर्स) ते मापन इंटरनेटच्या साहाय्यानं एकत्र करणं व एकमेकांशी जोडणं आणि त्यात कृत्रिम बुद्धिमत्ता वापरून, इलेक्ट्रॉनिक्सच्या साहाय्यानं अ‍ॅक्युएटरने प्रवाह कमी जास्त करणं, झडप उघडणं, नियंत्रण व्यवस्था सुरू करणं इ. या साखळीला आयओटी म्हणतात.याचं उदाहरण म्हणजे घरातला थर्मोस्टॅट, घरात हालचाल नसेल तर दिवे बंद होणं वगैरे. तुम्ही स्मार्ट होम ही संकल्पना ऐकली/वाचली असेल. यात घरातील अनेक यंत्रणा/उपकरणं ही एकमेकांशी व मुख्यत्वेकरून इंटरनेटवरून जगाशी पण जोडलेली असतात. नुसतं एवढंच नव्हे तर जी उपकरणं घरातील माणसे अंगावर वापरतात. उदा. अ‍ॅपलवॉच (घड्याळ), फिटबिट (मनगटावरील घड्याळासारखं उपकरण) हीसुद्धा या आयओटी व स्मार्टफोनमध्ये येतात.याचंच पुढील उदाहरण द्यायचं झालं तर एक घरच नव्हे तर संपूर्ण शहर जर असंच कनेक्टेड असेल व इंटिलिजण्ट असेल तर त्याला स्मार्ट सिटी म्हणतात. जगात अशी अनेक उदाहरणं आहे. आपल्याकडे पण १०० स्मार्ट सिटी जाहीर झाल्या आहेत. हे सर्व राष्टÑीय पातळीवर असणारे आयओटी व एआयचे आविष्कार.आपण एक लक्षात घेऊ की, केवळ अ‍ॅटोमॅटिक उपकरणं म्हणजे आयओटी नव्हे! त्यांना फार फार तर इंटिलिजण्ट म्हणता येईल. उदाहरणार्थ ‘शटर स्पीड’ किती असावा हे ठरवणारा कॅमेरा, किंवा साबण किती घालायचा हे स्वत:च ठरवू शकणारे स्मार्ट वॉशिंग मशीन. जोपर्यंत ते इंटरनेटवरून अन्य उपकरणाशी/जगाशी जोडले जात नाही तोपर्यंत ते आयओटीमध्ये मोडत नाही!आयओटीचं शेतीमधलं उदाहरण बघा. महाराष्ट्र आणि गुजराथमधील ५००० शेतकऱ्यांनी या बॉश कंपनीच्या आयओटी प्रकल्पात भाग घेतलाय. त्यांचे ट्रॅक्टर एकमेकांशी इंटरनेटच्या साहाय्याने जोडले आहेत. प्रत्येक ट्रॅक्टर दर दिवशी ५ एमबी एवढी माहिती निर्माण करतो आणि त्यातून शेतकºयाला फायदा म्हणजे ट्रॅक्टर खराब होण्याआधीच कंपनी त्याला सांगते की ‘सर्व्हिंसिंग करून घे!हा लेख तुम्ही वाचाल तो बहुधा मॉन्सूनच्या पहिल्या पावसाच्या दिवशीच. तो मॉन्सूनसुद्धा इंडस्ट्री ४.० मधल्या बिग डाटा आणि आयओटी, एआय या तंत्रज्ञानांनी प्रेडिक्ट करता येतोय.गूगलचं ड्युप्लेक्स, अ‍ॅमेझॉनचं एका, अ‍ॅलेक्झा, अ‍ॅपलचं सिरी हे सर्व व्हाइस असिस्टण्ट हे या आयओटीमध्ये मोडतात.मला खात्री आहे की हे इंटिलिजण्ट हरकामे आपल्याला मिळाले तर काय मजा येईल असा विचार आपल्या सगळ्यांचाच मनात असणार! सांगकामे नाही, हरकामे बरं का!‘अलेक्झा, माझ्या केवायसीचं काम करून टाक आणि माझं आधार कार्ड सगळ्या अकाउण्टला जोडून टाक’’ म्हटलं की कटकट संपली आपली, असं नक्की मनात आलं असेल.हे सहज करता येत असूनही अ‍ॅलेक्झा पुण्यात वापरताना, ही कामं १-४ दुपारच्या वेळात होणार नाहीत. याची संबंधितांनी दखल घ्यावी! नियम म्हणजे नियम याची जाणीव तुम्हाला मी एक असामान्य पुणेकर म्हणून करून द्यायला हवीच.भुवया उंचावू नका, अहो मी पुणेकर आहे म्हणजे असामान्य असणार नाही का? हे समजण्याइतपत तरी हे अलेक्झ, सिरी, ड्युप्लेक्स ‘स्मार्ट’ असतील अशी माझी आशा आहे!!

( लेखक आयटी तज्ज्ञ आहेत.)bhooshankelkar@hotmail.com