शहरं
Join us  
Trending Stories
1
बांगलादेशातील हिंदू तरुणाच्या हत्येप्रकरणी मोठा खुलासा; ईशनिंदेचा आरोप खोटा, 'हे' होते कारण
2
महाराष्ट्रापाठोपाठ गोव्यातील निवडणुकीतही भाजपाची मुसंडी, काँग्रेसची पीछेहाट, आपचा धुव्वा
3
Vijay Hazare Trophy स्पर्धेत दिसणार रोहित-विराटचा जलवा! ही जोडी कधी अन् कोणत्या मैदानात खेळणार सामना?
4
नवीन वर्षाच्या सुरूवातीला कमी हाेणार थंडीचा जोर; हवामान तज्ज्ञांनी व्यक्त केला अंदाज
5
भारतीय ऑलराउंडरची क्रिकेटच्या सर्व प्रकारातून निवृत्ती! IPL लिलावात CSK नं लावली होती विक्रमी बोली
6
"पालिका निवडणुकांमध्येही देवेंद्र फडणवीसच ‘धुरंधर’; उद्धव ठाकरे 'रेहमान डकैत"; भाजपाची टीका
7
IPL 2026: Axar Patel ला धक्का! कर्णधारपदावरून हटवलं, आता 'हा' Delhi Capitals चा 'कॅप्टन'
8
AI शक्तिशाली सहाय्यक, मात्र मानवी मेंदूला पर्याय नाही; सर्व तज्ज्ञांचे एकमताने शिक्कामोर्तब
9
Video: उकळत्या तेलात हात घालून काढते गरमागरम पकोडे... 'समोसा गर्ल' ची रंगलीये तुफान चर्चा
10
झाडू मारण्यासाठी सॉफ्टवेअर इंजिनिअरने सोडली हाय-फाय नोकरी; आता महिन्याला १.१ लाख पगार
11
हाण की बडीव! रुग्णालयात डॉक्टर-रुग्ण भिडले, एकमेकांच्या जीवावर उठले; लाथाबुक्क्यांनी मारहाण
12
VIDEO: तुर्की संसदेत जोरदार राडा ! आधी खासदारांमध्ये बाचाबाची अन् लाथाबुक्क्यांनी हाणामारी
13
नगरपरिषद निवडणुकीतील यश भाजपाचंच की 'इनकमिंग'चं?; सुप्रिया सुळेंनी मांडला 'हिशेब'
14
मंत्रिपदाचा आणि जिंकण्याचा संबंध नाही, आत्मचिंतनाची गरज; बावनकुळेंचा मुनगंटीवारांवर निशाणा?
15
"ज्यांच्याकडे मुख्यमंत्रिपद तेही कायम नाही, मी योग्य क्षणी..."; सुधीर मुनगंटीवारांनी थेटच सांगितले
16
"…तर तुला कोणीच संघाबाहेर काढू शकणार नाही!" १९८३ च्या वर्ल्ड चॅम्पियनकडून संजू सॅमसनला सल्ला
17
बाजारात जोरदार उसळी! गुंतवणूकदारांनी कमावले ३.५ लाख कोटी रुपये; 'ही' ६ कारणे ठरली गेमचेंजर
18
सात दिवसांत खचला नवा रस्ता, आठ फूट खोल खड्ड्यात अडकला टँकर, महिला जखमी   
19
‘पैशांपेक्षा जनतेचा विश्वास आणि सत्तेपेक्षा विचारधारा महत्त्वाची हे मतदारांनी दाखवून दिले’, हर्षवर्धन सपकाळ यांचं विधान
20
ख्रिसमस धमाका! अवघ्या १ रुपयात महिनाभर 'अनलिमिटेड' कॉलिंग आणि डेटा; BSNL ची खास ऑफर
Daily Top 2Weekly Top 5

Innovation Scholars : सायलेंट हार्ट अटॅकपासून सुटका

By admin | Updated: March 8, 2017 16:53 IST

दहावीत शिकणा-या आकाशनं सायलेंट हार्ट अटॅकवर केलं संशोधन. राष्ट्रपतींच्या हस्ते आकाशाचा सन्मान करण्यात आला.

 

देशातली ही सर्वसामान्य माणसं. त्यांच्या त्यांच्या गरजेतून त्यांनी काही संशोधन सुरू केलं. रुढार्थानं यातील कोणीही संशोधक नाही. काही तर अगदी अल्पशिक्षित.पण ही संशोधनं त्यांच्यापुरती मर्यादित न राहता हजारो लोकांसाठी उपकारक ठरली. त्यांच्या या नाविन्यपूर्ण शोधानिमित्त राष्ट्रपतींनीही त्याचा गौरव केला आणि राष्ट्रपती भवनात त्यांच्या या उपयुक्त संशोधनाचं प्रदर्शन भरवलं. अशा प्रतिभावंतांची ही ओळख..

 

त्याचे आजोबा म्हटलं तर अगदी हेल्दी. रोज हिंडत फिरत होते. त्यांची स्वत:ची सारी कामं स्वत: करत होते. रोज हिंडाफिरायला जात होते. नाही म्हणायला त्यांना थोडा डायबेटिसचा आणि हाय ब्लडप्रेशरचा त्रास होता, पण अंथरुणावर वगैरे पडून राहायची वेळ त्यांच्यावर कधीच आली नव्हती. त्यानंही आपल्या आजोबांना कायम हसतमुखच पाहिलं होतं. अचानक एके दिवशी थोडंसं पडण्याचं निमित्त झालं आणि आजोबा त्याला कायमचे सोडून गेले ते गेलेच. आजोबांच्या जाण्यानं तो अगदी हबकला.

असं कसं होऊ शकतं? चालते फिरते आजोबा असे अचानक आपल्याला सोडून कसे जाऊ शकतात?त्याचे आजोबा ‘सायलेंट हाटॅ अटॅक’नं वारले होते. आठवीतल्या त्या मुलानं त्याच्या मुळाशीच जायचं ठरवलं. तामिळनाडूच्या या मुलाचं नाव आकाश मनोज.

आज हा मुलगा दहावीत आहे. त्याला लहानपणापासूनच विज्ञानाची आवड. तामिळनाडूतलं होसूर हे त्याचं गाव. विज्ञानासंदर्भातली जर्नल्स त्याला तिथे मिळणं अवघडच होतं.  त्यानं मग त्याच्या घरापासून एक तासाच्या अंतरावर असलेल्या इंडियन इन्स्टिट्यूट आॅफ सायन्सच्या लायब्ररीत जायला सुरुवात केली. तिथल्या वैज्ञानिक जर्नल्सचा त्यानं फडशा पाडायला सुरुवात केली.

आकाश सांगतो, ही जर्नल्स, पुस्तकं मला मिळणं शक्यच नव्हतं आणि ती विकत घेणं तर त्याहून अशक्य होतं. कारण ही वैज्ञानिक जर्नल्स अतिशय महाग असतात. ती विकत घ्यायची मी ठरवली असती तर कोटीभर रुपये तरी सहज लागले असते.ही जर्नल्स वाचता वाचता आपल्या आजोबांना सायलेंट हार्ट अटॅक का आला, त्यासाठी काय करता येईल याविषयीच्या अभ्यसाकडेही त्यानं बारकाईनं लक्ष पुरवायला सुरुवात केली.

सायलेंट हार्ट अटॅकच्या नावातच खरं तर त्याची व्याख्या आहे. असा हार्ट अटॅक, जो हळूहळू येतो, लक्षातच येत नाही. आणि लक्षात येतं त्यावेळी वेळ निघून गेलेली असते. सर्वसामान्यपणे हार्ट अटॅक येतो, तेव्हा आपल्या छातीत दुखतं, श्वास गुदमरल्यासारखं वाटतं, सायलेंट हार्ट अटॅकमध्ये मात्र ही कोणतीही लक्षणं दिसत नाहीत. मसल पेन आहे, अपचन झालं असेल किंवा नुसतीच मळमळ आहे असं समजून रुग्णही त्याकडे दुर्लक्ष करतात आणि शांतपणे हा आजार माणसाला घेऊन जातो.

आजवर ग्रामीण भागात सायलेंट हार्ट अटॅकनं हजारो नागरिकांना आपले प्राण गमवावे लागले आहेत. त्यासाठीचे उपचारही त्यांना वेळेवर मिळू शकलेले नाहीत. मुळात प्राथमिक पातळीवरच हा हार्ट अटॅक ओळखण्याचं कोणतंही साधन, उपचार सध्या उपलब्ध नाही. त्यासाठी रुग्णालयात जाऊन इको टेस्टसारख्या छातीच्या तपासण्याच तुम्हाला करवून घ्याव्या लागतात. आकशनं या सर्व बाबींचा अभ्यास केला आणि एक छोटंसं उपकरण तयार केलं. या उपकरणाच्या साहाय्यानं सायलेंट हार्ट अटॅक ओळखता येऊ शकतो. मुख्य म्हणजे आपल्याला स्वत:लाच ते ओळखता येऊ शकतं. त्याच्या या संशोधनाचं नाव आहे ‘नॉन इनव्हॅजिव्ह सेल्फ डायग्नॉसिस आॅफ सायलेंयट हार्ट अटॅक’.

या तंत्रानुसार रक्तातील एफबीपी ३ हे प्रथिन आपल्या त्वचेला कोणताही छेद न देता तपासता येतं. हे प्रथिन ऋणभारित असतं आणि धनभारित प्रथिनांना ते आकर्षित करतं. अल्ट्राव्हायोलेट पद्धतीनं या एफबीपी ३ चं प्रमाण मोजता येतं. किती अतिनिल किरणं त्वचेतून शोषली जातात त्यावरुन हे प्रमाण कळतं.

आकाशनं बनवलेलं हे उपकरण अत्यंत स्वस्त आणि सर्वसामान्य रुग्णांना सहजपणे वापरता येईल असं आहे. या उपकरणाच्या पेटंटसाठीही आकाशनं अर्ज केला आहे. त्याच्या ट्रायलसाठी डिपार्टमेंट आॅफ बायोटेक्नॉलॉजीचे साहाय्य आकाशने घेतलं आहे. येत्या काही महिन्यांत या उपकरणाचं उत्पादनही सुरू होऊ शकेल. सुमारे नऊशे रुपयांत हे उपकरण मिळू शकेल.

आकाशला भविष्यात हृदयविकारतज्ञ व्हायचे आहे आणि दिल्लीच्या ‘आॅल इंडिया इन्स्टिट्यूट आॅफ मेडिकल सायन्सेस’मधून (एम्स) त्याला वैद्यकीय शिक्षण घ्यायचं आहे. आजोबांच्या सायलेंट किलरनं आकाशला या विषयात संशोधन करण्यास प्रोत्साहन मिळालं, पण त्याहूनही महत्तवाचं म्हणजे त्याच्या या संशोधनामुळे ग्रामीण भागातील सर्वसामान्य हजारो रुग्णांना त्याचा फायदा होणार आहे.

आकाशच्या याच संशोधनामुळे सध्या तो दिल्लीत राष्ट्रपतींचा पाहुणा आहे आणि राष्टपतींच्या पुढाकारानं गेल्या तीन वर्षांपासून राष्ट्रपती भवनात सुरू झालेल्या ‘इनोव्हेशन एक्झिबिशन’ अंतर्गत त्याला सन्मानित करण्यात आले आहे आणि त्याचे उपकरणही या प्रदर्शनात मांडण्यात आले आहे. - प्रतिनिधी