शहरं
Join us  
Trending Stories
1
मुंबईत महायुतीची बैठक संपली; भाजपा-शिंदेसेनेचा फॉर्म्युला ठरला, शेलारांनी आकडाही सांगितला
2
BJP Assets: 2014 पूर्वी भाजपाच्या तिजोरीत किती पैसा होता? 11 वर्षांत किती वाढला? जाणून थक्क व्हाल!
3
आत्मनिर्भर भारताच्या दिशेने मोठे पाऊल, भारतातील पहिला स्वदेशी 64- बिट मायक्रोप्रोसेसर Dhruv64 लाँच
4
18 डिसेंबरपासून 'या' वाहनांवर बंदी! PUC शिवाय पेट्रोल नाही, 7 लाखांचा दंड; दिल्ली सरकारचा निर्णय
5
IPL 2026 Auction: Mumbai Indians ने घेतला पहिला खेळाडू; Rohit Sharma ला मिळाला नवा जोडीदार
6
वयोवृद्ध जोडपं दहशतवाद्याशी भिडलं, अखेरीस एकमेकांच्या मिठीत सोडले प्राण, बोरिस आणि सोफियाची थरारक कहाणी
7
मेस्सीचा इव्हेंट फसला, स्टेडियममध्ये मोठा गोंधळ झाला होता; बंगालच्या क्रीडामंत्र्यांना राजीनामा द्यावा लागला
8
IPL 2026 Auction: विस्फोटक फलंदाज आयपीएल २०२६ च्या मेगा ऑक्शनमध्ये अनसोल्ड, नाव ऐकून चकीत व्हाल!
9
बाई, हा काय प्रकार... LinkedIn वर फुल-टाइम गर्लफ्रेंडची व्हॅकन्सी, लोक विचारतात सॅलरी किती?
10
सोनं १३०६ रुपयांनी स्वस्त, चांदीही घसरली; पटापट चेक करा कॅरेटनिहाय लेटेस्ट रेट
11
Jara Hatke: अजब प्रथा: 'या' गावात लग्नाआधी तोडले जातात वधूचे दात; पण का??? वाचा 
12
मनोज जरांगे पाटील यांनी दिल्ली गाठली; अमित शाह यांच्याकडे केली मोठी मागणी, नेमके काय घडतेय?
13
IPL Auction 2026 LIVE: केकेआरचा मोठा डाव, कॅमरून ग्रीनपाठोपाठ पतिरानावर लावली विक्रमी बोली
14
Budh Pradosh 2025: इंग्रजी वर्ष २०२५ मधील शेवटचे प्रदोष व्रत; कर्जमुक्ती, संतान प्राप्तीसाठी करा 'हे' उपाय
15
IPL 2026 Auction: पृथ्वी शॉसह सरफराज खानला कुणीच दिला नाही भाव; सलग दुसऱ्यांदा 'अनसोल्ड'चा ठपका
16
खळबळजनक! लेकीच्या कस्टडीसाठी पतीने रचला भयंकर प्लॅन; टीव्ही अभिनेत्री पत्नीला केलं किडनॅप
17
नाईट क्लब आग प्रकरणी फरार लुथरा बंधूंना दिल्लीत आणले; थायलंडला पळून गेले होते
18
कोट्यवधी कर्मचाऱ्यांसाठी खूशखबर! मार्च २०२६ पूर्वी मिळणार मोठं गिफ्ट, सरकारनं दिली महत्त्वाची माहिती
19
सेकंदात तयार होणारी मॅगी कॅप्सूल खरी की खोटी? ४० मिलियन लोकांनी बघितलेल्या व्हिडीओचं सत्य काय?
20
Numerology: अंकशास्त्रानुसार 'या' जन्मतारखेच्या लोकांनी पायात काळा धागा बांधू नये; होतो दुष्परिणाम!
Daily Top 2Weekly Top 5

निघा तर खरं..

By admin | Updated: June 22, 2017 09:37 IST

एकदा ठरवलं ना की करायचं, स्वत:च सारखं तपासत राहायचं, टार्गेट जाईल कुठं मग?

- प्राची पाठक

कारला हेडलाइट असतो ना? अवतीभोवती सगळा अंधार असला तरी गाडी सुरू करून आपण निघालो की, हेडलाइट आपल्यापुरता उजेड दाखवतात. आपण पुढे जात राहतो. गाडी सुसाट निघते. अंधार आहे म्हणून आपलं काही अडत नाही. तसंच आपण काहीतरी ठरवण्याचं आणि करण्याचं, जिंकण्याबिकण्याचंही असतंच!

एकदा ठरवलं ना की करायचं, स्वत:च सारखं तपासत राहायचं, टार्गेट जाईल कुठं मग?

‘उगाच कोणाला काही बोलू नका, आधी काम होऊ द्या’ अशी भीती आपल्याला नेहमी घातली जाते. अशाच वातावरणात आपण वाढतो. सतत सावध असतो. सरळ, साधंसं, सोपं काही नाहीच आयुष्यात, नसतंच असं एक फिक्सिंग करून टाकतात जणू लोक आपल्या डोक्यात. कोणी कोणाला आरंभशूर वगैरेदेखील म्हणतात. जे करणार ते बोललं, सांगितलं कुणाला चार कानी गोष्ट जाते, नाट लागते, नजर लागते, अडथळे येतात, काम होत नाही... असं बरेच काही लोक मानतात. कोणाला तसे अनुभवदेखील आलेले असतात. पण कोणाशी काय बोलावं, हे नीट कळलं असेल तर आपली मतं, आपले ध्येय, आयुष्याचे प्लॅन्स बोलल्यानं फायदाच होतो. आधार मिळतो. एक ऐकणारा, समजून घेणारा कान मिळतो. आपल्या शब्दांशी आपली बांधिलकी वाढते. इतरांनी आपल्याला ‘काय मोठाल्या गप्पा मारतो’ असं म्हणण्यापेक्षा आपणच आपल्यात हा दोष आहे का ते शोधू शकतो. नीट व्यक्त व्हायची, अतिरेक टाळायची सवय लावून घेऊ शकतो. सगळ्यात महत्त्वाचं म्हणजे आपल्या मनाला एक रिमाइंडर सतत मिळतो, व्यक्त झाल्यानं! हे करायचं आहे, करायचं आहे. मग कसं करायचं आहे, ते मार्ग सुचत जातात. पर्याय समोर येत जातात. वाट दाखविणारी माणसं समोर येतात. हात देणारी साथ मिळते. आपण आपल्या मनातल्या योजना प्रत्यक्ष राबवू लागतो. कारला हेडलाइट असतो तसं. अंधारात जरी गाडी पुढे जात असली तरी त्या हेडलाइटमुळे थोड्या थोड्या रस्त्याच्या भागात उजेड पडून गाडी पुढं जात राहते, तसे आपण पुढे जात राहतो. हे नाही, ते नाही करत थांबून राहण्यात मजा नाही. ते कळायला वेळ लागतो. पण कळले की गाडी एकदम सुसाट जाते. आपण मनातलं बोललो, तरी नेमकं असंच घडू शकतं. अडून पडलेल्या गोष्टीतून मार्ग दिसू लागतो. उत्तरं सापडतात. मार्ग बदलायचा की कसं, तेही समजू लागतं. एकाच जागी खिळून राहायची गरज नाही, ते कळतं. गाडी सुरू तर होते! म्हणून कोणाला वाटलं बड्या बड्या बाता करतो, तरी आपण आपला सेल्फ चेक लावून आपण काय बोलत आहोत, त्यावर ठाम राहायचं. जे बोलतो तसं प्रत्यक्ष घडवून आणायला पाऊलं उचलायची. टप्पे आखायचे. टीव्हीवर छोटे छोटे गेम्स खेळले जातात. पाहिलेत ना ते?अमुक अंतरावर उभे राहून रिंग्ज फेका. बॉल एखाद्या बादलीत फेका. आपण ते गेम्स आणि लोकांची फजिती आवडीने बघत असतो. छोटंसं काही असतं. ते चुकलं तर कोणी नापास होणार नसतं, वर्ष वाया जाणार नसतं की कोणी काही बोलणार नसतं. पण तेव्हाही मजा येते. कोणी बॉल जिथून फेकायचा आहे, ती रेष ओलांडून अगदी टार्गेटच्या जवळ जाऊन उभे राहतात. छोट्याशा गेममध्येही त्यांना फेल होणं आवडणार नसतं. शुअर शॉट बॉल बादलीत पडणारच, असं अंतर ते निवडतात. हा थोडासा रडीचा डाव असतो. आव्हान पेलायची रिस्क ते घेत नाहीत. चूक होईल याची भीती बाळगतात. त्या उलट काही जण असतात. ते अति आत्मविश्वासात एकदम लांब कुठंतरी जाऊन उभं राहतात. खूप उत्साहात ‘बघा, मी किती भारी’ असा गेम खेळायला जातात आणि हमखास फसतात. आधीच इतकं अंतर विनाकारण निवडल्यानं त्यातली रिस्क त्यांच्या लक्षात येत नाही. आपण हे करूच, असा भ्रम असतो. हे काय छोटंसं, फालतू टार्गेट अशा स्पिरिटनं ते खेळायला जातात. आपण चटकन करून टाकू हे काम, अशी त्यांची स्ट्रॅटेजी क्वचित कधी कामास आलेलीदेखील असते. पण ती नेहमीच कामाला येईल असं नाही, हे त्यांना तेव्हा कळत नाही. आपलं ध्येय निश्चित करायची प्रक्रि यादेखील काहीशी अशीच आहे. खेळाचे नियम समजून घ्यायचे. नियम पाळायचे. हा खेळ खेळण्यासाठी आपल्याकडे नेमक्या काय काय गोष्टी आहेत, काय कमी आहे ते आधी स्वत:ला सांगायचं. योग्य अंतरावर उभं राहायचं आणि फोकस सगळा टार्गेटवर ठेवायचा. आधीच्या चुकीचा विचार करायचा. त्यातून स्वत:ला पटकन मोल्ड करायचं. पुन्हा नवीन डाव खेळून बघायचा. त्याचं इव्हॅल्युएशन करायचं. बरे-वाईट तपासायचं. काय कमी राहतंय त्यावर काम करायचं. तटस्थपणे आपलाच परफॉर्मन्स आपल्याला चेक करता येतो का ते बघायचं. सगळ्यात महत्त्वाचं म्हणजे आपली उमेद टिकवून ठेवायची. ‘करीनच मी’ हे स्वत:ला बजवायचं. काय काय केलं, काय राहिलं त्याचे अपडेट जवळच्या व्यक्तीला द्यायचे. आपल्याच शब्दांत तो आपल्याला पकडू शकेल, ही पूर्ण संधी त्याला ठेवायची. आपण आपल्या टार्गेटवर खिळून राहण्यासाठी असे जिवाभावाचे चेक पोस्ट अत्यंत महत्त्वाचे काम करतात. म्हणूनच, बोलायचं... ध्येय गाठले जाईलच, पण तो प्रवासदेखील अतिशय सुंदर असेल. कम आॅन, डू इट!