शहरं
Join us  
Trending Stories
1
बांगलादेशातील हिंदू तरुणाच्या हत्येप्रकरणी मोठा खुलासा; ईशनिंदेचा आरोप खोटा, 'हे' होते कारण
2
महाराष्ट्रापाठोपाठ गोव्यातील निवडणुकीतही भाजपाची मुसंडी, काँग्रेसची पीछेहाट, आपचा धुव्वा
3
IPL 2026: Axar Patel ला धक्का! कर्णधारपदावरून हटवलं, आता 'हा' Delhi Capitals चा 'कॅप्टन'
4
"पालिका निवडणुकांमध्येही देवेंद्र फडणवीसच ‘धुरंधर’; उद्धव ठाकरे 'रेहमान डकैत"; भाजपाची टीका
5
झाडू मारण्यासाठी सॉफ्टवेअर इंजिनिअरने सोडली हाय-फाय नोकरी; आता महिन्याला १.१ लाख पगार
6
हाण की बडीव! रुग्णालयात डॉक्टर-रुग्ण भिडले, एकमेकांच्या जीवावर उठले; लाथाबुक्क्यांनी मारहाण
7
VIDEO: तुर्की संसदेत जोरदार राडा ! आधी खासदारांमध्ये बाचाबाची अन् लाथाबुक्क्यांनी हाणामारी
8
नगरपरिषद निवडणुकीतील यश भाजपाचंच की 'इनकमिंग'चं?; सुप्रिया सुळेंनी मांडला 'हिशेब'
9
मंत्रिपदाचा आणि जिंकण्याचा संबंध नाही, आत्मचिंतनाची गरज; बावनकुळेंचा मुनगंटीवारांवर निशाणा?
10
"ज्यांच्याकडे मुख्यमंत्रिपद तेही कायम नाही, मी योग्य क्षणी..."; सुधीर मुनगंटीवारांनी थेटच सांगितले
11
"…तर तुला कोणीच संघाबाहेर काढू शकणार नाही!" १९८३ च्या वर्ल्ड चॅम्पियनकडून संजू सॅमसनला सल्ला
12
बाजारात जोरदार उसळी! गुंतवणूकदारांनी कमावले ३.५ लाख कोटी रुपये; 'ही' ६ कारणे ठरली गेमचेंजर
13
सात दिवसांत खचला नवा रस्ता, आठ फूट खोल खड्ड्यात अडकला टँकर, महिला जखमी   
14
‘पैशांपेक्षा जनतेचा विश्वास आणि सत्तेपेक्षा विचारधारा महत्त्वाची हे मतदारांनी दाखवून दिले’, हर्षवर्धन सपकाळ यांचं विधान
15
ख्रिसमस धमाका! अवघ्या १ रुपयात महिनाभर 'अनलिमिटेड' कॉलिंग आणि डेटा; BSNL ची खास ऑफर
16
Astro Tips: आंघोळीच्या पाण्यात १ वेलची टाकल्याने होणारे लाभ वाचून चकित व्हाल!
17
Jara Hatke: कचरा फेकू नका, विकून पैसे मिळवा! 'या' ॲपची देशभर चर्चा; नेमका प्रकार काय?
18
४ दिवसांपासून सातत्यानं 'या' शेअरला अपर सर्किट; ७४% नं वाढला स्टॉक, तुमच्याकडे आहे का?
19
मस्तच! हात लावताच समजणार संत्र गोड की आंबट? आई-आजीलाही माहीत नसेल ही सुपर ट्रिक
20
Flashback 2025: वर्षभरात ८ लढती! टीम इंडियाचा 'षटकार' अन् पाकिस्तानला 'ट्रॉफी चोर'चा टॅग
Daily Top 2Weekly Top 5

खुद ही को पहचान

By admin | Updated: June 30, 2016 16:30 IST

दुसऱ्याच्या हातातलं चॉकलेट कितीही सुंदर दिसत असलं तरी ते आपल्याला आवडेल का? कदाचित आपल्या हातातलं चॉकलेट सगळ्यात चांगलं, वेगळंही असू शकतं! त्यामुळे ‘इतर’ काय करतात, ते करू नका, जे तुम्हाला आवडेल तेच करा, तेच निवडा. करिअर निवडीचा याहून सोपा पर्याय नाही.

- डॉ. श्रुती पानसेकाहीच नाही हो, काहीच समजत नाही की, काय निवडावं? हे पण भारी वाटतं, ते पण! डोक्यात चिखल झालाय!-अशा ईमेल्स गेल्या काही महिन्यात सतत आल्या आहेत. त्यामुळे करिअर आणि शिक्षणाची निवड नेमकी कशी करायची याची माहिती गेले काही आठवडे आपण घेत आहोत. त्याच दरम्यान आपण आठ प्रकारच्या बुद्धिमत्ता कोणत्या आणि आपण त्या कशा ओळखायच्या हेसुद्धा तपासून पाहिलं. आपल्याला करिअरची निवड करताना सतर्क राहावंच लागतं. असं म्हणतात की, माणसानं नेहमी त्याच्या आवडीच्या क्षेत्रात काम करावं. जे अगदी खरं आहे. त्यामुळे कशात पैसा जास्त, आणि सगळे काय करतात याचा विचार न करता करिअर निवडताना स्वत:च्या आवडीशी सुसंगत असंच करिअर निवडायला हवं. तरच ते काम करताना ‘जॉब सॅटिस्फॅक्शन’ मिळतं. आवडीच्या क्षेत्रात खूप जास्त आणि भरीव काम करता येतं. आपल्या वेगाने प्रगतीही करता येते.एखादा खेळाडू प्रवृत्तीचा माणूस ९ ते ५ प्रकारातलं आॅफिसचं क्लेरिकल काम पैशांसाठी करेलही. पण त्यात रमणार नाही. समाधानी होणार नाही. तर या उलट एखाद्या प्रयोगशाळेत तासन्तास रमणारा माणूस ह्यूमन रिसोर्सची कामं कशी पार पाडणार? कामाच्या सर्व वेळात निरनिराळ्या प्रकारच्या माणसांच्या गराड्यात कसा राहणार? असा माणूस मार्केटिंगचं काम कसं करणार? त्यामुळे स्वत:ला ओळखणं ही करिअर निवडीची कायम पहिली पायरी ठरते. आपल्याला नक्की काय आवडतं हे आपलं आपल्यालाच ठामपणे कळलं पाहिजे.
स्वत:ला कसं ओळखायचं?तर त्यासाठी गेले काही आठवडे ज्या बुद्धिमत्ता आपण या लेखमालेत वाचल्या, त्या स्वत:च्या संदर्भात ताडून पहाव्यात. आणि त्यातून ठरवावं की, यातलं आपल्याला काय आवडतं. या बुद्धिमत्तांपैकी आपली बुद्धी नेमकी कोणती, हे ओळखता आलं तर ‘स्व-ओळख’ निश्चितच पटेल.कौन रास्ता जाऊं?* आपल्यासमोर जेव्हा अनेक रस्ते असतात, तेव्हा आपलं शिक्षण आणि समोर असलेल्या संधी यांचा एक व्यविस्थतरीत्या केलेला, शांत मनानं केलेला कन्सेप्ट मॅप उपयोगी पडतो. या कन्सेप्ट मॅपमध्ये आपल्याला नक्की काय हवंय आणि कुठे पोहचायचंय, याची आखणी करायला पाहिजे. यामुळे मनातला गोंधळ संपेल.* आपल्यासमोर अशीही काही माणसं असतात की आपल्याला काय आवडतं याची नीट जाणीव होऊनही त्यांना संधी मिळत नाही. अशांचे गुण दडपलेलेच राहतात. ते संसार, नोकरी किंवा घरकामात बुडून जातात. स्वत:तल्या गुणांची जाणीवच हरवून बसते. असं होऊ नये म्हणून सर्वात जास्त प्रयत्न आपणच करायला हवेत. आपले छंद, आपल्या आवडी यांना जागतं ठेवलं पाहिजे. * मात्र हे करायचं तर स्वत:ला मोकळं करणं आलं! त्यासाठी ज्ञानेंद्रियं उघडी ठेवणं महत्त्वाचं. माहीत नसलेलं माहीत करून घेणं. आजपर्यंत कधी न केलेलं करून बघणं. चांगल्या पुस्तकांचं वाचन करणं. त्याविषयी आपली मतं प्रकट करणं, दुसऱ्यांचे विचार ऐकून घेणं. जी कला आपल्यात आहे, त्याची जोपासना करणं. हे सारं सतत, नियमित करता यायला हवं.* आपण अनेकदा इतरांना प्रेरणास्थान मानत असतो. दुसऱ्याकडून शाबासकी मिळावी, प्रोत्साहन मिळावं, याची अपेक्षा करतो. यापेक्षा स्वत:कडून प्रेरणा घेणं सर्वात चांगलं. आपण जर स्वत:शी मोकळेपणानं बोलत राहिलो, तपासत राहिलो तर आपल्या वाटेवरच्या खाणाखुणा आपल्याला नक्कीच सापडतील.* असं दिसतं की खूप जणांना ही निवड करताना दमछाक झाल्यासारखं वाटतं. आपलं आत्तापर्यंत सगळं चुकलं आहे, असं वाटतं. सगळं संपलं, आता पुढे जायला वाटच शिल्लक नाही, असं वाटून फारच निराशही वाटतं. टोकाचे विचार येतात. मात्र हे विचार झटका. रस्ते संपत नाही आणि जग तर कधीच संपत नाही.* वयाच्या तिशीच्या आत अजून आपण जग नीट पाहिलेलंच नाही. त्यामुळे आपल्या विचारांची गाडी योग्य दिशेत चालायला हवी. वेडीवाकडी चालायला नको; मात्र आपल्यासमोर कधीच सरळसोट, सहज, मजेचे, गमतीजमतीचे रस्ते नसतात. कायम वळणावळणांचे रस्ते असतात. उंचवटे आणि खड्डेही असतात. अपयश हे येतंच. पण ते तात्पुरतं असतं. ते आपल्याला शिकवतं की जिंकणं आणि हरणं हा या प्रवासाचाच एक भाग आहे. * कधी यश आहे, तर कधी अपयश. अपयश आपल्याला हेच शिकवतं की, काहीतरी चुकलंय नक्की ! काय चुकलंय ते शोधायचं आणि चलायचं पुढे ! एखाद्या वेळी माघार घ्यावी लागली तर त्याची कारणं तपासून बघायची असतात, इतकंच ! * नेहमीच आपल्यासमोर अनेक संधी असतात. असं म्हणतात की आपण जर सुंदरशा टेकडीवर असलो तर तिथून खालचं चित्र छान वाटतं. सुबक वळणावळणांचे रस्ते, नदीचं पात्र यांचं आकर्षण वाटतं. तिथे जावंसं वाटतं. आणि जर खाली आलो तर हिरवीगार टेकडी, तिचं आकाशात घुसलेलं टोक, तिथे वाहणारं मोकळं वारं याची भुरळ पडते. हे अनेकदा-बहुतेकदा नेहमीच घडतं. तसंच करिअरच्या बाबतीत ‘पलीकडचं चित्र सुखावह’ वाटणं, हे घडत असतं. मानवी स्वभावच आहे तो. यातला आकर्षणाचा भाग बाजूला ठेवायचा आणि स्वत:ला तपासत विचार करायचा की मला नक्की काय करायला आवडतं.करिअर निवडायचं तर या प्रश्नाचं उत्तर शोधणं हे जास्त योग्य !( लेखिका मेंदू आणि शिक्षण या विषयातील संशोधिका आहेत.) 

drshrutipanse@gmail.com