शहरं
Join us  
Trending Stories
1
अशोक खरातच्या अश्लील व्हिडीओंची १५ ते २० रुपयांना विक्री, गुन्हा दाखल, त्या व्यक्तीला लवकरच करणार अटक
2
"आज रात्री एका संस्कृतीचा अंत होईल..."; डोनाल्ड ट्रम्प यांची इराणला सर्वात मोठी धमकी
3
धडधड वाढली! इराणने 'या' शहरातील सर्व रेल्वे सेवा केल्या रद्द; इस्रायल-अमेरिकेचे हल्ले, तीन उड्डाण पूल उद्ध्वस्त
4
अवघ्या जगाला इंधनाची कमतरता, पण चीनला नाही जाणवली? २० वर्षांपूर्वीच केली होती तयारी
5
Viral Video: नदीच्या काठावर नवऱ्यासोबत मद्यपान, लोकांनी हटकताच म्हणाली,"आमच्यामुळेच तुमची घरं चालतात!"
6
NCL: एनसीएलमध्ये नोकरीची संधी, ५७७ जागांसाठी जाहिरात प्रसिद्ध; ९ एप्रिलपासून नोंदणी सुरू
7
८वा वेतन आयोग: १३ एप्रिल रोजी महत्वाची बैठक; वेतनवाढीचा अंतिम निर्णय होणार?
8
"दैवीशक्ती असल्याचं भासवत लैंगिक शोषण, ३० पीडिता समोर आल्या..."; खरात प्रकरणात मोठे खुलासे
9
इराण 'हॉर्मुझ' करारासाठी तयार; अमेरिकेला पाठवला शांतता प्रस्ताव, पण केली मोठी मागणी....
10
"पार्थ पवारांचं विधान काँग्रेसला फारच झोंबलं", अमोल मिटकरींनी १६ आमदारांची पार्टी म्हणत डिवचले
11
इस्रायलचा इराणवर मोठा हवाई हल्ला! १८ जणांचा मृत्यू, 24 गंभीर; दिग्गज लष्करी अधिकारी ठार? तेहरानसह शस्त्रास्त्र डेपो उद्ध्वस्त
12
IPL 2026 : अर्जुन तेंडुलकरचा यॉर्कर शो! पंतसमोर अचूक गोलंदाजी; LSG नं दिली पदार्पणाची हिंट (VIDEO)
13
Latest Marathi News LIVE Updates: 'इराणसाठी आजची रात्र अखेरची', अमेरिकेचे अध्यक्ष डोनाल्ड ट्रम्प यांच्या पोस्टने जग हादरले
14
बंगाल निवडणुकीसाठी कडेकोट सुरक्षा; २.४ लाख जवानांसह २० हजार महिला कमांडो तैनात
15
David Warner: क्रीडाविश्वाला हादरून टाकणारी बातमी! स्टार क्रिकेटपटू डेव्हिड वॉर्नरला अटक; नेमकं प्रकरण काय?
16
GEN Z मध्ये वाढतोय हेअर कलर ट्रेंड; ब्ल्यू-रेड-गोल्डन केसांच्या रंगावरुन ओळखा त्यांचं व्यक्तिमत्व
17
युद्ध चिघळलं! डेडलाइन संपण्याआधीच अमेरिकेचा खार्ग बेटावर मोठा हल्ला; इराणचा आर्थिक कणा मोडणार?
18
Manipur rocket attack: गोळ्यांचा आवाज आणि हिंसक जमाव;  मणिपूरमधील हिंसाचाराचे व्हिडीओ आले समोर
19
Mira-Bhayander Flyover: मीरा भाईंदरमधला व्हायरल झालेला 'तो' अजब पूल असा का बनला? खुद्द CM फडणवीसांनी केला खुलासा
20
भूमिपूजन झालं, पण 'पॉड टॅक्सी' नेमकी असणार तरी कशी? फायदा काय? इत्थंभूत माहिती समजून घ्या २ मिनिटांत!
Daily Top 2Weekly Top 5

मी करेल ती फॅशनच!

By admin | Updated: June 19, 2016 07:44 IST

तरूणांच्या फॅशनबद्दल किती बोललं आणि लिहिलं जातं. कोणी कोणती फॅशन फॉलो करावी यासाठी वेगवेगळ्या माध्यमातून टिप्सही दिल्या जातात. तरूण जे काही घालतात आणि करतात ती फॅशन असंही म्हटलं जातं.

- मयूरा चौधरी

तरूणांच्या फॅशनबद्दल किती बोललं आणि लिहिलं जातं. कोणी कोणती फॅशन फॉलो करावी यासाठी वेगवेगळ्या माध्यमातून टिप्सही दिल्या जातात. तरूण जे काही घालतात आणि करतात ती फॅशन असंही म्हटलं जातं. पण जे म्हटलं जातं ते अगदी तसचं वास्तव जीवनात अनुभवायला मिळतं असं नाही. 

आता काही दिवसांपूर्वीचीच गोष्ट ऐश्वर्या रायनं कान्सच्या रेडकार्पेटवर चालताना जांभळ्या रंगाची लिपस्टिक लावली. तिच्या या लूकविषयी मी माझं मत व्यक्त करणार तितक्यात माझ्या समोर ढीगभर प्रतिक्रिया येवून पडल्या. कोणी म्हणत होतं ऐश्वर्याची ही एकदम बोल्ड स्टेप आहे, तर कोणी म्हणत होतं की असं दिसून तिनं मेकअपचा, स्टाइलचा नवा फंडा समोर ठेवला आहे. कोणाला ते छान वाटत होतं, कोणाला ते एकदम भारी.

तसं पाहिलं तर मीही माझ्या आयुष्यात मी करे सो फॅशन याच मताची आहे. कशावर काही घालून घेते, आणि त्याच्याकडे फॅशनच्या नजरेतून बघते मला ते एकदम छान वाटतं. आता दोनच दिवसांपूर्वी आमच्या ग्रूपमधल्या एका मैत्रिणीची बर्थडे पार्टी होती. मग मीही थोडंसं वेगळं दिसावं असं ठरवलं. नेहमीपेक्षा जरा डार्क मेकअप करून गेले तर माझ्या समोर परत ढीगभर प्रतिक्रिया मी न विचारताही येवून पडल्या. शी काहीतरीच काय? 

तुझ्या रंगाला सूट नाही होत लिपस्टिकची ही शेड, ही काय टिकली लावली? या हेअर स्टाईलमध्ये अक्काबाई दिसतेय तू. एक ना अनेक. कोणीही कौतुकाचे चार शब्द काढले नाहीत. 

मनातल्या मनात मी चरफडलेच. एकतर मी काय घालावं, कसं दिसावं हा माझा प्रश्न. पाहणाऱ्यानं पाहावं, नाहीतर पाहू नये. नसेल आवडलं तर तो माझा प्रश्न म्हणून गप्प राहावं ना? पण नाही नुसत्या टीका. म्हटलं ऐश्वर्याच्या फॅशनबद्दल बोलताना फॅशनबद्दलचा किती अ‍ॅडव्हान्स दृष्टिकोन आहे हे दाखवण्याची धडपड तर इथे आपल्या मैत्रिणीचा पेहराव ही तिची फॅशन आहे, त्यामागे तिचा विचार आहे हे समजून न घेण्याची मानसिकता याला विरोधाभास नाहीतर दुसरं काय म्हणावं?

आपण कायम टी.व्हीवर जे पाहतो त्याला फॉलो करतो पण आपण आपल्या मनातल्या आपल्या लूकला, आपल्या स्वत:च्या फॅशन कल्पनांना फॉलो केलं तर. आपली स्टाइल कायम स्टार, मॉडेल, चित्रपट, मालिका यावरून का ठरवावी.आपण जर आपल्या दिसण्याचा, आपल्या व्यक्तिमत्त्वाचा नीट अभ्यास केला तर आपण आपली स्टाइल स्टेटमेण्ट बनवू शकतो. त्यासाठी आपण स्टार वगैरे असण्याची गरज नाही. आपण आपल्यासाठी स्टारच असतो. फक्त हे आजूबाजूचं जग टीका करून कायम आपल्याला नाऊमेद करत इतकचं. पण या टीकेला भीक न घालता मला हवं तसचं मी दिसेल असं मी ठरवलय !