शहरं
Join us  
Trending Stories
1
'मत चोरी'ची तक्रार करण्यासाठी राहुल गांधींनी जारी केली वेबसाइट; नागरिकांना केले आवाहन...
2
“भारत महाशक्ती, लादलेले टॅरिफ असंविधानिक”; ट्रम्प यांना अमेरिकन अर्थशास्त्रज्ञांचा घरचा अहेर
3
"जे देश सध्या दादागिरी करताहेत ते..."; भारत-अमेरिका तणावावर नितीन गडकरी यांचे रोखठोक विधान
4
जगदीप धनखड गायब? राऊतांना वेगळाच संशय; म्हणाले, “रशिया-चीनची पद्धत भारतात सुरू केली का?”
5
“शरद पवारांनंतर ते लोक उद्धव ठाकरेंनाही भेटले, लोकसभा अन् विधानसभेला...”; संजय राऊतांचा दावा
6
“RSS शिस्तबद्ध संघटना, ७५ वर्षे अटीचे पालन करेल”; शरद पवारांचा नाव न घेता PM मोदींकडे रोख!
7
अमेरिका-भारत नव्हे, 'या' देशाने बनवला जगातील सगळ्यात घातक ड्रोन! ११ टन वजन अन् AIवर चालणार
8
रोहित शर्माने खरेदी केली Lamborghini, नंबरने वेधले चाहत्यांचे लक्ष; काय आहे ३०१५ चा अर्थ?
9
ट्रम्प टॅरिफचा पहिला फटका, अनेक कारखान्यांत काम बंद, भारतातील व्यापार गेला पाकिस्तानात
10
गडकरींचे ३.५० लाख मतदार वगळले, कुटुंबीयांचाही समावेश; अजून पुरावे मागणार की माफी?; काँग्रेसचा सवाल
11
Video : भर पावसात बाबांचा स्वयंपाक, चिमुकल्यांनी डोक्यावर धरलं 'असं' छत, पाहून डोळ्यांत येईल पाणी! 
12
साप्ताहिक राशीभविष्य: मोठी जोखीम टाळा, पैसे उसने देऊ नये; ८ राशींना लाभ, सुख-सुबत्ता-कल्याण!
13
कियारा अडवाणीच्या बिकिनी सीन्सवर कात्री? 'वॉर २'ला प्रमाणपत्र देताना सेन्सॉर बोर्डाचे निर्देश
14
RCBच्या यश दयालवर बंदीची कारवाई; अल्पवयीन मुलीवर अत्याचार प्रकरणी 'या' स्पर्धेतून बाद
15
पाकिस्तानला झाले तब्बल 'इतक्या' कोटींचे नुकसान; भारतीय विमानांसाठी हवाई क्षेत्र बंद करणे पडले महागात!
16
सर्वाधिक धावा कुटल्या, मग कर्णधाराला माघारी धाडलं, २२ वर्षांच्या ऑलराउंडरने जिंकवला सामना
17
सोशल मीडियावर मैत्री केली; चार तरुणींच्या जाळ्यात अडकलेल्या आजोबांनी आयुष्यभराची कमाई गमावली!
18
५ लाख देण्याचे आश्वासन अन् हातात पडले अवघ्या ५ हजाराचे धनादेश; उत्तरकाशीतील नागरिकांचा संताप
19
'ऑपरेशन सिंदूर'मध्ये कोण जिंकलं? सेना प्रमुखांनी पाकिस्तानला थेट उत्तर दिलं! म्हणाले...
20
जिला गर्लफ्रेंड म्हटलं तिनेच राखी बांधली! मोहम्मद सिराज आणि आशा भोसलेंच्या नातीचं रक्षाबंधन, फोटो समोर

मी शेफ होणार!

By admin | Updated: November 10, 2016 14:41 IST

स्वयंपाक नावाच्या कलेवर प्रेम करणारे तरुण मुलगे... जुनाट भेदाच्या चौकटी मोडत सरळ किचनकडे वळतात आणि तिथून एका ग्लॅमरस, पैसेवाल्या क्षेत्रात करिअर करू पाहतात.. त्या लजीज बदलाची ही एक गोष्ट...

- भक्ती सोमण

मोठ्ठं झाल्यावर कोण होणार? - हा शाळकरी बावळा प्रश्न अनेकांना अजूनही घरी आलेले पाहुणे विचारतातच...एवढंच कशाला? बारावी झाली? ग्रॅज्युएशन झालं? - आता पुढे?ढमक्याचा पिंट्या गेलापण यूएसला असं सांगणाऱ्या भोचक काकवा-मावशा आणि तुसडे काकाबिका आपल्याही वाट्याला येतातच...आता या अशा उत्सुक + भोचक मंडळींना कुणी उत्तर दिलं की, मी मोठा झालो की, शेफ होणार आहे.किंवा सांगितलं की, मला स्वयंपाक करायला खूप आवडतं, सांगा तुमच्यासाठी चायनिज करू की थाई, कोकणी करू की इराणी?तर..?एक तर ते मोेठ्ठाले डोळे करून आश्चर्यानं गप्प बसतील किंवा मग काहीतरी टिपिकल म्हणतील की, मुलगा असून, असल्याकसल्या रे आवडी तुझ्या? स्वयंपाक कस्ला करतोस तू मुलगा असून??***पण अशा तमाम ‘टिपिकल’ लोकांच्या त्याहून टिपिकल आणि जुनाट विचारसरणीला मोडीत काढत आता काही तरुण मुलं स्वयंपाकघरात प्रवेश करू लागली आहेत. आपण केलेल्या पदार्थांचे फोटो हौशीहौशीनं पाककृतीसह फेसबुक-इन्स्टावर टाकू लागलेत. पदार्थांच्या कृतीपासून ते प्लेटिंगपर्यंतची चर्चा अतिउत्साहानं जाहीरपणे करू लागलेत..आणि स्वयंपाक म्हणजे ‘बायकी’ गोष्ट, पुरुषांच्या मर्दानगीला न शोभणारी असा जुनाट स्त्री-पुरुष भेदभाव तरी किमान काहीजणांनी मोडीत काढण्याचं ठरवलं आहे. काहींनी तो मोडीतही काढला आहे. अर्थात त्याला जोड मिळाली आहे ती टीव्हीवरच्या ग्लॅमरस कुकिंग शोजची आणि त्याहून देखण्या शेफ्स अ‍ॅँकरची...कुणाच्या गालावरच्या खळ्या, कुणाची स्टाईल, कुणाची स्माईल, कुणाची अदा तर कुणाचा संताप हे सारं तरुण मुलांच्या चर्चेचा विषय तर बनलंच.पण या शेफ्सचं ग्लॅमरस करिअर, त्यांच्याकडे आलेला पैसाही दिसू लागला..ग्लॅमर-पैसा या दोन्ही गोष्टींसह हाका मारणारं हे क्षेत्र म्हणूनच आता तरुण मुलांना (हो, मुलांनाच, मुलींना कमी !!) खुणावतं आहे..आणि मी शेफ होणार, हे तरुण मुलं अभिमानानं सांगत आहेत..कुकिंग, हॉटेल मॅनेजमेण्टसह शेफ म्हणून करिअरची वाट चालणाऱ्या या नव्या प्रवासाची एक झलक...खमंग गप्पांची एक खास लजीज मेजवानीच!!