शहरं
Join us  
Trending Stories
1
पुण्यात NCP शरद पवार गटाच्या आमदाराला मारहाण; सत्ताधारी अजित पवारांच्या समर्थकांसोबत वाद
2
नकाशावरून भारताचा इशारा, आता पाकिस्तानी सैन्यानं दिली पोकळ धमकी: "यापुढे युद्ध झालं तर..."
3
३० वर्षांचे गृहकर्ज होईल व्याजमुक्त; फक्त 'इतकी' SIP सुरू करा आणि व्याजापेक्षा जास्त पैसे कमवा
4
अमित शाहांची रणनीती, बंद दाराआड पाऊण तास खलबतं; CM फडणवीस अन् दोन्ही उपमुख्यमंत्र्यांसोबत चर्चा
5
स्वामी चैतन्यानंदचे सोशल मीडियावरही 'चाळे'; मुलींच्या फोटोंवर कमेंट्स, स्क्रीनशॉट्स व्हायरल
6
४४ वर्षांपूर्वी 'या' बँकेने जारी केलं होतं पहिलं क्रेडिट कार्ड! आता देशभरात किती लोक वापरतात?
7
दिल्लीत केनियाचा खेळाडू आणि दोन प्रशिक्षकांवर भटक्या कुत्र्यांचा हल्ला; भाजप म्हणतेय... 'कलंक'
8
6 लाखांपेक्षाही खाली आली Maruti Baleno ची किंमत, GST कपातीशिवायही मिळतोय ढासू डिस्काउंट 
9
इतकी मोठी झाली उर्मिला-आदिनाथ कोठारेची लेक जिजा, दिसायला आहे आईची कार्बन कॉपी
10
राधाकिशन दमानींच्या DMart चा दुसऱ्या तिमाहीत महसूल वाढीचा धमाका; शेअरवर 'फोकस' वाढणार?
11
आता मिसाइल, दारूगोळा अन् शस्त्रास्त्र खासगी कंपन्या बनवणार; संरक्षण मंत्रालयाचा मोठा निर्णय
12
IND W vs PAK W Live Streaming: भारतीय 'रन'रागिणींचा दबदबा; पाक महिला संघ कधीच नाही जिंकला!
13
अरबी समुद्रात 'शक्ती' चक्रीवादळ घोंगावलं, हवामान खात्याचा इशारा; महाराष्ट्राला कितपत बसणार फटका?
14
...म्हणून अजित पवारांनी त्या गोष्टीचा फायदा उचलला; गृहराज्यमंत्री योगेश कदम : आदित्यला मंत्रिपद ही चूक
15
चालतंय तोवर चालवायचं असं तो वागला नाही; मग तुम्ही एवढी घाई का केली? कैफचा आगरकरांना सवाल
16
साप्ताहिक राशीभविष्य: ७ राशींना चौफेर यश, येणी वसूल-पैशांचा ओघ; बढती-नवी नोकरी, सरकारी लाभ!
17
दहा मुलांचे जीव गेल्यानंतर 'अ‍ॅक्शन'! विषारी कफ सिरप लिहून देणाऱ्या 'त्या' डॉक्टरला बेड्या 
18
महायुतीत संघर्ष पेटला! गणेश नाईकांचे 'ते' व्हिडिओ महाराष्ट्रात प्रदर्शित करू; शिंदेसेनेचा इशारा
19
पुढच्या वर्षी मेगा सरकारी नोकरभरती, एमपीएससी भरतीही रेंगाळणार नाही; फडणवीस यांची घोषणा
20
मोठी बातमी! दिवाळीच्या ताेंडावर वीज दरवाढीचा 'बॉम्ब'; प्रति युनिट ३५ ते ९५ पैशांपर्यंत बिल वाढणार

लव्ह मॅरेज तर केलं, पण आता खाने के लाले?..

By admin | Updated: May 30, 2017 18:09 IST

लग्न करण्यापूर्वी आपल्यावर पडणार्‍या जबाबदार्‍यांचं भान ठेवलं नाही तर ‘फटके’ खावे लागणारच.

 - ऑक्सिजन टीम

 
 
अनेक जण लव्हमॅरेज करतात. जेव्हा प्रेमात असतात, तेव्हा त्यांना फक्त प्रेम आणि प्रेमच दिसत असतं, त्याशिवाय दुसर्‍या कोणत्या गोष्टीचा विचारच त्यांच्या मनात येत नाही. आपल्या भविष्याचं काय, जबाबदार्‍यांचं काय, त्या आपण कशा पद्धतीने पार पाडणार याचा काहीच विचार त्यांनी केलेला नसतो. ते घरच्यांच्या विरोधात जाऊन ते लग्न तर करतात, पण काही दिवसांतच त्यांना दाल-आटे का भाव समजायला लागतो. बर्‍याचदा त्यावरुनच भांडणंही व्हायला लागतात आणि या प्रेमात खटके उडायला लागतात.
 
अशावेळी नेमकं काय होतं?
 
 
 
जेव्हा प्रेम नवं असतं, तेव्हा सगळा भर असतो, तो त्यानं तिला फिरायला नेणं, गिफ्ट्स देणं यावर. अशा वेळी तो जे कमवत असतो ते त्यांना सहज पुरतं. पण जर का अशात पळून जाऊन लग्न  करायची वेळ आली, तर?
1. सगळ्यात पहिली गोष्ट म्हणजे आर्थिक गणित गडगडतं. कारण एकूण जगण्याच्या खर्चाचा मोठा हिस्सा आईवडील उचलत असतात. आणि जेव्हा अचानक स्वतंत्रपणे संसार करायची वेळ येते तेव्हा पैसे पुरेनासे होतात.
2. घरातले आर्थिक व्यवहार, घरखर्चाचे तपशील, प्रायॉरिटीज याचा दोघांनीही विचार केलेला नसतो. त्यामुळेही आर्थिक घोळ होतात.
3. अशावेळी सामान्यपणे मुलाला पैशांचं जास्त टेन्शन येतं. आणि मुलीला भावनिक एकटेपणा जाणवायला लागतो. कारण अजूनही आपल्याकडे कमावण्याची मूळ जबाबदारी पुरुषाची आणि घराची जबाबदारी स्त्रीची असंच समजलं जातं.
 
 
 
4. पळून जाऊन, इच्छेविरुद्ध केलेलं लग्न असेल, तर मुलाकडचे त्याची आर्थिक कोंडी करतात. मुलीकडची माणसं रागावून मुलीशी संबंध तोडतात. आणि त्यामुळे हा धोका अजूनच वाढतो.
5. अशा वेळी प्रत्येक प्रश्न समजुतीनं सोडवला नाही, तर घरचे त्यांच्यात सहज फूट पाडून घरी परत ये, दुकान तुझ्या नावावर करून देतो, असं काही तरी आमिष मुलाच्या घरची मंडळी दाखवतात. जर का बायको आर्थिक चणचणीवरून कटकट करत असेल, तर मुलगा त्याकडे सहज ओढला जाऊ शकतो.
6. कधीकधी मुलीच्या घरचे तिला सांगतात, की ‘वडिलांनी जेवण सोडलंय, आईनं अंथरूण धरलंय, एकदा तरी घरी येऊन जा. आम्ही काही बोलणार नाही’ आता हे खरंही असू शकतं. पण असंही असू शकतं, मुलगी घरच्यांवर विश्वास ठेवून घरी जाते आणि मग भावनिक चक्रात अडकते. किंवा तिला कोंडून ठेवतात आणि ती परत येऊ शकत नाही.
  हे टाळण्यासाठी सांसारिक जबाबदार्‍यांचा आधी विचार करणं आणि त्यासाठी मनाची तयारी हाच सवरेत्तम मार्ग आहे. आपल्या जबाबदार्‍यांचं आपल्याला भान नसलं तर मग मोठीच आफत ओढवते आणि ही लव्ह मॅरेजेस मग निष्फळ ठरतात. परिस्थितीनं दिलेले ‘फटके’ इतके जोरदार ठरतात, की मग आपल्या निर्णयाचा पश्चात्तापही व्हायला लागतो. त्यासाठी या सार्‍या गोष्टींचा मुळातूनच विचार करायला हवा.