शहरं
Join us  
Trending Stories
1
कबुतरांना कारवर ट्रे ठेवून खाद्य, महेंद्र संकलेचाला पोलिसांचा दणका; गाडीही केली जप्त
2
'आधी तक्रार करायला सांगितलं नाही'; माजी मुख्य निवडणूक आयुक्त रावतांचं मोठं विधान, आयोगाबद्दल काय म्हणाले?
3
निवडणूक आयोगाचा मोठा निर्णय, देशभरातील तब्बल ३३४ पक्षांना दिला दणका   
4
हा निर्णय सोपा नाही; त्यात संघातून बाहेर फेकले जाण्याचीही जोखीम! रहाणेचं बुमराहसंदर्भात मोठं वक्तव्य
5
जीर्ण पाईप फुटून आण्विक कचरा समुद्रात पडला, नौदलाच्या चुकीमुळे या देशात हाहाकार
6
'अजिबात तडजोड स्विकारणार नाही', डोनाल्ड ट्रम्प-पुतीन भेटीआधीच युक्रेनचे राष्ट्राध्यक्ष झेलेन्स्कींचा इशारा
7
"देशात इंग्रजांच्या राजवटीपेक्षा भयंकर परिस्थिती, लोकशाही आणि संविधान गिळंकृत करू पाहणाऱ्या प्रवृत्तींनो चले जाव’’, हर्षवर्धन सपकाळ यांचा इशारा
8
रिंकूच्या प्रॅक्टिस वेळी खासदार मॅडम प्रिया सरोज यांची थेट ग्राउंडमध्ये एन्ट्री, व्हिडिओ व्हायरल
9
मिस्टर इंडियाप्रमाणे तुरुंगातून गायब कैदी झाला, बाहेर गेला की आतच लपला? काही कळेना, झाडांपासून, गटारांपर्यंत पोलीस घेताहेत शोध  
10
भाजप खासदार निशिकांत दुबे आणि मनोज तिवारी यांच्या विरोधात गुन्हा, वैद्यनाथ मंदिर प्रकरण काय?
11
'शरद पवारांवर राहुल गांधींच्या भेटीचा परिणाम' निवडणूक आयोगाबाबत केलेलं वक्तव्य फडणवीसांना खटकलं
12
१५ दिवस चहा प्यायला नाहीत तर काय होईल? तुम्हाला आवडतील शरिरातील 'हे' ५ पॉझिटिव्ह बदल
13
ना धक्का.. ना धोका! वनडे वर्ल्ड कप पर्यंत रोहितची कॅप्टन्सी सेफ? BCCI नव्हे तर ICC नं दिली हिंट
14
दिलीप प्रभावळकर यांना 'लगे रहो मुन्नाभाई'मध्ये अशी मिळाली महात्मा गांधींची भूमिका, म्हणाले...
15
सिक्स सेन्स? आतड्यातील बॅक्टेरिया थेट मेंदूशी साधतात संवाद; रिसर्चमध्ये आश्चर्यकारक खुलासा
16
अग्नितांडव! दिल्लीतील रुग्णालयाला भीषण आग; एकाचा मृत्यू, काचा फोडून रुग्णांना वाचवलं
17
पत्नीला कपड्यांवरून टोमणे मारणे, जेवणावरून थट्टा करणे ही क्रूरता नाही; मुंबई हायकोर्टाचा निकाल
18
ओलाची लाली उतरू लागली! ईलेक्ट्रीक मोटरसायकल आणली तरी खरेदीदार मिळेनात, जुलैची विक्री पहाल तर...
19
दररोज अंगाला साबण लावत असाल तर आताच बदला सवय; कधी, किती वेळा करायचा वापर?
20
इस्राइलच्या हल्ल्यात स्टार फुटबॉलपटूचा मृत्यू, या देशाचा ‘पेले’ अशी होती ओळख 

बिनकामाचे फोन बंद कसे कराल?

By admin | Updated: June 22, 2016 13:04 IST

आपली सुखाची झोपसुद्धा या मोबाईलनं हिरावून घेतली आहे, असं नाही वाटत? एकतर रात्री उशीरापर्यंत आपण व्हॉट्सअ‍ॅपवर मेसेज मेसेज खेळतो, त्यात जरा कुठे डोळा लागायची वेळ झाली की, मोबाईल वाजलाच म्हणून समजा!

आपली सुखाची झोपसुद्धा या मोबाईलनं हिरावून घेतली आहे, असं नाही वाटत? एकतर रात्री उशीरापर्यंत आपण व्हॉट्सअ‍ॅपवर मेसेज मेसेज खेळतो, त्यात जरा कुठे डोळा लागायची वेळ झाली की, मोबाईल वाजलाच म्हणून समजा! बरं कही कमासाठी कल आला असेल तर ठीक आहे, पण अनेक कॉल्स तसे बिनकामाचेच असतात. त्यामुळे के वळ आपली झोपमोड होते. कॉल करणाऱ्यांचा प्रचंड राग येतो. पण आपल्यालाही इतकी सवय झालेली असते की, आपण रात्रीही फोन बंद करुन टाकत नाही. पण मग आपल्या शांत झोपेसाठी करायचं काय?आता लेटेस्ट अण्ड्रॉईड अर्थात लॉलिपॉप या मोबाईल आॅपरेटिंग सिस्टम मध्ये एक असं फिचर दिलेलं आहे ज्यामुळे मोबाईल बंद क रू न न ठेवताही तुम्ही तुमचा मोबाईल काही विशिष्ट वेळेपुरता सायलेण्ट करु शकता. लॉलिपॉप मधील इंटरप्शन लॉलिपॉप या मोबाईल आॅपरेटिंग सिस्टम मध्ये सेटिंग मध्ये गेल्यावर साउंड अ‍ँंड नोटिफिकेशंस या भागात इंटरप्शन हे आॅप्शन दिसेल किंवा व्हॉल्यूम बटण दाबुन प्रायॉरिटी नोटिफिकेशन्सच्या सेटिंगमधून सुद्धा तुम्ही इंटरप्शन मध्ये जाऊ शकता. याचा वापर करुन तुम्ही तुमचा मोबाईल किती वेळ सायलेण्ट ठेवायचा हे ठरवू शकता. उदाहरणार्थ रात्री अकरा वाजेपासुन सकाळी सहा वाजेपर्यंत तुम्हाला कॉल्स आणि मेसेजसुद्धा नको आहेत, तर तसे तुम्ही स्टार्ट टाईम आणि एंड टाईम सेट करु शकता. फक़्त कॉल्स सायलेण्ट करायचे कि मेसेज सुद्धा सायलेण्ट करायचे हे सुद्धा ठरवु शकता, तसेच आठवडाभरात किती दिवस हे शेडुल ठेवायचं हे देखील ठरवू शकता. त्यासोबत तुम्हाला आॅल कॉन्टॅक्ट साठी हे डू नॉट डिस्टर्ब सेट करायचं कि फक़्त स्टार कॉन्टॅक्टसाठी सेट करायचं हे देखील ठरवता येतं. म्हणजे महत्वाचे नंबर तुम्ही स्टार कॉन्टॅक्ट म्हणुन सेव्ह केले असतील तर अशा नंबर वरुन कॉल आल्यास रिंग टोन वाजेल आणि इतर नंबर्सवरुन कॉल आल्यास रिंग टोन वाजणार नाही. यामुळे तुमचे महत्वाचे कॉल्स देखील मिस होणार नाही आणि तुमची झोप देखील होइल. म्हणुनच लॉलिपॉप मधील इंटरप्शन हे फिचर खुप लोकप्रिय होत आहे. नाईटस् किपरज्यांंच्या मोबाईल मध्ये लॉलीपॉप ही मोबाईल आॅपरेटिंग सिस्टम नाही त्यांंच्या साठी गुगल प्लेवर नाईटस् किपर हे अ‍ॅप उपलब्ध आहेत ज्याचा वापर करुन तुम्ही डु नॉट डिस्टर्ब या सुविधेचा लाभ घेऊ शकता. नाईटस् कि पर हे अ‍ॅण्ड्राईड अ‍ॅप्लिके शन तुमच्या मोबाईलवर इन्स्टॉल के ले की, तुम्ही तुमची झोपायची वेळ सेट क रू शक ता. म्हणजे पयार्याने तुमच्या झोपेला डिस्टर्ब होणार नाही.मात्र तुम्ही म्हणाल या वेळेत जर काही महत्त्वाचे कॉल आले तर? त्यासाठी नाईटस् कि पर या मोबाईल अ‍ॅपमध्ये व्हाईट लिस्ट हा एक प्रकार असतो. व्हाईट लिस्टमध्ये तुम्ही तुमचे मोजके च काही महत्त्वाचे मोबाईल कॉन्टॅक्ट अ‍ॅड क रू शक ता. म्हणजे जेव्हा या व्हाईट लिस्टमधील कॉन्टॅक्ट नंबरवरून कॉल येईल तेव्हाच तुमचा मोबाईल रिंग टोन वाजेल. अन्य नंबरसाठी मात्र तो सायलेंट मोडवर राहील. म्हणजे आपोआपच बिनकमाचे कॉल आल्यामुळे तुमची झोपमोड होणार नाही.अनिल भापकर