लीना खांडेकर, ब्युटि एक्सपर्ट -
अनेक मुलींच्या मनात एक खूटखूट असते. आपल्याला चांगलं आय लायनर लावता येत नाही. आणि महत्त्वाकांक्षाही की, एक दिवस आपण परफेक्ट आय लायनर लावूच शकू !
ती महत्त्वाकांक्षा पूर्ण करायची आणि परफेक्ट आय लायनर लावायला शिकायचं तर या काही परफेक्ट गोष्टी तुम्ही अचूक करा.
आय लायनर नक्की उत्तम लावता येईल.
१) अनेक रंगांचे आय लायनर हल्ली मिळतात. ब्राउन, ब्लॅक, ग्रीन, नेव्ही ब्ल्यू यापैकी काहीतरी ट्राय करून पहावं असं वाटतं. पण, नेमकं घ्यायचं कोणतं? त्यासाठी सोपा नियम म्हणजे आपल्या ड्रेसप्रमाणे आय लायनरचा वापर करावा.
२) पंजाबी ड्रेसवर साधारणत: ब्लॅक, ब्राउन लायनर छान दिसतात. वेस्टर्न अथवा इंडोवेस्टर्न ड्रेसेसवर बाकीचे रंग उठून दिसतात. कपड्यांना मॅचिंग असं आय लायनरही लावता येतंच.
३) सगळ्यात महत्त्वाचं म्हणजे हे निवडलेलं आयलायनर आपण लावणार कसं? तुमचे डोळे लहान असतील, तर आयलायनर हे डोळ्यांच्या बाहेरच्या बाजूनं लावावं. थोडं जाडसर लावावं. आतल्या बाजूनं काजळ लावावं. काजळाची रेषही जाडसर असावी म्हणजे डोळे मोठे दिसतील!
४) पापण्या बारीक अथवा विरळ असल्यास काजळ जाडसरच लावावं, त्यानं डोळ्यांचा आकार मोठा आणि सुंदर दिसतो.
५) डोळे मोठे असतील तर मध्यमसर जाड लायनर लावावं. फार जाड लावू नये, नाहीतर डोळे अतीच मोठे दिसतात.
६) लायनर लावताना खूप जणींना भीती वाटते की, ते नीट लागत नाही. हात थरथरतो. पण आजकाल खूप छान जेल लायनर मिळतात. ते अगदी पेन्सिलीसारखे लागतात. त्यानं डोळ्याच्या वरच्या पापणीला लागून लायनर लावावं, त्यामुळं डोळे जास्तीतजास्त उठून दिसतील.
७) सगळ्यात महत्त्वाचं म्हणजे प्रॅक्टिस, तुम्हाला लायनर लावणं खरंच खूप आवडत असेल, तर सराव करा, मस्त छान आय लायनर थोड्याच दिवसांत नक्की लावता येईल!