शहरं
Join us  
Trending Stories
1
"तळपायाची आग मस्तकात गेली आणि आता १०० टक्के खात्री पटली की..."; राज ठाकरेंचा निवडणूक जाहीर करताच पारा चढला
2
लोको पायलटने रेड सिग्नल दुर्लक्ष केला, छत्तीसगडमध्ये झालेल्या प्रवासी ट्रेन आणि मालगाडी अपघातामागील कारण काय?
3
आठवीत शाळा सोडली; मुलांसोबत टेनिस बॉलवर खेळत ‘क्रांती’ घडवली, आणि आज ती वर्ल्ड चॅम्पियन!
4
"मुख्यमंत्री होताच...!"; योगी आदित्यनाथ यांच्या 'टप्पू-पप्पू-अप्पू' विधानावरून तेजस्वी यादव यांचा मोठा पलटवार
5
बिहार विधानसभा निवडणुकीत PK यांच्या जनसुराजला किती जागा मिळणार? ओवेसींच्या पक्षाचं काय होणार? असा आहे सर्व्हेचा अंदाज
6
'...हे निवडणूक आयोगाने लक्षात ठेवावं'; मनसे नेते संदीप देशपांडेंचा थेट इशारा, कोणते प्रश्न विचारले?
7
अजित पवारांची बिहार विधानसभा निवडणुकीत वेगळी चूल; तेजस्वी यादवांविरोधात उतरवला उमेदवार, १५ उमेदवार कोण?
8
पलंगावर कुजलेल्या अवस्थेत पडलेले होत पती-पत्नीचे मृतदेह, पोटच्या मुलांनीच संपवले  
9
बिलासपूरजवळ भीषण रेल्वे अपघातात १० जणांचा मृत्यू ! जखमींच्या किंकाळ्यांनी परिसर थरारला; महाराष्ट्रातील प्रवासी किती?
10
जगाचे लक्ष अमेरिकेकडे! अणु क्षेपणास्त्र चाचणीसाठी हालचाली सुरू, ट्रम्प यांच्या विधानानंतर सैन्याने दिली मोठी अपडेट
11
बिहारमध्ये पुन्हा 'NDA राज', सर्व्हेत छप्परफाड जागा मिळण्याचा अंदाज; भाजप 'टॉप', कोण-कोण ठरणार 'फ्लॉप'?
12
महाराष्ट्रात निवडणुकीचा शंखनाद! २४६ नगरपरिषदा, ४२ नगरपंचायतींसाठी मतदान; वाचा जिल्हानिहाय यादी...
13
Bilaspur Train Accident: एक जण डब्यात अडकल्याची माहिती, बाहेर काढण्यासाठी प्रयत्न सुरू!
14
Divorce laws: 'या' देशांमध्ये घटस्फोटाचे नियम आहेत खूपच कडक; दोन ठिकाणी तर थेट बेकायदेशीर!
15
'दुधाचा अभिषेक घालायला हा काय देव आहे का?', रामराजेंचा रणजितसिंह निंबाळकरांवर निशाणा
16
Municipal Corporation Election: राज्यातील महापालिकांच्या निवडणुका कधीपर्यंत होणार? निवडणूक आयोगाने दिले उत्तर 
17
दहशतवाद सहन करणार नाही..; पहलगाम हल्ल्यावरुन इस्रायलने पाकिस्तानला सुनावले
18
भारतीय संघात निवड होताच वैभव सूर्यवंशीचा रणजी सामन्यात धमाका! पण विक्रमी शतक थोडक्यात हुकलं
19
Train Accident: छत्तीसगडमध्ये मोठा रेल्वे अपघात, प्रवासी ट्रेन मालगाडीवर आदळली, ६ प्रवाशांचा मृत्यू, अनेक जण गंभीर जखमी
20
लठ्ठ लोकांसाठी आनंदाची बातमी! हृदयरोगाचा धोका कमी, समोर आला हैराण करणारा स्टडी रिपोर्ट

तुम्हाला किती भाषा येतात?

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: August 17, 2017 03:00 IST

तुम्हाला किती भाषा येतात? म्हणजे बोलता किंवा लिहिता येतात? २ किंवा ३? हिंदी. मराठी आणि त्यातल्या त्यात इंग्रजी? आणि आपल्यातलं कोणी फारच अगदी भारी असेल तर त्यांना जर्मन किंवा फ्रेंच येत असणार. किंवा जपानी!

- प्रज्ञा शिदोरेजगात काय भारतातच कितीतरी भाषा बोलल्या जातात, त्या आपल्याला का येत नाहीत?तुम्हाला किती भाषा येतात? म्हणजे बोलता किंवा लिहिता येतात?२ किंवा ३? हिंदी. मराठी आणि त्यातल्या त्यात इंग्रजी? आणि आपल्यातलं कोणी फारच अगदी भारी असेल तर त्यांना जर्मन किंवा फ्रेंच येत असणार. किंवा जपानी!पण आपल्या या जगात किती भाषा आहेत? माहीत आहे तुम्हाला?जगात आज कमीतकमी ७१०२ माहीत असलेल्या भाषा आहेत. यातल्या २३ भाषा अशा आहेत की ज्या जगातल्या ४.१ अब्ज जनतेच्या मातृभाषा आहेत.त्यात आपला भारत असा कदाचित एकमेव देश आहे की जिथे अनेकविध भाषा बोलल्या जातात. भारताचा आकार आणि अर्थातच लोकसंख्या एवढी जास्त असल्यामुळे या महत्त्वाच्या २३ भाषांमध्ये किती भारतीय भाषा येतात?ही सगळी माहिती गोळा गेली आहे जगातल्या काही महत्त्वाच्या भाषा शास्त्रज्ञांनी. या अभ्यासामध्ये थेट अमेरिकन सीआयएपासून मंडळी कामात होती. सीआयए बरोबरच, यूएन आणि युनिव्हर्सिटी आॅफ डुसेलडॉर्फआणि वॉशिंग्टन पोस्ट यांनी ५-६ वर्षांच्या अभ्यासानंतर त्यांची निरीक्षणे एका इन्फो-ग्राफिक्सद्वारे प्रसिद्ध केली. इन्फो ग्राफिक्स म्हणजे कोणत्याही प्रकारची माहिती जर चित्राच्या आकृतीच्या माध्यमातून द्यायची झाली तर त्याला इन्फो-ग्राफिक्स असं म्हणतात. तर या मोठ्या चार्टमध्ये तुम्हाला जगातल्या मुख्य भाषा बघायला मिळतील. त्याबरोबरच ती भाषा किती लोकं आणि कुठे बोलली जाते, हेदेखील लक्षात येईल.तुम्ही नेटवर ‘वर्ल्ड आॅफ लॅँग्वेजेस’ असं सर्च केलंत तर तुम्हाला हे इंफोग्राफिक बघायला मिळेल. आणि भाषाविषयक बरीच माहिती वाचताही येईल. बघा ही साइट.https://www.scmp.com/sites/default/files/2015/11/25/languageshqscmp.png

चला, राणीच्या स्वयंपाकघरातजगातल्या सर्वात प्रसिद्ध कुटुंबाच्या स्वयंपाकघरात डोकावण्याची संधी तुम्हाला हवी आहे? फक्त डोकवायची नाही तर ते काय खातात, कसं खातात, कोणाला काय काय आवडतं, सगळं सगळं पाहायचं आहे? मग तुम्हाला हा माहितीपट पाहण्याशिवाय पर्याय नाही.आपण लहान असताना आपल्याला आपल्या आईने कित्येकदा लोकांच्या घरी गेलो की इथे-तिथे बघू नको, उचक-पाचक नको, स्वयंपाकघरात तर अजिबातच नको असं सांगितलं असेल, हो ना? पण हा माणूस थेट जगातल्या कदाचित सर्वात प्रसिद्ध आणि जगातल्या सर्वात श्रीमंत लोकांच्या यादीत असलेल्या एका कुटुंबाच्या थेट स्वयंपाकघरात जाऊन पोचला. हे कुटुंब म्हणजे थेट ब्रिटनची राणी एलिझाबेथ यांचं स्वयंपाकघर!या ‘रियल स्टोरीज’ नावाच्या निर्मात्यांनी हे सगळं नुसतं पाहिलं नाहीतर तिथल्या हेड शेफकडून सर्व पदार्थांची माहिती करून घेतली आणि मुख्य म्हणजे आपल्याला दाखवली!या ‘सिक्र ेट्स आॅफ रॉयल किचन’ नावाच्या माहितीपटामध्ये सुरुवातीला या रॉयल कुटुंबाचं वर्णन केलं आहे. त्यांच्या खाण्या-पिण्याच्या सवयी, आवडत्या डिशेस याबद्दल शेफ ग्राहम न्युबोल्ड अगदी मनापासून सांगतो. त्या सर्व परिसराचा फेरफटकाही मारून आणतो. हो, फेरफटकाच कारण हे किचन म्हणजे एका खोलीचं नाही हो. त्यामध्ये मोठा डायनिंग हॉल, एक किचन गार्डन असा सगळ्या गोष्टी आहेत... याबरोबर राणीला म्हणे रोझे नावाची वाईन फार आवडते. त्यामुळे त्यांच्या किचनमध्ये या वाईनचं मोठं भांडार आहे! कसं आहे ना, तिच्याकडे येणारे पाहुणेही कमाल असतात. एखाद्या राष्ट्राचा राष्ट्रपती असे लोकं येणार. मग इथली प्रत्येक गोष्ट सर्वोत्तम ही असलीच पाहिजे हा आग्रह.असं कोणी महत्त्वाची व्यक्ती जेवायला यायची असेल तर म्हणे या किचनमध्ये २५ ते ३० शेफ्स काम करत असतात! प्रत्येक वेळेला राणी स्वत: ही सर्व देखभाल बघते. आणि नेमकेपणा एवढा की त्यांच्याकडे दोन चमच्या मधलं अंतरही ठरलेलं असतं आणि ते मोजण्यासाठी त्यांच्याकडे विशेष उपकरणेही असतात.या आणि अशा अनेक गमती पाहण्यासाठी हा माहितीपट पाहायला विसरू नका!! हा माहितीपट तुम्हाला यू-ट्यूबवर पाहायला मिळू शकेल.त्यासाठी ही घ्या लिंक-https://www.youtube.com/watch?v=did6mMxAI6U  

तुमचे लेख आता वाचा आॅनलाइन आॅक्सिजनवरकितीजण पत्रं पाठवतात, लेख लिहितात. दर आठवड्याच्या आत पानांत सगळे लेख छापणं अवघड.आता मात्र ‘आॅक्सिजन’ने ठरवलंय की, उत्तम लेख, चांगली पत्रं थेट आॅनलाइन पोस्ट करायची ६६६.’ङ्म‘ें३.ूङ्मे/ङ्म७८ॅील्ल वर!आठवडाभरात ज्यांचे लेख आॅनलाइन प्रसिद्ध होतील, त्यांची नावं इथं ‘आॅक्सिजन’मध्येही प्रसिद्ध होतील..त्यामुळे जरुर लिहा. तुमच्या कॅम्पसविषयी, जगण्याविषयी, प्रश्नांविषयी, करिअरविषयी आणि अर्थातच यारी-दोस्ती, मौजमजेविषयी, प्रवासाविषयी आणि संघर्षाविषयीही.मनापासून, मनमोकळं. आणि पोस्टानं पाठवा किंवा ई-मेल करा.त्यासाठी शेवटच्या पानावर आमचा पत्ता आहे.ई-मेलही करता येईल. आमचा ई-पत्ता -oxygen@lokmat.comया आठवड्यात आॅनलाइन प्रसिद्ध झालेले लेख-आश्विन उमाळे, अमरावती ( कॅम्पसमधल्या फ्लॅशबॅकच्या आठवणी)आणि अजय नराळे ( स्पर्धा परीक्षा देताय? प्लॅन बी तयार ठेवा!)