शहरं
Join us  
Trending Stories
1
देशाला मजबूत पंतप्रधानांची गरज, नरेंद्र मोदी तर भाजपाचे प्रचारमंत्री; उद्धव ठाकरेंचा घणाघात
2
"मोठी किंमत चुकवावी लागेल माहितीये, पण..."; पंतप्रधान मोदींचे डोनाल्ड ट्रम्प यांच्या टॅरिफ बॉम्बवर थेट उत्तर
3
Video: भाषिक वादावरून उद्धव ठाकरे दिल्लीत कडाडले; राज ठाकरेंसोबतच्या युतीवरही स्पष्टच बोलले
4
ट्रम्प टॅरिफमुळे 'या' क्षेत्राला होणार ₹२४,००० कोटींचं नुकसान; या कंपन्यांचे शेअर्स क्रॅश, तुमच्याकडे आहेत का?
5
'सुहागरात' झाली, नवऱ्याला खोलीत कोंडून बायको बाल्कनीत आली अन्...; स्टोरी ऐकून पोलिसही चक्रावले
6
नवरा गंगास्नानासाठी गेला, बायकोने १५ लाखांच्या दागिन्यांवर डल्ला मारून बॉयफ्रेंडसह पळ काढला
7
पोस्ट ऑफिसच्या 'या' योजनेत वर्षाला फक्त १.५ लाख गुंतवून मिळवा ७० लाख रुपये, संपूर्ण रक्कम टॅक्स फ्री
8
ट्रम्पच्या ५०% टॅरिफने भारतीय उद्योगात खळबळ, पण आनंद महिंद्रांना दिसली 'संधी', दिले २ महत्त्वाचे सल्ले!
9
५० टक्के ट्रम्प टॅरिफचा वार, भारत कसा करणार बचाव? ७ पर्याय अजून खुले; अमेरिका गुडघे टेकेल!
10
ठरलेलं लग्न मोडलेला तरुण 'सैयारा' चित्रपट बघायला गेला, घरी परतला अन्...; संपूर्ण गावाला बसला मोठा धक्का!
11
संधी साधायची तर...! या ईलेक्ट्रीक कारवर मिळतोय १० लाखांपर्यंतचा डिस्काऊंट...
12
शरद पवार गटात नवे प्रदेशाध्यक्ष केवळ नामधारी? शशिकांत शिंदे नाही, रोहित पवारच अधिक सक्रिय
13
"पप्पा, मी वाचणार नाही...", मुलाचा अखेरचा कॉल; उत्तरकाशीतील दुर्घटनेनं दिली आयुष्यभराची जखम
14
"गरज असेल तर मी टक्कलही करेन...", कामातील कमिटमेंटबद्दल अभिनेत्री स्पष्टच बोलली
15
भारतानं रशियासोबत असं काही केलं की ट्रम्प यांचा होईल तिळपापड; अमेरिकेच्या दुखत्या नसेवर हात ठेवला का?
16
TCS मध्ये मोठा निर्णय! १ सप्टेंबरपासून पगार वाढणार, पण 'या' १२,००० कर्मचाऱ्यांची धडधड वाढली!
17
८ डावात फक्त एक फिफ्टी! टेस्टमध्ये 'नापास'चा ठपका; आता करुण नायर या मोठ्या स्पर्धेतून OUT
18
२०१८ मध्ये बनला उड्डाणपूल, २७ कोटींचा खर्च; अवघ्या ६ वर्षात BMC करणार जमीनदोस्त, कारण काय?
19
Trump Tariff News Apple Update: डोनाल्ड ट्रम्प यांच्या धमक्यांपुढे झुकले टीम कुक; ₹८७७७३२ कोटींची गुंतवणूक, Apple ची मोठी घोषणा
20
आकाशात उडत होतं विमान, अचानक धडकला मोठा पक्षी; विमानाचं मोठं नुकसान, प्रवासी थोडक्यात बचावले!

परफेक्ट जिन्स कशी शोधाल?

By admin | Updated: November 20, 2014 17:48 IST

‘चांगली’ जिन्स घ्यायची तर, आपल्याला नक्की काय माहिती हवं?

‘मला ना चांगली जिन्स घ्यायची आहे’
-असं म्हणणारे आणि चांगली, परफेक्ट फिटिंगची जिन्सच मिळत नाहीये अशी तक्रार करणारे तर अनेकजण असतात. 
पण मुळात ‘चांगली’ जिन्सची पॅण्ट घ्यायची म्हणजे कोणती आणि कशी पॅण्ट घ्यायची हेच कळत नाही?
‘चांगल्या’ पॅण्टचे निकष काय?
आणि जिन्स काय आपण वर्षाकाठी घेत नाही, चांगली-आवडीची जिन्स अनेकजण वर्षानुवर्षे वापरतात. मात्र अशी ‘चांगली’-‘परफेक्ट’ जिन्स शोधणं हे अत्यंत जिकिरीचं आणि अवघड काम असतं. ते कसं जमावं? त्यासाठीच ही काही सोपी सूत्रं.
 
उंच-जाड-बुटके-बारीक
-तुम्ही नेमके आहात कसे?
आपण कसं दिसावं हे वाटणं ‘वेगळं’, पण आपण जसे ‘आहोत’ तसं मान्य करणं हे वेगळं. त्यामुळे तुम्ही जसे दिसता आहात, तसे मान्य करा . आत्ता जाड आहोत, बारीक झाल्यावर वापरू असं म्हणत आता जिन्स घेण्याचं काहीच कारण नाही. त्यामुळे तसं करू नका.  आपल्या बॉडीटाईप प्रमाणं जिन्स घेणं महत्त्वाचं. 
बुटके आहात?
 तुम्ही ठेंगणे-ठुसके असाल तर त्या मापाची जिन्स घ्या. काहीजण उगाच मोठी पॅण्ट घेतात आणि मग ती घोट्यापाशी गोळा होते. घड्या दिसतात. तशी जिन्स अजिबात घेऊ नका. ते फार गबाळं दिसतं. त्यापेक्षा योग्य मापाची जिन्स घेतली तर तुमचे पाय लांबसडक दिसतील. हल्ली फॅशनेबल असणार्‍या स्किनी अर्थात तंग, पायाला चिकटणार्‍या जिन्सही तुम्ही घेऊ शकता.
उंच आहात?
उंच व्यक्तींनी लॉँग इन-सीम पॅण्ट जरुर घ्याव्यात. एक्स्ट्रा लॉँग लांबीच्या जिन्समुळे तुमचे पाय फॅँटास्टिक लांबसडक दिसू शकतात. लोक तुमच्याकडे पाहतील, ‘जिन्स’कडे नाहीत. स्किनी, तंग, पायाला चिकटणार्‍या जिन्सही तुम्ही बिनधास्त वापरू शकता.
जाडजुड आहात?
जाडजुड मुलामुलींनी जिन्स घालावी की नाही हा प्रश्न अनेकांना पडतो. तर जरुर घालावी, पण ती घालताना काही नियम नक्की लक्षात ठेवावेत. जाडसर मांड्या असतील फार तर जरा पायघोळ, घोट्यापाशी सैल असणारी, बॉटम मोठं असणारी जिन्स घ्यावी. म्हणजे मग पाय फार जाड आहेत असं वाटणार नाही. स्ट्रेट जिन्स, क्लासिक फिट जिन्स घेणं फार चांगलं. म्हणजे अनावश्यक आकारउकार दिसणार नाहीत. स्ट्रेच जिन्सही घेऊन पहायला हरकत नाही, त्यातही तुम्ही जरा बारीक दिसाल.
ट्रायल अँण्ड नो एरर
घाईगडबडीत जिन्स खरेदी करू नका. ते फुरसतीचं काम आहे. 
8 आवडली, ब्रॅण्डेड आहे, आपल्याच साईजची आहे म्हणून घालून न पाहता जिन्स कधीच विकत घेऊ नये. ट्राय करुन पहाणं मस्ट.
8 ती जिन्स घालून चालून पहा. वाका. खाली बसा. खाली वाकून काहीतरी उचला. जर ती कंबरेतून घसरतेय,खाली सरकतेय असं वाटलं तरी कितीही आवडली तरी ती जिन्स अजिबात खरेदी करु नका. अशी ‘घसरणारी’ जिन्स सावरत बसणं फार वाईट दिसतं. बेल्ट लावू, त्यात काय असं म्हणणं तर अजूनच वेडेपणा.
-  घट्ट होणारी जिन्स घेऊ नका, वजन कमी करतोय, बारीक झाल्यावर घालू, अजिबात नाही. घ्यायची तर मापाचीच. फार सैल नको, फार घट्ट नको.
- वेगवेगळ्या स्टाईल्सच्या जिन्स घालून पहा. त्यातून आपल्याला कोणती चांगली दिसते हे नक्की कळेल.
- जिन्स खरेदीला जाताना मित्राला, मैत्रिणीला सोबत घेऊन जा. म्हणजे कुठली जिन्स चांगली दिसतेय, हे तो नक्की सांगेल.
-  तुमचा पूर्ण फोकस हा फिटिंगवर ठेवा, ब्रॅण्डवर नाही. 
 
जिन्स नव्हे, इन्व्हेस्टमेण्ट!
- परफेक्ट जिन्स मिळणं हे अवघड काम. त्यात जर तुम्हाला हवी तशी परफेक्ट जिन्स मिळालीच तर बजेट थोडं ताणून ती जरुर घ्या. म्हणजे ती चांगली जिन्स तुम्ही नियमित काही वर्षे वापरू शकता. पैसे वसूल होऊ शकतात.
- स्वस्तातल्या, भलत्याच कलरच्या जिन्स घेऊ नका. त्या वापरल्या जात नाहीत, पैसे वाया जातात.
- उत्तम जिन्स म्हणजे ‘लक’, शोधत रहा, सापडेल!
- प्राची खाडे 
स्टायलिस्ट आणि पर्सनल शॉपरपरफेक्ट जिन्स