शहरं
Join us  
Trending Stories
1
ईडीचे १२ ठिकाणी छापे, यशवंत सावंतांच्या घरी सापडलं घबाड; ७२ लाखांची रोकड, ७ लग्झरी कार जप्त
2
Nepal Crisis : नेपाळच्या लष्करप्रमुखांनी राष्ट्राला संबोधले, मागे हिंदू राजांचा फोटो, नेमके राजकारण काय?
3
रशियन नोकऱ्या स्वीकारू नका; जीवावर बेतू शकतं... परराष्ट्र मंत्रालयाचा भारतीयांना थेट इशारा
4
ना चीनला पळाले, ना दुबईत गेले; 'या' सीक्रेट जागेवर लपलेत नेपाळचे माजी पंतप्रधान केपी शर्मा ओली!
5
iPhone 17 Series:'फोल्ड करून दाखवा', आयफोन १७ सिरीज लाँच होताच सॅमसंगने अ‍ॅपलची खिल्ली उडवली
6
"घाई काय आहे, अजिबात नाही"; भारत-पाक सामन्यावर सुप्रीम कोर्टाने दिला तीन वाक्यात निकाल
7
एफडी विसरा... पोस्ट ऑफिसच्या 'या' योजनेत ५.५५ लाख रुपयांचा फिक्स परतावा; दरमहा मिळेल व्याज
8
Navya Malik : आधी मैत्री, मग ग्राहक बनवायची; नेत्यांच्या मुलांना केलं वेडं, ड्रग्ज क्वीनने ८५० श्रीमंतांना लावलं व्यसन
9
मराठा आंदोलनानंतर आता ओबीसींचा मोर्चा मुंबईत धडकणार; तारीख ठरली
10
फ्रान्समध्ये सरकारविरोधात लाखो लोक रस्त्यावर का उतरले? चार कारणे समजून घ्या
11
अवघ्या १५ दिवसांच्या बाळाला फ्रीजमध्ये ठेवून झोपली आई; कारण समजताच कुटुंबीय हादरले!
12
Asia Cup 2025: भारत-पाकिस्तान सामना रद्द होणार? सुप्रीम कोर्टात याचिका दाखल, जाणून घ्या A टू Z माहिती
13
संतोष देशमुख हत्या खटल्याची सुनावणी लांबविण्याचा प्रयत्न; विशेष सरकारी वकील उज्ज्वल निकम यांचा न्यायालयात आरोप
14
भारतातून पळालेल्या झाकीर नाईकला झाला एड्स? आता मलेशियामधून समोर आली अशी माहिती
15
IND vs UAE: अभिषेक शर्माची रेकॉर्ड बूकमध्ये नोंद, 'अशी' कामगिरी करणारा चौथा भारतीय
16
हृदयद्रावक! शाळेत खेळता खेळता श्वास थांबला; ११ वर्षांच्या मुलीचा कार्डिएक अरेस्टने मृत्यू
17
मंगळावर खरंच जीवसृष्टी होती? NASA रोव्हरने शोधून काढली अशी गोष्ट, तुम्हीही व्हाल अवाक्
18
दोन iPhone 17 च्या किंमतीत मिळू शकते एक कार, इतक्या पैशांत सामान्य व्यक्ती काय काय खरेदी करू शकते?
19
लॅरी एलिसन यांनी मस्क यांना टाकलं मागे! बनले जगातील सर्वात श्रीमंत व्यक्ती; काय करतात व्यवसाय?
20
कोण आहेत अबिदुर चौधरी? ज्यांनी डिझाईन केला Apple चा सर्वात स्लीम iPhone 17 Air

इमेजमधून टेक्स्ट कसं कॉपी करणार?

By admin | Updated: February 26, 2015 21:18 IST

सबमिशनची घाई, पाठव रे म्हटलं नोट्स, तर दोस्त व्हॉट्स अॅपवर टाकणार फोटो, त्यातून मॅटर बाहेर कसं काढणार?

शैल्या जाम अस्वस्थ होता. प्रोजेक्टचं सबमिशन दोन दिवसांवर येऊन पोचलं होतं. थर्मोडायनामिक-आधारित प्रोजेक्ट असल्यानं एक विशिष्ट पुस्तक त्याला प्रोजेक्ट लिहिण्यासाठी आवश्यक होतं. दोन ब्रिटिश ऑथर्सची पुस्तक होती त्याच्याकडे; पण त्यातली भाषा डोक्यात शिरत नव्हती. आणि डोक्यात न शिरलेलं कागदावर उतरवलं तर ‘ओरल’मधे भलतीच वाट लागली असती. याच प्रोजेक्टसाठी महत्प्रयासानं मिळवलेलं एका आपल्याकडच्या लेखकाचं पुस्तक त्यानं सहज बघण्यासाठी म्हणून पुढच्या वर्गात असलेल्या राहुलला दिलं आणि त्याला अचानक गावी जावं लागलं. त्याची आई आजारी असल्यामुळं तीन-चार दिवस तरी तो येऊ शकणार नव्हता. पुस्तक कुरिअरने पाठवावं म्हटलं तरी हातात फार वेळ नव्हता. त्यामुळे त्यानं राहुलला विनंती केली की, बाबा काहीही कर, पण त्यातली मला आवश्यक असलेली 1क्-12  पानं व्हॉट्स अॅपवर पाठव. राहुलने फोटो काढून ती पाठवली. पानं तर आली पण त्यातला टेक्स्ट त्याला कॉपी करणं शक्य नव्हतं. कारण व्हॉट्स अॅपवर पानांच्या इमेजेस आल्या होत्या. पुस्तक समोर असतं तर स्कॅन करून पीडीएफमधून थेट टेक्स्ट कॉपी करता आलं असतं. पण इमेजेसमधून टेक्स्ट कसं कॉपी करणार?
- खरं तर या अवघड वाटणा:या प्रश्नाचं उत्तर अगदी सोपं आहे. 
ओसीआर अर्थात ऑप्टिकल कॅरॅक्टर रेकिग्नेशन या पद्धतीने पीडीएफमधून आपल्याला टेक्स्ट सहज कॉपी करता येतं. पण इमेजेसच्या बाबतीत ते इतकं सहजरीत्या होत नाही. पण आता त्यासाठीही एक जादुई अॅप्लिकेशन उपलब्ध झालं आहे. जीटी टेक्स्ट हे त्या सॉफ्टवेअरचं नाव. 
हे सॉफ्टवेअर वापरायचं कसं हे कळलं ना, तर तुमच्या अनेक अडचणी एकदम सहज सुटतील!
 
 
जीटी-टेक्स्ट
काम कसं करतं?
 
1) सगळ्यात आधी https//code.google.com/p/gettext/downloads/list
या लिंकवर जा. आणि जीटी-टेक्स्ट हे अॅप्लिकेशन डाऊनलोड करून घ्या.
2) या अॅप्लिकेशनची विविध व्हर्जन्स या लिंकवर उपलब्ध आहेत. त्यातील साधारण 13 एमबी आकाराचे अॅप्लिकेशन (डॉट ईएक्सई फाईल) डाऊनलोड करून घ्या. हे या अॅप्लिकेशनचे ऑफलाइन व्हर्जन आहे.
3) डाऊनलोड झाल्यानंतर हे अॅप्लिकेशन तुमच्या विंडोज मशीनवर किंवा लॅपटॉपवर इन्स्टॉल करा. छापील टाईप्ड टेक्स्ट असलेली एखादी इमेज कॉम्युटरवर सेव्ह करून ठेवा. यातील टेक्स्ट आपण आता या अॅप्लिकेशनच्या आधारे कॉपी करण्याचा प्रयोग करू. 
4) अॅप्लिकेशन इन्स्टॉल झाल्यानंतर जीटी-टेक्स्ट असा आयकॉन तुमच्या कॉम्प्युटरवर दिसायला लागेल. 
5) त्यावर डबल-क्लिक केल्यानंतर इमेज सिलेक्ट करण्यासाठीची विंडो सर्वात आधी ओपन होईल. त्याद्वारे छापील टेक्स्ट असलेली इमेज सिलेक्ट करा. 
6) सिलेक्ट केलेली इमेज जीटी-टेक्स्ट अॅप्लिकेशनच्या विंडोमध्ये ओपन झालेली तुम्हाला दिसेल. दिलेल्या टूलबारवरील दुस:या क्रमांकाच्या टूलच्या आधारे इमेजमधील टेक्स्ट असलेला भाग सिलेक्ट करा.
7) टेक्स्ट असलेला भाग सिलेक्ट केल्यानंतर लगेचच एक पॉप-अप विंडो ओपन होईल. त्यात तुम्ही सिलेक्ट केलेलं टेक्स्ट एडिटेबल स्वरूपात तुम्हाला दिसेल. 
8)  कॉपी झालेल्या टेक्स्टमध्ये काही त्रुटी असतील तर ‘ट्राय अगेन’ यावर क्लिक करा. करेक्टेड टेक्स्ट दिसायला लागेल. 
9) आता हे टेक्स्ट तुम्ही कॉपी करून थेट नोटपॅड किंवा इतर कोणत्याही अॅप्लिकेशनमध्ये थेट पेस्ट करू शकता. 
1क्) रोमन लिपीतील कोणतेही टेक्स्ट याद्वारे कॉपी करणो शक्य आहे. 
मात्र इतर भारतीय लिपींतील टेक्स्ट तुम्हाला या पद्धतीनं कॉपी करता येणार नाही.
 
 
 
 
जीमेलवरच्या फोटोतून 
डायरेक्ट टेक्स्ट?
 
जीटी अर्थात ग्राऊंड ट्रूथ असे या प्रकल्पाचे नाव आहे. 
हा प्रकल्प गुगल कोड प्रोजेक्टचा एक भाग असल्याकारणानं वापरण्यास अत्यंत सुरक्षित आहे. पुढे चालून हा प्रकल्प गुगलच्या कोणत्याही सेवेमध्ये सामावून घेतला जाऊ शकतो. म्हणजे काय तर भविष्यात जी-मेलमध्ये आलेल्या इमेजेसमधूनही  थेट टेक्स्ट कॉपी करता येणं शक्य होऊ शकतं. अर्थात  तुम्हाला त्या भविष्यकाळाची वाट पाहण्याची गरज नाही. तुम्ही आजच हे अॅप्लिकेशन ट्राय करू शकता!