शहरं
Join us  
Trending Stories
1
१९ तारखेला अत्यंत स्फोटक माहिती उघड होणार, ज्यानं भाजपा नेत्यांची फजिती होईल; संजय राऊतांचा दावा
2
महायुतीत एकनाथ शिंदेंची कोंडी; मुंबईत भाजपानं शिंदेसेनेला केवळ ५२ जागांचा दिला प्रस्ताव?
3
टीम इंडियाला मल्टीप्लेक्समध्ये पाहून सगळचे चकीत झाले...; मैदानातील सगळेच धुरंधर 'धुरंधर' पहायला गेलेले...
4
Crime: बुरखा न घातल्यानं पती संतापला, पत्नीसह पोटच्या २ मुलींना संपवलं; मृतदेह पुरले खड्ड्यात!
5
कोण आहे डोनाल्ड ट्रम्प यांची होणारी सून...! मंगळवारीच उरकला साखरपुडा, दोघे भारतातही येऊन गेलेले...
6
उद्धव-राज विरुद्ध भाजप-शिंदेसेना असाच सामना; १३८ मराठी बहुल मतदारसंघ या निवडणुकीत ठरणार निर्णायक
7
सरकार आणखी एका बँकेतील हिस्सा विकण्याच्या तयारीत; खात्यात येणार २१०० कोटी, सध्या आहे ९५% हिस्सा
8
'उद्याच्या तेजस्वी पहाटेसाठी!' रितेश देशमुखचा छत्रपती शिवाजी महाराजांच्या भूमिकेतील पहिला लूक समोर
9
"महापालिका निवडणूक लुटण्याचे वाटे केले गेले"; अंजली दमानियांचा निशाणा, महायुतीवर भडकल्या
10
प्रसिद्ध दिग्दर्शक आणि पत्नीच्या हत्या प्रकरणाला नवं वळण, पोलिसांनी लेकालाच केली अटक
11
निवडणुका जाहीर होताच तापले युती अन् आघाडीचे राजकारण; महाराष्ट्रात काही ठिकाणी गणित बिघडणार
12
अमेरिकन शेअर बाजारात मोठा बदल! नॅस्डॅक २४ तास ट्रेडिंग सुरू करण्याच्या तयारीत; भारतीय गुंतवणूकदारांवर काय होणार परिणाम?
13
अमेरिकेत पॅलेस्टिनसह इतर ७ देशांतील नागरिकांना प्रवास बंदी; डोनाल्ड ट्रम्प यांचा मोठा निर्णय
14
Stock Market Today: सुस्त सुरुवातीनंतर सेन्सेक्स-निफ्टीमध्ये किंचित वाढ; ICICI Bank, Nestle, HDFC Bank मध्ये घसरण
15
महालक्ष्मी व्रत उद्यापन: ४ गुरुवार नेटाने केलेल्या महालक्ष्मी व्रताचे १८ डिसेंबर रोजी उद्यापन कसे करावे? वाचा विधी
16
'१२ लाख सैनिकांची गरज काय? त्यांना दुसरे काम लावा'; पृथ्वीराज चव्हाण यांनी स्पष्टच सांगितलं
17
आई मंदिराबाहेर फुले विकायची...! आयपीएलने मुलाला बनविले 'करोडपती', वडील मैदानावर...
18
LIC ची कोणत्या कंपनीत किती गुंतवणूक? सरकारनं दिली महत्त्वाची माहिती; टाटा, रिलायन्स, अदानीसह कोणत्या कंपन्या?
19
अंबरनाथमध्ये भाजपाचे उमेदवार पवन वाळेकर यांच्या कार्यालयावर गोळीबार; घटना सीसीटीव्ही कॅमेऱ्यात कैद
20
मुंबई-दिल्ली एक्स्प्रेसवेवर भीषण अपघात! धडक होताच उडाला भडका, तीन जणांचा आगीत झाला कोळसा
Daily Top 2Weekly Top 5

Smart शहरं असतात कशी?

By admin | Updated: September 24, 2015 14:51 IST

स्मार्ट सिटींचा एवढा गाजावाजा चाललाय, पण स्मार्ट सिटीत राहायचं म्हणजे जगण्याचा अनुभव कसा बदलतो,याची ही एक झलक.

 
 
भारत सरकारचा स्मार्ट सिटीज प्रकल्प चांगलाच चर्चेत आहे. या प्रकल्पात निवड होण्यासाठी त्या-त्या राज्यांनी सुचविलेल्या भारतातल्या शहरांची चक्क स्पर्धा घेण्यात आली. या स्पर्धेत आपला अर्ज करण्यापूर्वी ब:याच शहरांनी नागरिकांकडून सूचनाही मागवल्या. हे सगळे करून शेवटी 98 शहरांची अंतिम निवड या दीर्घकालीन प्रकल्पासाठी करण्यात आली. त्यात महाराष्ट्रातील 11 शहरं आहेत.
पण स्मार्ट सिटी म्हणजे नेमके काय हो?
पहिली गोष्ट म्हणजे शहरांचा स्मार्टनेस हा फक्त टेक्नॉलॉजीपुरता मर्यादित नाही, तर त्यात दोन गोष्टी महत्त्वाच्या आहेत. यातली पहिली गोष्ट म्हणजे शहरातल्या नागरिकांचे जीवन अधिक सोयीस्कर आणि सोपे कसे होईल हे बघणं. दुसरी महत्त्वाची गोष्ट म्हणजे पृथ्वीचा फक्त दोन टक्के भूभाग व्यापलेल्या जगभरातील शहरांसाठी तब्बल 75 टक्के नैसर्गिक साधनसंपत्ती खर्च होते. शहरासाठी लागणा:या नैसर्गिक संसाधनांचा वापर अधिक काटकसरीनं आणि योग्य पद्धतीने होईल हे बघणं हा स्मार्ट सिटीचा एक महत्त्वाचा भाग आहे. आणि या दोन्ही गोष्टींसाठी योग्य तंत्रज्ञानाचा वापर ही यातली कळीची गोष्ट आहे. 
भारतात जरी शहरांना स्मार्ट करण्याच्या दिशेने पहिले पाऊल आता उचलले असले, तरी जगभरात अनेक शहरांमधे अनेक स्मार्ट उपक्र म तिथल्या जगण्याचा भाग बनले आहेत. असे काही उपक्र म तर भारतातल्या शहरात लगेच राबवावेत असे आहेत. अशा या उपक्र मांची ही एक ओळख.
कोपेनहेगेनच्या रस्त्यांवरील स्मार्ट दिवे
आपल्याकडे जरी ब:याच विनोदांचा भाग असला तरी रस्त्यांवरचे दिवे हा शहराच्या इन्फ्रास्ट्रक्चरमधला एक महत्त्वाचा भाग असतो. रस्त्यांवरील दिव्यांवरचा खर्च पालिकांच्या विजेवरील खर्चाच्या जवळपास 25 ते 30 टक्के इतका अवाढव्य असतो. बरं हा फक्त प्रकाशाची सोय आणि त्याचा खर्च एवढाच प्रकार नाही. रस्त्यांवरचे दिव्यांचे जाळे शहरभर पसरलेले असते. त्याचा वापर स्मार्टपणो करू शकलो तर?
हाच विचार करून कोपेनहेगेनमघील हस्र्टेडमधे स्मार्ट स्ट्रीटलाईट्सचा प्रकल्प राबविण्यात आला आहे. यात आपल्या जुन्या हॅलोजन बल्बऐवजी एलईडी वापरण्यात आले आहेत. हे सगळे एलईडी बल्ब नेटवर्क कनेक्टेड आहेत. या प्रत्येक बल्बला स्वत:चा आयपी अॅड्रेस व  त्याचबरोबर सेन्सॉर्स आहे. यामुळे एका मध्यवर्ती नियंत्रण कक्षातून जिथे गरज तिथलेच दिवे ऑन, जिथे गरज तिथे लागेल तितक्याच तीव्रतेचा प्रकाश ठेवता येतो. हा प्रकल्प हळूहळू देशातल्या सर्व शहरांत राबविला जाणार आहे. त्याशिवाय लाईटच्या खांबांच्या जाळ्याचा वापर मोबाईल किंवा वायफाय नेटवर्कयासारख्या सोयींसाठी करण्याचीही योजना आहे.
दिल्लीसारख्या शहरात रस्त्यांवरील सर्व दिव्यांसाठी फक्त एलईडी वापरण्यानेच तब्बल 7क्क् कोटी रु पयांची आणि 25 कोटी विजेच्या युनिटची बचत होणार आहे. 
स्मार्ट सिंगापूर
भारतात असल्यासारखी सगळ्या गोष्टींची मुबलकता सिंगापूरमधे नाही. बेटावर वसले असल्याने तिथे जागा आणि सर्व नैसर्गिक साधनसंपत्ती अगदीच तुटपुंजी आहे. याशिवाय सिंगापूरमधील लोकसंख्येची घनता जगात सर्वात जास्त आहे. या देशात एका स्क्वेअर किलोमीटरमध्ये तब्बल 8क्क्क् नागरिक दाटीवाटीने राहतात. यामुळे सिंगापूरला स्मार्ट बनण्याशिवाय पर्यायच नाही. या परिस्थितीवर मात करण्यासाठी तिथल्या सरकारने सिंगापूरला जगातला पहिला स्मार्ट देश बनवण्याचा महत्त्वाकांक्षी प्रकल्प हाती घेतला आहे.
सिंगापूरच्या अनेक प्रश्नांपैकी एक महत्त्वाचा प्रश्न म्हणजे तिथली वाहतूक व्यवस्था. प्रचंड लोकसंख्या, अतिशय प्रगत अर्थव्यवस्था आणि अपुरी जागा यामुळे वाहतुकीचा प्रश्न तिथे कायम ऐरणीवर असतो. यामुळे सिंगापूरने खासगी कार्सची संख्या वाढणार नाही याची दक्षता घेतली आहे. सार्वजनिक वाहतूक व्यवस्था अधिकाधिक सक्षम करून त्यांनी सिंगापूरची सार्वजनिक वाहतूक व्यवस्था दृष्ट लागावी इतकी सोयीची केली आहे. याशिवाय दळणवळण सुरळीत होण्यासाठी वाहतूक नियंत्रणाचे निर्णय त्या-त्या वेळच्या वाहतूक आणि गर्दीच्या ताज्या आकडेवारीवरच्या आधारे घेतले जातात. याशिवाय ही माहिती प्रवाशांनाही पोचवली जाते. त्यामुळे वाहतुकीला शिस्त राहून वेळ, पैसा आणि इंधन या तिन्ही गोष्टी वाचतात. 
सिंगापूरमधे जागोजागी टोलनाके आहेत. आपल्याकडील टोलनाक्यांचा अनुभव बघता हा अनुभव सिंगापूरसारख्या छोटय़ा देशाला परवडणारा नव्हताच. यावर उपाय म्हणून सिंगापूरमधे ईआरपी म्हणजे इलेक्ट्रॉनिक रोड प्राईसिंगची यंत्रणा आहे. यात प्रत्येक कारमधे समोरच्या काचेजवळ डॅशबोर्डवर आपण मोबाइल स्टॅंड ठेवतो तसे एक प्रीपेड कार्ड ठेवलेले डिव्हाइस लावलेले असते. इथले टोलनाके म्हणजे फक्त एक स्मार्ट कमान असते. कार या कमानीतून गेली की कारमधल्या प्रीपेड बॅलन्समधून आपोआप टोल वजा होतो. त्यातही टोलची रक्कम वेळ, गर्दी यासारख्या गोष्टींवर अवलंबून असते. आणि जर तुमच्या कार्डमध्ये बॅलन्स नसेल तर दंड भरण्याची नोटीस आपोआप पोस्ट होते.
स्मार्ट सिटी जर आपलं शहर होणार असेल तर आपलं आयुष्य नक्की कसं बदलणार, याची बेसिक माहिती तरी आपण ठेवायलाच हवी!
- गणेश कुलकर्णी