शहरं
Join us  
Trending Stories
1
ज्योती मल्होत्रानंतर ISI च्या आणखी एका एजंटला अटक, उत्तर प्रदेश एटीएसची कारवाई
2
IPL 2025 Playoffs Scenarios: आता एका जागेसाठी ३ संघ! MI अन् DC त कडवी टक्कर; LSG चं काही खरं नाही
3
ज्योती मल्होत्रा बनली होती पाकिस्तानसाठी 'अ‍ॅसेट', 'ऑपरेशन सिंदूर'च्या काळात होती शत्रूच्या संपर्कात
4
IPL 2025 : गुजरात टायटन्ससह रॉयल चॅलेंजर्स बंगळुरु अन् पंजाब किंग्जला मिळालं प्लेऑफ्सचं तिकीट
5
RSS मुख्यालयावरील हल्ल्याचा सूत्रधार सैफुल्लाचा १९ वर्षांनंतर खात्मा, संघ वर्तुळातून ‘अज्ञात’ व्यक्तीच्या कृतीचे स्वागत
6
IPL च्या इतिहासात असं पहिल्यांदाच घडलं; शुबमन गिल-साई जोडीच्या जोरावर GT नं साधला विक्रमी डाव
7
मुंबईत तिहेरी हत्याकांड! दोन कुटुंबाचा वाद विकोपाला, कोयत्यानेच एकमेकांवर हल्ला; ४ जण जखमी
8
'गौरव गोगोई ट्रेनिंगसाठी पाकिस्तानला गेले होते', काँग्रेसच्या खासदारावर भाजपच्या मुख्यमंत्र्याचा गंभीर आरोप
9
Mumbai: ड्रग्ज तस्करांना दणका! १३ कोटींचे एमडी जप्त; मुंबई आणि नवी मुंबईतील पाच जणांना अटक
10
Solapur Fire: आगीत ८ जणांचा मृत्यू, PM मोदींनी व्यक्त केला शोक; CM फडणवीसांकडून पाच लाखांच्या मदतीची घोषणा
11
किंग कोहलीपेक्षा फास्टर निघाला KL राहुल! टी-२० त जलदगतीने गाठला ८००० धावांचा पल्ला
12
हल्दी घाटीमध्ये सराव, CDS ची रणनीती आणि..., अशी आहे ऑपरेशन सिंदूरच्या यशाची Inside Story  
13
गडचिरोली: यू-टर्न घेताना घात झाला अन् भरधाव ट्रक येऊन धडकला, कारमधील चौघे जागीच ठार
14
नाम तो सुना होगा! केएल राहुलनं शतकी खेळीसह रचला इतिहास; असा पराक्रम करणारा एकमेव फलंदाज
15
कुख्यात दहशतवादी सैफुल्लाह खालिद ठार, भारतात झालेल्या तीन हल्ल्यांमागे होता हात, पाकिस्तानमध्ये अज्ञातांनी झाडल्या गोळ्या  
16
शिक्षण घोटाळ्यात नागपूर पोलिसांची एसआयटी स्थापन, अनेक मोठ्या अधिकाऱ्यांचा भांडाफोड होण्याची शक्यता
17
या महिलेवर लक्ष ठेवा, त्याने वर्षभरापूर्वीच दिला होता इशारा, आता त्या ट्विटची होतेय चर्चा
18
अभिनेत्री नुसरत फारियाला ढाका विमानतळावर अटक; कोणत्या प्रकरणात झाली कारवाई?
19
आणखी एका पाकिस्तानी हेराला ठोकल्या बेड्या, ISIला भारताची गोपनीय माहिती पुरवणारा अरमान अटकेत  
20
RR विरुद्धच्या विजयासह PBKS चा प्लेऑफ्सचा पेपर झाला सोपा! आता GT च्या निकालावर असतील नजरा, कारण...

डोकं बंद पाडणारा आजार

By admin | Updated: July 16, 2015 19:36 IST

सतत दारू प्याल्यानं मेंदूच आकसून जातो. त्याच्या न काही लक्षात राहतं, ना हातापायांना काम करा म्हणण्याचं बळ त्याच्यात उरतं. तो आजारी-मलूल होऊन मुकाट पडून राहतो.

मनोज कौशिक
 
सतत दारू प्याल्यानं मेंदूच आकसून जातो. त्याच्या न काही लक्षात राहतं, ना हातापायांना काम करा
म्हणण्याचं बळ त्याच्यात उरतं. तो आजारी-मलूल होऊन मुकाट पडून राहतो.
------------
व्यसन हा एक आजार आहे, हे मला काही केल्या पटेना!
व्यसनाला आजार कसं म्हणायचं, हा प्रश्न माझी पाठ सोडत नव्हता. म्हणून मग मी त्याच्याबद्दल बरीच माहिती गोळा करण्याचा प्रयत्न सुरू केला.
‘हिलिंग द अॅडिक्टेड ब्रेन’ नावाचं एक समजायला सोपं असं पुस्तक त्यात हाती लागलं. या पुस्तकात स्पष्ट म्हटलंय की, काही वर्षापूर्वीर्पयत व्यसनांचे मेंदूवर झालेले परिणाम आणि व्यसन केल्याने माणसाच्या मेंदूवर नेमका काय आणि कसा परिणाम होतो हे माणूस मरेर्पयत समजत नसे. परंतु नवी आधुनिक तंत्रे म्हणजे  एमआरआय आणि पीईटी सारखी अत्याधुनिक साधनं हाताशी असल्यानं. त्याद्वारे मेंदूचा अभ्यास केला तर मेंदूत व्यसनांनी नेमकी काय गडबड होते ते शास्त्रज्ञांना स्पष्टपणो समजले आहे, आणि तेही माणूस जिवंत असताना! या नव्या साधनांमुळे आपण आता मेंदूत कोणत्या घडामोडी होत आहेत ते पाहू शकतो. आणि त्यामुळे मेंदूत होणारा नेमका बिघाड आणि बरे होत जाण्याची प्रक्रि याही समजून घेऊ शकतो.
आकसलेला मेंदू
व्यसनाचा विशेषत: दारूच्या दीर्घकाळ सेवनाचा मेंदूवर होणारा पहिला दृश्य परिणाम म्हणजे मेंदू आक्रसून जाणं. या आक्र सण्यानं मेंदूचा कार्यशील भाग कमी होतो. सर्वाधिक परिणाम आपल्या कपाळाच्या मागे असलेल्या कॉरटेक्स या वळ्यावळ्यांनी घडलेल्या फ्रोण्टल लोब्स या भागात होतो. फ्रोन्टल लोब्सचे प्रमुख काम, स्मरणशक्ती, निर्णय घेणो, कोणतीही गोष्ट अविचाराने न करणो, बुद्धिमत्ता,  आवश्यक असणारी सर्व कामे करणं हे असतं. याशिवाय सामाजिक भान आणि लैंगिकता ही दोन महत्त्वाची कामे तो करीत असतो. या सगळ्या गोष्टी आपल्या कपाळाच्या थेट मागे असल्याने, बोलीभाषेत आपले भविष्य आपल्या कपाळावर लिहिलेले आहे असं म्हणत असावेत कदाचित.
जे पुस्तकात लिहिलंय तसंच माणसांचं काही होतं का, हे समजून घेण्यासाठी मी मुक्तांगणमधील रुग्णमित्रंशी बोलण्याची, त्यांचे अनुभव ऐकण्याची परवानगी दत्ता श्रीखंडे यांच्याकडे मागितली. त्यांनी सुचवले की, एकदोन वर्षे व्यसनमुक्त असलेले मित्र अधिक माहिती देऊ शकतील. त्यांनी तीन-चार नावे सुचवली, फक्त त्यांची नावं छापू नका म्हणाले.
नावापेक्षा बोलणं महत्त्वाचं होतं म्हणून मग मी एका दोस्ताला भेटलो. प्रश्न न विचारता, त्यांचे अनुभव ऐकायचे असंही ठरवलं. 
एकजण सांगू लागला, ‘‘मी एका सहकारी बँकेत ऑफिसर म्हणून काम करीत होतो. माझी बदली खूप लांब असलेल्या जिल्ह्यातील एका शाखेत केली. मुलांची शिक्षणं आणि बायकोची नोकरी पुण्यातच असल्याने मी एकटाच तिकडे  होतो. आधी दर शनिवारी मी येत असे. परंतु नव्या जागेत मी एकटा एकटा राहू लागलो. संध्याकाळ खायला उठायची. मग दारू जास्त प्रमाणात सुरू झाली. आणि संध्याकाळचे सहा वाजले की डोक्यात घंटी वाजू लागे, हात थरथरू लागत. मग बँकेतले काम किती तरी वेळा अर्धवट सोडून मी घरी जायचो आणि  कधी बाटली उघडीन असं व्हायचं. ते प्रमाण इतकं वाढलं की सकाळी नऊर्पयत मी बेशुद्धच असायचो. अनेकदा शिपाई घरी येऊन किल्ल्या घेऊन जायचा. गाव छोटे असल्यानं माङया दारू पिण्याबद्दल गावात चर्चा होऊ लागली. घरी पाठवून उरलेले पैसे पुरेनात. तेव्हा मी कर्जदाराकडून कर्ज मंजुरीच्या बदल्यात व्हिस्की खोकी घेणं सुरू केलं. एकेकाळी झपाटय़ानं काम करणारा म्हणून मी प्रसिद्ध होतो. आता मला कामे उरकेचनात. पूर्वी कर्ज प्रकरणो मी अतिशय काळजीपूर्वक तपासत असे. त्याच्यावर माङया सुंदर अक्षरात टिपणी लिहिलेली असे. पण हळूहळू माङो अक्षर मलाच वाचता येईना. एकेकाळी सर्व महत्त्वाच्या ठेवीदारांची कुंडली माझी पाठ असे. परंतु आता ते जर आले तर त्यांचे नाव आठवायला मला कष्ट पडत. एवढंच काय पण दोन दिवसांपूर्वी मी कोणाला काही सांगितलं तर तेही विसरायला लागलो. कुठलाही निर्णय मी खाडकन घेत असे किंवा काही कारण नसताना लांबवत असे. माङया कामात फालतू चुका व्हायला लागल्या. रात्रीचं जेवण बंदच झालं होतं.
माझी दारू कमी व्हावी म्हणून बायको रजा घेऊन माङया गावी येऊन राहिली आठ दिवस. पण मी तिला हूल देऊन दुस:या  गावातील बारमध्ये जाऊन पीत असे. चार दिवस घरीच आलो नाही. लांब जाऊन एका हॉटेलमध्ये खोली घेऊन पीत राहिलो.
बायकोनं तिच्या भावाच्या मदतीनं मला ‘मुक्तांगण’मधे दाखल केलं. त्या गोष्टीला पाच र्वष झाली. आता दारूच काय, सिगरेटसुद्धा पीत नाही.’’ - त्यांनी आपबिती सांगितली.
हे सारं ऐकून मला पुस्तकात लिहिलेल्या गोष्टी किती ख:या आहेत याची जाणीव झाली.
मेंदूच्या कामात आलेली संथ गती, विस्मरण आणि कार्यक्षमता कमी होणं हे सगळं घडलेलं मी थेट त्या अनुभवातून गेलेल्या माणसाच्या तोंडून ऐकत होतो. आपला मेंदू असा कायमचा आकसण्याचा आजारच देतं हे व्यसन.
- मग ते सोडायला नको? - कायमचं??
 
(सहकार्य- मुक्तांगण व्यसनमुक्ती केंद्र, पुणे)