शहरं
Join us  
Trending Stories
1
बीड जिल्ह्यात मुसळधार पाऊस, नद्या-नाले तुडुंब; जीप वाहून सहा जण अडकल्याची भीषण घटना
2
कावड-पालखी सोहळ्यातील ट्रॅक्टरचा अकोला दगडीपुलाजवळ अपघात, २२ भाविक जखमी
3
सी.पी राधाकृष्णन यांना उपराष्ट्रपतिपदाचे उमेदवार बनवण्यामागे भाजपाची खेळी काय? जाणून घ्या
4
कोल्हापूर सर्किट बेंच झाले, आता खंडपीठाचा प्रस्ताव द्या; सरन्यायाधीश भूषण गवईंची सूचना
5
जलसमाधी आंदोलनावेळी नदीत उडी घेणाऱ्या 'त्या' आंदोलनकर्त्याचा मृतदेह १५ किमी अंतरावर सापडला
6
दहीहंडीला २४ तासांत तब्बल १.१३ कोटी दंड वसूल; वाहतूक पोलिसांनी बेशिस्त गोविंदांना लावला चाप
7
मोठी बातमी! महाराष्ट्राचे राज्यपाल सीपी राधाकृष्णन उपराष्ट्रपती पदाची निवडणूक लढणार; भाजपाची घोषणा
8
योगींच्या गोटात खळबळ! १०० हून अधिक आमदारांचा पत्ता कट होण्याची शक्यता; सपाही टेन्शनमध्ये...
9
लग्नानंतर ४५ दिवसांत असं काय घडलं, २७ वर्ष युवकानं स्वत:ला संपवलं?; आईला केला होता शेवटचा कॉल
10
पावसाळ्यात बेडूक येतात तसं निवडणूक आल्यावर जरांगे बाहेर पडतात; भाजपा आमदाराची बोचरी टीका
11
न्यायालयात लेखी स्वरुपात देणार का? निवडणूक आयोगाच्या 'त्या' वक्तव्यावर काँग्रेसचा पलटवार
12
'आता तरी उठा' या पुण्यातील बॅनरवरून अण्णा हजारेंनी मौन सोडलं, म्हणाले, "हे माझं दुर्दैव..."
13
महाराष्ट्रातील मतदानावर आरोप, ECI नं राहुल गांधींना सुनावलं; "निकालानंतर आरोप केले, पण आजपर्यंत एकही..."
14
जिथे नवीन मतदार, तिथे BJP चा विजय; महाराष्ट्रात जादूने १ कोटी मतदार निर्माण झाले- राहुल गांधी
15
दावा जगाची युद्धे थांबविल्याचा, ट्रम्पना वॉशिंग्टन डीसीतील परिस्थिती आवरेना...; दुसऱ्या राज्यातून सुरक्षा मागविली
16
आई-पत्नी आणि मुलीसमोर तरुणावर तलवारीने हल्ला; एका व्हॉट्सअॅप फॉरवर्डमुळे गेला जीव
17
७ दिवसांत प्रतिज्ञापत्र द्या अन्यथा देशाची माफी मागा; निवडणूक आयोगाचं राहुल गांधींना चॅलेंज
18
उतावीळ...! नोबेल द्या नाहीतर प्रचंड टेरिफ लावू...; ट्रम्प यांची नॉर्वेच्या अर्थमंत्र्यांना धमकी
19
'मत चोरी'च्या आरोपांना आम्ही घाबरत नाही; राहुल गांधींना निवडणूक आयोगाचे उत्तर
20
तुमचं पॅन कार्ड हरवलंय? काळजी करू नका, घरबसल्या फक्त ५ मिनिटांत मिळेल डुप्लिकेट ई-पॅन

गावोगावच्या तरुणांना वास्तव छळतं तेव्हा.

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: December 20, 2018 12:34 IST

रोज अंधारात हरवणारी गावं, त्या गावातली तरणी पोरं, काळोखात उभ्या बाभळीची सळसळ हे सारं गावोगाव काय सांगत असतं?

ठळक मुद्देआमच्यातला रु जलेला अंधार असा उपटून फेकता येणार नाही. हे स्मरणदिवे आमच्या अस्तित्वाची राख होईर्पयत विझणार नाहीत..

- अरुण तीनगोटे 

गावाकडे प्रचंड लोडशेडिंग. उजळलेले दिवे दिसणं ही दुर्मीळ गोष्ट होती. उन्हाळ्यात लोडशेडिंग आणखी वाढायचं. मग उन्हाळ्याचे दिवस अधिक असह्य होऊन जायचे. दुपारी रणरणत्या उन्हाने जिवाची लाही लाही व्हायची. घरासमोरच्या खळ्यातला चारा आपोआप पेटून जाईल असं वाटायचं. संध्याकाळ होईर्पयत तिथली गाय चारापाण्यासाठी हंबरायची. विजेच्या तारेवर कधीतरी एखादं चुकार पाखरू दिसायचं. दुपार सहन करून संध्याकाळ होण्याची वाट पाहणं मुश्कील व्हायचं. नदीकाठच्या बाभळीवर संध्याकाळी बगळे येऊन बसायचे, हे त्यातल्या त्यात बरं होतं.या अशा अंधारून येणार्‍या संध्याकाळी पुलावर बसून घरी जाणार्‍या बैलगाडय़ांचे आवाज ऐकणं कानाला चांगले वाटायचे. रात्नी जेवण झाल्यानंतर बायाबापडे घरासमोरच्या ओटय़ावर गप्पा मारत बसायचे. कधी कधी थंड हवेची झुळूक यायची, ते शरीराला मस्त वाटायचं. समाजमंदिराजवळ देवीचं एक छोटंसं देऊळ होतं. तिथं रोज रात्नी आदिवासी मुलं गाणी म्हणायची. त्या शांततेत ती गाणी कानाला फार श्रवणीय वाटायची. त्या गाणार्‍या मुलांमध्ये एक सावळ्या रंगाचा दणकट पोरगा होता. तो सावळा होता आणि सर्व त्याला प्रेमाने भोर्‍या म्हणायचे. त्याचा आवाज जाडाभरडा तरीही गोड होता.‘तुझ्याविना मला कुणी नाय, अंबाबाय..’  हे गाणं ते नेहमी म्हणायचे. गावची आठवण आली की, मला नेमकं  हेच गाणं आठवतं. मग मिट्ट काळोखात हरवलेल्या बाभळी आठवतात. मिणमिणता दिवा लागलेलं आमचं घर आठवतं. ओटय़ावर आराम करणारे वडील आठवतात. त्यांचे घट्टे पडलेले हात आठवतात. त्यांच्या पायातली कुरूपं आठवतात. सतत काहीतरी मोजणारी त्यांची बोटं आठवतात. त्यांचं दचकून झोपेतून उठणं आठवतं. मनाशी बोलत राहणं आठवतं..आयुष्यभर संघर्ष करून, अनेक पराभव सहन करून पुन्हा पुन्हा जिंकण्यासाठी त्यांचं लढणं  आठवत. सतत आनंदी दिसणारी माणसं आतून दुर्‍खानं पोखरलेली असतात. छोटय़ा छोटय़ा गोष्टीत आनंद शोधू पाहणारं त्यांचं मन नैराश्य टाळू शकत नाही. काही माणसांच्या लढाया त्यांच्या मरणार्पयत संपत नाहीत. कदाचित मरणानंतरही. कधीतरी सकाळी सकाळीच ‘अच्छो को बुरा साबित करना, दुनिया की पुरानी आदत है..’ या ओळी गाणारे वडील आठवतात. आपण वडिलांचा आवाज विसरत जातो, ही किती वाईट गोष्ट आहे.या विस्मरणाचं काय करायचं असतं? जेवायला बसल्यानंतर सर्वात प्रथम ज्वारीच्या भाकरीचा एक कोरडा तुकडा मोडून खाणार्‍या वडिलांचे हात अचानक आठवायला लागतात, तेव्हा नेमकं काय करायचं असतं?कधी कधी वाटतं की, हे आठवणीचं मोहळ कुणीतरी उठवलं पाहिजे. आपली स्मरणशक्ती कुणीतरी हिरावून घेतली पाहिजे. हे मन आणि मेंदू रात्नीच्या काळोखात मिटून का जात नाही? जुन्या दिवसांची पाटी कोरी करकरीत का होत नाही? पण आमच्यातला रु जलेला अंधार असा उपटून फेकता येणार नाही. हे स्मरणदिवे आमच्या अस्तित्वाची राख होईर्पयत विझणार नाहीत..